Mala Kahi Sangachany - 18-2 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय...- १८-२

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

मला काही सांगाचंय...- १८-२

१८. नियतीचा खेळ... remaining

तर इकडे ती तिच्या शहरात पोहोचली तेव्हा बराच वेळ झाला होता ... ती बसमधून उतरून घरी जातेवेळी रस्त्याच्या कडेला दिवे लागले होते , तिने मोबाईल मध्ये किती वाजले ते पाहिले तर ७:३० वाजलेले ... तिने मोबाईल परत हँडबॅगमध्ये ठेवला तर हाताला काहीतरी लागल्याचं तिला जाणवलं पण तिला घाई असल्यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष करून ती पटापट पावलं उचलत घरी जात होती , काही मिनिटांतच ती घरी पोहोचली ... पण कुमारला त्या अवस्थेत पाहुन तिचं मन सारखं त्याच्या विचारांत गुंतलं होतं.. ती घरी आल्यावर , तो ठीक असेल काय ? त्याची काय हि अवस्था झाली ? या प्रश्नांनी तिला हेरलं ... कामात ती स्वतःला व्यस्त ठेवू पाहत होती पण मन मानत नव्हतं ... सारखा त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत होता ... लग्न होऊन चार वर्षे झाली आणि सुखी संसार तिला लाभला ... याच तिला समाधान वाटत होतं आणि ती संसारात रमली होती .. त्यामुळेच बऱ्याच गोष्टींचा तिला विसर पडला होता ....


तिच्या मनात विचारांची कालवाकालव सुरु होती . दारावरची बेल वाजली तशी विचारांतून काहीवेळ तिला सुटका मिळाली ... ओले झालेले हात पदराला पुसत ती दाराजवळ गेली आणि तिने दार उघडले ...


" ओ माय स्वीट हार्ट .."


चेहेऱ्यावर असलेली चिंता व्यक्त न करता ओठांवर हसू आणून .... तिने तिच्या पतीला आत या असा नजरेनं इशारा केला ...


तो आत आला आणि हात पाय धुवून टॉवेलने पुसून सोफ्यावर बसला ... इतक्यात ती चहा घेऊन आली , कप त्याच्या समोर धरून उभी राहिली पण मनात विचार पुन्हा दाटून आले ...


तिला असं पाहून तो म्हणाला..

" आज मौन आहे की काय तुझं?"


त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने ती भानावर आली ...

" मौन वगैरे काही नाही , बस असंच "


" बरं बैस जरा समोर ..."


" एक मिनिट मी दुसरा कप आणते "


तिने किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी आणखी एक कप आणला आणि ती त्याच्या समोर बसली .... दोघे सोबत चहा घेत गप्पा मारायला लागले पण तिचा काही जास्त प्रतिसाद मिळत नव्हता ... मग न राहवून त्याने विषय काढला ...


" आधी मला तू माफ कर ... मला ठाऊक आहे तू का रागावली आहे ते ..."


ती कप बाजूला सारून " तुम्ही माफी का मागत आहात ..."


" पहिलं तर तुझा वाढदिवस कालच झाला आणि मी तुला काहीही भेट दिली नाही . दुसरं म्हणजे साधं तुला शुभेच्छा दिल्या नाही ..."


आता तिला आठवलं कि काल तिचा वाढदिवस होता आणि कुमारने तिला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या ... ती पुन्हा विचारात गर्क झाली ...


" खरंच मला माफ कर , मी सर्व तयारी केली होती पण तुझ्यासाठी जी भेट मी आणणार होतो ती वेळेवर तयार झाली नव्हती त्यामुळे माझा मूड खराब झाला ..."


मग त्यावर ती म्हणाली " काही हरकत नाही मी नाराज नाही तुमच्यावर , मला काहीच वाटलं नाही त्याबद्दल , मला ठाऊक आहे की तुम्ही माझी किती काळजी घेता ते ..."


तेव्हा हसतच त्याने तिला म्हटलं " एक गंमत आहे , प्लिज दोन मिनिटं डोळे बंद कर ."


" काय गंम्मत आहे ? " म्हणत तिने डोळे बंद केले


त्याने एक छोटी पिशवी सोफ्यावर आणून ठेवली , लाईट बंद केला ... " हं आता उघड डोळे .."


तिने डोळे उघडून पाहिलं तर समोर टेबलवर केक ठेवलेला ... मेणबत्ती लावलेली .... त्याच्या एका हातात गुलाबांच्या फुलांचा गुच्छ आणि दुसऱ्या हातात काहीतरी पाठीमागे लपवून ठेवलेलं ... तो गायला लागला ...

" हॅप्पी बर्थडे टू यु , माय डिअर वाईफ ...."


असं गात त्याने सुंदर नेकलेस डब्यातून बाहेर काढला आणि दोन्ही हातात घेऊन तिच्या समोर भरला ... ती हसत हात ओठांवर ठेवून आश्चर्य आणि आनंद व्यक्त करत त्याला

" थॅंक यु , थॅंक यु सो मच , माय डिअर ... हे असं काही मला अपेक्षित नव्हतं ..." म्हणाली ...


" आधी घालून तर बघ ... कसा दिसतो तुझ्या गळ्यात मला बघू दे "


" तुम्हीच घाला कि माझ्या गळ्यात "


नेकलेस तिच्या गळ्यात घालून ... तिला आरश्या समोर नेऊन " आता कुठे हा नेकलेस सुंदर दिसत आहे "


स्वतःला त्याच्यासमोर आरश्यात पाहून ती लाजली ... खरंच खूप छान आहे , खूप सुंदर ती म्हणाली , मग थोडा केक चाखून तिने बाकीचा फ्रीज मध्ये ठेवला ...


" तुला आवडला ना ! बस , पैसे वसूल झाले ... बरं तू जेवण वैगरे बनवलं का ?"


" नाही . तुम्ही सांगा काय बनवू ? "


" काही हि बनवू नकोस , आपण आज बाहेर जाणार आहोत जेवायला तू पटकन तयार हो , लगेच निघूया ..."


ती पटकन तयार होऊन आली . दोघेही बाहेर पडले . बऱ्याच दिवसांनी सोबत बाहेर जेवण झाले . मग आईस्क्रीम घेऊन जरावेळ इकडे तिकडे फिरत ते घरी परत आले तेव्हा १०:३० वाजले होते ... काही आवराआवर करून झोपायला जवळपास वेळ झाल्याने अन दिवसभर झालेली दमछाक त्यामुळे तिला लगेच झोप लागली ... अचानक आलेल्या त्या क्षणिक सुखाने तिला दिवसभर जे घडलं त्याचा विसर पडला ... मन हे असंच आहे जरा दुःख झालं की निराश होणारं , सतत सुखाचा पाठलाग करणारं ...


त्याला लवकर ऑफिसला जावं लागत असल्याने ती पहाटेच उठली . काम आटपून तिने अंघोळ केली आणि आधी दोन कप चहा बनवला . त्याने दिलेला नेकलेस ठीक करत तिने त्याला चहा दिला ... त्याच्याशी जरावेळ गप्पा मारून ती पुन्हा डबा करायचा म्हणून किचनमध्ये गेली आणि स्वयंपाक बनवायला लागली ... काहीवेळात तो तयार होऊन किचनमध्ये आला तिथेच बाजूला खुर्चीवर बसून त्याने थोडं जेवण केलं ... तिने डबा हाती दिला आणि तो ऑफिसला निघून गेला.... ती काम करण्यात मग्न झाली पण दर पाच दहा मिनिटांनी नकळत ती आरश्यासमोर जाऊन स्वतःला त्यात पाहून तिच्या चेहऱ्याची लाली चढत होती ... असं काहीवेळ आरश्या समोर आणि काहीवेळ काम करत १०:०० वाजून गेले ... मग पंखा सुरु करुन तिने टी व्ही सुरु केला ... तिला गाणं ऐकावसं वाटत होतं तिने गाण्याचं चॅनल लावलं .... तिच्या आवडीचं गाणं लागलं .....


" अँखियो के झरोखो से , मैने देखा जो सावरे .... तुम दूर नजर आये , बडी दूर नजर आये ... "


गाण्याचे बोल सोबतच ती गात होती .... इतक्यात तिचा मोबाईल वाजत असल्याचं तिला कळलं , टी व्ही चा आवाज जरा कमी करून तिने मोबाईल हाती घेऊन कानाला लावला ...


" हॅलो सुजित बोलत आहे .."


त्याचं नाव ऐकताच तिला कुमारची आठवण झाली ... त्याला काल जाऊन भेटल्याचं तिच्या लक्षात आलं , काही क्षणात त्याचा काल पाहिलेला चेहरा तिच्या नजरेसमोर आला ... मोबाईल सुरु असल्याचं भान तिला नव्हतं ...


" हॅलो ... हॅलो ... आवाज येत नाही का?" सुजित म्हणाला


भानावर येऊन " हॅलो बोल सुजित ... आता ऐकू येत आहे ... कसा आहे कुमार ?"


" अजून बेशुध्दच आहे , आज सकाळी च ऑपरेशन झालं ... व्यवस्थित ..."


" मग डॉक्टर काय म्हणाले ? "


" लवकर ठीक होईल आणि जवळ जवळ पाच तास झाले की त्याला जाग येईल असं म्हणाले .."


" ठीक झालं . बरं मला कॉल करून सांगशील मग तो कसा आहे ते .."


" हो सांगतो ना , बरं मला एक विचारायचं होतं ..? "


" हं विचार ना ..काय म्हणतोस ? "


" काल चुकून तुझ्या बॅगमध्ये एक बुक टाकलं होतं तुला मिळालं का ते ..? "


" नाही , मला तर माझ्या बॅगमध्ये कोणतंच बुक नाही दिसलं ...."


" जास्त महत्वाचं नाही पण असेल तर एकदा पाहून घे आणि मिळालं तर पुन्हा इकडे येतेवेळी सोबत घेऊन ये ..."


" बरं ठीक आहे मी बघते माझ्याकडे आहे कि नाही ..."


" हो पण आठवणीने बॅग बघ ... "


" हो . नक्की , बरं ठेवते मी .."

म्हणत तिने फोन बंद केला आणि ती तिची बॅग शोधू लागली .... तिने काल रात्री बाहेर जेवायला जातेवेळी ती हँडबॅग सोबत घेतली असल्याचं तिला आठवलं म्हणून आधी हॉलमध्ये टेबलवर , आजूबाजूला तिने शोधलं .... मग टी व्ही बंद करून ती बेडरूम मध्ये गेली आणि कपाट उघडून त्यात कुठे ती हँडबॅग दिसते का ते पाहू लागली पण तिथेही तिला ती बॅग मिळाली नाही . मग बेडच्या आजूबाजूला असेल म्हणून ती तिथं वाकून पाहत होती तिथेसुध्दा तिला बॅग मिळाली नाही मग शेवटी तिने बेडरूम मध्ये इकडे तिकडे नजर फिरवली तर हँडबॅग बाजूलाच एक भिंतीच्या कोपऱ्यात तिला मेकअप साठीचा आरसा दिसला ... ज्याला लागूनच एक छोटा टेबल होता त्यावर ती बॅग ठेवलेली तिला दिसली ... मग बॅग हाती घेऊन ती बेडरूम मधून बाहेर हॉलमध्ये आली ...


तिने ती हँडबॅग उघडली तर तिचा स्कार्फ तिच्या हाताला लागला , तिने तो स्कार्फ बाहेर काढला तर त्यासोबत काहीसं जड खाडकन फरशीवर आदळलं . तिने खाली वाकून ते उचललं , हाती घेऊन स्वतःशीच ..... ' हे तर काही वेगळंच एखाद्या डायरीसारखं दिसत आहे सुजित तर बुक म्हणत होता हे ते नसेल कदाचित ... पण हे आहे तरी काय ...? ' म्हणत तिने अंगठ्याने त्या डायरीचे पान झरझर नजरेआड केले तेव्हा त्यात काहीतरी लिहिलं आहे , तिला दिसून आलं .... मग पहिलं जाड कवर बाजूला सारून तिने पान बदललं तर ते पाहून तिने आधी बॅग उचलून टेबलवर ठेवली , डायरीच्या पहिल्याच पानावर गर्द लाल रंगाने

"मला काही सांगाचंय"


असं मोत्यासारख्या सुंदर अक्षरात एखाद्या पुस्तकाचं नाव लिहावं तसं लिहलं होतं ....


ती सोफ्यावर बसून ते अक्षर ओळखीचं वाटलं म्हणून .... ' किती सुंदर लिहिलं ! किती छान अक्षरं आहेत ! हे अक्षर याआधी सुध्दा मी पाहिलं आहे पण कुठे ? ' आठवण घेत तिने स्वतःलाच प्रश्न विचारला .... पण काहीही आठवत नसल्याने तिने ते पान बाजूला सारून ती पुढचं पान वाचायला लागली ....


"जीवनात खूप काही बघायचं बाकी आहे आणि खूप काही मिळवायचं बाकी आहे , शिकून मोठ्ठ व्हायच आहे असं मी ठरवलं होतं, मला जन्म दिला , माझे पालन पोषण केलं, मला शिकता यावं यासाठीे कष्ट घेतले..... त्या आई वडिलांना सुखात ठेवायचं असं खुपकाही स्वप्न मी पाहिली होती. बालपणापासून मीही बरेच चांगले वाईट अनुभव घेतले आणि आलेल्या संकटांना तोंड देत समोर जात होतो, आज एका गोष्टीचा आनंद आहे पैसा जरी नसला जवळ तरी दोस्त खूप मिळवले. अगदी जिवलग मित्र मिळाले या नश्वर जीवनात , मला जवळपास सर्वांची गुपितं माहीत होती ते स्वतःहून मला सांगायचे त्याच कारण मला कधीच कळलं नाही....


आज खंत याचीच वाटते आहे कि जेव्हा मला गरज आहे आधाराची तर मी कुणालाही माझ्या मनातलं सांगू शकत नाही, इतकं एकटेपण वाटेला येईल आणि स्वतः बद्दल असं काही लिहण्याची वेळ मजवर येईल असं मला वाटलं नव्हतं. आज माझे मन इतके जड झाले आहे की शब्द बनून भावना व्यक्त करणं अशक्य झाले आहे... आणि त्याचसाठी मला पुःन्हा सगळं एकदा सुरुवातीपासून तर आतापर्यंत घडलेलं शब्दांत मांडून जगायचं आहे.... या निमित्तानं सर्वकाही आठवून का हि वेळ यावी ? या प्रश्नाच उत्तरं मिळवायचं आहे... जीवनातील साऱ्या आठवणी मोत्यासारख्या या पेन आणि कागदाच्या मिलनातून एका दोरात ओवायच्या आहेत.... ...... ..... .......