" पाटलांची फजिती "
नुकताच श्रावण संपला होता आणि पाटलांचा फार दिवसांचा बेत त्यांनी आज आखायचा ठरवला होता. दिवसही साजेसा होता. आज बाजाराचा दिवस होता .पाटलांनी कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातलेला होता. आज लोकांना दिलेले उसने पैसे परत आल्यामुळे खिसा गरम होता. गावच्या इस्माईल कडे मिळणारा कडकनाथ घेऊन आज पाटील गरम खिशा निशी घरी आनंदाने गेले .त्यांनी एका हातात पिशवी आणि एका हातात पैशाची गड्डी दिली. पाटलिन बाई आज दिवसभर कामकाजामुळे दमलेल्या होत्या .त्यामुळे पाटलीन बाईंचा खिचडी करण्याचा बेत होता .प्रथम त्यांनी पाटलांना कडकनाथ बनवण्यासाठी विरोधही दर्शवला .परंतु त्यांच्या जिद्दी स्वभाव पुढे त्या जास्त काळ टिकाव धरू शकल्या नाही .पण त्याचबरोबर त्यांनी मनात एक खूणगाठ बांधली की पाटलांचा स्वभाव आपण बदलायला हवा आणि त्यांना धडाही द्यायला हवा .पाटलांचा महिनाभराचा खंड पडला होता त्यामुळे पाटलांना तेजतर्रार असा कडकनाथ हवा होता .पाटलिन बाईनि विचार केला आज खंड पडला म्हणजे शरीर इतक साथ देणार नाही म्हणून पाटलीन बाईंनी चार मिरच्या जरा शिल्लकच घातल्या होत्या .पाटलीन बाईंनी ताट वाढलं ,रस्सा टाकला, कडकनाथ टाकला,कांदा- लिंबू संगतीला दिलं .पाटलांनी अधाशा सारखा रस्यावर ताव मारला .कडकनाथ पोटाचा आकार आकार न बघता संपवला .कांदा लिम्बु व्वा . पाटील तृप्त झाले होते .नंतर पाटलिन बाईंनी त्यांचा बिछाना टाकला आणि पाटील झोपी गेले. रात्री एक-दीड ची वेळ असेल कडकनाथ चार शिल्लक मिरच्यांशी झालेल्या मुकाबल्यामुळे जागी झाला होता . त्याला त्यांची संगत नको होती .बाहेर येण्यासाठी आतूर झाला होता. पाटीलही जागी झाले पाटलीन बाईना कळू नाही म्हणून या कुशीवरुन त्या कुशीवर होत होते .परंतु कडकनाथ तळपला होता ,ह्या अथांग विश्वाच दर्शन घेण्यासाठी आतुर झाला होता. पाटीलांनी पडल्या पडल्या ढगाशी दो वगैरे करुन पाहिल . पण काही केल्या जमेना . . शेवटी पाटिल उठले, पाटलांनी टमरेल भरलं, गावचा पाटील आता विवश झाला होता वाड्याच्या बाहेर पडले रात्रीच्या किर्र अंधारात गावचा रस्ता नापु लागले ,अनेक गोष्टी पाटलांच्या डोळ्यासमोरून जात होत्या डॉक्टरांनी मूळव्याधीसाठी कडकनाथ जरा जपूनच खा सांगितलेला सल्ला विजेच्या वेगाने येऊन गेला, पाटलीन बाईंचा घरात शौचालय बांधन्याचा सल्लाही त्यांच्या डोळ्यासमोर तरळला,गावचि नदी दुरवर असल्याची जाणीव होत होती ,गांव भलमोठ जाणवत होत, रस्त्यावरचे चढ उतार परेशान करत होते,ढगाशी दो लिम्बशी कट्टी हा लहान पनीचा खेळही आजमावून झाला होता ,कडकनाथच भांडण विकोपला चालल होत,मिरच्यांच तिखट बोलण त्याला झोमत होत ,तसतसा तो पोटात उड्या मारत होता .पण रस्ता काही केल्या संपत नव्हता गल्लीच्या कोपऱ्यात पडक्या वाड्यात बसाव हा विचारही आला .पण कुणी बघितलं तर नाचक्की होईल म्हणून पाटलांनी सपासपा पाय उचलण्याचे प्रयत्न केले परंतु कडकनाथ तेहि करू देत नव्हता . त्यामुळे दिवसभर ताठ चालणारे पाटील आज अर्ध्याअधिक वाकुन चालले होते . धावतपळत कसेबसे पाटलांनी ध्येय गाठलं आणि कडकनाथ ला रस्ता मोकळा करून दिला .कडकनाथ शांत झाला होता.त्याच अणि मिरच्यांच किती कडाक्याच वाजल असेल. याची पाटलांना जाणीव झाली होती.पाटिलही निवांत झाले होते. कडकनाथच्या जाचातुन सुटले होते.अति तिथ माती ह्या उक्तिच दर्शन त्यांना झाल होत. सकाळी बघतो तर काय दारात गवंडी आलेले होते. वाडयाच्या परसात जागेच माप घेत होते.पाटिल जातीन ह्या कामात लक्ष घालत होते. बाईंच्या चार मिरच्यानी त्यांचं काम चोखपणे केलं होतं.पाटलिन बाईनी एक दगडात दोन पक्षी मारले होते.पण पाटलांच्या प्रेमापोटी त्यांनी तुपात दूध बनवून दिल.रात्रीच्या खिचडीचा बेत सकाळी पूर्ण केला आणि पाटलांना वाढली .
बोध - नवरा शेर बायको सव्वाशेर .
कथाकार -समाधान पाटिल