Bhatkanti - punha ekda - 6 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ६)

Featured Books
Categories
Share

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ६)

" कोण कुठे निघालं आहे ? " अमोल आला तितक्यात. अमोलला काहीच सांगायच नव्हतं. तो आला समोर, काय सांगावं... सुप्री समोर प्रश्न..
" काही नाही सर , फिरायला निघायचा प्लॅन करतो आहे. ... पिकनिक... " ,
" wow !! very nice.. जाऊ या ना सगळेच... कुठे जायचे आहे... मी सुद्धा येतो... " अमोल खुशीत बोलला.
आली का पंचाईत . अमोलला काय सांगावं आता. तरीही सुट्टी घ्यावी लागेलच ना, जायचे असेल तर...
" हि माझी मैत्रीण कोमल... travelling करत असते. ती निघाली होती पुन्हा... तर तिच्यासोबत जायचा विचार होता. " संजना अडखळत बोलली.
" चालेल ना... जाऊया सर्वच... कोण कोण येणार आहे ते ठरवा. मी पप्पांची permission घेऊन येतो. " अमोल गेला. संजनाने लगेच तिच्या भटकंतीच्या ग्रुपची मिटिंग घेतली. सोबत कोमल होतीच. सुप्री मात्र या सर्वापासून अलिप्त होती.


संजनाने तिचं म्हणणं , सर्व ग्रुप समोर मांडलं. निदान एक शेवटचा प्रयत्न म्हणून सगळेच तयार झाले. फक्त अमोल काय बोलतो त्यावर मात्र हे सगळं अवलंबून होते... अमोल काही वेळाने बॉसच्या म्हणजे त्याच्या वडिलांच्या केबिनमधून बाहेर आला. सगळ्यांसोबत बसला.
" काय झालं अमोल सर... " संजनाने विचारलं.
" खूप मोठी गुड न्यूज आहे.. आपल्याला permission मिळाली. " अमोल आनंदांत बोलला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
" आणि किती दिवस माहित आहे का... २० दिवस... कदाचित महिनाभर सुद्धा... " ,
" कसं काय ? " एकाने विचारलं.
" पप्पा , महिन्याभरासाठी दिल्लीला निघाले आहेत.. आपल्या दिल्ली ब्रांचला... तर महिनाभर नाहीत ते... त्यात आपल्या ब्रांच चा बिसनेस गेल्या ६ महिन्यात इतर ब्रांच पेक्षा जास्त झाला आहे. मग सुट्टीच विचारलं तर पप्पा बोलले, घ्या सुट्टी... खूप दिवस सगळेच वेळेवर ,आणि विना सुट्टी येतात... बोलले कि मीच सांगणार होतो जा फिरायला कुठेतरी.. बंद राहू दे ऑफिस... काहीच टेन्शन नाही... मस्त ना... " साऱ्यांना आनंद झाला. इतके दिवस मिळतील शोध-शोध करायला. बरं झालं...


" मग कुठे जायचे... एखाद्या हिल स्टेशन वर.... मज्जा येईल... " अमोल आता पासूनच उत्साही होता.
" actually .... आमचा प्लॅन ठरला आहे कुठे जायचा ते... " कोमल बोलली.
" आपण सगळे राना-वनात जाणार आहोत... " एक मुलगी मागून बोलली.
" मी जरा confused आहे.. आपण पिकनिकला चाललो आहोत ... right ?? मग जंगलात .. मला काही कळलं नाही.... " अमोल.
" मी सांगते... " संजना. " आम्ही आधीही असे फिरलो आहे खूप.. जंगलातून, रानातून... सांगायचं झालं तर एक प्रकारचं ट्रेकिंग.. ",
" wow !! मी सुद्धा फिरलो आहे खूप... but हे जरा वेगळं आणि adventures वाटते... By the way, इतके दिवस जाणार आपण... राहायची सोय, जेवणाचे... अंघोळ... या गोष्टी... ?? " अमोलने प्रश्न विचारून टाकले.
" गावागावातून फिरणार ना... तिथे अंघोळ , जेवणाची सोय होते... राहायचे सांगायचे तर tent मध्ये राहायचे... " कोमलने माहिती पुरवली.
" ग्रेट... सॉलिड होणार आहे हि पिकनिक... मी आताच्या आता तयार आहे निघायला..... बोला कधी निघायचं... " अमोल.
" आज तारीख आहे २२ मे.... आपण तयारी करूया सर्व... या येत्या ३-४ दिवसात ... ह्म्म्म.... २६ मे ला निघूया... " कोमलने तारीख ठरवली.


आणखी काही बोलणी करून , कोमल निघून गेली. अमोल सहित सगळेच उत्साहात. अमोल "पहिल्यांदा असं ट्रेकिंग" करणार होता म्हणून, बाकीचे... आकाशसाठी आणि खूप दिवसांनी फिरायला मिळणार म्हणून आनंदांत. एकटी सुप्री तेवढी गप्प होती. अमोलने ओळखल. सर्व आपापल्या कामाला लागले. जेवणाच्या वेळी सुद्धा नेहमीपेक्षा शांत होती ती. जेवणाच्या सुट्टी नंतर पुन्हा सगळे कामाला लागले. अमोल आला सुप्री समोर.


" काय मॅडम ... बरं वाटतं नाही का... " सुप्रीने कामातून डोकं वर काढलं.
" हो... बरी आहे मी... मला कशाला आजारी पडता. ",
" मग, एवढे सर्व खुश आहेत पिकनिक साठी... तुझ्या चेहऱ्यावर साधीशी smile सुद्धा नाही. असं का ? " अमोलने विचारलं. सुप्रीला या विषयावर बोलायचं नव्हतं. काही कारण द्यावे लागेल याला , बोलावं लागलं.
" मी गरीब आहे ना ... मला सोडणार नाहीत घरातले... एवढा खर्च जमणार नाही मला. " तोंड कसनुसं करत बोलली सुप्री. अमोलला पुन्हा हसायला आलं.
" हो, गरीब आहेस ना... माहित आहे मला.. " हसला परत.
" हसा... अजून हसा... बघ रे गणू... गरीब माणसांवर हसतात लोकं... " सुप्री. हसू आवरत अमोल बोलला मग,
" टेन्शन घेऊ नकोस... पैशाची व्यवस्था मी करतो... तुझ्या घरी येतो पाहिजे तर ... तुझ्या घरच्यांना तयार करतो. झालं मग.... address दे तुझा... " ,
" कमी असली तरी अक्कल आहे ... बरं का... address मागायची चांगली आयडिया होती... but डिटेक्टिव्ह सुप्री को फसाना आसान नही... " सुप्रीच हे बोलणं ऐकून केवढ्याने हसला अमोल.... खरच कमाल आहे हि मुलगी...
" ok.... ok, तू नाही जात ना... मी हि cancel करतो मग.. या बाकीच्या लोकांना जाऊ दे... " अमोल हसू आवरत बोलला.
" अरे ... काय होतंय नक्की... मला खरंच नाही वाटत , मी जाऊ शकेन या पिकनिकला.. " सुप्री.
" चालेल ना... मी सुद्धा घरीच थांबतो... " इतक्यात संजना आली.
" का घरी थांबता सर... सकाळी तर तयार होतात तुम्ही... आता काय झालं.. " संजना विचारात पडली.
" तुझी best friend येतं नाही... म्हणून मी सुद्धा cancel करतो आहे... खरं सांग सुप्रिया.... मी येतो आहे म्हणून तू जात नाहीस ना... तसेही सांगू शकतेस... तुम्ही जा... मी थांबतो... " अमोल बोलला.
" प्लिज... सर, misunderstanding करू नका , असं काही नाही... आणि हे मनात आणूच नका कधी... कि तुमच्यामुळे असं आहे... ",
" असेल सुद्धा... " ,
" नाही.... ठीक आहे... मी माझा विचार कळवते २ दिवसात .. " सुप्री मान खाली करत म्हणाली.
" अमोल सर, आज पासूनच तयारी करा हा... वेळ मिळत नाही... सुप्री येईल नक्की... मी तयार करते तिला. " संजना कडून प्रॉमिस घेऊन अमोल निघाला. सुप्री ना संजना कडे बघत होती ना कोणाकडे. उगाचच काम करायचं नाटक करत होती. पण लक्ष दुसरीकडेच होतं.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: