आजोबा नेहमी त्याच्याकडून झाडं घेत असल्याने त्यांची आणि आजोबांची छान ओळख होती. सोबत निशांतची ही. आम्ही सुंदर फुल झाड घेतली. वेगवेगळ्या रंगाची, सुंदर अशी फुलझाडं बघून तर मी वेडीच झाले होते.. त्या नर्सरीमध्ये फुलपाखरा सारखी इकडून तिकडे उडत होते. काही कॅकट्स ची झाड ही घेतली. काही फळ झाड, तर काही भाज्यांची रोपटी.. टमाटर, गवती चहा... मोगरा, शेवंती, गुलाब.. खुप छान वाटत होतं. मी तर तितेच हरवुन राहील म्हणून निशांतची माझ्यावर नजर होती. सगळ घेऊन आम्ही निघालो.. येताना सगळी झाड ट्रकमध्ये ठेवली. मी आणि निशांत अजून ही मागे बसलो होतो.
लवकर येऊन आम्ही काही झाड लावणार होतो.. बाकीची आजोबा लावणार होते. जसे आम्ही घरी पोहोचलो आजींनी सर्वाना दम दिला.., जेवल्या शिवाय काही काम करायचं नाही. मग काय त्यांच्यापुढे कोणाचं काही चालत.. "जिथे आजोबांचं चालत नाही इथे आम्ही कोण...???!" मग आम्ही आधी पेटपूजा आणि नंतर गार्डनच काम करत बसलो. अर्धी झाडं लावून मी आणि बाबा फ्रेश होऊन निघण्यासाठी निघालो.. ते बोलत बसले बघून मी लगेच निशांतच्या रूमध्ये गेले. तर हा झोपला होता. पुढे बघायला गेले तर हा गाड झोपेत बघुन मी एक स्माईल देत त्याच्या अंगावर पांघरूण घातल आणि निघाले असता.. त्याने माझा हात धरला..
अचानक अस झाल्याने मी मात्र चांगलेच घाबरले. मागे वळुन पाहिलं तर हा हसत होता... "दुष्ट आहेस तू निशांत..." मी जरा ओरडलेच.. "किती घाबरशील.. आता या रूमध्ये तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणी आहे का.., मग कशाला घाबरायचं." मी स्वतःचा हात सोडवुन घेत निघु लागले तसा तो पटकन उठला आणि मला थांबवलं.. "अग हनी-बी थांब जरा.. तुझ्यासाठी काही तरी आहे." मी प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारल असता तो मला फक्त थांब एवढंच बोलला.
त्याने के पिशवी माझ्या हातात दिली.. "हे घे तुझ्यासाठी माझ्याकडून.." ती पिशवी मी घेतली आणि बघितल तर आत एक गुलाबाच रोपटं होत. "रेड रोज.." "हे कशाला निशांत..??" मी हसुन विचारल तस त्याने माझ्या हातातली पिशवी खेचून घेतली.... "ओके नको ना तुला... दे हर्षल ला देतो." हे ऐकून मी लगेच त्याच्या हातातली पिशवी घेतली आणि निघाले.. दरवाजा जवळ जाऊन मागे फिरले आणि मोठ्याने त्याचे आभार मानले.... "खडूस थँक्स..." एवढं बोलुन स्वतःचे तोंड वाकड करून खाली पळाले.. हे तो फक्त उभा राहून हसुन बघत होता.
मग सर्वांचा निरोप घेऊन मी आणि बाबा घरी आलो. घरी येताच मी आईला निशांतने दिलेलं रोपटं दाखवलं.. "आई.., हे बघ निशांतने मला हे गिफ्ट केलं." मी हातातलं गुलाबाचं रोपटं दाखवत बोलले. "अग.., पण निशांत तर येणार नव्हता ना. मग कसा आला. " आजी जरा कन्फ्युज होत विचारत होती. मग मी तिला शॉर्टमध्ये सगळं सांगितलं. आणि रोपटं लावायला निघून गेले.... रोपटं लावून मी निशांतला फोटो ही पाठवला. आणि हात धुवून अभ्यास करत बसले.
आईच्या हाकेने भुकेची जाणीव झाली. बाहेर येऊन आम्ही जेवलो सोबत बाबांच्या आणि माझ्या नर्सरीमधल्या गप्पा होत्याच.. आई देखील सगळं मन लावून ऐकत होती. सगळं आवरून मी निद्रेच्या स्वाधीन झाले... सगळं आठवुन गालातल्या गालात हसत मी झोपी गेले...
आता माझा पाय अलमोस्ट बरा झाला होता. आम्ही एक-दोन दिवसांनी आम्हची प्रॅक्टिस ही चालू करणार होतो. आणि तो दिवस जवळ आला. हर्षलचा बर्थडे.. ती तिच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी. त्यात तिचे वडील हे तिथले आमदार. सो तिचा बर्थडे काही साधा नव्हताच होणार... सगळं काही रॉयल होणार होत..
बघु काय धमाल करतात ते बर्थडे पार्टीमध्ये.. मज्जा येणार की अजून काही होणार....,
to be continued.....