ठाकर पाडा
अवघ ३०० -३५० लोकसंख्येचा पाडा . मुख्य रस्त्या पासून ५ ते ६ मैल दूर तौल्याचा डोंगरात वसलेली शांत वस्ती .
पाड्याकडं जाण्यासाठी पक्की सडक नव्हती वहिवाटीनी पडलेली आडवळणी वाट एवढाच पाड्यावर जाण्यासाठीचा मार्ग ,
ठाकरांला गाव गाठायचा म्हणजे ५- ६ मैलांची पायपीट करायला लागे .मग तिथून मुख्य हमरस्त्यावर एखाद वडाप मिळतं का ते बघावं लागे .गावापासून दूर असला तरी पाडा संपन्न होता. कधीच कोणाला घाईवर येऊन गाव गाठायची वेळ आली नव्हती.
पाड्याचा मध्यभागीच ग्रामदेवतेच कौलारू देऊळ बांधलेलं ,सगळे त्याला तौल्या बाबाच म्हणत.कुणाचं दुखलं-खुपलं कि तौल्या ला कौल लावला जायचा, तेवढ्यावरच लोकांचं समाधान होई. कधी शहरात जाऊन डॉक्टर गाठायची पाळी कधी कोणावर आली नव्हती.तेवढी लोंकांची त्यावर श्रद्धा व्हती .तसं गावात वैद्य व्हती .तौला डोंगर देखील एक त्यांचा साठी देणगीच होता . सगळी आजारावर गुणकारी अशा वनस्पतींनी युक्त व्हता .
पाड्यावरची घर देखील कौलारू, भिंती गेरूचा मातीनं पोचारलेल्या त्यावर पोरीबाळीं नी काढलेल्या पानाफुलांचा नक्षा उठून दिसत. छतांची उंची जेमतेम ६ ते ७ फूट उंच. मध्यभागी दोन खांब रोवून छताला दोन्ही बाजून उतार काढलेला,आत एका बाजूला मोरी , तिला लागूनच चुल मांडलेली. अन एक आडवी एक उभी भिंत.प्रत्येक घराला ओटा अन त्यावर कुडाची ओसरी काढलेली म्हणजे आलेला गाडी माणूस एक्दम आत जात नस .
देवळाच्या बाजुलाच आबा ठाकराचं घर .पाड्यावरची माणसं एकदम साधी भोळी . आबानं घालून दिलेल्या शिस्ती बाहेर जाण्याची कुणाची टाप नव्हती. पाड्यावर आबाचा शब्द शेवटचा. कुणाचं बी गाऱ्हाणं आलं कि आबा चा दारातून कोणी मन मारून परत त नव्हता.
रुक्मि अन सदू हि आबाची दुनिया .बायको सदू २ वर्षांचा असतानाच जग सोडून गेली ,तसं आबानी दोघांला वाढवलं. घरात म्हातारी पण तीच्या सोबत वरचा आवजात बोलावं लागायचं मग कोणी तिचा नाद करत नव्हतं . रुक्मि सदूपेक्षा आठेक वर्षांनी मोठी व्हती . ती त्याचा वर आई प्रमाण माया करायची .सदू अजून लहान व्हता . रुक्मि दिसायला एकदम देखणी सगळे म्हणत तिच्या आईवर गेली. लांब सडक केसांची करकचून वेणी बांधलेली असायची, नाक चाफ्या सारखं,गोरीपान ,हातावर तुळशीचं पान , हनुवटीवर तीन ठिपके गोंदलेले. गुडघ्या पर्यंत नसलेलं लुगडं न चोळीत खरंच विठ्ठलाच्या रुख्मिणी सारखीच दिसत.पाण्या साठी बारवा कड जायची तवा पोरं तिचा उघड्या पांढऱ्या पोटऱ्याकडं डोळे भोकरागत करून बघत .तिचा चालीत वेगळीच लय व्हती .पड्या वरचा पोरान्ला ती कधी पाण्याला जाईल असं व्हायचं . तिचा बोरोबर पाण्याला जाण्यासाठी पोरी पाटआपट घरा बाहेर पडत .तिचा बोलण्यात एक समंजसपणा व्हता . हसणं एकाद्या नितळ झाऱ्या सारखं .पोरान्ला वाटायचं एकदा तरी तीन आपल्या शी बोलावं .प ती काय कोणाला थारा लागून देणार्यातली नव्हती.पाड्यावरचा सगळ्या बाया बापड्या तिचा हेवा करी .ती होतीच तशी आई गेल्या नंतर आबाचा संसार तीन नेटान उभा केला. आबाची अन सदूची जणू तीच आई झाली व्हती.
रुक्मि बरोबरच्या पोरींची लग्न होऊन एक एक पोरग काखात घेऊन मिरवत होत्या . रुक्मि मात्र अजून बिन लग्नाचीच होती .आबा ला मात्र तिची काळजी जीवाला खात असायची . त्याला कारण हि तसाच होत.पाड्यावर एक प्रथा होती . दार वर्षी तौल्या बाबाचा चैत्री पूणवला उत्सव असायचा.त्या दिवशी पाड्यावरचा तरुण पोरींचे बाप तौल्या ला कौल लावत . त्या प्रमाण एक एक पोरी चा कौल लावल्या जात. मग ज्याचा कौल जो उचललं .त्या प्रमाण पसंती नापसंती सांगून पोरींचे जोडीदार ठरवले जात . मग दुसरी दिवशी चांगला मुहूर्त पाहून सामूहिक रित्या सगळ्यांची लग्न एकाच दिवशी लावून दिली जात . हे सगळे नियम आबानंच ठरवून दिले व्हते .
आबान अजून रुक्मिचा कौल लावला नव्हता . सगळ्या पोरांचा नजरा आबा व अन रुक्मि व लागत .एक एक वर्ष असाच जात व्हतं . उत्सवाचा अगोदर पाड्यावर एक बैठक घेतली जायची . त्यात ज्या ज्या पोरी ला पदर येत त्यांचे आई बाप कौल मांडायचा प्रस्ताव बैठकीत ठेवत. बैठकीत तरुण पोरांची एकाच झुंबड उडत कोण कोण प्रस्ताव ठेवत याची सगळे वाट बघत . मग प्रत्येक जण महिना भर कसून तयारीला लागत .प्रत्येकानं आप आपली सोबतीण मनात ताडून ठेवलेली असत . कोणाचा कौल उचलायचा हे मनात ठरवत. ज्या मुलीचा कौल उचलायचा तीच साठी एक
दागिना खरेदी करावा लागत .एका मुलीचा कौल ठेवला कि मुलाकडची मंडळी आपला दागिना टाळया समोरचा ताटात ठेवत ज्याचा दागिना मुलीकडचे उचलत त्याची निवड त्या मुलीसाठी केली जात .मग लग्न सोहळा एकत्र पार पडत .
रुक्मि ला अजून काही पदर आला नव्हता. तशी ती ची काळजी आबा करू लागला. रुक्मि मात्र बिनघोर होती तिचा सदू त खूप जीव होता .ती लग्न करून गेली तर त्या तिघांची आबाळच होणार होती . म्हातारी आता जास्तच वाकायला लागली होती .
उदरनिर्वाह म्हणून पाड्यावरची माणसं महादू मुकादमाचा वित्त भट्टी वर कामाला जायची . डोंगराचा पायथाशी मोठा ओढा वाहत तिथंच महादूची भट्टी होती .कधी कधी लैच नड असली तर बायका देखील नवऱ्या सोबत जात.महादू हा बायकां बाबत लाळ घोट्या ; एकटी बाई दिसली कि त्याची लाळ टपकत.त्यामुळं कोणताच माणूस आपल्या बायकोला एकटीला भट्टीवर जाऊ देत नव्हता.तो दिवस भर बायकांच बारीक निरीक्षण करीत, गडी माणसं त्याची खोड जाणून व्हते पण मुकादम असल्या मूळ सगळे मूग गिळून बसत .
मग घरात पाड्यावर दिवसभर म्हातारे, बारकी पोरं, असत. तरुण पोरं आई बापाला मदत करायला जात. काही गावचा बाजारात जंगलातून गोळा केलेलं मध,कोंबीडीची अंडी ,कोंबड्या सर्पणाचा मोळ्या,औषधी मुळ्या, रान भाज्या, फळ, असं काही बाही घेऊन जात .ज्याला पैशाची नड असे तो बोकड नेई .प्रत्येकाचा घरात पाच ते सहा शेळ्या बकऱ्या असायचा . खुराड्यात कोंबड्या अन पिल्लं डालून ठेवली असायची , दिवसभर मोकळी सोडेल असल्या मूळ साऱ्या अंगन भर ती पिल्लावळ कोंबडी माग लुडबुड करत .दिवस मावळतीला जाताच बारकी घरी थांबलेली पोरं आप आपल्या खुराड्यात आपल्याच कोंबड्या पिटाळत सगळं नुसता एकच गलका उठे .त्यांचा धारपकडीत एखाद्या म्हतार्याची मात्र खूपच फजिती व्हत .तशी ती पोरं फिदी फिदी हसत सुटत .
शेळ्या , बकऱ्या चरायला न्यायचं काम पोरींकडं असायचं, घरची काम आटपून पोरी भाकरीच पेंडकं घेऊन दिवसभर शेळ्या माग जात .दिवस मालवायचा आत सगळ्या परतत.परतत असता जणू टांडाच दिसे ;सगळ्या पोरी हातात काठी गोल फिरवत आप आपल्या शेळ्यांना नावानं चुचकारत चालत.शेळ्यांसाठी तुराट्याची कूड करून झाप शेकारलेला असे त्यामुळे रानटी कुत्री, लांडगी,कोल्हे यांची भ नसायची.
संध्याकाळ व्हताच चरी घेऊन जोतो आप आपल्या शेळ्यांची धार काढत . मग चर्र.. चर्र ...एकच सूर निघे .थोडं पिल्लं साठी शिल्लक ठेवल्या जात. ती बकरं मग मिटक्या मारत सडांला बिलगत. रात्री पाडा शांत असायचा तारवाडाच्या झाडांत काजवे चमकत, रात्रभर कोल्हे कोई ~ ऐकू येई ..गडी माणसं ओसरीतच नाहीतर अंगणात खाट टाकून झोपत. दिव्यांचा वाती पोरंबाळं झोपताच गडप व्हत . म्हातारी माणसं राहून राहून खाकारे काढत . नव्या जोडप्यांची मात्र कुजबुज काही लवकर थांबत नव्हती . चंद्र जस जसा उजूळून निघे तस तशी त्यांची रात्र चांगली च रंगात येई. दुसऱ्या दिवशी मग सगळ्या कशा पाण्याला जमल्या की एकमेकींची गुपित काढत,जाणत्या बायका त्यांची चेष्टा करत मग बिचाऱ्या चांगल्याच कचाट्यात सापडत.लाजून लाजून मग लवकर तिथून पळ काढत.
कधी कधी पाड्यावरची टाकायला आलेली खोडं देवळाच्या पटांगणात हलगी , झंजरी ,टिमकी घेऊन सूर आवळायला बसत .
मग अख्खा पाडा पटांगणाकडं झेप घेत .कोणी नाचत, कोणी हलगी वाजवत, मग एका मागो माग एक गाणी व्हत.सगळा पद टेम्भ्याचा उजेडात उजळून निघत निम्मी रात्र सारली कि जो तो पोरं बाळ घेऊन घारला निघत .
शेजारच्याच पाड्यात रात्रीला दारु गाळपाचे का चालायचं . पण आबाचा शिस्ती मूळ कोणाची तिकडं फिरकण्याची हिम्मत व्हत नव्हती.तेवढा वचकच ठेवलं व्हता आबान .त्यामुळंतर पाडा निरोगी, समृद्ध, निर्व्यसनी होता , कोणाचाच घरात कलह नव्हता सगळे एकोप्यान राहत .
आबा उमाजी नायकाच्या गोष्टी सांगत , त्यानं कशी रामोशांला मदत केली ते सांगत , त्यामुळं पाडावासी आबाचा लै मन राखत .पाड्यावरची माणसं तालुक्याला जायला बुजत त्यामुळे तालुक्याचा बाजारात आबा सोडून कोणीच जात नसत .तालुक्याला कोणत्याही गोष्टीच मोल जास्त मिळतं हा आबाला ठाऊक होत. त्यामुळं आबा तालुक्याचा आठवडी बाजारात जात. आबाला थोडी फार अक्षर ओळख होती.तालुक्याला एखाद काम असलं कि आबा सगळ्या पाड्यावरचा लोकांची काही काम हाय का ते विचारायचा न कोणाचं काय तर कोणाचं काय सम्दी काम घेऊन तालुक्याला जायचा .कोणाचा पोराला सदरा ,को णाला धोतर लागे ,बायका पोरींचा choli बांगडी ,कुणाचा नातावनला कुड्या बाळ्या ,कोणाची औषध ; आबाला अख्या पद तोंडपाठ व्हता .समद्यांची काम ध्यानानं करायचा .त्याला खूप वाटायचं पाड्यावरचा पोरांनी शिकावं पण कोणी काय मानावं घेत नव्हतं. त्याची कळकळ फक्त दोनच व्यक्ती जाणून होत्या एक म्हणजे रुक्मि दुसरा शंकर ठाकराचा गणा .
गणा तरणाबांड अंगात कोपरी असायची, दंडाला तौल्याचा ताईत करकचून बांधलेला, त्यामुळं हाताची दंड कशे हवा भरल्या गत तर्रर्र फुगल्यागत दिस. उंच अन धिप्पाड छाती. घोट्या पर्यंत धोतर, कमरेला एक उपरणं कायमच बांधेल. गणाचा पाठीवर चार बहिणी; तिघींची लगीन होऊन सुखात नांदत व्हत्या. पाड्यावरच दिल्या मूळ गणा पण बिनधास्त असायचा . तसा गणाचा बी वचक व्हता .मामाकडं राहून गणा चार वर्ग शिकेल व्हता. आबाचा सोबत गणा जास्त असायचा, दोघ बोलायला बसली कि बाकीची फकस्त ऐकत. कोणाला काय बी उमजत नस.
गणा चं बी लगीन खोळंबलं व्हतं.त्याची धाकटी अजून लग्नाची बाकी व्हती. गणा आबाकडं येई तवा रुक्मि मात्र त्याचा राग राग करी
गणाला फिरून बोलण्याची हिम्मत एकट्या रुक्मितच व्हती.
.
.
रुक्मि तिच्या मैत्रिणीं संगती जाऊन पाण्याचा दोन खेपा घेऊन आल्ती . सदु तिची वाटच बघत व्हता त्याला लै भूख लागलेली .पण पारू संगती गप्पा मारत येता किती येळ गेला तिला बी कळलंच न्हाय .
पारू तिची खास मैत्रीण दोन वरीस झालती लगीन होऊन ,सात महिन्याची पोटुशी असतानाच नवऱ्याला पान लागलं . सरपण अनाया गेल्ता खोडा खाली हात घातला तसा वरडून उठला हातावर खोल दोन दात टोचेल त्यातुन रक्त वाहायला लागलं पर जवळ कोणीच न्हाय तसाच धावत सुटला, पर रस्त्यातच काळवंडून पडला . अजून घरला कसा न्हाय आला म्हणून पारू समदीकडं जाऊन आली पर काय काळया मार्ग न्हाय . मग गणा नि पाड्या वरचा पोरांनी शोधाया सूरूवात केली ; तवा हा तोंडाला फेस येऊन पडेल . सगळ्यांनी उचलून त्याला देवळात आणलं . वैद्यानी मंत्र सोडले , अंगारे लावले पर तो काय निवळाना . मग पारू मोठ्यानं हंबर्डे फोडाया लागली, तिचा नवरा गणाचा जिगरी यार . तो सुद्धा ढसा ढसा रडाया लागला आबान रुक्मीन लै सावरलं .
पारू आता तिचा सासरीच राहत व्हती .पोरग आता रांगू लागलं व्हतं सासू सासऱ्याचा लै आधार व्हता तिला .नवरा गेला तसं पाडावाल बी तिचा कड जातीनं लक्ष पुरवायची . घरातली करती तीच तर व्हती नवऱ्या माग सांभाळणार दुसरं कोण बी नव्हतं . गणा तिचा कड अधून मधून चक्कर टाकी .
पारू हे रुक्मि पासून हटकून लपवून ठेवी .
पण रुक्मिच त्याचा वर बारीक लक्ष ठेऊन व्हती .पारून न्हाय सांगितलं तर बी तिनं त्याला त्याचा घरातून हळूच निघताना बघितलं व्हतं .तीच त्या दोघां बद्दल येगळंच मत बनाया लागलं, तसं बी पारू आजून नवतारणीच तर व्हती दोघी बरोबरचा पर पारूला पदर आला तसं तिचा संसार थाटला ; पर देवाला काय बघावंल नाय ती एकटीच पडली. अशा वक्ताला बाई आधार शोधातच असती कि ;तो आबाचा सहवासात रहायचा प्रयत्न करी , रुक्मिशी बोलायचा प्रयत्न करी पण ti काय त्याला वारा लागू देत नव्हती.
आबाचा मात्र त्याचा वर लै इश्वास .आबा त्याला तालुक्याला घेऊन जाऊ लागलं व्हतं .गावा गावाचा बारीक सारीक गोष्टी सांगू लागलं व्हतं .आबा न बी गणा बाब काहीतरी ताडलं व्हतं.
आबा गणला मुद्दाम डिवचत" लगीन कवा करणार ,गणा "तवा तो म्हणत
"माझी सरी लहान हाय अजून तीच झालं कि लगेच",
आबा ला मग त्याच माप कौतुक वाट . पण रुक्मीला वाटत पाणी दुसरीकडंच मुरतंय .
सदू आता रडकुंडीला आला आबाला म्हणाया लागला "आबा चूल पेटव कि लै भूक लागलीय , आक्की आली कि लगच करल भाकरी"
आबा न तवर चूल पेटत घातली ,बाभळीचा दोन धप्ल्या घातल्या . तवर रुक्मि आलीच सदू च उतरेल तोंड पाऊण त्याचे मटा मटा मुकं घेऊ लागली , त्याचा पुढं चुंभळीत गुंडाळून आणेल सागरगोट्या ओतल्या तसा त्याचा चेहरा खुलला ; तिचा पाठिवं लटकून लाड काढत म्हणाया लागला " आक्के लै भूक लागलिया लवकर टक कि भाकर ; मग त्याचे गालगुच्चे ओढून ती लगेच काथवत घेऊन भाकरी थापाया बसली .तवर सदू सागरगोट्या जमिनीवर रगडून आबाला चटका देई तस्स आबा खोटं खोटं रड मग तो जोरात टाळ्या पिटी.
रुक्मि सगळं बघत व्हती .दोन भाकरी झाल्यावर ती न दोघानला बी जेवाया बोलावलं .तेवढयात गणा बी आलाच ,आबांनी इचारलं : " काय गणा आज लै सकाळी सकाळी ; ये बस्स न्याहारीला ";
तस्स रुक्मीन डोळे वटारले ते गणा न पायलं . मग त्यानं बी ठरवलंच न्याहारी करायचीच . आबा न दोन ताट घेतली एक सदू च आबाच दुसरं गणाच .सदू आबाचा ताटात च जेवत.
रुक्मि न ताटात भाकर ,लसणाचा खर्डा , काचकोयरीच कालवण वाढलं . गणा ला काय तरी बोलायचं हाय ते आबा न ताडलं पण तो अडखळत व्हता , रुक्मि कड बघून मान खाली घालून खात व्हता .मग आबा न इचारलंच गणा काय झालं सांग तरी , तसा गणा रुक्मि कड न आबा कड बघाया लागला .
मग आबा च म्हटलं :"आर तीला नग लाजू तीला समद्या गोष्टी सांगतच असतो मी तू बोल पटदिशी ".
गणा म्हणाला : "माझी सरी काल मोठी झाली , तवा माय म्हणली की तिला चोळी बांगडी घ्याया लागल "
सरी रुक्मि पेक्षा चारेक वर्षांनी लहान व्हती .तरी तीला पदर आला व्हता .
"माय म्हणाली औंदा दोघांला बी बाशिंग बांधील ,आता तुझं काय बी ऐकणार न्हाय ".
आबाच मन थोडं खट्टू झालं ,पण आबान तस दाखवलं न्हाय .
मग रुक्मिच म्हणाली " मग अडलं कुठं म्हणायचं , चांगलंच हाय की ; तू बी वाटच पाहत व्हता ना "
तसा आबा अन गणा एकदम चरकले .
गणा ला रुक्मि आवडत व्हती ,पाडाव तोच घोडनवरा दिसत व्हता .तो तर रुक्मिसाठीच सरीचं कारण पुढं करून थांबला व्हता .
आबाला तर येगळीच चिंता व्हती ,रुक्मि अजून न्हायला आली नव्हती. रुक्मिसाठी गणाच शोभलं असं आबाला वाटायचं .
अजून चैत्रीला सात आठ महिन बाकी व्हतं , तवर तिला पदर आला तर ठीक नायत चांगलं पोरगं हातातून जाईल असं आबाला वाटलं.
पण रुक्मिचा मनात तस्स काय बी न्हाय अस्संच त्या दोघास्नी वाटून गेलं.
मग गणा म्हणाला: " आबा मी बी येतो आज तालुक्याला , मला बी येउद्या ,आता कामाला लागाया पाहिजे लग्नाचा ; माय काय या वरीस ऐकत न्हाय
हळूहळू तयारी ला लागतो. कसं वाटतं तुमास्नी "
आबाला काय बोलावं कळंना :"बरं तू म्हणशील तस्स" .
तेवढ्यात पारू आलीच शेळ्या सोडाया उशीर व्हाया लागला व्हता .
मग रुक्मि म्हणाली " पारू तुझा गणाचे औंदा चार हात व्हणार बघ "
तस्स पारून चमकून गणाकड पायलं . गणान लगेच खाली मान घातली . गणा त्याचे समदे गुपित पारूला सांगत ,गणाला रुक्मि आवडती ह्य तिला म्हाईत व्हत .
पारू तिला लवकर आवराया सांगून निघून गेली . रुक्मिन पटापट काम उरकली म्हातारीला जेवाया दिलं स्वतःची न सदूची भाकरी एका फडक्यात बांधली
म्हातारीची वेणी फणी करून शेळ्या कोकर सोडयला निघून गेली . सदू पण तिचा संगती जायला लागला व्हता त्याला तौल्याचा माळ लै आवडायचा .
दिवसभर म्हातारीचं घरी थांब ,संध्याकाळी रुक्मीला येईस्तवर केरकचरा , दिवाबत्ती करून ठेवी .
रुक्मि शेळ्यांचा झापात गेली तिचा शेळ्यांनी तिला बघून एकच कल्ला केला . सदू न सगळ्यांला मोकळं केलं ताशा समद्या बाहेर उड्या टाकू लागल्या कोकर जोरजोरात वार्डायला लागली . रुक्मिची आवडती चंदी नावाची शेळी व्हती ,काळीकुट्ट अन तिचा माथ्यावर पांढरा डाग उठून दिसायचा म्हणून त तीच नाव चंदी ठेवल ;चंदी चे कोकर सुद्धा तिचा सारखीच उपजत ,चंदी रुक्मि पासून फर्लांग भर सुद्धा बाजूला चरत नसत. मग सगळ्या पाडावरचा तांडा तौल्याचा माळा कड निघाला , त्यांचा संगती चार पाच कुत्री पण असायची त्यामुळं साऱ्या पोरी बिनदास्त रहायचा .
एकदिवशी पारूला माळाव लै कोरडया उलट्या व्हाया लागल्या . रुक्मीचा संशय खरा व्हायला लागला .
रुक्मीन तिला विचारलं :"कितवा चालू हाय गं "
तस्स ती पटकन बोलून गेली: "दुसरा" .
मग स्वतःची च चोरी पकडल्या गेली लक्षात आल्याव दाता खाली जीभ चावून घेतली .अन धायमोकलून रडाया लागली .
रुक्मि कडू तोंडानं बोलाय लागली :"करता ना लाज न्हाय वाटली मग आता का गळे काढाया लागली , त्या गणाच पाप हाय नावं ; तरीच म्हटलं कसा अजून पोतर थांबला , पण तुझा कौल कसा लागलं गं, "
पारू हात जोडाया लागली :"रूकमे तू तरी असं नग बोलू , तुझा शिवाय कोण हाय माझं ; तू समजती तस्स काय बी न्हाय ग "
रुक्मि पण थोडी भानावर आली तिला पण कळालं नाय एवढं फटकन कसं बोली ते " तीच विचारात पडली तिला का त्याचा एवढा राग का आला "
पारू ची त्याचा संगतीची जवळीक तिला आवडत नव्हती , बाकी एका बी पोरी संगती तो लगट करत नव्हता.खरच तेच कारण व्हतं कि अजून काही ती बुचकळ्यात पडली.
पारू रुक्मिला त्या इसमाच नाव सांगना ,रुक्मि न गैरसमज करून घेतला हे तिचा लक्षात आलं होत . पारूची अडचण गणा जाणून होता त्यानं तिला तौल्या ची शपत घातली होती, ह्य कोणाचा बी कानावर जाता काम न्हाय .पारून तीच बी पाय धरले ,तस्स रुक्मि पण वरमली तीन तिला धीर दिला .हे कोणाला कळालं असत तर लोकांनी तीला वाळित टाकलं असत .
मग सांच्याला गुमान घरी आल्या . रुक्मिच कशातच लक्ष लागणं .तिला सगळं माहित करून घ्यायचं व्हतं पारू कडून गुपित माहित करून घ्यायचं व्हतं .
तिनं कशे तरी चार घास घशा आड लोटले .
इकडं पारू ला कधी सगळं गणाला सांगते आस झाल्त . गणा मुंजाचा पारावर पोरांसंगती गप्पा मार्त बसला व्हता .पारू त्याला हुडकत पराकडं गेली . त्याला बोलवून घेतलं ,त्यानं पण ताडलं काय तरी गंभीर असणार म्हणून तो लगेच पोरांमधून सटकला . तिला कश्याईचा देऊळा मागचा पटांगणात भेटला .तिकडं रात्रीच कोणी फिरकत नव्हतं .पारू न गणाची भेट झाली तस्स पारू त्याला भाडा भड सगळं एका दमात सांगू लागली मधीच हमसू लागली
इकडं रुक्मि ला कधी पारू ला भेटते अस्स झालं, मग ती पण पारूचा घरी जायला लागली. पारूचा घरचा रास्ता काशाइ चा देऊळा समोरूनच जात व्हता .ती अंधारात जपूनच पाऊल टाकत चालली व्हती. तिला मागचा पटांगणात कुजबुज ऐकू यायला लागली ,तिनं हळूच कानोसा घेतला पर काही ऐकू येईना ,ती देवळाचा मातेरी भिंतीला चाचपडत पाउलांचा आवाज न करता मागचा बाजूला आली ,तिथं तारवाडाच खुरटं व्हतं ;त्यामागं वाकून बघू लागली ,तिला समोरच समद दिसत व्हतं पर ऐकू काही येईना . तो तीची समजूत काढत व्हता पर ती काय रडायची थांबणा ,तस्स त्यानं तीचे डोळे पुसले तीला गप करू लागला .ती हमसतच व्हती मग त्यानं तीला आपल्या कुशीत घेतलं अन मायेन तीच डोकं थोपटू लागला
हे समद रुक्मि पाहत व्हती. तशी ती सर्र्कन पुढ्यात येऊन ठाकली. दोघांची पण भांबेरी उडाली दोघ पटकन बाजूला सरले ; रुक्मि न स~णकण गणाचा
मुस्काटात हाणली .पारू मधी पडली ती तीला सगळं खरं सांगण्याचा बेतात व्हती तस्स तिला गणा न थांबवलं .तिला हात धरून मग सारलं ;त्या मूळ रुक्मि अजूनच चवताळली .आता ती पारू वर धावून जायला लागली तस्स गणान तिला कवळी घातली त्याचा दांगट बाहुपाशात तिला हालातही येईना ; त्यानं पकड अजून घट्ट केली बराच येळ तीन हिसके मारले पण काय उपयौग व्हयना ,त्यानं आपले ओठ तिचा कानापाशी नेले , त्याचा काळजाची धड धड वाढाली व्हती....
त्याचे उष्ण श्वास तिच्या मानवर पडायला लागले तशी ती अंगभर शहारली .....तिचा अंगावर सर्र्कन काटा आला ,तिनं डोळे गच्च आवळले . तिला अजून कोणी बी हात सुद्धा लावला नव्हता ; ती छातीत श्वास रोखून शांत उभी ऱ्हायली ... त्यानं बी अजूनपर्यंत कोणा संगती एवढी लगट केली नव्हती . तो एवढा गडी माणूस पण त्याचा आवाजात कापरं भरलं . तस्स अजून तीला छातीशी कौटाळीत तिच्या कानाशी बोलू लागला.
"रुकमे! माह्या वर इश्वास नसल तर नको ठेऊस, पर तौल्याची आण घेऊन सांगतो म्या काय बी वंगाळ काम न्हाय केलं." त्याचा डोळ्यातलं दोन आसवं रुक्मिचा मानवं पडली.
मग रुक्मिचा बी डोळ्यात टचकन पाणी आलं , पारू नुसती बघतच व्हती.
तशी ती थोडी सावध झाली न त्याला बाजूला सारल;
" तू या समद्या भानगडीत नग पडूस .... मी न पारू बघून घेतो " गणा म्हणाला.
तशी ती आणखीनच चिडली " पारू! तुझा न माझा संबंध संपला , तुझं तोंड बी दाखू नगस " ; एव्हडं बोलून ती तर तर निघून गेली .
.
.
.
रुक्मि इचित्रं वागाया लागली ह्य आबा चा ध्यानात यायला लागलं व्हतं , आज काल तीच कशात बी लक्ष नव्हतं .
एकटक बघत बस्स , एकटीच हास , गप गप राही.
आबा ला वाटायचं बाकीचा पोरींची लगीन झालीत म्हणून ती जीवाला खात तर नसल ;
म्हणून आबा तिला अजूनच जपाया लागलं व्हता .
रुक्मिला त्या रात्रीच समद आठवायचं ..... त्याचा स्पर्श हवाहवा वाटाया लागला व्हता तीला ,ती सारखा त्याचाच इचार करी .....
मग पारू आठवली का तिचा निरास व्हयी .
पोरी पाण्याला जायचा तवा टवाळ कार्टी पोरींव हासत ,मागून शिट्या मारत . त्यांच्यात गणा कवा बी दिसत नसत ..... एखाद्या वक्ताला एखाद पोरग त्याला बखुटाला घरून आणिच , तो पोरान मधी दिसला तर रुक्मिचा लै तिळपापड व्हयी .....का ते तिला बी कळत नव्हतं .
.
.
चार दोन दिसा पसून रुक्मि ला काय बरं वाटत नव्हतं . पाय लै दुखाया लागले व्हते , थोडं काम केलं कि गळून जाया व्हायचं .आज तिला पोरी पाण्याला बोलावया आल्या तरी तीच कायबी आवरेल नव्हतं .तिनं पोरीनला जायला सांगितलं .
तीला आवरता बराच वखत निघून गेला . पोरी बायका घरी पण आल्या . तिला एकटीलाच जावं लागणार व्हतं .
परावरची पोरं बी उठून गेल्ती .
ती बारवा \कड जायला निघाली ,.... आज गणा बी पाण्याला आल्ता .
बारवा वर दोघांची गाठ पडली , तिला त्याचा संगती काय बी बोलायचं नव्हतं .
पण ती त्याला चोरून बघत व्हती हे गणाला समजलं.
"सरी ला बरं नाय ,म्हणून म्याच आलो " तोच बोलला
तिनं नुसतं "हूं" केलं, पण मनातून लै बरं वाटलं , बहिणी साठी एवढं करताना बघून .
तीनं गुंड्या खाली ठेवल्या अन पाणी वाढायला लागली ;
तस्स तिचा पोटात एकदम दुखून आलं तिनं हातातलं चऱ्हाट सोडून दिलं ,तसा पाण्यात धपकन आवाज झाला .
गणाचा काळजाचा ठोका चुकला .....त्यानं वर पाहिलं रुक्मि बारवाचा बाजूला पोटाला धरून गपकन बसली . पाण्यात चऱ्हाटासगट बादली पडली .
तो धावतच तीचा जवळ गेला ...... तीला असं बघून गणा लै वरमला .... काय करावं काही कळणं झालं.
रुक्मीला बी तिची अशी फजिती झाली , ती पण गणा समोर.... म्हणून ती रडकुंडी आली .
दोघानि खाली माना घातल्या . त्याला कळून चुकलं त्यालाच मदत करायला लागणार हाय . पाड्यावर पोरांनी तिला असं पाहिलं तर समदे तिचा वर हसतील .
तिचा काष्टा रगतान माखला व्हता .त्याची एक धार पायानी खाली ओघळाया लागली व्हती. तिला धड उठता यायना .
ती रडाया लागली ,..... गणा तिचा जवळ गेला तो काय करतो त्याच त्यालाच कळंना
त्यानं तिला अचानक उचलून घेतली ,तिला बी काळानं काय करतोय ते .
तिला बाजूचा झाडीत नेली , तिथं कर्दळीची झाड वाढेल व्हती .त्यानं तिला एका खडकावं बसवली , बराच उशीर झाल्यानं तिकडं कोणी फिरकणार नव्हतं
हे त्याला माहित व्हतं .
रुक्मिचा मनात वंगाळ यायला लागलं तशी ती जोरात रडाया लागली ,पर किती वराडल तरी कोणीच येणार नव्हतं .त्यानं तीच तोंड दाबलं ,
कर्दळ लै वाढली व्हती त्यामुळं मधी कोण हाय कोणाला दिसणार नव्हतं
त्याचा हात तिचा तोंडावर व्हता ,ती त्याचा डोळ्यात डोळे घालून पाहू लागली .
" मी सांगतो तेवढंच कर" गणा म्हणाला
तिनं मनाला नाय म्हणून हिसके मारले , त्यानं अजून जोरात तीच तोंड दाबलं .
तिचा पोटात दुखाया लागलं व्हतं .
"तुझा काष्टा फेड, " तिचा डोळ्यातून धारा चालू झाल्या. ती हातपाय झाडाया लागली.
" गुमान ऐक , मी पाणी आणून देतो , समद धून घे , तात्पुरतं माझं उपरणं लाव घरपोतं जावस्तोर , तुझी फजिती नाय होऊ द्यायचो मी "
ती शांत झाली , मान हलवून खाली बघाया लागली .
" मला बी चार बहिणी हाय म्हटलं, माझा सरीला बी आज पदर आला हाय म्हणूनतर म्या आल्तो पाण्याला"
त्याचा हात तिचा तोंडावर अजून तसाच व्हता . तो किती वेळ तिचा कडचं बघत व्हता .
तशी ती लाजून कावरी बावरी होऊन नजर फ़िरवाय लागली .
भान आल्यावर तो बी लाजला , त्यानं बादली भर पाणी आणून दिलं . तिला कमरेच उपरणं सोडून दिलं . अन बाजूला जाऊन उभा ऱ्हायला .
बऱ्याच वख्तान ती बाहेर आली . तीच लुगडं ओलं व्हतं ,उपरणं अंतर्वस्त्रा सारखं घेतलं होतं अन वरून तेच लुगडं काष्टा धून नेसली व्हती .
ती हळू हळू गणा मागून चालू लागली , त्यानं दोघांचे बी पाण्याचे भांडे खांद्यावर उचलून घेतले . मग दोघ घरला निघाले . आबा वाट बघत व्हतं .गणा न तिचे भांडे ओसरीत ठेवले , ती अजून मागून येतच व्हती .
आबान गणाला इचारलं "रुक्मि कुठं हाय "
"येतीया " गणा म्हणाला
रुक्मि आली तशी मोरीत शिरली , आबाला काय काळाना ; ती मोरीचा पडदा ओडून आंघोळी ला बसली ,
" आ गं सकाळीतर आंघोळ केल्ती ना वं, बरी हाय ना ,अन गणा ला कामून आणाया सांगितलं , म्या गेलो असतो " आबा न बाहेरूनच इचारलं
गणा अजून ओसरीतच बसून व्हता ,ती काहीच बोलत नव्हती .
आई असती तर तिला सगळं कळलं असतं ,पर आबाला काय सांगणार ; म्हातारी हाय पर तिला ऐकाया येत नस .
मग गणाच म्हणाला " अहो !ऱ्हाहुद्या आबा , काय व्हतं म्या आणलं तर ,"
"पर ती बोलना का , " आबा
"तिची माय असती तर बोली असती , तुम्हाला तिला चोळी बांगडी करावं लागल आता " गणा .
तसा आबाचा डोक्यात उजेड पडला , त्याचा डोळ्यात आसवं दाटली " म्हणजे माही रुख्मी मोठी झाली"
"आबा ! म्या येतो आता माय वाट पाहत आसल ." गणा जायला निघाला .
आबान त्याला जेवाय करता थांबवु लागला , त्यानं न्हाय म्हुणुन सांगितलं; त्याची बी माय पाण्यासाठी खोळमळी असणार ,
तवर रुक्मि बी बाहेर आली , ती त्याला चोरून बघत व्हती . आबाला लै आनंदात व्हता .
गणा गालात हासत व्हता ; मग तो तिथून निघून गेला .
.
.
तीन चार दिसांनी गणा आबा कड आला ......"आबा ! आज तालुक्याला जातो ,पारू बी हाय संगती ;तीच बी काम हाय "
रुक्मि आज न्हाली व्हती त्यामुळं चुलीला पोचारा मारत व्हती. गणा ला पाऊन खुलली, तशीच पारूचं नाव काढताच हिरमुसली.
"तुमचं काय काम असलं तर द्या, म्या करतो" गणा न इचारलं .....त्याला माहित व्हतं आबाच काय काम असणार ते.
आबा खाटावं बसून सदू ला खाऊ घालत व्हतं . " काम तर हाय ....पर तुला नाय जमणार "
"सांग तर आधी" ...गणा
"तर सम्दच माहित हाय ,त्या दिशी मह्या रुक्मि साठी देवासारखा धावलास ;मला कळलं समद रुक्मिकडून " आबा म्हणालं .
गणा रुक्मिकडं बघून गालात मुलकू लागला , पर ती तर तोंड फुगून बसली .
आबा म्हणलं " रुक्मि साठी चोळी बांगडी आणायची हाय "....आबा
"एवढंच ना मी आणतो ,तुमी नगा धावपळ करू "....गणा
"असं म्हणतोस " आबा न कोपरी चा खिशातून पैशे काढून गणाला दिले " मग बघू तुझी पसंद आवडती का माह्या रुक्मिला"
आबा खो खो हसू लागला
सांच्याला गणा आबा कड आला .,आबा घरी नव्हता ....सदू ओसरीत खेळत व्हता .
सदून सांगितलं आबा काश्याइ ला नारळ व्हायला गेले . तो चोळी बांगडी घेऊन आल्ता ."
uरुक्मि दिवा बत्ती करत व्हती .
"आमची पसंद आवडली का बघावं म्हटलं" गणा मोठ्यानं म्हणाला
तशी रुक्मि बाहेर आली " पसंद कोणाची हाय ,तुझी का तीची"
त्याला समजलं तिला काय म्हणायचं हाय " बघितल्या शिवाय कसं कळणार " त्यानं पण नीट उत्तर दिल
तिनं चोळीचे खण त्याचा हातातून हिसकून घेतले . उलगडून बघाया लागली ....बारीक नक्षीचे , अस्सल , हिरवा आन तांबडा अशे दोन खण घेऊन आल्ता
लाल रंगाचा बांगड्या एकदम तिचाच हाताचा मापाचा डझन भर बांगड्या आणल्या व्हत्या . रुक्मि एकदम खुश झाली
"मग आवडल्या का नाय " ......गणा
"हं~ ; पर दोन खण का बरं.....तुला माह्या हाताचं माप कसं ठावं "
तो हसया लागला " एक आबाचा अन दुसरा माझा , तुझा हाताचं माप घेतलं व्हतं एकदा "
ती लाजया लागली , अन घरात निघून गेली ........पण पारूचा इचार काय तिचा पिच्छा सोडीना.
आता तिचा मनात फक्त गणाच सुरपारम्ब्या खेळाया लागला व्हता. मनात ती दोघांबद्दलचे एकांतातले क्षण रंगया लागली व्हती .
गणा तर त्या क्षणांची किती वर्षा पसून वाट बघत व्हता . या चैत्री पुनवला ते सपान पूर्ण व्हणार व्हतं .
गणा अन पारू तालुक्याला जाऊन आल्या नंतर चार पाच दिसांनी पारू लै आजारी पडली. आठ दहा दिवस आंथरुणालाच खिळून व्हती .तिचा घरची काम गणा अन सरी करत व्हती . तिचा दवा पाण्याकडं गणा जातीनं लक्ष देई .तिला नेमकं काय झालं कोणाला कळत नव्हतं .गणा वैद्याला येऊ देत नव्हता .व्हईल दोन दिसात बरी म्हणून वेळ मारून नेई.
रुक्मीला ही गोष्ट समजली, पर तिची माया पातळ व्हईना ती काय पारूला भेटाया जाईना .पारू वाटायचं रुक्मि आली कि समद खरं सांगून टाकावं .पर गणाला बी शबूत देऊन ठेवला व्हता .ती पुरती कचाट्यात सापडली .तिचा दोघांसाठी जीव तुटत र्हायी .
आबा पारूला भेटून आल्ते . तंवा रुक्मीण तिची समदी इचारपूस केली . तिला वाटलं तिला भेटून यावं काही झालं तरी दोघी सख्या मैत्रिणी व्हत्या .
पण तिला गणा अन पारूचं नातं मान्य नव्हतं .तिचा दृष्टीनं पारू व्यभिचारी व्हती . अन गणात तिचा जीव भटकत चालला व्हता .
.
.
पारू आता चांगलीच निवळली व्हती .बऱ्याच दिसांनी तो आबा कड आला व्हता . आबा न पारूचा इषय काढला तवा त्यानं तुटक उत्तर दिली.
त्याला रुक्मि समोर पारू चा इषय नको व्हता .रुक्मि दोघांचं बोलणं कान देऊन ऐकत व्हती .
मग रुक्मीनच इच्चारलं " काय म्हणती तुमची पारू , तुम्हास्नी सोडीना वाटत , ....आज लै दिसानं उगवला म्हणून म्हटलं"
" काय नाय बरी हाय आता, " गणा
रुक्मिच असं बोलणं गणाला आवडलं न्हाय , त्याला वाटत व्हतं रुक्मि मला ओळखाया लागली असल , पर तिचा मनात अजून संशय व्हता .तो अजून तरी तिला काहीच सांगणार नव्हता .
.
.
आज पाड्यावरल्या लोकांनी तौल्याचा पटांगणात जमायचं ठरवलं व्हतं ,थंडीचे दिवस व्हते , पटांगणात मोठी शेकोटी पेट घेत व्हती . तिच्या भोवती समद्या बाया बापड्या लेकरांला घेऊन बसली व्हती .गडी माणसं एका बाजूला तर तरणी पोरं एका बाजूला व्हती . आज काही पोरांनी मुकादमाला नाच गाणं बघाया बोलावलं व्हतं ,तसा मुकादम कधी पाड्यावर येत नस ,आज पोरांनी लैच आग्रह केल्ता .हे समद गणांन ठरवलं व्हतं .
हलगी वाजया लागली. ढोल, झारीच्या तालावर पोरं एका लयीत नाचया लागली .म्हातारी माणसं गाणी म्हणत व्हती . गणा अन रुक्मिची चुकून नजरा नजर होई .पण रुक्मि त्याला बघून मुरके मारी .तसा गणा गालात खुद्कन हास .
मुकादम बाई येड्या व्हता. बायका पाहून तो डोळे फाडून त्यांना निरखून घेई. गुलाबी थंडीत रात्र चांगली रंगत आल्ती. रुक्मिची नजर गणा ला शोधत व्हती पर तो अचानक गायब झाल्ता. तिनं पारूला शोधाया सुरवात केली ती पण कुठं दिसणं झाली.तस्स रुक्मिच मन येगयेगळे तर्क बांधाया लागल. रुक्मीण सदूला आबाचा ताब्यात दिलं.अन तिथून हळूच सटकली मुकादम बी आता जायला निघाला व्हता. दोघ एकदमच निघाले तो पहिल्यांदाच रुक्मीला बघत व्हता . रुक्मिच त्याच्याकडं अजिबातच लक्ष नव्हतं ,रुक्मि सारखं नक्षत्र तावडीत सापडलं म्हणजे त्यांची माकडाचा हाती कोलीत ' अशी त्याची गत झाली असती .
रुक्मि वरचा आलीत दोघांला शोधया निघाली ,मुकादम तिचा पाठीच व्हता ,ती एका उंबराचा झाडाखाली अंधाराचा आधारानं उभी ऱ्हायली .कुठं ते दोघे दिस्तायका ते बघत सुटली . ......अचानक तिचा कमरेला कोणी तरी हात घातला दुसरा हाताने तिचं तोंड दाबून धरलं ....तिला माग कोण हाय काय बी दिसत नव्हतं . .....ती घशातून आवाज काढाया लागली तो तिला फरपटत गवताच्या सुडीत नेऊ लागला ......ती पूर्ण ताकदीनिशी त्याला आडवत व्हती .....तिचा पायातल्या वाहन गळून पडल्या ......त्यानं तिला गवतावर फेकून दिली तिचं तोंड एका फडक्यानं बांधून घेतलं .....तो तिचा काष्टा फेडणार तेवढयात त्याचा कमरेत मागून निबर लाथ बसली तसा तो कोकलून उठला .....
.रुक्मि पटदिशी उठून उभी ऱ्हायली ....समोर गणा तिचा वहाणा घेऊन उभा व्हता ......त्याला बघून ती त्याचा छातीला बिलगली ती धाय मोकलून रडाया लागली .....त्याला त्या इसमाला चितपट करायचं होत ....पर रुक्मि त्याला बिलगतच तो इरघळून गेला ....तो इसम मात्र अंधाराचा फायदा घेऊन तिथून निसटला .....गणा ला माहित होत ती व्यक्ती कोण होती ....पण रुक्मि मात्र अचानक झालेल्या प्रसंगामुळे भांबावली व्हती .ती गणाला सोडाया तयार नव्हती .किती तरी वेळ ते दोघे तशेच उभे व्हते. ....तो मायेन तिचा डोक्यावरून हात फिरवीत व्हता .तशी ती तिचा मनाला सावरत होती .किती तरी वेळ त्याचा श्वासबरोबर तीच डोकं वर खाली व्हत व्हतं . .....त्यानं हळूच तिचा गालावरून हात फिरवला.तिचे डोळे पुसले .....त्यानं त्याचा ओंजळीत तिचा पूर्ण चेहरा धरला तिचा डोळ्यात डोळे घालून बघू लागला .तिनं लगेच तिचे डोळे गपकन मिटले .अजून डोळ्याचा धारा चालूच व्हत्या ...त्यानं हळूच तिचा मस्तकाचे चुंबन घेतले ....तिनं परत त्याला मिठीत घेतलं ...अजून हि तिचे डोळे मिटले होते .दोघानला हि कडाक्याचा थंडीतही उब जाणवाय लागली व्हती .....
तो तिला म्हणाला
" जे झालं ते इथंच इसर,कोणाला काही सांगत बसू नकोस . तुला परत कोणीच तरास देणार न्हाय,माझा व इश्वास ठेव"
तेच आपुलकीचे शब्द ,ती मनोमन सुखावली .
तिनं आता डोळे उघडले थोडी सावध झाली , अजून पटांगणात गाणी चालूच व्हती .तिनं त्याच्याकडं बघून मान डोलावली .तिचं त्याचा मागं लक्ष गेलं .तिथं पारू उभं व्हती . झाल्या प्रकारानं ती बी घाबरल्याली दिसली .....मग रुक्मिचा डोक्यात उजेड पडला ,ती त्या दोघानांतर शोधाया आल्ती . तिची पायाची आग मस्तकात गेली .
म्हंजी ती दोघेपण गवताचा सुडी चाच बाजूला व्हती झटपट ऐकू येताच पटकन बाहेर आल्ती .....
तस रुक्मीण गणाला ढकलून दिलं .तो तिला समजाया लागला पर ती काय बी ऐकून घ्यायला तयार नव्हती ..पारून बी लै थांबवायचा प्रयत्न केला पर ती तिथून पळत सुटली अन पटांगणात येऊन आबाचा माग येऊन बसली . गणा अन पारू बी तिथं आले . गणा एकटक तिच्याकडं नजर लावून बघत व्हता .पर तिनं एकदा बी त्याच्याकडं बघितलं न्हाय .
लोक थकून भागून घरला निघाली.सदू झोपी गेला व्हता रुक्मिचा अंगात त्राण नव्हते त्याला उचलून घरी न्यायचे . आबा त्याला उचलतं व्हती.मग गणाचं पुढं झाला त्यानं सदूला आपल्या खांद्याव टाकलं. आबा, गणा, रुक्मि चालू लागले .आबा एकटच बडबड करीत व्हतं.दोघ बी घाण्याला जुंपलेल्या बैलागत चाली व्हती. गणान त्या निघास्नी घरी सोडलं .
निघतानी त्याचे पाय सारखं घुटमळत व्हती. न राहून तिनं त्याच्याकडं पाहिलं. तस तो थबकला, पर ती डोळ्यांनीच बोलत व्हती " का वागला असा"
त्याला कळत व्हतं तिला काय म्हणायचं हाय , तिचे पाणावलेले डोळे समदं बोलत व्हते .तो मात्र गप्पच व्हता
रुक्मि आता झाल्या प्रकारातून बरीच सावरली होती .पण नुसती गप गप राही . आबा ला तिचा लग्नाची हुरहूर लागून व्हती . गणाचा काऊ हिला मान्य आसल का न्हाय याचीच चिंता त्याला लागून ऱ्हायली व्हती .कारण रुक्मि त्याचा काही इषय काढला कि गप राही
गणाचं घरावं येणं वाढलं व्हतं पर रुक्मित त्याच्यात काहीच बोलणं व्हत नव्हतं .तो फक्त आबा संगती अन सदू संगती बोलत असे .पण तो रुक्मिचा अंदाज घ्याय करता येई हे आबान ताडलं व्हतं .
.
.
आज चांदण्या कश्या जमिनी पोतर लोम्बाल्या व्हत्या जश्या काही आभाळाला जड झालत्या .अंगणात वारं आट्या पेट्या खेळत व्हतं . आबा न खाट अंगणात टाकली व्हती ,सदू आबाचा ढेरी वर बसून आबा संग आपडी थापडी खेळत व्हता . पाडा निपचित पडला व्हता .एखाद दुसऱ्याचा अंगणात शेकोटी पेटून ठाकर गप्पा मारीत बसले व्हते .आबा पडल्या पडल्याच चाऊ मऊ करत व्हता ,रुक्मि त्याचा पायताला बसून नुसती गालात हासत व्हती .
आबाचा पायाला तेल लावून पाय चुरत बसली व्हती .
तिला लांबूनच अंधारात कोणी तरी झपाझप पाऊलं टाकत येताना दिसलं तशी ती सावध झाली . तो आता लांबून लांबून चोरून चालाया लागला व्हता .
तिनं ओळखलं व्हतं कोण हाय ,पण आबाला पाहूनच तो लांबून चालला व्हता हे तिला समजलं .असं काय कारण असल म्हणून तो तोंड लपून चाला व्हता .तिनं मुद्दाम त्याला आवाज दिला" गणा~ थांब.कुठं चाला येवढ्या घाईनं, ये कि काय घाई हाय "
"काय न्हय, घरला चाललो "
आबा बी सदूला सावरून बसलं , त्यानं बी आवाज दिला " गणा ये रे "
तसा तो थोडं मोर्ह झाला "नको लै येळ झालाय " असं म्हणत असतानाच पायाला ठेच लागली . तशी रुक्मि त्याचा पोतर धावत गेली अन पटकन पदराची चिंधी फाडून त्याचा अंगठ्याला बांधली .ती उठून उभी ऱ्हायली तो तिचा पासुन तोंड लपवीत व्हता .त्याचा व्हटातून रगत निघत व्हतं .कोणी तरी ठोशा मारल्यागत व्हट सुजला व्हता . तिनं तिची लांबसटक बोटं त्यावरून फिरवली ,तिला एकदम आवंढा आला .ती त्याला काही इचारणार तोच त्याचा अंगाचा दारूचा दर्प तिच्या नाकात शिरला .तस्स तिनं पटदिशी नाकतोंड दाबलं .आबा ला मागणं येताना बघून त्यांन काढता पाय घेतला ,ती तशीच आसवं गाळीत उभी व्हती . आबा जवळ येताच थोडी सावध झाली .
"का बरं गेला गं तो असा घाईनं"
" काय नाय काम व्हतं त्याला"एवढं म्हणून ती आपलं रडकं तोंड लपवीत निघून गेली
दुसऱ्या सकाळी एकच बातमी पाडयावर वाऱ्यावर पसरली ,'मुकादमाला झपाटलं ' जाच्या त्याचा तोंडी एकच झालं ; चार दिवस भट्टी बंद व्हती .
कोणी काय कोणी काय बोलत व्हतं ' मुकादम घरला जात असतानी रस्त्यात त्याला खविस दिसला ,दोघांत लै झटपट झाली , मुकादमाला लै मार बसला .
कसा तरी त्याचा तावडीतून सुटला हाय ".
रुक्मिला या गोष्टीत शंका यायला लागली . गणा दोन दिवसांनी आबाकडं आला, तोंड ओसरल व्हतं . त्याला बघायकरता रुक्मि घाईनं ओसरीत आली .
आबा न गणाचा गप्पा सुरु व्हत्या .तिला पाहताच गणा गालात मूलकला . ती मात्र त्याच्याकडं निरखून बघत व्हती ,तिला कशाचा तरी अंदाज घ्यायचा व्हता . " आंगठा बरा हाय ना वं " तिनं इचारलं .
त्यानं नुसतं "हूं " केलं .पण थोडा चरकला . तिनं अबासमोर काही बोलाया नको .तो तिच्याकडं पाठफिरवून बसला, त्याचा हातावर काही ओरखडे व्हते .
तिनं त्याला इचारलं " तू कधी खविस पाहिलाय का ".
आबा हासत सुटलं " अगं ,असं काय बी नसतं ,समद्या मनाचे खेळ असते ,त्या मुकादमाला कोणी चोपलं आसल बघ ,त्याची कारस्थानच तशी हाय "
गणा गालात हासत व्हता .ती त्याचा कड बारीक तिरपी नजर करून बघाया लागली .
"म्या नाय पहिला, पर भेटला कधी तर आधी तुझ्याकडचं धाडीन" तो हासत सुटला.
"काय नग , तुझा खविस तुझाकच ठिव "असं म्हणून ती शेळ्या सोडाया निघून गेली .
.
.
चैत्री पूणव महिन्याभराव आली व्हती , आबान पाडावरची बैठक बोलावली व्हती . समदी बाया माणसं पोरं-पोरी बैठकीला आल्ती .
मुंजाच्या पारावर खाट टाकेल व्हती .खाटावं आबा ,अन अजून जाणती तीन- चार मंडळी बसली व्हती .
बाकी सारी पाराचा समोर दाटी वाटी करून बसली व्हती .सगळ्याला एकच उत्सुकता व्हती ,आज कोणा कोणाचा कौल ठेवायचा हाय ते कळणार व्हतं ,समदी पोरं पोरींकडं चोरून बघत व्हती ,पोरी तर वर मान कराया बी तयार नव्हत्या .
आबा न सुरवात केली ."कोण कोण कौल लावणार हाय, त्यानं नाव सांगायची, गणा तू नाव लिहून घे"
दरवर्षी आबाच नावं लिही ,औंदा मात्र त्यानं गणाला सांगितलं , गणा गर्दीतून वाट काढीत पुढं आला ,समदी त्याच्याकडं टकामका बघत सुटली .
गणा आबाचा बाजूला जाऊन उभा र्हाईला .समोरच रुक्मि अन पारू बशेल व्हत्या .त्यानं दोघीकडं बघितलं .त्या जशा ओळख नसल्या सारख्या एकमेकींच्या बाजूला बसल्या व्हत्या .रुक्मीन लाजून अंग चोरून घेतलं .
"आबा मी माझा सरीचं नाव पाहिलं लिवतो"
साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या . मग एक एक करत नाव पुढं यायला लागली .बैठकीत नुसता उत्साह वाहत व्हता . तरणी पोरं जोर जोरात टाळ्या ,शिट्या मारी . ज्यांनी पोरी हेरून ठेवेल व्हत्या त्यांची नाव पुढं आली कि पोरग लै खुश व्हई . तर काही हिरमुसून जाई .
सात आठ पोरींची यादी झाली .बायकां मधी कुजबुज सुरु झाली ' औंदा बी रुक्मि तशीच राहती वाटतं , आई बिना पोर देव किती वाट पाह्य लावितो काय माहित '. आबा न समदा कल्ला शांत केला .यादी हातात घेऊन आबान यादी वाचून दाखवली . " कोणी र्हायलं त नाय ना ",आबा न पुनः खात्री करून घेतली .रुक्मि अन गणा एकमेकांकडं बघाया लागली ,गणा आबाला काहीतरी म्हणार , ते आबाला कळालं तोच आबा म्हणी .
"गणा ! आता मह्या रुक्मिच नाव लिव्ह".
एवढं ऐकून पोरं जोरजोरात शिट्या मारल्या , बायका त्यांचं गाऱ्हाणं ऐकलं म्हणून देवाला हात जोडू लागल्या .रुक्मि चे गाल तांबटया सारखे लाल लाल झाले . गणांन तीच नाव टिपून घेतलं .तो लै वर्षापाऊण या दिसाची वाट पाहत व्हता .समद्यांनी ."तौल्याचा नावानं चांग भलं " अशा हाल्या दिल्या .
.
.
आता फकस्त पंधरा दिवसावर पूणव र्हायली व्हती , आबाचा अंगावर लै काम आलं ,कोणी काय काय आणाया सांग आबाला . आबाचा तालुक्याला खेपा वाढायला लागल्या . लोक बारीक सारीक सामान गावचा बाजारातून घेऊन येई .लग्नाचा खर्चासाठी कोंबड्या ,बकर बाजारची वाट धरू लागली व्हती .
गणान बी त्याची चार बोकडं काढली व्हती .औंदा त्याला दोन लग्नाचा खर्च जमा करायचा व्हता . सरी लुगडी , चोळी ,बांगडी .त्याचा व्हणाऱ्या बायको साठी दागिने करायचे व्हते .आबा संगती तो तालुक्याला जाऊ लागला व्हता , दोघ बी बघत काय काय घेताय ते .
आबा गणाचा पसंदीनच समदी खरेदी करी .गणा बी मग भारी लुगडी काढी ,बारीक नक्षीचे चोळीचे खण काढी .दोघ बी एकीसाठीच खरेदी करत व्हते .
पण गणा हुशारीनं त्याची खरेदी करी ,आबाला कळू देत नस त्याची खरेदी कोणासाठी हाय .
पोरी आता लवकर माळावरून घरला येई . पुनवची तयाररी करू लागी , देऊळ सजवायचं व्हतं , घर पोचारायची ,नक्षा काढायचा व्हत्या .लगीन सोहळा सामाईक असल्या मूळ पंगती साठी शीदा निसून ,बांधून ठेवायचा ,अशी बरीच काम व्हती . गावात नुसतं आनंदाला भरत येत व्हतं . समदी गोळ्या मेळ्यांन
तयारीला लागले व्हते .पोरं कौलाचा दागिना घेण्यासाठी भट्टीवर जास्तीच काम करू लागली व्हती .
दिवस जसजशे जवळ येऊ लागले तशी रुक्मि बेचैन व्हायला लागली व्हती .तिला र्हाहून र्हाहून त्याचा बरोबरचे क्षण आठवत मग ती अंग भर शहारून उठत.तिला आता त्याचा संगती लै बोलायचं व्हतं.दिवस कमी कमी व्हतं चालले व्हते. पर तो आता कामात गढून गेला व्हता, दोन लग्नाचा भार व्हता त्याचा वर. लगीन पोराचं असो वा पोरीचं दोघा मंडळींला समान खर्च करावा लागे.तिची घालमेल व्हई. पर त्याला एकांतात कसं गाठावं ते
तिला कळत नव्हतं , " त्याचा मनात दुसरी कोणी असली तर , माझा कौल त्यानं न्हाय उचला तर .....पर पारूचं न त्याच काय नातं हाय.....पाड्यावर कोणी बी दारू पेत न्हाय मग तो कसा प्यायला लागला....आबाचा किती इश्वास हाय त्याचावर......"
असं काहींना काही तिच्या डोक्यात चालू व्हतं ....
आबा अन गणा आज तालुक्याला सकाळीच गेल्ते .चार दिसावर पूणव आल्ती .सगळीकडं नुसती धामधुमच व्हती .
गणा ला अन आबाला ऱ्हायली -सायली समदी खरेदी करायची व्हती .
आज समद्या पोरींनी बी लवकर आवरून जायचं ठरिवलं व्हतं ,म्हंजी संचाला लवकर घरी यायला अजून देवळाची सजावट बाकी व्हती अन चारच दिवस हाताशी व्हते .
सदून समद्या शेळ्या कोकर सोडली , पोरी बी आप आपल्या लवाजमा घेऊन वाटला लागल्या .सगळा तांडा धूळ उडवीत माळाकडं निघाला पोरी आप आपल्या शेळ्यास्नी चुचकारत चालल्या व्हत्या . गप्पा मारत मारत माळावर कवा पोचल्या कळलं बी न्हाय . सदू रुक्मिचा पाठीवर बसून आल्ता .तिनंच त्याला लाडानं उचलून घेतलं व्हतं .
तो तिला मधेच इचारी आक्के तू लगीन करून कुठं जाणार , मी बी येणार त्वा संग .
आता ते मला कसं ठाव ,पर कुठं बी गेले तर तूला संगती नेईल .ती त्याची समजूत काढी
मग आपला आबा ग त्याचापाई कोण र्हाईलं ,त्याला भाकर कोण घालील ....सदू तोंड बारीक करून इचारी
"म्या काय म्हणते माह्या नवऱ्यलाच आपल्या घरी घेऊन येऊ...म्हंजी कोणी बी कुठं जाणार न्हाय" मग दोघ बी हसत सुटले पारू दुरूनच चालत त्यांचा बाता ऐकत व्हती
सदू रुक्मिचा नवरा तिच्यासाठी कायबी करील बघ तू ...." पारू बोली .
रुक्मिन मुरका मारला .
आक्के तुझा नवरा गणादा सारखा पाहिजे बघ , म्हणजे माझी लै मज्जा होईल .
तसं रुक्मिचा मनात अजूनच काहूर माजलं .चार दिसांनी कौल ठेवला जाईल .तरी बी दोघात अजून काहीच बोलणं व्हत नव्हतं .
तिला तिचा मनातल्या समद्या शंका इचारायचा व्हत्या ,त्या शिवाय ती त्याला कौल देणार नव्हती .आज ती जास्तच बेचन झाल्ती.आज तीच अजिबातच लक्ष नव्हतं,सदू एकलाच शेळ्या माग पळत व्हता.
पोरींनी आज लवकर जायचं ठरिवलं व्हतं ,पारूला तिची बेचेनि कळत व्हती .पर रुक्मि तीच काय बी ऐकणार न्हाय हे तिला माहित व्हतं .
दुपार टळून गेली व्हती दिवस कलायला लागला .सदू आज लै दमला व्हता तो सारखा रुक्मीला आवाज देऊन तिची तंद्री मोडीत .तीच लक्ष फकस्त गणात व्हतं .
पोरी गोळा व्हायला लागल्या अजून सांच्याला लै येळ व्हता .पोरींनी घरची वाट धरली .सदू अन रुक्मि बी शेळ्या हाकारया लागल्या .
पर पळता पळता तिचा पाय एका दगडात आटकला अन रुक्मि जोरात वरडुन उठली .तिचा पाय मोडला अन ती पाय हातात धरून हाय हाय करायला लागली .पोरी पुढं गेल्या व्हत्या ,माग पारू अन एक दोन जनीच बाकी व्हत्या ,त्या पळतच तिचा पाशी आल्या
रुक्मिचा पाय चांगलाच टोपसला . पोरी तिला धरून उभं करू लागल्या पर तिला काही उठता येईना .काय करावं काही काळानं .
सदू रडाया लागला .त्याला गप करत रुक्मीन पारूला शेळ्या अन सदूला घरी घेऊन जायला सांगितलं .
तो काही ऐकणं " आर तू लवकर पारू संगती जाय अन आबास्नी पाठव माला न्यायला ; मी तवर इथंच थांबते लवकर गेला तर आबा लवकर येईल मला घ्यायला"
त्याची समजूत घालून तिनं त्याला पाठवून दिल .मग ते लहान लेकरू शेळ्या घेऊन बिगीबिगीनं जायला निघालं .तिची चंदी काय तिला सोडून जायना .मग तिला अन खंड्या तिचा कुत्रा दोघास्नी संगतीला ठेऊन घेतलं .चंदी तिच्या बाजूलाच चरत ऱ्हायली .खंड्या सगळीकडं लक्ष ठेऊन व्हता .
तिचा पाय लै कळा माराया लागला तिनं तिच्या लुगड्याचा पदर फाडला अन पाय घट्ट बांधून ठेवला उरलेलं लुगडं कमाराभोवती गुंडाळून घेतलं .
अन ती आबांची वाट बघाया लागली . दिस मावळाया बराच वकत बाकी व्हता .
इकडं सदा पाड्यावर पोचला त्याला धाप लागली व्हती .आल्या आल्या ते आबाला शोधाया लागलं . आबा कुठंच गावाना .मग ते थकून भागून रडकुंडीला आलं .ओसरीत बसून रडाया लागलं . पारून त्याचा शेळ्या झापात बांधून दिल्या अन त्याला गप करु लागली .पर तो काय एकानं .
त्याला गणा त्याचाच घराकडं येताना दिसला तसं उठून तो गणा ला जाऊन बिलगला . गणान बाजारच्या पिश्या खाली टाकून त्याला वर उचलून घेतलं .त्याला इचाराया लागला काय झालं रडाया .
सदू फक्त आबा कुठं हाय एवढंच इचारीत व्हता .
गणान त्याला ओसरीत आणून बसवलं . पारून गणाला समदी हकीकत सांगितली .
"हत्याचा ! एवढाचना मी घेऊन येतो तिला माळातून,आबा अजून तालुक्यालाच हाय त्यांला येळ लागल म्हणून मी म्होरं निघून आलो"
मग सदूचा गालवर हसू आलं .त्यानं पारूचा घरी थांबाया सांगितलं अन तो लगेच मळाचा वाटलं लागला .
गणा माळावर पोचला पर त्याला कोणीच दिसना .तो सैर भैर झाला अन त्यानं एक शीळ ठोकली .शीळ ऐकताच खंड्या धावत त्याचा पोतुर आला मग गणाचा बी जीवात जीव आला . गणा खांड्याचा माग माग पळत सुटला .रुक्मि एका खडकावर येऊन पायाला धरून बसली व्हती .
गणा तिचा म्होरं जाऊन उभा रहायला ,तिनं त्याचाकड पाहिलं अन अंग झाकू लागली .
तिचा चोळीवर पदर नव्हता . पदर आल्या पासून ती एकदम भरीव दिसत व्हते .शरीरावरचे उठाव उठून गच्च दिसत व्हते .
"तू कशाला आला,म्या आबा ला बोलावलं व्हतं"
"आबा अजून तालुक्याला हाय,म्हणत अशील तर जातो परत"
"मग इथवर कशापाई आला,तू काय माझा ठेका घेतला हाय"
ती त्याचा अंदाज घेऊ पात व्हती ,अन हीच चांगली संधी चालून आल्ती ; तिनं मनातच तौल्याचे आभार मानले .
तो पण या क्षणाची वाटच पात व्हता ,आज त्याला समद सांगून टाकायचं व्हतं .
"तू ला आवडणार असलं तर तो बी घेईल".
तो तिचा पाया पाशी बसला आज तो तिला डोळे भरून पाहत व्हता.त्याची नजर तिच्या वरून हटत नव्हती
ती कावरी बावरी झाली व्हती .चोळीवर पदर नव्हता ,स्तन हवा भरल्यागत तट्ट दिसत व्हते .तिच्या श्वासाचा लयीत वर खाली व्हतं व्हते .
तिला काय बोलावं कळंना .
त्यानं त्या पायावरच फडकं सोडलं तशी ती हुस हुस कारराय लागली .त्यानं तिचा डोळ्यात डोळे घातले ती एकटक त्याच्याकडं बघाया लागली .
त्यानं तोवर हळूच पाय हातात घेऊन चोळू लागला , अन एक जोरात झटका मारला .खटकन आवाज आला .
ती जोरात ओरडून उठली गणा ! सांगायचं तरी .
तू हात तरी लावून दिला असता का .गणा हसत सुटला .
ती त्याला चपट्या माराया लागली , अगं ! बघ तरी हलतो का न्हाय .
तिनं पाय फिरवून पाह्यला .तो पूर्ण हालत व्हता अन तीच दुखायचं बी कमी झाल्त .त्यानं पाय परत बांधून घेतला.
"लै नको हालवू,मला लंगडी बायको कराया लागलं" गणा पाय बांधता बांधता म्हटला.
म्हंजी ,रुक्मीन काय न कळल्याचा सोंग घेतलं .
आता तो तिचा जवळ जाऊन बसला .ती पण सावध होऊन बसली .
"तुला खरंच काही कळत न्हाई" :गणा
"कळायचं काय तू सरळ बोल" ;रुक्मि
त्यानं तिचा हात हातात घेतला "लै दिसा पसून तुला सांगायचं हाय ,रुकमे एवढे वर्ष तुझीच वाट बघत थांबलो व्हतो .नाहीतर कवाच लगीन करून मोकळा झाला असतो . माझा कौल घेशील"
तिचा डोळ्यात बघून तो बोलत व्हता .ती पुरती शहारून गेल्ती .पण परत सावरत हात काढून घेतला .तिला सगळ्या गोष्टीची खातरजमा करायची व्हती .
"पर मला बाटेल,अन दारुडा नवरा नग" तिला खरं माहित करून घ्यायचं व्हतं.
त्यानं पुन्यांदा तिचा हात हातात घेतला अन तिच्याम्होरं गुडघ्यावर बसला.
"रूकमे तौल्याची आन घेऊन सांगतो,तू समजती तसं काय बी न्हाय"
"मग पारूचं काय प्रकरण काय हाय,अन तू त्या दिवशी दारू पेऊन व्हता समदा वास येत व्हता तुझा,म्हणून तर तू पळाला तिथून;अन पारूचं तुझं कैना काई चालूच असतंया" रुक्मि म्हणाली.
"तुझा माझ्यावर एवढा बी इश्वास नाय का ग"
"इश्वास वाटतो म्हणून तर आबाला काय सांगितलं न्हाय म्या,पर तुझा माझ्या वर न्हाय म्हणून तर तू मला काय बी सांगत न्हाय"
"येडी हाय बग तू,आग म्या जे बी करतो ते समद आबा ला म्हाहीत असतंय,त्याला सांगून,इच्चारुनच करतो म्या समद"
"म्हणजे तुम्हा दोघांचं प्रकरण आबास्नी बी ठाव हाय ".....रुक्मि
"अगं,भैन हाय ती माह्यावाली, सुऱ्या गेल्या पाउण मी तिला माही भैन च मानतो,तिला दुसरा आधार तरी हाय का,आबा ला म्हाहीत हाय."
"अन पारू पोटुशी व्हती ते"
"ते समद त्या मुकादमाची करणी...., पारूचं पोर लै आजारी झाल्त,तिला नड व्हती,त्याचाच फायदा त्यानं घेतला,त्याचंच पाप व्हतं ते;.....कोणाला बी सांगू नको मीच तिला सांगून ठिवलं व्हतं......,तुला ते समजलं,ते सांगायचं ती कश्याईचा पटांगणात माला भेटाया आल्ती.अन तू वंगाळ इचार करीत बसली"
"मग माला का नाय सांगितलं,माला आपलं माणूस न्हाय समजत वाटत"
"पर तू कधी माझं ऐकूनच न्हय घेतलं,तुमचा राग कायम नाकावर"
रुक्मिची कळी थोडी खुलया लागली ,दिवस आता मावळाया आल्ता .
"आबाचा कानावर समदा प्रकार घातला तवा आबा नच मला तालुक्याला डाक्तर कड घेऊन जायला सांगितलं व्हतं,.....वैद्याला बोलावलं असतं तर समद्या पाड्यावर तिची थू झाली असती......त्या मुकादमाची शिक्षा त्या बिचारीला कशापाई....पोरगं पाडलं तवा तिला तुझी लै गरज व्हती...तू एकटीच तर जिवा भावाची व्हती...पर तू बी राग धरून बसली"
आता रुक्मि रडाया लागली ,किती मोठी चूक करून बसली व्हती ती ,बिचारी पारू उगाच बोलणी खात ऱ्हायली .
गणा तिला गप करू लागला ,"तीला महित हाय माझा जीव तुझ्यात अडकला हाय ,त्यामुळं ती मुकाट तुझं ऐकत ऱ्हायली "
ती अजूनच ओशाळली " त्या दिशी मुकादमाला म्याच हाणला ,मला त्याचा वचपा काढायचाच व्हता .त्या रात्री तुझ्यावर झडप त्यानंच घातली व्हती .....पारूनच मला त्याला मारायवाचून थांबिवल व्हतं ....पर त्यानं तुझा संग वंगाळ कराया लागला मग म्हाय डोस्क फिरलं .
त्या रात्री तो दारू पिऊन व्हता रस्त्यानं बी दारूचं पीत चालला व्हता ....म्या त्याला गाठून लै हाणला त्याची दारू माह्या अंगावर सांडली ...तुला वाटलं म्याच दारू प्यालो ....."
आता रुक्मि गणाला बिलगली तिची आसवं थांबणं ,गणाचा बी डोळ्यात पाणी आलं "आता न्हाय नाव मना मंदी काही "
"गणा मला माफ करशील... म्या पारूची बी माफी मागील. "
"केल माफ"
त्यानं हळूच तिची हनुवटी वर उचलली ,दिस मावळतीला कासरा भरच बाकी व्हता आभाळात नारंगी-गुलाबी छटा पसरल्या ...तशेच तिचे बी गाल दिसायला लागले .दोघ आता लै जवळ आल्ती .एकमेकांचे उष्ण श्वास गालाला गरम करत व्हती ...त्यानं हात तिच्या कमरे भोवती घट्ट आवळले ...
ती त्याचा मांडीवर समदा भर देऊन बसली व्हती .
त्यानं ओठ तिचा ओठावर टेकवले ....बराच वेळ ते एकमेकांत गुंतले व्हते कोणी एक अक्षर सुगट बोलना
तो तिच्या मानेचे ,गालाचे ,ओठांचे मुके घेत सुटला .....ती फक्त स्वतःला झोकून देत व्हती
त्याचा आता समद आवाक्या भाईर व्हायला लागलं ....ती पण त्याला थांबवू शकत नव्हती ..जशी ती तिची अपुरी इच्छा पुरी करून घेत व्हती
दोघ कधी जमिनीवर आडवे झाले त्यास्नी बी न्हाई कळालं .
तो किती वर्षा पासून तिच्यासाठी थांबला व्हता .आज तर तिनं सर्वस्वानी स्वीकारलं व्हतं.त्याचा अंगावरचा सदरा कवाच गळून पडला व्हता.
त्यानं तिचा अंबाडा मोकळा केला ....तशी ती अजूनच मादक दिसया लागली .तो पूर्ण बेभान झाल्ता .ती सगळे स्पर्श साठवून ठेवत व्हती .
त्यानं तिच्या स्तनावरुन हळूच हात फिरवला अन चोळीची खसकन गाठ सोडली .तिनं तिचा श्वास रोखून घेतला अन तिचा डोळ्यात पाणी आलं .
तसा गणा भानात यायला लागला ,मोठा श्वास घेऊन तो तिच्याच गळ्यात डोकं खुपसून रडाया लागला .
ती त्याचा उघड्या पाठीवरून ,केसातून हात फिरवाया लागली .त्याच उघड अंग तिच्या अंगाला भिडलं व्हतं ,दोघे घामानं ओले चिंब झालते .
बराच वेळ ते तशेच पडून ऱ्हायले .
गणा आता सावरला त्यानं आपला सादरा अंगात चढवला .ती उठून गुढग्यात डोकं घालून बसली .
गणा न पुन्यांदा तिला जवळ घेतली "रुकमे मी तसा न्हाय गं ......तुला कस सांगू ....लै दिसांची तुझी वाट पाहतो ...सरीचा निमतान माझं धकून जायचं ....पर औंदा सरीचं बी लगीन होऊन गेलं असत अन तू तशीच ऱ्हायली असती तर. .....म्या लै घाबरलो व्हतो बघ ...आज न्हाय थाम्बू शकलो गं ....मला नव्हतं काय करायचं
तिचे केस पाठीवर लोळत व्हते .चोळी उघडीच व्हती तिला आता कसलीच लाज वाटणं झाली .
तिनं त्याचा ओठां वर बोट ठेवलं "नग थांबूस " डोळ्यात पाणी आणून ती म्हटली
"आज पासून म्या तुझीच हाय....तू मला लै येळेस असं माझा जवळ येऊन सोडून गेलास....माझा मनात वणवे पेटून दिलेस...आज समदे विझून टाक....असं अर्ध्यावर नग थांबूस...."तिनं घट्ट मिठी मारली.
इकडं आबा घरी आले व्हते .सदु न समद आबाला सांगितलं व्हतं .पर गणा अनाया गेला म्हटल्या वर त्यांची चिंता कमी झाल्ती .पर आता अंधार पडत आल्ता म्हणून आबा ओसरीत चकरा मारू लागलं व्हतं
त्यानं मागून तिचा आंबाडा बांधला .ती त्याला सोडायला तयार नव्हती .दिस मावळतीला आल्ता .त्यानं हळूच तिला बाजूला सारली.अन तिच्या स्तनाला स्पर्श बी होऊ न देता चोळीची गाठ बांधली.
"तुला कसं जमत असं सगळं,तुया अशा वागण्यानं च माला येडं केलंय बघ" ती लाडात येत म्हटली
"तुझा इश्वास हाय ना माझ्यावर ....एकदा का कौल लावला कि तुला अजाबात सोडणार न्हाय .....तू न्हाय म्हटली तरी नाय सोडायचो ....आधीच तूझा मूळ मला लै दिस थांबाया लागलं "
तिनं तोंड दोन्ही हातात लपवलं .
त्यानं खिशातून एक पैंजण काढलं अन तिच्या पायात घातलं .आजच आणलं व्हतं त्यानं बाजारातून .तिनं दुसरा पाय म्होरं केला .
"अहं,ते आज न्हाय....ते कौल लावायचा दिशी.....हे तू आज माझी झाली त्यासाठी...माझा कौल घेशील तवा पूर्ण माझी व्हशील"
त्यानं कमरेचा उपरणं सोडून तिचा अंगावर पांघरलं ...अन तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं .
एकमेकांचा डोळ्यात बघत कधी घर जवळ आलं कळलं बी न्हाय .चंदी अन खंड्या त्यांचा म्होरं चाले व्हते जशे काय त्यां दोघास्नी वाट ठावंच न्हाय .
आबा न आता टेम्भा बनवला .दोन चार माणसं संगती घेतली .ते निघणार तेवढ्यात खंड्या अन चंदी समोरून धावत येताना दिसले .चंदीला सदून झापात बांधली .ते दोघ अजून येतच व्हती .
गणा तिला घेऊन ओसरीत आला ,आबा न तिला हात देऊन खाली बसून घेतली .तिचा अंगावर गणाचा उपरणं तसंच पांघरलं व्हतं .
आबान गणा ला पाणी दिलं ,अन त्याला प्रश्न इचाराया सुरवात करणारच व्हता .तेवढ्यात रुक्मिचा पायातल पैंजण अंधारात चमकून उठलं .
आबाच लक्ष गेलं .ते तेच पैंजण व्हतं जे गणान आजच कौल लावाय साठी इकत घेतलं व्हतं .
आबा मनोमन खुश झाल्ता ....आजच त्याचा रुक्मिचा कौल लागला व्हता .
गणा अन रुक्मि लाजून चूर झाले व्हते ...आता चारच दिसांची प्रतीक्षा बाकी व्हती .
(समाप्त)
समीक्षा नक्की करा .......sharadshejwal0170@gmail.com