जरा घाईतच मी ऑडीमध्ये घुसले.... ऑडीमध्ये आज परत तशीच गर्दी होती. मी निशांतला शोधत आत गेले.., पण तो काही दिसत नाही बघून जाणार होते की, ऑडीचा दरवाजामध्ये निशांत उभा होता. मी धावत त्याच्या जवळ गेले.. "अरे निशांत.., आपण कुठे करूया प्रॅक्टिस.?? इथे तर खुप गोंधळ आहे." मी जवळ जाऊन बोलले.
"एक काम करू.. आपलं कॉलेज संपलं की माझ्या घरी जात जाऊया प्रॅक्टिसला टेरेसवर... तिकडे फक्त आपणच असु., म्हणजे कोणाचा दुसऱ्याचा त्रास नाही होणार." तो पूढे चालत बोलला. "आपण उद्यापासुन प्रॅक्टिस करूया तुझ्या घरी.. कारण आज मला शॉपिंगसाठी ही जायचं आहे." मी त्याच्या मागे चालत बोलले. त्याने माझ्याकडे बघत आपला हाताचा थम्ब दाखवत तो निघाला. त्याला बाय करून मी स्वतःच्या क्लासमध्ये निघून गेली... हर्षु आज येणार नव्हती असा तिने आधीच मॅसेज केला होता.. कारण उद्या मॅडमचा बर्थडे जो होता.. मला ही घरी जाऊन शॉपिंग सुद्धा करायची होती.. जस कॉलेज संपलं मी घरी जायला निघाले.
सोफ्यावर स्वतःला झोकुन दिल... "आई गं, मला एक कप चहा देतेस का.??" मी बसल्या बसल्याच बोलले. तिने ही तो तय्यारच ठेवला होता.. जस काय तिला कळलं असाव मी येऊन तिला तेच सांगणार होते... "कशी असते नाही आई.., तिला सगळं कळत आपल्या मुलांच्या मनातलं.." मी हसत तो चहाचा कप घेतला. "आई.., शॉपिंगला जायचं आहे आपल्याला.., काल रात्री बोलले ना तुला. आज हर्षुचा बर्थडे आहे आणि तिची थीम आहे की, गर्लनी लॉंग वन पीस आणि बॉईजनी कोट, बलेजर घालून यायचं.. तुला तर म्हाहित आहे ना तीच सगळं कसं असत. त्यामुळे जाऊया.. मी बाबांना सांगितलं आहे. ते बोलले होते तुला कॉल करून ठेवतील." मी चहा संपवत बोलले..
आई किचनमधून बाहेर येत बोलली... " हो ग, बोलले हे मला.. तुम्ही बाप-लेक शहाणे आहात म्हाहित आहे मला. मी एकटी पडते.. पण काही दिवसांनी माझी बाजु घेणारा ही येईल." मी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं... "तुझा नवरा ग.." आई हसत बोलली.. "आई ग, काही ही असत तुझं तर. त्याला अजून खूप वेळ आहे." मी उठत स्वतःच्या बेडरूमध्ये जात बोलले. फ्रेश होऊन आम्ही शॉपिंगसाठी जायला निघालो.
मॉलमध्ये गेल्यावर एका शॉपमध्ये लॉंग ड्रेस लावले होते.. आम्ही त्या शॉपमध्ये गेलो.. "आई हा कसा आहे..??" मी हातात एक ड्रेस घेऊन बोलले.. "हा ठीक आहे ग प्राजु.. हा बघ.., तुझ्यावर हा रंग मस्त वाटेल." तिने एक ग्रे विथ पिंक कॉम्बिनेशन असलेला ड्रेस दाखवला. आणि खरच तो खूप छान वाटत होता. मग चेंजिंग रूमध्ये जाऊन फिटिंग बघितली आणि येऊन आईला तोच डन करायला सांगितला.
ते घेऊन आम्ही हिल्स वाल्या शॉपमध्ये गेलो आणि त्याच्यावर सूट होतील असेल सिल्वर हिल्स घेतल्या. त्यानंतर टायटन च्या शॉपमध्ये जाऊन आम्ही तिच्यासाठी एक छान अस घड्याळ घेतलं. नंतर थोडी फार शॉपिंग करून आम्ही घरी परतलो. "छान झाली नाही शॉपिंग." मी आईकडे बघत बोलले. तिने मानेनेच होणार दिला. तिनेही काही कुर्ते आणि एक जीन्स घेतली होती. हे सगळं बाजुला ठेवून मी आईला जेवणात मदत केली.. जेवत बनत असता बाबा ही आले. मग मी जाऊन बाबांना आजची शॉपिंग दाखवली.. बाबांही ड्रेस फार आवडला. त्यांच एक छान होत की, त्यांनी मला लहानपणापासून कोणत्याच गोष्टीला नकार नाही दिला.. मग ते बॉईज सोबतच मैत्री असो की, कपडे. त्यामुळेच बाबा माझे मित्रच झाले होते.
सगळं आवरून आम्ही झोपलो. मी निशांतला मॅसेज केला. तर त्याचा काही रिप्लाय आला नाही. कदाचित झोपला असेल म्हणून मी पुस्तक वाचत बसले. कारण मला हर्षुला रात्री बाराला कॉल करून विश जे करायचं होतं.. वाट बघता बघता चांगल्याच डुलक्या लागत होत्या.., पण स्वतःला कंट्रोल करत मी कधी एकदा घडाळ्यात बाराचा टोल वाजतोय याची वाट बघत होते आणि वाजला.
To be continued.....