callgirl - 11 in Marathi Love Stories by Satyajeet Kabir books and stories PDF | कॉलगर्ल - भाग 11

Featured Books
Categories
Share

कॉलगर्ल - भाग 11


सकाळी डॉक्टरांनी काका-काकूंना discharge दिला. यश त्या सगळ्यांना घरी सोडून साईटवर गेला. बाकीची सगळी जबाबदारी जान्हवीनं सांभाळली. काका-काकूंची जेवणं, त्यांची औषधे, सगळं काम तिने काळजीपूर्वक केलं. काकूंना जान्हवीचा मोठा आधार होता. त्यांच्या तोंडात सारखं जान्हवीचं नाव होतं. यशने रात्री काका –काकुंचं त्यांच्या मुलाशी स्काईपवर बोलणं करून दिलं. काकूंनी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तो आधी घाबरला, लगेच निघतो म्हणाला. पण यशने त्याला समजावलं. काकू ठीक असल्याचं सांगितलं. त्यानेही यशचे वारंवार आभार मानले.

रात्री झोपताना यशने जान्हवीला जवळ घेतलं, तिचा हात हातात घेत म्हणाला,
“आज किती काम केलंस, थकली असशील?”
“हो. पण काकू सुखरूप आल्या याचं समाधान जास्त आहे.”
“किती हिम्मत आहे तुझ्यात, तुला एवढं धैर्य कुठून येतं? काल तुझ्या जागी मी असतो तर माझी बुद्धी कुंठीत झाली असती. मी पुरता गोंधळून गेलो असतो. हे सगळं तुला कसं शक्य झालं?”
“मलाच माहित नाही, मी सुद्धा खूप घाबरले होते, मला जे सुचेल ते प्रामाणिकपणे करत गेले. काकू बऱ्या झाल्याचा आनंद खूप मोठा आहे.”
“मला तुझ्यापेक्षा आज माझाच जास्त अभिमान वाटतो. मी तुला इथे आणलं नसतं तर या दोघांचं काय झालं असतं, मला कल्पना सुद्धा करवत नाही.”
“मी जरी नसते तरी त्यांना काहीच झालं नसतं. यश, आपल्याला वाटतं की माझ्यामुळे हे झालं, ते झालं. पण तो आपला भ्रम असतो, आपल्यामुळं काहीच होत नसतं. आपण फक्त निमित्त असतो. होणारी गोष्ट होतच असते. पण ती आपल्या हातून व्हावी अशी नियतीची इच्छा असते. आपण फक्त ती इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात असतं. बाकी सारा नियतीचा खेळ असतो.”
“तू नेहमीच नियतीला आणि supernatural powers ना का श्रेय देतेस? सायन्स, टेक्नोलॉजी, नाँलेज यांवर तुझा विश्वास नाही का?”
“असं का म्हणतोस यश? मी सायन्सचीच student आहे. सायन्स, नाँलेजवर माझा विश्वास आहेच. पण त्यापेक्षा कर्मयोगावर माझा जास्त विश्वास आहे. आपल्याला नेमून दिलेलं कार्य आपण करायचं, फळाची किंवा श्रेयाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. या जगात अश्या बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या सायन्सच्या दृष्टीनं अशक्य आहेत पण त्या गोष्टी घडतात. तेव्हा त्यापाठीमागे प्रेम, श्रद्धा, विश्वास या गोष्टी असतात. उदाहरणासाठी सांगते, जेव्हा जिराफाची मादी पिल्लाला जन्म देते, तेव्हा ते नवजात पिल्लू कमीत कमी सहा फुट उंचीहून खाली पडतं. पडतानाही ते टाळूवर पडतं. कोणतही नवजात अर्भक इतक्या उंचीवरून डोक्यावर पडत असेल तर त्याची वाचण्याची शक्यता कमीच! पण त्याची आई त्याला वाचवते. आपल्या जिभेने त्याला चाटून स्वच्छ करते. आणि जन्मानंतर केवळ तीन तासात ते बाळ पायावर उभं राहून चालायला लागतं. त्या आईचं पिल्लाला चाटणं हे तिचं प्रेम असतं. तिची लाळ त्या बाळाला ताकद देते, त्या लाळेने पिल्लाची प्रतिकारशक्ती वाढते, भविष्यात येणाऱ्या संकटांना, रोगांना लढायला ते पिल्लू तयार होतं.
यश, प्रेम ही जगातली सर्वोत्तम भावना आहे. काल माझ्यात आणि काकुंमध्ये असणाऱ्या प्रेमाच्या बंधाने त्यांना जीवदान दिलं. मला वाटतं, एखाद्याशी आपण प्रेमाचा बंध जितका द्रुढ करू तितकी दुरावण्याची शक्यता कमी होते. यश, तुला काय वाटतं?”
“मला फक्त तुझं कौतुक वाटतं.” यशने जान्हवीच्या कपाळाचं चुंबन घेतलं. एकमेकांच्या सहवासात त्यांना गाढ झोप लागली.

x x x x x x x

x x x x x x x


“यश, मला वाटतं, जोपर्यंत काकूंना बरं वाटत नाही तोपर्यंत आपण प्रेग्नंसी डिक्लेअर नको करूयात. एकदा काकू बऱ्या झाल्या की मगच विचार करूयात, आपल्याशिवाय त्यांना इथे कुणीच नाहीये.
“हो. मलाही तसचं वाटतं.”
“तू अनुशी बोलशील का? तिला इथली situation सांग. तू सांगितल्यावर तिला पटेल सगळं.”
“ठीक आहे. मी बोलतो तिच्याशी.”
x x x x x