Avyakt - 1 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | अव्यक्त - भाग-1

Featured Books
Categories
Share

अव्यक्त - भाग-1

तन्वी ने निघताना एकदा आरश्यात पाहिलं आणि मग पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहिलं. 10 ला आरव ची filght land होणार. खर तर मी आता तिथे असायला हवं होतं, पण.........! नकोच तो विचार चला आपण आपल्या कामाला लागू अस म्हणून ती रूम मधून बाहेर निघाली.' तन्वी, आज थोडस लवकर ये हा ऑफिस मधून'. तिची आई तिला जाताना टोकतच म्हणाली. 'का ग आई काय झालं'? 'अग काय झालं काय, आज आरव येणार आहे ना विसरली का'? त्यांच्या कडे पार्टी आहे संध्याकाळी. 'आणि का ग, लहानपणापासून चा bestie ना तुझा तो तू खर तर जायला हवं होतं'. मला तर वाटलं तू आजची सुट्टीच घेणार आणि इथे तर असं दिसतंय तुला काहीही फरक पडत नाही. 'अग आई, अस काहीही नाही आहे तुलाही माहिती आहे सध्या नवीन प्रोजेक्ट चालू झाल्यापासून किती workload वाढलाय'.'आणि ह्या period मध्ये मला सुट्टी अजिबात शक्य नाही'. 'बर लवकर कर तर येणार ना'? 'i will try',' पण काहीही सांगू शकत नाही तुम्ही जा पुढे' i Will join,bye! आणि ती निघालीही.
शांत असलेल्या पाण्यावर अचानक वादळ यावे आणि मोठ्या लाटा उसळाव्या तशी काही अवस्था तिच्या मनाची झाली.आणि डोक्यात पुन्हा विचारांचे थैमान सुरू झाले. 6 महिने झाले आरव जाऊन पण एकही दिवस त्याच्या आठवनिशिवाय गेला नाही. किती सहजपणे निघून गेला तो एकदाही माझा विचार केला नाही.एकदा कमीत कमी एकदा तरी मला विचारायचं असत..... आता विचार करून काय फायदा 24 वर्षांची मैत्री क्षणात तोडून गेला त्याला काहीही फरक नाही पडत मग मी च का इतका विचार करायचा! मान्य आहे माझीही चूक होती म्हणून इतका टोकाचा निर्णय घ्यावा. छोट्या छोट्या गोष्टी मला विचारुन करणारा आरव आयुष्यात इतका मोठा decision घेतला आणि मला ते बाहेरून कळावं. त्याच Germany ला internship साठी जाण्याच स्वप्न होत किती मागे लागायचे मी त्याच्या पण मला कधीही seriously घेतलच नाही त्याने नेहमी उडवाउडवीची उत्तरे आणि जर त्या दिवशी अंकित चा कॉल आला हे विचारण्यासाठीआरव कधीच्या flight नी जाणार ? मला तर सुरवातीला काहिच कळले नाही की हा काय बडबड करतोय मग नंतर त्याने उलगडा केल्यावर कळलं की आरव ने Germany मध्ये internship साठी apply केलं होतं. आणि त्याला हव्या असलेल्या कंपनी मध्ये त्याला internship पण मिळली होती. ह्या गोष्टीचा माझ्या पेक्षा जास्त आनंद कुणालाच झाला नसता पण ही गोष्ट बाहेरून कळल्या मुळे माझ्या पेक्षा दुःख कुणालाच झालं नसणार.किती सांभाळून घेतलं मी त्याची प्रत्येक चूक लपण्याचा प्रयत्न करायचे. त्याचे ब्रेकअप झाले की ह्याला माझी आठवण यायची कुणाचा आधार नसला की माझ्या जवळ येऊन रडायचं मी किती वेळेस समजून घ्यायच त्याने कधी मला priority दिलीच नाही, नेहमी मला granted च धरलं त्याने आणि जाताना मी का गermany च का नाही सांगितलं ह्यावरून चिडले तर म्हणे तू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते म्हणूनच सोडून चाललो. असा कसा बोलू शकतो आरव मला त्याला एकदाही कळू नये माझ्या भावना,जाऊदे आता मलाही काही फरक नाही पडत, सवय झाली त्याच्या नसण्याची. पण आज जावंच लागणार सगळे असतील मी नाही गेले तर चांगल नाही वाटणार.

आरव खूप excited होता किती दिवसांनी अखेर तो घरी येणार होता, आपल्या माणसांमध्ये. airport वर सगळ्या आपल्या लोकांना पाहून तो खूप खुश झाला. त्याचे आई वडील सगळा ग्रुप पण त्या सगळ्यांमध्ये तो फक्त तन्वी ला शोधत होता. मी ही काय वेडा आहे का येईल ती इथे. ''खर तर तिने सगळं विसरून यायला हवं होतं', पण नाही येणार नेहमीच तिचा ego नाही सोडणार ती. एकही दिवस तिच्या आठवनिशिवाय जात नाही. कुठलाही कॉल आला की अस वाटायचं तन्वी च असेल किती सवय झाली होती. पण तिला काय फरक पडतो तिने कधी माझा विचारही नाही केला. जगात मला सगळ्यात चांगलं तीच ओळखते असा आव आणायची ना मग 24 वर्षांत माझ्या सध्या feelings समजू नये तिला.किती excited होतो मी मला internship मिळाल्या वर तिला surprise देण्यासाठी तिच्या नकळत apply केलं मी. वाटलं की तन्वी ला direct लेटर च दाखवावं किती खुश होईल ती! पण सगळं उलटच झालं किती, तिला अंकित कडून आधीच कळाल ह्या इतक्या छोटया गोष्टीचा किती issue केला तिने. पण मी त्या दिवशी थोडं over react च केलं अस नव्हतं बोलायला पाहिजे मी पण रागाच्या भरात बोलतो मी काहीही तिने समजून घ्यायला नको का? नेहमी तर घेती पण ह्या वेळेस मात्र तिने काहीच ऐकून नाही घेतलं. पण मी मी का विचार करतो आहे पुन्हा तिचाच आज सायंकाळी येईलच ईच्छा अजिबात नसणार तिची पण बाकीच्यांना काय वाटेल म्हणून नक्की येईन ती. तो मनातच विचार करत होता. 'क्या यार आरव तन्वी को कॉल किया था लेकीन उसका आणा आज impossible ही था कोई important मीटिंग हे बोल रही थी'. त्यांचाच मित्र अंकित म्हणाला. 'hmm भेटेल न evening ला असेल काहीतरी काम नाहीतर ती येणार नाही अस शक्यच नाही'त्यांच्यातला दुसरा एकजण म्हणाला.