Addiction - 9 in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | एडिक्शन - 9

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

एडिक्शन - 9




हळूहळू दिवस जाऊ लागले आणि शेवटी कॉलेज संपण्याच्या वाटेवर आल..कॉलेज जीवनातला शेवटचा आणि आठवणीतला प्रसंग म्हणजे स्नेहसंमलेन ..मला लहानपणापासूनच गाणं गायला आवडत असे त्यामुळे गितार वाजवायला शिकून घेतली होती ..निशाही बऱ्याचदा स्टेजवर गायली होती ..मी तिच्यासोबत एकदा गावं अशी तिची इच्छा असल्याने मी तिच्यासोबत गायला तयार झालो होतो ..एक्ससायटमेंट तर होतीच पण भरपूर दिवसाने गाणार असल्याने भीतीही वाटत होती आणि शेवटी नाव अनाउंस झालं आणि आम्ही स्टेजवर पोहोचलो ..मी माझी पोजिशन घेतली आणि एक लांब श्वास घेऊन गायला सुरुवात केली ..


थोडा सा प्यार हुआ है
थोडा है बाकी
थोडा सा प्यार हुआ है
थोडा है बाकी ..
हम तो दिलं दे ही चूके
बस 'तेरी हा है बाकी
थोडा सा प्यार हुआ है
थोडा है बाकी ...

कौन सा मोड आया
जिंदगी के सफर मे
बस गया तू ही तू
अब तो मेरी नजर मे
दिलं की हर एक धडकन
तुझको पहचानती है
मेरी चाहत है अब क्या
तू नही जानती है

( आणि ती म्हणाली )

मै तुझे जाण गयी
तुझको पहचान गयी
फिर भी 'तेरी
हा है बाकी
थोडा सा प्यार हुआ है
थोडा है बाकी

आज ये क्या हुआ है
दिलं नही मेरा बसमे
इसलीये सोचता हु
तोड दु सारी रसमे
उमरभर के लिये तू
आ मेरा साथ दे दे
तेरा हो जाउंगा मै
हाथो मे हाथ दे दे

हाथो मे हाथ सही
तू मेरे साथ सही
फिर भी 'तेरी
हा है बाकी
थोडा सा प्यार हुआ है
थोडा है बाकी ..
थोडा सा प्यार हुआ है
थोडा है बाकी ...

गाणं जस संपलं तसाच संपूर्ण हॉल टाळ्यानी गजबजला ..आम्हाला ड्युएटच पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळालं होतं ..बक्षिसाकडे पाहून ती आज फारच खुश असल्याचं जाणवत होतं ..आणि ती पटकन बोलून गेली , " प्रेम तुझे पता है आज मेरा दिलं कर रहा है की तुझे किस करू ..( मी मनात म्हणालो मग वाट कसली दे लगेच )..पण पुढच्याच क्षणी ती म्हणाली .पर अभि नही ..इक दिन आयेगा ऐसा जब तुझे तेरा गिफ्ट मिल जायेगा ..मुझे तो मेरा मिल गया ..ऊस वक्त का इंतजार कर ...मी तिच्याकडे पाहून हसलो आणि बर का आजही वाट पाहतोय तिच्या ओठांच्या मोहरची आणि ती मिळण्याची चिन्हेही दिसत नाही आहेत ..

या एका क्षणाने आमची कॉलेज लाइफ संपली ..कॉलेज जरी संपलं असलं तरीही आम्ही दोघे अगदी तसेच होतो ..आमच्यात काहीच बदल झाला नव्हता ..एकमेकांसाठी वेळ काढणं असो की फिरायला जाण सर्व काही सारखच होत ..एकाच शहरात राहत असल्याने आमच्यात कुठलाच दुरावा आला नव्हता .शिवाय आता कॉलेज लाइफ संपली असल्याने मला ती माझ्या आयुष्यात कायमची हवी होती,..आता कुठलाही दुरावा मला नको होता ..म्हणून मनातली गोष्ट तिला सांगायची ठरवल ...उत्तर काय असेल ते माहिती नव्हत तरीही सांगायचं होतच ..

अशाच एका दिवशी तिने स्वताच मला फोन केला आणि भेटायला बोलावलं ..तेव्हा तिला माझ्या मनातलं सांगण्यासाठी उत्तम संधी सापडली होती ..मला ऑफिस असेल म्हणून तिने सायंकाळी मला भेटायला बोलावलं होतं ..मी सकाळपासूनच काय बोलू , कस सांगणार असे भरपूर विचार डोक्यात सुरू होते आणि अधिकच भीती जाणवू लागली ..तिने तीच्या वाढदिवसाला मला दिलेला शर्ट परिधान करून मी तयार झालो ..आधी कधीतरी वेंधळ्यासारखा बाहेर जाणारा मी आज मात्र जय्यत तयारी करून बसलो होतो ..कित्येकदा स्वतःलाच आरशात पाहिलं होतं आणि स्वतःच्याच प्रेमात पडलो ..ती मला होकार देईल यात कुठलीच शंका माझ्या मनात नव्हती आणि पोहोचायला वेळ लागणार म्हणून लवकरच निघालो ..सायंकाळी 7.30 वाजले होते जेव्हा मी हॉटेल ला पोहोचलो आणि तिची येण्याची वाट पाहू लागलो ..काहीच वेळात ती आली पण सोबत कुणीतरी होत ..त्यामुळे तिला सर्व काही सांगता येणार नाही हे पक्के झालं होतं ..मी उदास जरी असलो तरी चेहऱ्यावर खोटा आनंद आणून तिच्याशी हात मिळविला आणि सोबत जो आला होता त्याच्याशी पण हात मिळविला ..काहीच क्षणात आम्ही चेअर वर बसलो ..
निशाणे आम्हा दोघांचीही एकमेकांशी ओळख करून दिली ..सर्वप्रथम आम्ही खायला मागवून घेतलं आणि तिनेच बोलायला सुरुवात केली , " प्रेम आज मेरी जिंदगी का सबसे खास दिन है और सबसे पहले खूषखबरी तुम्हे ही देणा चाहती हु इसलीये तुम्हे यहा पर बुलाया है ."

आणि मी हसून म्हणालो , " खूषखबरी ? " ,

आणि ती हसून म्हणाली , " हा खूषखबरी ..योगेश और मेरी शादी होणे वाली है .."

हे ऐकल्यानंतर तर मला शॉकच बसला .हृदय जोराने धडधड करू लागल होत फक्त डोळ्यात अश्रू यायचे बाकी होते ,..कदाचित ते पण येणारच होते पण मी त्यांना कसतरी आवरून घेतलं ..मी तिला माझ्या मनातलं सांगायला फारच उशीर केला होता ..अशाही स्थितीत मी तिला आणि योगेशला शुभेच्छा दिल्या ..आज योगेश तिच्या हातात हात घालून बोलत होता आणि मी सर्व काही उघड्या डोळ्याने पाहत होतो ..अस वाटत होतं की लगेचच बाहेर पडावं पण त्यांना वाईट वाटणार म्हणून मी कसतरी स्वताला सांभाळून घेत होतो ..शेवटी योगेशला उशीर होत असल्याने ते निघाले ..आणि मीही माझ्या वाटेला निघालो ...खुप वेळ मी माझे अश्रू लपवून ठेवले होते ..घरी आलो आणि अश्रूंना मोकळी वाट करून दिली ,..प्रेमात पडन खूप सोपी असत पण ती आपली होऊ शकत नाही हे स्वीकारण खूप कठीण असत हे त्याक्षणी जाणवू लागल..कितीतरी वेळ अश्रूंनी डोळ्यातली हक्काची जागा सोडली नव्हती ..तिची मला सवय झाली होती तेव्हा आता ती आपल्या आयुष्यात नसेल तेव्हा काय करायचं , कस जगू तिच्याविना असे बरेच प्रश्न डोक्यात निर्माण झाले होते पण आता ती दुसर्याची अमानत होती त्यामुळे तिला विसरन भाग होत ..आणि तिला मनातून कायमच काढून टाकण्याचा निर्णय पक्का केला ..

त्या दिवसानंतर आमच्यातील नात पूर्णच बदललं ..मी शक्यतो तिला टाळण्याचा प्रयत्न करू लागलो होतो ..कॉल आला तर एखाद्या वेळेला रिसिव्ह करायचो पण फिरायला जाण या दिवसात पूर्णतः टाळत होतो .. मॅसेज तर आता बंदच झाले होते ..मला तिच्यापासून दूर राहायचं होत पण तिच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होत ..तिने बाबांशी बोलून आपल्याच कंपनीत मला जॉबवर लावून दिलं ..खर सांगू तर मला तिथे काम करायला अजिबात आवडणार नव्हतं पण तिच्या बाबांनी मला स्वतःच्या मुलासारखं प्रेम दिलं होतं त्यामुळे त्यांना नकार देऊन दुखावन मला कदापि शक्य नव्हतं ..काही दिवसातच मी बँकेच्या जॉबला राजीनामा देऊन सरांकडे रुजू झालो ..सरानी घरचाच असल्याने पगार पण फार जास्त दिला होता शिवाय राहण्याची व्यवस्था आणि गाडी अस सर्वच देऊ केलं ..मीही माझं संपूर्ण काम जबाबदारीने करू लागलो ..त्यामुळे सर माझ्यावर फार खुश होते ..

निशाच लग्न आता फक्त 3 महिन्यावर येऊन ठेपल होत ..सरांना दोन्ही पण मुलीच होत्या शिवाय त्यांच्यावर कामाच भरपूर ओझं असल्याने त्यांनी मला निशाच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी सोपवली व मी ती आनंदाने स्वीकारली ....सुरवातीच्या दिवसात मी फार तर ऑफिसचे काम न करता तिच्या विवाहाची तयारी करण्यात व्यस्त होतो ..सरांचे निशाच्या लग्नाच्या बाबतीत फार स्वप्न होते आणि ते त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखविले होते ..मीही त्याच अनुषंगाने कामाला सुरुवात केली ..ती एक ग्रँड सेरेमनी होणार होती त्यामुळे मला फार जास्त काम करावं लागणार होत ..लग्नाच्या पत्रिकेपासून तर पायांच्या जोड्यापर्यंत सर्व मला अरेंज करायचं होतं त्यामुळे कामाचा फार त्राण वाढला होता आणि अशातच सगाईची तारीख देखील आली ..

क्रमशः ..