घरात सनई चौघडे वाजत असतात, सगळीकडे फक्त हसण्याचा, एकमेकांना कॉम्प्लिमेंट , सावरण्याचा इत्यादी इत्यादी असे वातावरण असत . लग्न म्हटलं की हे सगळं आलाच ना. सगळ्यांना आनंद असतो की आपल्याला मिरवायला भेटणार म्हणजे काय तर हे एकच क्षण असतो त्यात सगळे कसे उत्साहाने भाग घेतात , साजरा करतात.
आज लतिकाच्या बाबतीत पण हेच होत होत. खूप छान दिसत होती अगदी सगळे बघत बसतील अशी, ती सुध्दा ह्याच दिवसाची खूप वेळ वाट पाहत होती कारण लग्न हे तिच्या मर्जीनुसार होणार होत.त्यात पण ती खूप नर्व्हस होती.....
३ महिन्यापूर्वी
लतिका खूप घाबरली होती , आणि आता तिच्या डोक्यावरून पाणी गेलं होतं. काय करू आणि नको काय सुचत नव्हतं सतत तिच्या मागे लग्नाची गोष्ट नि तीच डोकं भिंणभिण्याचं पण आज आपण नाही बोलोलो तर आपल्याला खूप पुढे त्रास होणार, लतिका रूममध्ये आली तिच्या पाठोपाठ आई सुध्दा आली.
आईने तिला बसवलं आणि विचारलं ," अंग वय वाढत जाईल कोणी मग भेटणार नाही लतिका आपण आता लग्नाचं बघूया असं तुला घरी बसवणं आम्हाला नाही आवडणार मग ऐक आपण करूया हां तुझं लग्न"
लतीकाला आईकडे बघून इतक वाईट वाटलं की आई तरी आपल्याला आपल्या मनातील विचार पण कोणाला काय पडली नाही
आज काही पण आपण बोलायचं काहीही होउ दे कारण आपण जर जास्त खेचलं तर खूप काही वेगळं होऊन बसेल
लतिका आईचा हातात हात घेऊन थोडं घाबरून , "आई ऐक ना मला लग्न करायचं पण माझ्या पसंतीच्या मुलासोबत "
लतिका ची आई आंनदाने," अंग मग करूया ना काय हरकत आहे ,(तिला मुलाचा फोटो दाखवत) बघ हां कसा आहे ..?"
लतिका ," अंग आई असं नाही ग , मी डायरेक्ट बोलते मी निवडलेल्या मुलासोबत मला लग्न करायचं"
लतीकाची आई ला खूप मोठा धक्का लागतो आपली लतिका असं करू शकते
लतिका," आई आई अंग ऐक ना मला माहितीय कि मी खूप मोठा धक्का दिलाय पण खरच मी वाईट नाही केलयं , आणि मला सांग कोण अशी व्यक्ती आहे ती आपल्या स्वतःबद्दल वाईट विचार करेल आई तो मुलगा खरच चांगला आहे आणि तो चांगल्या नोकरीवर पण आहे सरकारी नोकरी आहे त्याला स्वतःच्या पायावर उभा आहे , आणि त्याचबरोबर त्याच स्वतःच घर पण आहे ते तो बांधतोय. आई ऐक ना बाबांना तू सांगशील काय? ग"
लतीकाची आई," लतिका तू असं करशील असं वाटलं नव्हतं पण आता प्रेम केलयस तू तर आम्ही तरी काय बोलणार मी बोलून बघते ह्यांच्याशी तू जा तुझ्या अभ्यासाला संध्याकाळी काय जे बोलतील ते ऐकून घे"
लतिका काही जास्त न बोलता अभ्यासाला निघून जाते , लतीकाची आई पण ऑफिसला निघून जाते, लतिकाला माहिती असत कि काहीही झालं तरी आई ऑफिसला गेल्यावर हि बाबांना कॉल लावणार आणि सांगणार . फक्त सगळं ठीक होउ दे
दुपारपर्यंत लतीकाच्या मनात फक्त एकच विचार येत होते ते कि बाबा आपल्याला खूप ओरडणार , बोलणार सतत विचार करून करून तीच डोकं फिरलं होत बस्स आता काही विचार करायचा नाही मग डोकं फुटेल आपलं.
संध्याकाळ होते तेव्हा , बाबा आणि आई घरीच आलेले असतात. लतिका आईकडे बघून डोळ्याच्या इशाऱ्याने "सगळं ठीक आहे ना' आई पण रिलॅक्स होयला सांगते , लतिका आईजवळ बसते , बाबा बोलायला सुरुवात करतात , "हां मला एक गोष्ट काळाली कि तुझं ठरलंय लग्न , म्हणजेच तू ठरव्रणार स्वतःच हो ना...?