Jugari - 3 in Marathi Love Stories by निलेश गोगरकर books and stories PDF | जुगारी - (भाग - 3)

Featured Books
  • सर्द हवाएं

    लेख-सर्द हवाएं*******""       यूं तो सर्दियों के मौसम में जब...

  • इश्क दा मारा - 45

    यूवी गीतिका का हाथ पकड़ कर ले जा रहा होता है तभी गीतिका बोलत...

  • लल्लन जी की अद्भुत नौकरी

    गाँव के एक छोटे से कस्बे में रहते थे लल्लन जी। उनका नाम ही उ...

  • चुप्पी - भाग - 2

    क्रांति की हॉकी खेलने की चाह को महसूस करके और उसकी ज़िद को हद...

  • छिनार

    बसंत बाबू, ये ही बोलते थे लोग, 23 साल का खूबसूरत युवक, 6 फिट...

Categories
Share

जुगारी - (भाग - 3)

मागील भागावरून पुढे........

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे राज गार्डन मध्ये आपल्या नेहमीच्या जागेवर येऊन बसला होता. अण्णा कडून त्याने सकाळीच वळण आणले होते. ते पैसे घेऊनच तो आता इथे बसला होता. आज सुषमा उशिरा येणार होती. तिने कालच त्याला सांगितले होते. काल गडबडीत त्याने तिचा नंबर पण घेतला नव्हता. त्यामुळे तो तसा निवांतच बसला होता. रात्रभर शोधून पण आज त्याला बिलकुल काही गेम निघत नव्हती . बऱ्याच जणांचे फोन आले होते पण गेम नाही म्हंटल्यावर त्यांची निराशा झाली होती.
तेव्हड्यात पुन्हा त्याचा फोन वाजू लागला. त्याने काहीश्या त्रासिक चेहऱ्याने मोबाईल उचलला. त्यावर राखी हे नाव फ्लॅश होत होते. ते बघून त्याला आश्चर्य वाटले. फार कमी वेळा तिचा फोन येई..

" हॅलो... " त्याने उत्तर दिले.

" ............."

" मी ठीक आहे. तु कशी आहेस? "

" .............."

" हा बोल ना.. "

" ..............."

" अग आज काहीच गेम निघाली नाही... "

" ................"

" एक काम कर. इकडेच ये... गार्डन मध्ये बघूया काय करता येते आहे ते.. "

" ................."

" हा... ये... मी वाट पाहतोय... " असे म्हणून त्याने फोन ठेवला.
फोन ठेवल्यावर त्याच्या डोळ्या समोर राखी चा चेहरा तरळून गेला. ती एक गुजराथी स्त्री होती. नवरा अपघातात गेला होता. दोन मुलांची आणी सासू सासऱ्यांची जबाबदारी तिच्या वर पडली होती त्यामुळे ती कायम आर्थिक विवंचनेत असायची. छोटी मोठी कामे करून ती कसाबसा आपला गाडा ओढत होती. एके दिवशी सुदैवाने तिची राज बरोबर ओळख झाली. तेव्हा राज ने तिला काही गेम दिल्या होत्या त्या गेम पास झाल्याने तिला मोठा आधार झाला होता. त्यामुळे राज वर तिचा खूप विश्वास होता. त्याची बायको त्याला सोडून गेल्यावर राज खूप खचला होता. त्यावेळी त्याला त्यातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याचे काम तिने खुबीने केले होते. दिवसागणिक दोघे खुप जवळ येत गेले. त्यांच्यात कैकवेळा शारीरिक समंध पण झाले होते. पण आता तिची मुले मोठी झाली होती त्यामुळे पहिल्या सारखे सारखे सारखे दोघांना भेटता येत नव्हते. पण दोघात अजून पण प्रेम आणी आपुलकी होतीच.

थोड्यावेळाने राखी त्याला शोधात आली. आज जवळ जवळ तीन महिन्या नंतर तो तिला बघत होता. तिच्यात काही बदल झाला नव्हता. तशीच ताजी, टवटवीत, हसरी होती.

" कसा आहेस? " त्याच्या बाजूला बसत तिने विचारले.

" मी मस्त.... तुझे कसे चालले आहे..? "

"' ठीक आहे... "

"'आज अचानक तुला कशी काय माझी आठवण झाली. "

" अरे अडचणीत असल्यावर सगळ्यात आधी तुझीच आठवण होते. "

" ह्म्म्म.. म्हणजे अडचण असली तरच माझी आठवण होते." तो तिची मस्करी करत होता. त्यावर चिडून तिने एक गुद्दा त्याच्या हातावर मारला.

" आई गं ..." तो विव्हळत ओरडला.

" असच पाहिजे..." ती डोळे मोठे करत उद्गारली.

" बरं काय एव्हडे अचानक काम निघाले ते तरी सांग... "

" गावाला आमच्या वाटण्या करणार आहेत. माझ्या नवऱ्याचा पण त्यात हिस्सा आहे. त्यामुळे मला गावाला जावे लागणार आहे. आपल्या जागेला कुंपण वैगरे घालून यायचे म्हणजे काही खर्च होणारच नां... आणी तुला तर माहित आहे माझी परिस्थिती. अश्या वेळी पंधरा वीस हजार रुपये मी कुठून आणू ? "

" ह्म्म्म... "

" कुंपण वैगरे घातले नाही तर ते.. जागा बळकावायला कमी करणार नाहीत. "

" हो ते पण आहे... काल तरी सांगायचे काल मजबूत गेम होती आणी पास पण झाली.. "

" अरे काल रात्री त्यांचा फोन आला. उद्या निघायचे आहे. परवा वाटण्या करणार आहेत. "

" आज माझ्या जवळ काहीच गेम नाही.. आणी अंदाजे गेम मी टाकत नाही हे तुला पण माहित आहे. "

" ह्म्म्म... बरं ठीक आहे मी बघते अजून कोणाकडून तरी पैश्याची सोय होतेय कां ते. "

" काही गरज नाही.... कालचे वळण आहे माझ्या जवळ त्यातले पैसे घेऊन जा.. "

" अरे पण ते कोणाला तरी द्यायचे आहेत नां... "

" त्याची नको काळजी करू. तिला मी काय सांगायचे ते सांगीन... "

" कोणी मुलगी आहे...? "'आपण बोलण्यात तिचा उल्लेख करून गेलो हे राज ला उशिरा लक्षात आले.

" हो.. तिच्या भावाला ट्युमर आहे. ऑपरेशन करायचे आहे म्हणून तिला गेम दिली होती काल. पास झाली. त्याचेच वळण आहे. "

" हे घे..." त्याने पंचवीस हजार काढून तिला दिले.
" पंचवीस आहेत.. "

" एव्हडे कशाला ? "

" असुदे.. लागतील तर असावेत.. " तिने ते पैसे सांभाळून ठेवले.

" राज ! आज मला वेळ आहे... मुले पण आज मामा कडे गेलीत. त्यामुळे घरी लवकर नाही गेले तरी चालण्यासारखे आहे. " ती कशा बद्दल बोलतेय हे राज ला कळले होते.इतर वेळी राज हसतच तिच्या बरोबर कोणत्या तरी लॉज ला गेला असता पण आज ची वेळ वेगळी होती.

" गेलो असतो ग... पण सुषमा येणार आहे. मी इथे दिसलो नाही तर माहित नाही माझ्या बद्दल काय विचार करेल कारण तिचे पैसे आहेत नां माझ्या जवळ... "

" ओह... " राखीचा चेहरा पडला.. राज बरोबर तिला ही मनापासून आनंद व्हायचा.

" अशी नाराज होऊ नकोस... तू गावावरून आलीस कि मला फोन कर मग वेळ काढून भेटू.." तिचा हात आपल्या हातात घेऊन त्याने हळुवार कुरवाळत त्याने तिला समजावले.

" ह्म्म्म... मग मी निघू... "

" बरं... सावकाश जा.. आलीस कि मला फोन कर..."

" बरंय..." ती उठून त्याचा निरोप घेऊन निघाली.

काही वेळाने सुषमा आली ती धापा टाकतच...

" काय गेम काढलीस आज ?" तिने आल्या आल्या विचारले.
तो पण बघत बसला.

" अरे असे काय बघतोस ? "

" बघतोय कि एका दिवसात तुझ्यात किती बदल झालाय.. काल पर्यंत तुला जुगार आवडत नव्हता आणी आज..." त्याने आपले बोलणे अर्धवट सोडले.

" मला माझ्या भावाचे ऑपरेशन लवकर करायचे आहे म्ह्णून... " ती काहीशी खजील होत म्हणाली.

" आज काहीच गेम बसत नाही.. त्यामुळे आपण आज हॉस्पिटलला जाऊन पैसे भरून येऊया.. "

" ठीक आहे... " ती निराश स्वरात म्हणाली. बहुतेक ती मोठ्या आशेने आली होती. ते त्याच्या लक्षात आले.

" काळजी करू नकोस लवकरच एखादी गेम निघेल... आणी हो आज मिळालेल्या वळणातुन मी पंचवीस हजार खर्च केलेत हां.. "

" ह्म्म्म.. "

" विचारणार नाहीस कशाला ते ? "

" त्याची काही गरज आहे ? अरे ते पैसे तुझ्याच मुळे मिळू शकले. तर त्यातले काही तू खर्च केलेस तर बिघडले कुठे?" तिचा आपल्यावरील विश्वास बघून त्याला उगाचच भरून आल्यासारखे वाटले. नाहीतर गेम पास झाल्यावर त्याला पैसे दयायला टाळाटाळ करणारेच त्याला जास्त भेटले होते.

त्यानंतर दोघे हॉस्पिटलला गेले. तिथे त्यांनी पैसे भरले. काही पैसे आपल्याजवळ गेम साठी ठेऊन ते संध्याकाळ पर्यंत तिच्या भावाबरोबर वेळ घालवत बसले.
तिचा भाऊ लहान साधारण आठ दहा वर्षाचा होता. खूप गोड होता मुलगा. थोड्याच वेळात राजला त्याने आपलासा केले. ती संध्याकाळ त्याच्या बरोबर घालवून राज रात्री घरी आला. त्या रात्री पण त्याने खूप नवीन नवीन पद्धतीचा अवलंब करून गेम काढायचा प्रयत्न केला. पण आज ही त्याला गेम बसत नव्हती. शेवटी कंटाळुन त्याने सगळे बाजूला ठेवले त्यावेळी त्याच्या डोळ्या समोर समीर चा हसरा चेहरा समोर आला. त्याच्या साठी आपल्याला काहीतरी करावेच लागेल म्हणून तो सगळा आळस, थकवा विसरून परत चार्ट घेऊन बसला.
आपला अनुभव , ज्ञान , कौशल्य पणाला लावत त्याने एक गेम काढली. खरंतर ती काही स्ट्रॉंग गेम नव्हती. पण काहीच नाही तर त्यावर डाव लावुन बघावा ह्या निष्कर्षाला तो आला होता. शेवटी सर्व काही व्यवस्थित लिहून त्याने चार्ट वैगरे बंद करून बेड वर पाठ टाकली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते.

सकाळी जोरजोरात दरवाजा वाजवण्याच्या आवाजाने त्याला खाडकन जाग आली. क्षणभर त्याला काहीच कळले नाही. नंतर कोणीतरी दार वाजवते आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने घड्याळात पाहिले तर सकाळचे सव्वा सात वाजले होते. एव्हड्या सकाळी सकाळी कोण तडमडला म्हणून वैतागून तो दरवाजा उघडायला उठला. आधीच रात्री उशिरा झोपल्याने झोप पूर्ण झाली नव्हती त्याचा ही राग त्यात भरला होता.

दरवाजा उघडल्यावर त्याने पाहिले तर समोर सुषमा उभी होती. तिला सकाळी सकाळी आपल्या दारात बघून तो कमालीचा गोंधळला.

" तू...?.. आणी सकाळी सकाळी इथे कशी ? समीर ठीक आहे नां ? " त्याने एका पाठोपाठ एक प्रश्नाचा भडीमार तिच्यावर केला.

" अरे हो... हो.... समीर ठीक आहे... पण मला आत तरी घेशील कि , इथेच सगळे प्रश्न विचारशील ? " ती अजून पण दरवाज्यातच उभी होती.

"अरे.. हो.... ये आत ये.." दरवाज्यातून बाजूला होत तो म्हणाला.

" बोल काय झाले ? "

" काल रात्री आमच्या झोपडपट्टी मधील काही जणांनी माझ्यावर हात टाकायचा प्रयत्न केला. "

" काय ?... कोण होते ते...? मला दाखव एकेकाला उभा सोलून काढतो. परत तुझ्याकडे डोळे वर करून पाहण्याची कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे.. " तो त्वेषाने हातांच्या मुठी आवळत म्हणाला..

" त्याची काही गरज नाही. म्हणजे तू त्यांना मारणार मग तू पण जेल मध्ये जाऊन बसणार मग त्याचा काय फायदा ? "

" मग त्यांना असेच सोडायचे कां ? "

" ह्म्म्म.... सध्या तरी... मी आता ती झोपडपट्टी कायमची सोडून आली आहे. रात्री एका मावशी कडे लपून बसली होती. तेव्हा कुठे जायचे हा विचार करत होती. आपसूक तुझेच नाव डोळ्यासमोर आले. आफ्टर ऑल यु आर माय पार्टनर नां? म्हणून मग महाराष्ट्र नगर मध्ये आले. तुझा पत्ता विचारला आणी सरळ इकडेच आली.... " ती क्षणभर थांबली.
"'काही सोय होईपर्यंत मी इथे राहिली तर चालेल नां ? "

" हो राहा नां.. पण मी रात्री अभ्यास करतो आणी सकाळी झोपतो. आणी त्यात कोणी लुडबुड केलेली मला चालत नाही. हे जर तुला चालणार असेल तर राहा.. माझी काहीच हरकत नाही. "

" मला चालेल... " ती समाधानाने म्हणाली.

" किचन मध्ये सगळे सामान आहे.. बघ तुला काही हवे असेल तर चहा वैगरे तर करून घे... मी आता झोपतो आहे. काल रात्री खूप वेळ जागून गेम काढली आहे. दुपारी मला उठव.. मग जाऊन गेम टाकून येऊ.. " त्याने तिला सूचना केल्या. आणी तिने मान डोलवताच तो पुन्हा बेड वर पडला आणी काही मिनिटातच झोपी गेला.

खमंग वासाने दुपारी त्याला आपोआप जाग आली. दुपारचे बारा वाजले होते. आळस देत तो बेड वर उठून बसला. तिची किचन मध्ये काही खुडबुड चालू होती. स्वैयंपाकांचा खमंग वास पोटात भुकेची जाणीव करून देत होता. सहज त्याचे लक्ष आजूबाजूला गेले. सगळे घर आवरले होते. प्रत्येक वस्तू जागच्या जागी. एकदम सगळे चकाचक.. तो नवल करत किचन मध्ये शिरला तर तिथला तर सगळा चेहरामोहराच तिने बदलून ठेवला होता. बेसिन मध्ये पडलेली भांडी घासून मांडणीत लावली होती. गॅस शेगडी , किचनचा ओटा इतर भांडीकुंडी घासून लक्ख केली होती. त्याने ब्रश करण्यासाठी ब्रश घ्यायला हात पुढे केला. तर
ब्रश कुठे आहे..

" ब्रश कुठे गेला ? "

" बेसिन च्या वर लावून ठेवला आहे. " त्याने ब्रश काढून दात घासायला घेतले. अंघोळीला निघाला तर टॉवेल गायब..

" टॉवेल ? "

" बाथरूम मध्ये दरवाज्या मागे लावलाय.." ती म्हणाली

" माझे कपडे इथे होते ? "

" कपाटात ठेवले आहेत... खाली , डावी कडे.. " ती पुन्हा..

त्याला अशे सगळे काही व्यवस्थित ठेवायची सवय नव्हतीच. तिने अक्षरशः एका दिवसात, दिवसात कसले काही तासातच त्याच्या आयुष्यात वादळ आणले होते.

" किराणा नव्हते नां घरात...? "

" ह्म्म्म... मी घेऊन आले बाजूच्या दुकानातून.. "

" पैसे ? "

" होते माझ्या जवळ... "

त्याने अंघोळ उरकली तोपर्यंत एक वाजायला आला होता.

" पटकन जेऊन चल... आज एक गेम काढली आहे.. टाकून येऊ.... "

" आज तुच जा नां.... "

" कां... तू पण चल सोबत... "

" नाही मला थोडी कामे आहेत... "

" आता काय करायचे बाकी ठेवले आहेस...? "

" आहे अजून काही... "

" अग.. पण तुला माहित आहे नां.. कि मी टाकलेली गेम कधी पास होत नाही ते..कशाला उगाचच रिस्क घ्यायची? "

" काही होत नाही.. आज तूच गेम टाक.. आज तुझी गेम नक्की पास होईल बघ... हे घे काही पैसे आहेत माझ्या जवळ. " असे म्हणून तिने तीन हजार रुपये त्याच्या हातावर ठेवले.

" अग पण तुझ्या जवळ आहेत कि नाही पैसे ? "

" आहेत दोन चारशे... मला कशाला पैसे लागतात... "

" बरं... हे घे..." असे म्हणून राज ने आपल्या खिशातून दोन हजार काढून तिच्या हातावर ठेवले.

" कशाला ?"

" असुदे...." तो म्हणाला पण त्याचे आज गेम टाकण्याचे धाडस होत नव्हते.

" सुषमा.. चल नां तू... "

" अहं... तूच जा... "

"'नको ग... आज पर्यंतचा इतिहास पाहता मला तर वाटते कि रिस्क नको.... "

" मी म्हणतेय नां...... मग जा... बघू तरी आज.... " ती अगदी निग्रहाने म्हणाली.. त्यामुळे त्याचा नाईलाज झाला. तो निघाला तर बाईक ची चावी सापडेना... त्याने अपेक्षेने तिच्या कडे पाहिले.

" त्या कि होल्डर ला लावलीय चावी...." ती हसून म्हणाली... आणी ती चावी घेऊन तो घरा बाहेर पडला... अण्णा च्या अड्ड्यावर सगळे राज ला बघून चकित झाले. आज तो आलाय म्हणजे काहीतरी गेम घेऊन आलाय ह्याचा बरोबर वास खेळी लोकांना आला होता. पण त्याने खेळलेली गेम सहसा येत नाही हे समीकरण पण त्यांना माहित होते म्हणून त्याचा फायदा घेत ते राज ची गेम सोडून गेम बनवून खेळणार होते .

" 359 पानां OTC (ओपन टू क्लोज )250 नी आणी सिंगल सत्ता घे दोन हजार रुपयानी.
जोडी घे 72 /77/74/70 प्रत्येकी 250 रुपयानी " राज ने गेम टाकली. गेम टाकून तो जड़ मनाने अड्डयावरून बाहेर पडला. समोरून मोरे मावशी येत होती.
मोरे मावशी... वयाची साठी उलटली होती. एकुलता एक पोरगा दारू पिऊन पिऊन मेला. सून तर आधीच सोडून गेली होती. आता एकुलत्या एक नातवासाठी म्हातारी मर-मर मरत होती. राज दिसला कि ती हमखास राज ला गेम विचारायची. राज पण कोणताही आडपडदा न ठेवता तिला गेम दयायचा... कधी कधी म्हातारीला चांगले पैसे मिळून जायचे.

" राज,... बाळा आज काय काढलेस कल्याण ला ? "

" मावशी, आज गेम स्ट्रॉंग नाही आहे. त्यातच आज गेम मी टाकली आहे. त्यामुळे येण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे आज तुम्ही तुमची गेम खेळा.." राज ने प्रामाणिकपणे तिला समजावत सांगितले...

" असुदे रे बाळा... आज पर्यंत तू मला कितीतरी वेळा गेम दिलीस. मी किती पैसे कमावले.. पण तू कधी एक रुपयाही माझ्या कडून घेतला नाहीस. मग आज गेम फेल झाली तर काय झाले..... असुदे तू सांग... "

" अहो मावशी , ऐका माझे... खरंतर मी गेम टाकणारच नव्हतो.. पण कोणीतरी खूप फोर्स केला म्हणून मी गेम टाकली. "

" बघ राज, मला माहित नाही तुला कोण बोलले ते. पण जर त्या व्यक्तीने तुझ्यावर एव्हडा विश्वास दाखवला आहे तर नक्की आज तुझी गेम पास होईल.. मला पण पैश्याची गरज आहे. नातवाला नवीन दप्तर , शाळेचे कपडे घ्यायचे आहेत. फि भरायची आहे. गेम आली तर माझे पण काम होऊन जाईल. "

" ह्म्म्म... मावशी आता तुम्ही ऐकतच नाही म्हणल्यावर मी तरी काय बोलणार.. "
" कल्याण ला 359 नी 7 येण्याची दाट शक्यता आहे. OTC खेळा. जोडी टाका 72 /77 /70 /74 टाका. आणी सिंगल सत्ता खेळायला विसरू नका. ठीक आहे. "

"'ठीक आहे... देव करो आज तुझी गेम पास होवो.. " मावशी म्हणाली आणी अड्ड्याच्या दिशेने निघाली.

" मावशी ! जास्त खेळू नका.. माझे पैसे गेले मला काहीच वाटत नाही. पण तुमचे पैसे गेले तर मला खूप वाईट वाटेल... " तिला सावध करत राज आपल्या नेहमीच्या जागेवर बसायला निघून गेला.

पुढील भाग लवकरच......

© सर्वाधिकार लेखकाकडे..