धारावाहिक कादंबरी ..
जिवलगा .. भाग -५ वा .
ले- अरुण वि.देशपांडे
------------------------------------------------------------
बराच वेळ झाला तरी अजून बस निघत नाहीये ?,काय झाले असावे ?
खाली पण खूप काही गोंधळ चालू झाला आहे , मोठ्या मोठ्या आवाजात बोलणे चालू आहे, हे जाणवत होते ,
काही तरी मोठा प्रोब्लेम नक्कीच झालाय ,खाली उतरून पाहिल्या शिवाय कळणार पण नाही .
.नेहा बसच्या खाली उतरली ..तिच्या बस मधले अर्धे अधिक प्रवासी खाली उभे आहेत, हे तिला दिसले,
एक मध्यम -वयीन महिला आणि तिच्या सोबत ८-आठ दहा वर्षाचा मुलगा खूप घाबरलेल्या अवस्थेत उभे होते आणि त्यांच्या भवती लोकांच्या गराडा होता.
नेहाच्या कानावर एकेक संवाद पडू लागला .
बाई रडवेल्या आवाजात सांगत होत्या ..
अहो , माझी बस ही नाहीये ..हे दुसरीच आहे,
मी चुकून याच बस मध्ये चढले आणि बर्थवर आडवी झाले ,
माझा मुलगा म्हणाला ,आई, आग, ही बस नाहीये आपली , बघ ..हे समान पण आपले नाहीये ....
सगळे लोक म्हणाले ..अरे बापरे ..हे काय ,दोन गाड्या सारख्या .आदला बदली झाली की काय पेसेंजर ची ?
एकाच कंपनीच्या दोन गाड्या शेजारी शेजारी उभ्या राहिल्या , एक निळी -पांढरी ,तर दुसरी -पांढरी -हिरवी ..एक नांदेड -पुणे ,आणि दुसरी पुणे -नांदेड ..बाई तुमची बस कोणती ..
?मी पुण्याहून नांदेडला जाते आहे ..आणि आता चुकून या गाडीत बसली आहे , पण ही बस तर .नांदेड-पुणे आहे.. अरेच्च्या .मोठीच चूक केली की बाई तुम्ही
बसच्या ड्रायव्हरच्या सोबत असलेल्यापैकी एक जण म्हणाला " अहो बाई - तुम्ही खाली उतरल्यावर आपली गाडी कोणती आहे . तिचा नंबर लक्षात ठेवायला पाहिजे होता न ?
अहो ते राहू द्या बाजूला , मी चुकले हे खरे आहे ..
पण, त्या दुसर्या गाडीत या बसमधले दोन प्रवासी .ते सुद्धा पुण्याला जाण्या ऐवजी परत नांदेडला जाणर्या बस मध्ये बसलेत त्याचे काय ?
यावर एक पेसेंजर म्हणाला- त्या गाडीच्या स्टाफ ने पेसेंजर मोजले असतील ..तर ते बरोबरच भरले असणार .मग, काय ,निघाली असणार गाडी ..
पण ते दोन प्रवासी झोपेतच आहेत की काय ? आपण चुकून दुसर्या गाडीत बसलोत हे पण त्यांना कळाले नाही, म्हणजे कमालच झाली म्हणायची .
आजकाल पब्लिक का क्या बी भरोसा नई रे बाबा ..! ,
कठीण रे बाबा - इतके गहीराती लोक, स्वतःच्या वागण्याने सगळ्यांना त्रास देतात ,!,
थोडा तरी .भान असायला पाहिजे माणसाला .. !
दिवसाची गोष्ट वेगळी..आता मध्यरात्र झालीय , सोपे आहे का हे निस्तरणे !
कोणत्या मुहूर्तावर निघालो की बाबा ..असा प्रवास ,सगळा मूड ऑफ ,अशा विचित्र लोकांच्या मुळे !
नेहा शांतपणे सगळा गोंधळ पाहत उभी राहिली ..या शिवाय आपण करणार तरी काय ? जे होईल ते होईल..आता सगळ्या बरोबर आपले हाल आणि बेहाल ..
तिने घड्याळात पाहिले --बापरे दोन वाजले होते ..
इतक्या रात्री ..लोकांना एक प्रोब्लेम मिळाला होता .जणू टाईमपास साठी..
नेहाच्या बसचा ड्रायव्हर त्या बाईंना म्हणाला ..ताई ..घाबरू नका .. दोन्ही बस आमच्या कंपनीच्याच आहेत , रोज इथेच आमची क्रॉसिंग होत असते ,
पण, असा घोळ सहसा होत नाही ,आजचा प्रोब्लेम ..एकट्या तुमच्या चुकी मुळे झालाय असे नाही, त्या दुसर्या दोन पेसेंजर तेवढेच चुकले आहेत ..
मी आमच्या दुसर्या बसच्या ड्रायव्हरशी आत्ता लगेच बोलून घेतो...तो कुठपर्यंत आहे हे कळले की ..सोपे होईल सगळे..
तुम्ही घाबरू नका , फक्त वेळ लागेल ,तेव्हढा धीर धारा .
आणि समोर उभे असलेल्या पब्लिकला तो म्हणाला ..
आता तुम्ही पण सगळे काही चर्चा न करता , सल्ले न देता गप्प बसून राहावे ..कारण त्यानेच आम्हाला जास्त टेन्शन येतय . तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि देऊ पण नका ..
परिस्थिती ओळखून मार्ग काढणाऱ्या या ड्रायव्हरचे सगळ्यांना कौतुक वाटले ..त्याच्या बोलण्याचा ,सांगण्याचा खरेच खूप परिणाम झाला ,सगळे आपापल्या जागी चुपचाप झाले.
ड्रायव्हर ने आपल्या दुसर्या बसच्या ड्रायव्हरला फोन केला .आणि त्याला कल्पना दिली ..
तो देखील ..लगेच म्हणाला ..ऐसा क्या ?घाबराव मत अब ..!
आपुन तो भी क्या करेंगे -ऐसे लोगा मिले तो .
जो हुवा सो हुवा , दिमाग खराब कर लेने से काम नही होगा ,
एकेक दिन एकेक नमुना मिळता ही अपने कु !
अच्छ सुनो , मै क्या कहता हु -
इतनी रात तो अपनी दुसरी गाडी भी नही है इस रूट पर,
देखो एक घंटे मे मै तो पचास किमी दुर आया हू अब एक काम करेंगे .हम.
तुम २५ किमी पीछे आओ, मै भी पचीस किमी पीछे आता हु , रातभर चाय मिलता है ना .. ,वो फाटे पार हम दोनो बस रुकेंगे ,और अपने -अपने पेसेंजर को लेके ..निकल जयंगे ,!
ठीक है बडे भाई , टाईम ही ऐसा है आया की माथां फोडी नकोच अब ..
या दोन्ही ड्रायव्हर मधले सगळे बोलणे समोरच्या पब्लिकने अगदी कान देऊन ऐकले होते .त्यामूळे.
जो तोडगा निघाला आहे तो अगदी यौग्य आहे ड्रायव्हर साब ..!असे समाधानाचे एकमत झाले .
दोन्ही बस बोलण्यात ठरल्या प्रमाणे एकमेकींना भेटल्या , दोन्ही बस मधले चुकलेले प्रवासी ,आपापल्या बसमध्ये बसवले गेले .
आणि पहाटे-पहाटे..नेहाची बस पुण्याकडे रवाना झाली ..या सगळ्या गोंधळात ..बस पुण्याला किती वाजता पोंचणार हो ? वगरे प्रश्न विचारून ड्रायव्हरला कुणी वैतागून सोडले नाही , याचे सगळ्यांनाच मोठे समाधान होत होते ..
काही सिरीयस प्रोब्लेम पेक्षा हा सावळा -गोंधळ परवडला ..
आता सकाळी सकाळी पुण्याला बस खूपच उशिरा पोंचणार , तिथून पुणे- ठाणे ही बस .म्हणजे अजून चार तास . ठाण्याला जाई पर्यंत दुपारच होणार
मावशींना आणि काकांना सकाळी आठवणीने निरोप द्यायला पाहिजे ..की तुम्ही बस स्टोप वर येऊन थांबू नका ..मी पुन्हा मेसेज करेन ..तेव्न्हा बोलू ..नेहाला आता मात्र खरोखरच झोप येऊ लागली होती.. तिचा प्रवास सुरु झाला ..नव्या गावात .नवा दिवस..कसा असेल ?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढील कहाणी ..लवकरच ..
भाग..सहा ..येतो आहे..