ट्रॅफिक जॅम...१
कधी तुम्ही ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहात ??..ह्या... काही प्रश्न आहे का हा ?? आपल्यापैकी कित्येक जण अडकले असतील...किती वेळ ३ ते ४ तास..आणि पाऊस असेल तर ३ ते ४ दिवस आठवा २६ जुलै २००५..
पण समजा तुम्हाला असे सांगितले चीन मध्ये सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम झाला होता...तब्ब्ल १२ दिवस...हि १२ तास नाही...तब्ब्ल १२ दिवस
हा ट्रॅफिक जॅम झाला होता चीनच्या नॅशनल हायवे ११० वर १४ ऑगस्ट २०१० ते २५ ऑगस्ट २०१०.. त्याचे असे झाले..
चीनची सुपर पॉवर होण्याच्या दिशेने राक्षशी वाटचाल सुरु आहे..जगाच्या १३ टक्के कोळसा चीन मध्ये आणि १० टक्के कोळसा चीनच्या शेजारी असलेल्या मंगोलिया मध्ये तयार केला जातो...आणि आपली भूक भागवण्यासाठी चीन अजून कोळसा मंगोलियामधून मागवतो..मंगोलियाच्या सीमांमधून फक्त ७ रस्ते चीन मध्ये येण्यासाठी योग्य आहे बाकी सर्व निसर्गाने आपल्या ताब्यात घेऊन ठेवले आहे...आणि त्या भागात अजून म्हणजेच मंगोलियाच्या आतून ते चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरात किंवा त्या शहराच्या आसपास येण्यासाठी मोजून ७ ते ८ रस्ते आहेत...आणि त्या प्रदेशात रेल्वे चे जाळे अगदीच नगण्य आहे..इतर वाहतुकीची साधने पण कमीच आहेत..मग अश्या वेळी फक्त कोळसा वाहतुकीचे एकमेव साधन म्हणजे मोठमोठे ट्रक...त्या ट्रक ना सोईचा मार्ग म्हणजे नॅशनल हायवे ११०..कारण इथे इतर मार्गांच्या तुलनेत फार कमी सुरक्षा व्यवस्था आहे आणि हवे तसे चेकिंग हि केले जात नाही...त्यामुळे विनापरवाना वाहतुकीसाठी सोप्पा मार्ग..असे कितीतरी ट्रक रोज मंगोलियाच्या सीमांमधून चीनमध्ये या मार्गाने येत असतात..१ ते २ तास ट्रॅफिक जॅम तिथे
साधी गोष्ट आहे..ट्रक वाहतूक नेहमीपेक्षा जास्त चालू होती..आणि नेहमीच्या ट्रॅफिक जॅमला तिथे ३ ते ४ तास लागत होते..आणखी त्यातच त्या ट्रक च्या बोझ्यामुळे जी काही रस्त्याची वाताहत झाली होती..त्याचे चिनी सरकारने काम चालू केले...म्हणजे नॅशनल हायवे ११० अर्धा बंद केला..रस्ता अर्धा बंद केला तरी जी वाहतूक होती ती काही कमी केली नव्हती ती तेवढीच होती..त्यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने चालू होती..आणि त्यातच जास्त वजनामुळे कोळसा वाहतूक करणारे काही ट्रक बंद पडले..आणि ते ट्रक बाजूला घेऊन दुरुस्ती करण्याशिवाय काही पर्याय नव्हता..पण बाजूला तरी कसे घेणार अर्धा महामार्ग बंद...मग तिथुन जी काही गाडयांची लांबलचक रांग लागायला सुरुवात झाली ती जवळजवळ ६० मैल पर्यंत पसरत गेली..
पहिले चार ते पाच दिवस गाड्या होत्या तिथेच थांबल्या होत्या...मुंगीपेक्षा कमी गतीने गाड्या धावत होत्या..अनेकांचे हाल झाले..मध्येच गाड्या सोडून जात येत नव्हते..पण त्या नॅशनल हायवे ११० च्या आसपास असलेल्या गावांना मात्र मोठा फायदा झाला..१२ दिवस तो महामार्ग एक छोटंसं शहर झाले होते.. मा त्यांचाच त्यांनी फायदा उठवला..अनेकांनी चालताफिरती दुकाने थाटली...पाण्याच्या बॉटल साधारण १ युआन ला मिळतात..त्याच १५ ते २० युआन ला विकल्या जात होत्या...नुड्ड्ल्स ची किंमत ३ पटीने वाढली होती..आणि काहींनी मात्र काळोखाचा आणि गोधळाचा फायदा घेऊन अनेकांच्या गाड्या लुटल्यापण..शेवटी चिनी सरकारने तर त्या मार्गाने येणारी वाहतूक इतर ठिकाणी वळवली होती..इतर वाहतुकीची साधने वापरावीत यासाठी आवाहन केले जात होते..
हे असे उपाय करून शेवटी १२ दिवसांनी तो ट्रॅफिक जॅम सुटला..पण मिडिया ने मात्र हा मुद्दा चांगलाच उचलून धरला..फक्त चिनी मिडिया सोडा सर्व जगाचे लक्ष या ट्रॅफिक जॅम कडे लागले होते..शेवटी या सर्व गोष्टीतून धडा घेऊन..चिनी सरकारने तातडीने पावले उचलत..मंगोलियाच्या आतून ते चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरात कोळसा वाहतूक करण्यासाठी चांगले रेल्वे मार्ग उभारले..अनॆक विनापरवाना कोळशाच्या खाणी बंद केल्या..फक्त कोळसा वाहतूक करण्यासाठी वेगळे मार्ग तयार केले...
पण तुम्हाला जर का वाटत असेल मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम होता तर थांबा....आत जी गोष्ट सांगणार आहे त्या पुढे हा ट्रॅफिक जॅम तर काहीच नव्हता...
तो सुरु झाला होता....
क्रमश :