callgirl - 9 in Marathi Love Stories by Satyajeet Kabir books and stories PDF | कॉलगर्ल - भाग 9

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

कॉलगर्ल - भाग 9

सकाळी यश उठला. नेहमीप्रमाणे त्यानं किचनमध्ये पाहिलं. पण जान्हवी तेथे नव्हती, कुठे गेली असेल सकाळी सकाळी? बहुतेक गोगटे काकूंकडे गेली असेल म्हणून यश बाहेर आला. समोरचे दृश्य पाहून त्याला हसू आवरलं नाही.
साडी नेसलेली जान्हवी, तुळशीसमोर पूजेचं ताट घेऊन उभी होती. तिने तुळशी वृन्दावनातील वाळलेली पाने बाजूला केली. तुळशीला स्नान घातले, तिला हळद कुंकू वाहिले. समोर उदबत्ती लावली. दिवा ओवाळला. पाच प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार केला. यश दारातच उभा होता. तो अजूनही हसतच होता.
“यश, का हासतोयेस?”
“हे आत्ता तुझं काय चाललं होतं?”
“काय म्हणजे? तुळशीला पाणी घालत होते.”
“का?”
“गोगटे काकू म्हणतात, तुळस सासुरवाशीणीची पाठराखीण असते. ती तिच्यावर कायम लक्ष ठेवून असते. सासुरवाशीणीने आपली दु:ख तुळशीला सांगावीत. ती आपलं सगळं ऐकून घेते अन देवाच्या कानात सांगते. आपल्यासाठी देवाकडे शिफारस करते. त्यामुळे तुळशीची काळजी घ्यावी. तिला बहीण मानावे. रोज पाणी घालून नमस्कार करावा.”
“आणि तुही या सगळ्यावर विश्वास ठेवलास? come on यार जानु...”
“यश, मी pharmacy ची student आहे. pharmacy मध्ये तुळशीला ‘elixir of life’ म्हणतात. तुळस इतर वनस्पतींपेक्षा जास्त म्हणजे दिवसातले वीस तास oxygen produce करते. त्या nascent oxygen मुळे toxic gases कमी होतात. तुळशीत ‘cyclo oxygenate enzyme’ असते. हे enzyme, oxygen evolution mechanism regulate करते. त्याचबरोबर तुळस ‘insect repellent’ आहे. या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास आहे. आणि काकू म्हणाल्या की, तुळशीला पाणी घातलं की पत्नीची पतीवर निष्ठा वाढते. आणि पतीची पत्नीवर प्रीती वाढते. तुला यावर आणखी काही म्हणायचं आहे का?”
यश तिच्याकडे पाहतच राहिला.
“I am speechless.” एवढंच तो कसबसं म्हणाला.
“चल मग, नाश्ता रेडी आहे. थंड होण्याआधी करून घे.”


दुपारी बबन यशचा लंच घेऊन गेला. त्यानंतर जान्हवी अनुशी स्काईपवर बोलत होती.
“हँलो डार्लिंग, कशी आहेस?”
“मजेत..तू सांग.”
“मी बरी आहे. काय म्हणतो गं तुझा so called नवरा?”
“काही नाही, तो साईटवर गेला आहे.”
“तुला त्रास तर देत नाही ना गं?”
“अजिबात नाही. उलट माझी काळजी घेतो, मी म्हणेल ते ऐकतो.”
“तसा त्रास नाही गं. रात्री बेडवर त्रास देतो का ते विचारतेय मी?”
“ए चल, चावट कुठली, तू जरा मँड आहेस का? आमच्या दोघांत तसं काही नाहीये.”
“माझ्याशी खोटं बोलू नकोस जेनी, तुला आणि यशला मी चांगलं ओळखते. you had definately sex with him. खरं सांग. तुला माझी शप्पथ आहे.”
“जेनीने काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त लाजली.”
“तुझ्या गालावरची blush च सांगतीये, तुमच्यामध्ये काय काय घडलंय ते, काय खरंय ना?”
“हो खरंय खरंय. बास? झालं तुझं समाधान? तू आता माझी उलट तपासणी घेणार आहेस का?”
“so, finally यश प्रधान lost his virginity. you are lucky and so special for him. यशला attract करणं सोपी गोष्ट नाही. कित्येक मुलींनी try केलं, finally you achieved it.”
“Yes, I am lucky. आणि या बाबतीत तर तो खूपच loyal आहे. माझ्या परवानगीशिवाय त्याने मला स्पर्शही केला नाही.”
“क्या बात है. so called नवऱ्याची फारच स्तुती चाललीये. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, प्रेग्नंट होण्याचं फक्त नाटक करायचं आहे, खरोखर प्रेग्नंट व्हायचं नाहीये. आवश्यक ती काळजी घ्या.”
“ आम्हांला तेवढं कळतं, लहान मुलं नाही आहोत आम्ही.”
“या चुका मोठी माणसंच करतात, लहान मुलं नाही. तुला एक गोष्ट सांगून ठेवते जेनी, या नाटकाचे तुम्ही हिरो-हिरोईन असाल, पण मी नाटकाची डायरेक्टर आहे. मी सांगितल्याप्रमाणेच तुम्ही काम केलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत हे नाटक हिट झालंच पाहिजे. फ्लॉप शोजची मला सवय नाही. मी काय म्हणतेय ते कळतंय ना तुला?”
“होऽऽऽ गं, मला सगळं माहित आहे.”
“आणि next week मध्ये तुमच्या नाटकाला महिना पूर्ण होईल. त्यामुळे दोघं discuss करून प्रेग्नंसी कधी डिक्लेअर करताय हे सांगा. ठीकय? चल बाय take care.”
“हो, आम्ही कळवतो तुला, बाय.”
अनुशी बोलल्यावर जान्हवीला उगाचच टेन्शन आलं.

रात्री झोपताना जान्हवीने हा विषय काढला.
“यश, दुपारी अनुचा फोन आला होता.”
“अच्छा, काय म्हणतायेत मँडम?”
“पुढच्या आठवड्यात मला इथे येऊन एक महिना पूर्ण होईल. आपण प्रेग्नंसी कधी डिक्लेअर करणार आहोत हे विचारत होती.”
“हो माझ्या लक्षात आहे. आपण या week मध्ये काय सांगायचय याची नीट प्लानिंग करू. रिहर्सल करू, आणि दहा ते पंधरा दिवसात प्रेग्नंसी डिक्लेअर करू. अनुला फक्त रिपोर्ट्स आणि medical certificate पाठवायचे सांग. बाकी दिवस कसे गेले ते कळलं पण नाही, महिना इतक्या लवकर संपेल असं वाटलं नव्हतं.”

क्रमशः