Addiction - 10 in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | एडिक्शन - 10

Featured Books
Categories
Share

एडिक्शन - 10




काही दिवसावरच निशाचा साखरपुडा येऊन ठेपला होता ...लग्न लवकरच असल्याने लग्नाची आणि सगाईची एकत्रच तयारी सुरू झाली होती त्यात ते कपडे खरेदी करायला जाणार होते ,..लग्नपत्रिका असो की ऑफिसच काम सध्या मी बराच व्यस्त झालो त्यामुळे त्यादिवशी ऑफिसलाच काम करत बसलो होतो ..तेवढ्यात निशाचा फोन आला..तिने कपडे खरेदी करण्यासाठी मला बोलविल होत पण मला तिच्यापासून दूर राहायचं असल्याने मी कामाचा बहाणा देऊन जाण्यास नकार दिला आणि तिने रागाने फोन खाली ठेवून दिला ..थोड्याच वेळात सरानी मला केबिनला बोलविल आणि शॉपिंगला जाण्याचा वरून आदेशच आला त्यामुळे नाईलाजाने का होईना जावं लागलं ..या संपूर्ण काळात मी निशाच्या फॅमिलीच्या फारच जवळ आलो होतो ..तिचे जीजू असो की ताई किंवा मग आई सर्व मला मुलासारखंच मानत होते ..तर सरांचा मी फारच लाडका झालो होतो ..निशाच्या ताईसोबत तर माझी छान गट्टी जमली होती आणि तिच्या छोट्याश्या मुलीसोबत वेळ घालवण्यास मला नेहमीच आवडत असे..

कपडे खरेदी करण्यासाठी सर्वच मॉलमध्ये पोहोचले होते आणि नंतर मीही त्यांना जॉइन झालो ..मी जसा आत पोहोचलो निशाच्या ताईने त्यांच्या चिमुकलीची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि बाकी सर्व आपली खरेदी करण्यात व्यस्त झाले ..ताईची मुलगी फारच क्युट होती त्यामुळे ती सोबत असली की मला फार आनंद मिळायचा ..सर्व कामात व्यस्त असताना मी तिला मॉलमध्ये फिरवू लागलो ..बाजूलाच एक टेडी बिअरची शॉप होती त्यातला एक क्युटि मी तिला घेऊन दिला ..बाजूलाच कॅप्स होत्या ज्यात मला एक पांढऱ्या रंगांची गोल टोपी दिसली ...मी तिच्या डोक्यावर ती पकडली आणि त्या टॉपिला देखील अधिकच शान आली ..चिमुकलीला देखील फिरण्यात खूप जास्त मज्जा येत होती ..नंतर आम्ही मोर्चा सर्वांकडे वळविला ..निशा साडी खरेदी करण्यात व्यस्त होती पण तिला एकही साडी आवडत नव्हती ..बाजूला साड्यांचा पसारा पडला होता ..सेल्समन साड्या दाखवून त्रासला होता तरीही मॅडमच मन काही तयार होईना ..मी तिथे पोहोचलो ..आणि तीच माझ्याकडे लक्ष गेलं ..आता ती प्रत्येक साडी घ्यायची आणि मला इशारा करून विचारायची ..एक दोनदा अस झालं की सर्वाना साडी आवडली होती पण मी फक्त नकार दिल्याने निशाणे ती घेण्यास नकार दिला ..काही वेळात तिने पुन्हा दुसऱ्या साड्या शोधण्यास सुरुवात केली आणि मला त्यातल्या काही आवडल्याच तिला सांगितलं आणि निशाणे अगदी त्याच साड्या घेतल्या ..साड्या पाहून तिच्या चॉइसवर सर्वच खुश झाले होते त्यापेक्षा जास्त आनंद निशाला काहीतरी आवडलं याचा जास्त होता ..हळुहळु संपूर्ण मॉल त्यांनी पालथा घातला ..मग पायात लावण्यासाठी सॅंडल असो की वेगवेगळ्या वस्तू ..जिकडे - तिकडे फक्त मिश्रा फॅमिलीच दिसत होती ..शेवटी सर्वांची शॉपिंग संपली आणि आम्ही घरी परतलो ..

पाहता - पाहता निशाच्या सगाईचा दिवस आला ..सायंकाळी सगाई असल्याने मी आणि ताई सकाळपासूनच कामाला लागलो होतो ..ताई आणि मी डेकोरेशनच काम पाहत होतो तर सोबत अरेंजमेंट करणारे सर्व लोक सोबत होते ..सरानी ऑफिसला सुट्टी दिली होती त्यामुळे काही मित्र मी मदतीला ठेऊन घेतले होते ..जेवणाची अरेंजमेंट योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पाहून आलो होतो आणि स्वप्नीलला तिथेच थांबायला सांगितलं होतं .लॉण सजविण्याआधिच लॉनचा गेट सजवला होता ..सरांचे फॅमिली मेम्बर शिवाय काही खास मित्र येणार असल्याने त्यांनी मला सोहळा उत्कृष्टच झाला पाहिजे अशी ताकीद दिली होती त्यादृष्टीने मी सर्व तयारी करू लागलो होतो ..लॉन असा शोधला होता जिथे निसर्गप्रेमींना अधिकच आनंद मिळेल ..त्यात वेगवेगळ्या फुलांनी , फुग्यांनी लॉन सजविला होता ..फुलांच्या वासाने संपूर्ण लॉन दरवळून निघाला होता ..सर्वांसाठी खास टेबल देखील सजवून झाले होते ..तर निशा - योगेशसाठी स्टेज देखील तयार झाला होता ..सजावट बघून ताई आणि मी फारच खुश झालो होतो ..तेवढ्यात निशाच्या आई आल्या ..आम्ही सकाळपासूनच काम करण्यात व्यस्त होतो त्यामुळे आम्ही दोघाणीही तयारी केली नव्हती ..आई येताच आमच्यावर रागावल्या ..त्यांनी मला कारमधून एक शेरवानी काढून दिली आणि आम्ही दोघेही तयारी करण्यासाठी घरी निघालो ..आता फक्त दोनच तास सोहळा संपन्न होण्यासाठी उरले होते ..

माझं काम अजूनही आटोपलं नसल्याने मी लवकरच तयारी करून पुन्हा एकदा परतलो ..संपूर्ण लॉन लोकांनी भरला होता ..मिश्रा फॅमिलीचे सर्व लोक दारावरच स्वागत करण्यासाठी उभे होते ..आणि योगेश - निशा दोघेही एकमेकांच्या हातात - हात टाकून गेटवर पोहोचले ..तेव्हढ्यात लॉनचे लाईट बंद झाले ..आणि त्यांची जागा हलक्याश्या प्रकाश देणाऱ्या सिरीजने घेतली ..ते दोघेही गेटवर आले आणि दोघांचही पहिल पाऊल आत पडताच वरून गुलाबांच्या पकड्यांचा वर्षाव झाला ..वर आकाश कंदील आणि त्यात हार्ट शेपचे बलून वर आकाशात उडू लागले होते ..खाली देखील गुलाबांच्या पाकळ्यांनी स्टेजपर्यंत जाण्यासाठी वाट सजवली होती आणि ते दोघे एकमेकांच्या हातात हात घालून चालू लागले ..बाजूला हळू आवाजात सुरू असलेले रोमँटिक गाणे वातावरणाला आणखीनच बहारदार बनवू लागले ..त्यांच्या मागे मिश्रा - द्विवेदी फॅमिलीचे सर्व मेम्बर चालत येऊ लागले आणि मी सर्वाना पुढे काय कारायच आहे याच्या सूचना देण्यात व्यस्त झालो ...मधातून सर्व फॅमिली जात होती आणि बाजूला सर्व लोक टाळ्यानी त्यांचं स्वागत करू लागले होते .हळूहळू पाऊल टाकत - टाकत ते स्टेजवर पोहोचले आणि संपूर्ण लाइट्स अचानक सुरु झाले ..वरून अजूनही गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरूच होता ..सर्व कस मानमोहून घेणार होत ..सरानी तयारी बघून माझी पाठ थोपटली होती ..एखाद्या ग्रँड सेरेमनीसारखाच तो सोहळा होता ..दोन्ही कुटुंब एकत्र आली आणि त्यांच्या विधिविधान पद्धतींने त्यांनी सगाईला सुरुवात केली ..मी कुठेतरी दूर उभा होतो पण एल . ई. डी. स्क्रीनवर ते दृश्य मला दिसत होतं ..काही वेळातच तिने योगेशच्या बोटात अंगठी घातली आणि ती कायमसाठी मला सोडून निघून गेली ..बाजूने ब्लास्ट होऊन रंगेबेरंगी रिबीन उडू लागल्या होत्या तर एकीकडून स्प्रेचा फवारा काही अंतरावर सुरू होता आणि दोन्ही कुटुंब एकमेकांना अभिनंदन करण्यात व्यस्त झाली ..
प्रत्येक व्यक्ती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर चढू लागला होता तर दुसरीकडे फोटो काढल्या जात होते ..शुभेच्छा देऊन सर्व जेवण करायला जाऊ लागले ..हळूहळू गर्दी कमी होऊ लागली होती ..मी सरानी सांगितलेल्या काही खास लोकांची व्यवस्था पाहण्यात व्यस्त होतो त्यामुळे त्यांना शुभेच्छासुद्धा देऊ शकलो नव्हतो ...आता जवळपास सर्वच लोक गेले होते फक्त काही फॅमिली मेम्बर उरले होते..सुगम संगीत आताही सुरूच होत ..गाणं गाणाऱ्या क्रयु ने हे शेवटच गान आहे असं सांगितलं आणि गाणं संपल्यावर एकच आवाज लॉन मध्ये दरवळू लागला ..तो होता निशाचा..ती म्हणाली , " आज हमारे इस पल को खास बनाने के लिये बहोत से लोगो ने सहकार्य किया है उस्के लिये शुक्रिया ..पर कोई और है जीसके बिना ये पल खास नही हो सकते ..शायद सबसे ज्यादा काम उसिने किया है ..प्रेम शुक्रिया यार इस पल को खास बनाने के लिये ..सॉरी मै थोडी सेल्फीश हो रही हु पर क्या तुम मुझे और एक चीज नही दे सकते ? ..प्लिज मेरे लिये ..हमारे लिये एक गाना गा दे .."
आता सर्वांच्या नजरा माझ्यावरच खिळल्या होत्या शिवाय त्यांना नाराज करणं मला परवडणार नव्हतं म्हणून मी स्टेजकडे जाऊ लागलो ..आणि सर्व देखील माझा उत्साह वाढवत होते ..स्टेजवर पोहोचलो ..हातात पुन्हा एकदा गिटार पकडली ..आणि ते फलक शब्बीरचे बोल आठवले ...

तुम्हे कोई और देखे
तो जलता है दिलं
बडी मुश्किलो से फिर
संभलता है दिलं
क्या क्या जतन करते है
तुम्हारे बिना ...
हमे इंतजार कितना
ये हम नही जानते
मगर जी नही सकते
तुम्हारे बिना ...
हमे तुमसे प्यार कितना
ये हम नही जानते
मगर जी नही सकते
तुम्हारे बिना ..

सुनो गम जुदाई का
उठाते है लोग
जाणे जिंदगी कैसे
बिताते है लोग
दिलं भी यहा तो लगे
बरस के समा
हमे इंतजार कितना
ये हम नही जानते
मगर जी नही सकते
तुम्हारे बिना
हमे तुमसे प्यार कितना ..

गाणं संपताच सर्विकडे टाळ्यांचा कळकळाट झाला आणि मी हातातली गिटार ठेवून बाहेर पडू लागलो ..मी प्रत्यक्षात तिच्यासमोर माझ्या हृदयाची स्थिती मांडली होती पण तिला याबद्दल काहीच माहिती नव्हतं ..मी कसातरी उठलो आणि फोन आल्याचा बहाणा करून बाहेर पार्किंगला गेलो ..डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून दिली आणि पुन्हा एकदा परत आलो ..ती त्या दिवशी फारच खुश होती आणि मी तिला पाहून फार खुश झालो ..पाहता - पाहता माझ्या डोळ्यासमोर तीच लग्न देखील झालं ..ती आपल्या नवीन संसारात खुश झाली आणि मीसुद्धा स्वताची एक वेगळी वाट शोधली ..बस हीच होती माझी कहाणी .

लैला को कोई और ले गया
और मजनू को अब भी है उसीकी पडी है

क्रमशः ...