toch chandrama - 3 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | तोच चंद्रमा.. - 3

Featured Books
Categories
Share

तोच चंद्रमा.. - 3

राॅबिन

यान थांबले. थांबले म्हणजे गती शून्यावर आली. बाजूची शटर उघडली. आम्ही उतरलो. समोर एक तंबूरूपी घर होते. आतून एक जण बाहेर आला.

"अरे, तू? बरा झालास?" बाबा म्हणाले.

"हो.. मी स्वतःला आॅटो रिपेअर करून घेतले सर. आता ठणठणीत आहे. तुम्हाला त्यामुळे स्वतः यान चालवावे लागले.. साॅरी.."

"अरे, डोन्ट वरी, ते काय आॅटो मोडवर चालते. तू बरा आहेस ना?"

"यस्सर.. मी आॅटो मोड मध्ये अॅनालाईझ केले स्वतःला. थोडासा प्रोग्रामिंग मध्ये गोंधळ होता.. गाॅट मायसेल्फ करेक्टेड."

"अरे राॅबिन, हा माझा मुलगा, अंबर.."

राॅबिनने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. त्याचा हात बऱ्यापैकी थंडगार होता.

"अंबर हा राॅबिन, आपला ह्युमनाॅईड, ही इज अ स्पेशल रोबो. अरे सरकारी नोकरीत वरच्या ग्रेडवर असलेल्यांना मिळतात असे स्पेशल ह्युमनाॅईडस्. बट ही इज अवर ओन.. नाॅट अ गव्हर्नमेंट एम्प्लाॅई. पण इथे आम्ही त्यांना रोबोस् नाही म्हणत. दे आर ह्युमन लाइक.. होय की नाही राॅबिन?"

"यस्सर.."

"ही इज प्रोग्राम्ड फाॅर होल डे.. अख्ख्या दिवसात राॅबिन करतो सारे काम."

"सांगाल ते?"

"नाही .. त्याला सांगावेच लागत नाही. ही इज सुपर इंटलिजंट!"

"वा! चांगलाच आहे!"

"आणि गप्पा देखील मारतो तो. आपला मूड बघून. यू वोन्ट बिलिव्ह, आपला मूड ओळखतो तो नुसते पाहून.. त्याच्या अल‌्गाॅरिदम मध्ये आहे सारे फीड केलेले. खरे सांगू तर याची सोबत होती म्हणून पहिली तीन वर्षे निघाली नीट. आता तुझी आई आलीय तर ठीक. पण इकडे शांतता जीवघेणी वाटते कधी कधी. अशा वेळी साथीला असा राॅबिनसारखा कुणी असणे म्हणजे वरदान आहे रे."

"अंबर, काय घेणार? चहा, काॅफी?"

राॅबिनने मला विचारले. "साहेब आणि मॅडम, तुमच्या साठीही आणतोय.."

"अरे, राॅबिन, अंबरबद्दल काल तुझ्या प्रोग्राम मध्ये टाकायला विसरलो मी?"

"नाही सर, तुम्ही टाकलंयत.. मला माहितीय अंबरला काॅफी हवीय विथ एक्स्ट्रा शुगर.. पण त्याला ह्युमन अनुभव द्यावा म्हणून विचारले. अगदीच मेकॅनिकल फील नको यायला त्याला म्हणून. खरेतर काॅफी तयारच आहे. फक्त साखर टाकायची बाकी आहे. आणतो."

राॅबिन ऐटीत आत गेला. हा ह्युमनाॅईड कसला चांगलाच ह्युमन होता!

"अरे राॅबिन सारा स्वयंपाक करतो, घर आवरतो, मी आले ना तर किती धक्का बसला त्याचे काम पाहून. अगदी परफेक्ट काम त्याचे."

"वा! म्हणजे तिथल्यासारखे नोकर नकोत शोधायला."

"अरे, ते खरे काम नाही राॅबिनचे. इकडे सूर्य धुळीची वादळे झाली की बाहेर फक्त राॅबिनच जातो.. म्हणजे सगळीकडे फक्त रोबोज बाहेर जाऊ शकतात. आपल्याला घरातच बसायला लागते."

सूर्यधूळीचे वादळ.. हे मी वाचले होते. चंद्रावर असे सूर्य किरण नि रेडिएशन म्हणजे माणसाच्या रोगांना नि कॅन्सरला निमंत्रण. त्यापासून बचाव करायचा तर रोबोहून योग्य अजून कोण?

"आणि अजून.. मेटेराॅईडस्.. कुठून येऊन आदळतील नेम नाही. म्हणून ही तंबूसारखी घरे बनवलीत इकडे. या राॅबिन सारख्या रोबोंशिवाय कठीण आहे इकडे."

मला वाचलेले आठवले, म्हणजे इकडे येण्याआधी मला झेपेल इतका अभ्यास केलेला मी. त्यात काही समजले, बरेचसे डोक्यावरून गेले. पण समजले त्यात हे एक होते, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मनुष्यवत यंत्र मानव.. अगदी दिसा-बोलायला माणसासारखे असणारे रोबोट्स.. ही विज्ञानाची गेल्या काही वर्षांतली झेप आहे. त्यातून जणू अगदी उत्क्रांत होत

आजचा हा यंत्र मानव जन्माला घातलाय माणसाने.. माणसासाठी.

राॅबिन ट्रे मध्ये चहा काॅफी घेऊन आला. आणि चंदा ब्रँडची मारी बिस्किटे. मला मारी बिस्किटेच आवडतात हे बाबांनी फीड केले असणार त्याच्यात. पूर्वी सिनेमात रोबोस् एकसुरी बोलताना दाखवायचे. हा राॅबिन मराठी नि इंग्रजी अस्खलित बोलतोय. त्यात आवाजाचे व्यवस्थित चढउतार आहेत. हवे तिथे थांबतो तो, स्वल्पविराम घेतल्यासारखा. त्याचे प्रोग्रामिंग तसे केले असले तरी मध्येच त्याने मला चहा की काॅफी म्हणत आपल्या मानवी बुद्धिमत्तेचीही चुणूक दाखवलेली. मानवी बुद्धीचाच हा यांत्रिक चमत्कार होता. त्याच्याकडे कौतुकाने पाहात म्हणालो मी, "राॅबिन, तुझी न माझी जोडी जमेल.. मस्त! हाय फ्रेंड.."

राॅबिन म्हणाला, "हाय! अंबर. आपण मित्र म्हणून राहू शकतो. अर्थात मी माझी कामे तर करत राहिनच. पण मला ही कुणी मित्र असेल तर बरे वाटेल. मित्राकडेच आपण सारे शेअर करू शकतो. आणि आज तू आलायस तर किती बरे वाटतेय म्हणून सांगू. आय अॅम रियली हॅपी."

"अरे राॅबिन, तुला कुणी मित्र नाही हे माझ्या कधीच लक्षात अाले नव्हते राजा. आता अंबर आलाय, चांगली कंपनी मिळेल तुला."

"होय सर. खरेय तुमचे. म्हणून म्हणालो ना, मी आज खूप खूश आहे. अर्थात तो बाजूच्या मिश्रांकडचा केविन माझा दोस्त आहे. पण एक मानवी दोस्त असण्याची मजाच वेगळी."

"एक विचारू बाबा.. या राॅबिनचे वय काय?"

"राॅबिन आणि वय?"

"अर्थात ..मी सांगतो.. राॅबिन की नाही तरूण आहे.. माझ्यासारखा.."

"का?"

"सिंपल .. मैत्री समवयाच्या लोकांत होते .. सो इफ वुई आर फ्रेंडस्.."

"आमची वये सारखी असली पाहिजेत.. वा! अंबर, आवडले लाॅजिक मला!"

राॅबिन टाळी देत म्हणाला.

"थ्यांक्स राॅबिन. तू खरेच तरूण आहेस.. यंग अँड डायनॅमिक.. आणि डॅशिंग!"

"आणि हँडसम ही.. हे विसरू नकोस अंबर."

"हुं खरंय! आई तू काहीच बोलत नाही आहेस ती?"

"तुझे बाबा बोलू देतील तर ना! पण एका वर्षानंतर तुला पाहून बरे वाटतेय रे. आज माझ्या हातून बनवून खाऊ घालते तुला."

"यस मॅडम. त्याच्या आवडीच्या गोष्टींसाठी लागणारे सामान तयार ठेवलेय मी. मला वाटलेच होते तुम्ही स्वतः बनवून खाऊ घालाल त्याला ते. मी आहेच मदतीला."

"थँक्स राॅबिन. चल, अंबर मी पटपट थालिपीठ बनवते, भुकेला असशील."

"हो ना, या इकाॅनाॅमी क्लास मध्ये आठवडाभर पाणी पिऊन पोट भरावे लागले."

"लकी आहेस तू, मी पहिल्यांदा आलो तर यानातले पाणीही चौथ्या दिवशीच संपलेले.." बाबा म्हणाले.

"चल, लवकर तयार हो. मी बनवते खायला तुझ्यासाठी." आई अाॅर्डर सोडल्याच्या सुरात म्हणाली.

"हो मॅडम, मी स्पेशल काऊ मिल्क लोणी आणून ठेवलेय.. थालिपिठाबरोबर खायला. यू लाईक दॅट नो माय फ्रेंड.. राॅबिन मला विचारत होता.."

"यस डिअर राॅबिन.. आय लाईक इट.."