Jay Malhar - 2 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | जय मल्हार - भाग २

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

जय मल्हार - भाग २

जय मल्हार भाग २

खंडोबा विषयी माहिती घेताना त्याच्या वेगवेगळ्या देवस्थानांची माहिती घेणे जरूरी आहे .

महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी देवस्थाने प्रमुख अशी एकंदर अकरा आहेत.

यातील काही ठिकाणी जिथे प्रत्यक्ष खंडोबाच्या जीवनातील घटना घडल्या त्या ठिकाणांना महत्व आहे .

१) जेजुरी (पुणे) २) शेबुड (अहमदनगर) ३) निमगाव दावडी (पुणे)

४) सातारे (औरंगाबाद) ५) पाली-पेंबर (सातारा) ६) मंगसुळी (बेळगांव) ७) मैलारलिंग (धारवाड) ८) मैलार देवगुड्ड (धारवाड)

९) मृणमैलार (बल्लारी ) १०) मैलापुर-पेंबर (बिदर) ११) नळदुर्ग-धाराशी (उस्मानाबाद).

१) श्री क्षेत्र जेजुरी( पुणे ):

जेजुरी हे सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे असे मानतात .

हे गांव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे.

उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे.
सह्याद्रीच्या या डोंगररागांना जयाद्री नाव लाभले,आणि काळाच्या ओघात त्याचे जेजुरी झाले.

या मंदिरांत असणार्‍या राममंदिरांत एक लेख आहे ज्यानुसार हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे.

गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्‍या ६३ ओवर्‍या आहेत.

खंडोबा अवतार चरित्रातील हे प्रमुख खंडोबा क्षेत्र आहे .

श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला.

दक्षिणे मध्ये मणि मल्लाचा संहार केल्या नंतर आपली राजधानी ही येथेच वसवली.

मार्तंड भैरवाच्या मुळ अवताराचे ठिकाण हे आहे .

या मल्हारीस हळद प्रिय म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळद उधळीत असतो.उत्सवा मध्ये तर सारा आसमंत व परिसर भंडाराने सुवर्णमय होतो म्हणूनच जेजुरीला “सुवर्णनगरी”किंवा “सोन्याची जेजुरी” म्हटले जाते.

२) शेबुड (अहमदनगर)

येथे चंपाषष्ठीला फार मोठी यात्रा भरते

३) निमगाव दावडी (पुणे)

येथे चंपाषष्ठीला फार मोठी यात्रा भरते

४) सातारे (औरंगाबाद)

हे गांव औरंगाबाद स्टेशनपासून २ मैलांवर आहे.

येथे चंपाषष्ठीला फार मोठी यात्रा भरते.

५) श्री क्षेत्र पाली पेंबर ( सातारा ):

पाली हे गाव सातारा-कोल्हापूर रस्त्यावर कर्‍हाड तालुक्यांत सातार्‍यापासून १५ मैलावर आहे

अतीत या गावाजवळ ते ५ मैलावर आहे.

या मंदिराच्या ओवरींत एक शिलालेख आहे.

हे देवस्थान शके १६९४ मध्ये चैत्र वद्य १३, गुरुवार या दिवशी श्री. गणेश खंडो व श्री महिपत खंडो पारगावकर यांनी बांधले असा उल्लेख आहे .

ही खंडोबा व म्हाळसा यांची विवाह भुमी असुन खंडोबा म्हाळसा येथे विवाहबद्ध झाले.

सातारा जिल्ह्यात तारळी नदी काठी वसलेला हा निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुललेला असतो.

आजही पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह येथे संपन्न होतो.

मुळात या गावचे नाव राजापुर आहे पण येथे पालाई नावाची एक गवळण राहत होती तिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा येथे लिंगरूपाने प्रगट झाले .
तिच्या नावावरूनच या गावास पाल अथवा पाली हे नाव प्राप्त झाले.

६) मंगसुळी (बेळगांव)

मंगसुळीचे हे देवस्थान बेळगांव जिल्ह्यांत अथणी तालुक्यांत आहे.

येथे अश्विन महिन्यांत मोठी यात्रा भरते आणि अश्र्विन शुद्ध द्वादशीस भंडारा होतो.

या ठिकाणी वाघ्या साखळदंड तोडतो. व त्यावरुन भविष्यही वर्तविले जाते.

७) मैलारलिंग (धारवाड)

हे स्थान धारवाडपासून सुमारे २ मैलावर आहे.

उंच टेकडीवरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे.

८) मैलार देवरगुड्डा (धारवाड)

देवरगुड्डा हे कर्नाटकातील मधील गाव मैलार मंदिरासाठी म्हणजेच खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे या गावाचे मुळनाव गुडगुड्डापूर म्हणजेच टेकडीवरील गाव पण येथील मंदिरामुळे देवाचे टेकडी वरील गाव म्हणून देवरगुड्डा म्हणतात .

आदिमैलार हे कर्नाटक मधील खंडोबाचे प्रसिद्ध क्षेत्र आहे .
कर्नाटक मध्ये खंडोबा मैलार या नावाने ओळखला जाते.

खंडोबा विषयक आद्य ग्रंथ ' मल्हारी महात्म्य ' याची ही जन्म भुमी .

या ग्रंथात शेवटी या क्षेत्राचे वर्णन करण्यात आलेले आहे.
पुणे-बंगलोर मार्गावर पुण्यापासून साधारणपणे ४०० मैलावर देवरगुड्ड हे स्टेशन आहे.

तेथून डोंगरावरील हे देवस्थान ४ मैलावर आहे.

आदिमैलार कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बिदर पासुन २० किमी अंतरावर आहे हे मंदिर सपाटीवर असुन गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोचू शकते .

मंदिरास प्रशस्त आवार असुन पुर्वद्वार भव्य आहे

हे देवस्थान चुन्या-मातीचे आहे.

मंदिराची शिखरे कमी उंचीची आहेत .

ज्या ऋषी मुळे शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला त्यांची ही तपोभूमी त्यामुळे या क्षेत्रास आदिमैलार म्हटले जाते.

या देवस्थानास शके १६३८ ते १७६७ पर्यंत अनेक देणग्या मिळाल्याचे शिलालेख व कागदपत्रे आहेत.

९)श्री क्षेत्र मृणमैलार:

खंडोबा कर्नाटक मध्ये मैलार या नावाने ओळखला जातो.

मृणमैलार कर्नाटक राज्यातील बल्लारी जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या हाडगल्ली पासुन ४० किमी अंतरावर आहे. गुंटल व राष्ट्रीय महामार्ग क्रं ९ वरील राणीबेनुर येथून ३४ किमी आहे.

हे गाव येथील मैलार मंदिरा साठी प्रसिद्ध असल्याने या गावास मैलार हेच नाव प्राप्त झाले आहे. या गावास मृणमैलार या नावानेही ओळखले जाते.

येथील मंदिरातील मैलाराची मुर्ती माती पासुन बनवलेली आहे अशी श्रद्धा आहे या मुळे मृणमैलार असेही म्हणतात.

हा परिसर खंडोबा व मणि मल्ल दैत्य यांची युद्ध भुमी आहे ,याच ठिकाणी मार्तंड भैरवने मणि मल्ला चा वध केला व लिंग रूपाने वास केला.

येथे ऋषीमुनी नी मातीच्या मैलाराची मुर्ती बनवली तीच ही मुर्ती असल्याचे स्थानिक लोक सांगतात.

१०) मैलापुर-पेंबर (बिदर)

चंपाषष्ठी ला इथे मोठा उत्सव होतो .

११) श्री क्षेत्र नळदुर्ग / अणदूर:

नळदुर्ग हे गांव सोलापूरच्या ईशान्येस साधारण ३० मैलावर आहे.

असे सांगतात की या ठिकाणी खंडोबाची तीन स्थाने आहेत.

शके १५३६ मध्ये एक स्थान किल्ल्यांत होते. असे कागदपत्रांत आहे.

नळदुर्ग गावाच्या उत्तरेस दोनएक मैलांवर दोन स्थाने जवळ जवळच आहेत.

अहिल्याबाईने बांधलेले देवालय आज प्रसिद्ध आहे.
उस्मानाबाद - सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासुन ५८ किमी व सोलापूर पासुन ४८ किमी अंतरावर नळदुर्ग आहे, नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना ४.५ किमी वर दक्षिणेकडे अणदूर कडे जाणारा रस्ता लागतो.

नळदुर्ग व अणदूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत, या दोन ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, अणदूर येथे खंडोबा वर्षातील १०.२५ महिने व नळदुर्ग येथे १.७५ महिने वास्तव्य करतात असे मानले जाते, या मुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते.

श्री खंडोबा व बाणाई यांचा विवाह येथेच संपन्न झाला.
येथील नळराजाची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती तिच्या भक्ती मुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले, याठिकाणी अनेक वेळा मंदिरांची स्थलांतरे झाली .
यात्रांच्या जागा ही बदलल्या .
अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभुमी असणारी ही भुमी अजूनही इतिहासाच्या पाउल खुणा घेउन नांदत आहे.
ही सर्व स्थळे भक्तांच्या दृष्टीने अतिशय पवित्र आहेत .