सकाळी यश उठला तेव्हा जेनी शेजारी नव्हती. तो बाहेर हॉलमध्ये आला तेव्हा त्याला खमंग उपीटाचा वास आला. किचनमध्ये जेनीने नाश्ता तयार केला होता.
“काय सकाळी सकाळी छंद जोपासायला सुरवात झाली वाटतं तुझी.”
यावर जेनी गोड हसली.
“तसं नाही काही, काल बबनदादांसोबत बाजारात गेले होते तेव्हा थोडा रवा घेतला होता. त्याचंच उपीट केलंय. सांगा कसं झालंय?”
“क्या बात है. जेनी यार, उपीट तर झक्कास झालंय.”
एवढ्यात दाराची कडी वाजवत गोगटे काकू आल्या.
“काय नाश्ता चालूये का जोडीचा?”
“या काकू तुम्ही पण या नाश्त्याला.”
“मी ही आत्त्ताच केला गो. तुमच्यासाठी हे पोहे आणले होते.”
जेनीने काकूंना उपिटाची प्लेट दिली.
“छान झालंय गो उपीट. रवा अगदी खरपूस भाजलास. यश आवडलं की नाही तुला?”
“हो काकू, जेनीच्या हाताला छान चव आहे.”
“ही जेनी कोण आता?” काकूंनी निरागसपणे विचारलं.
तशी यशने जीभ चावली आणि तिच्याकडे बघितलं. तीही लाजली.
“बायकोला लाडानं जेनी नाव ठेवलंस काय रे? असू दे, असू दे, चांगलं आहे. असंच एकमेकांशी प्रेमानं रहा.”
काकू गेल्यावर यश म्हणाला,
“सॉरी जेनी. तुला ‘जान्हवी’ म्हणायचं माझ्या लक्षातच आलं नाही.”
“माझी एक request होती, मला जान्हवी नाव खूप आवडतं. प्लीज तुम्ही मला जान्हवीच म्हणाल का?”
“sure, का नाही. पण माझीही एक request होती, तुही मला अहो-जाहो नं करता यश म्हणलं पाहिजेस. मला आजपर्यंत कुणी अहो-जाहो केलं नाही. तुझ्यामुळे मला awkward फील होतं.”
“पण सगळ्यांसमोर ते विचित्र वाटेल. नवऱ्याला एकेरी नावानं बोलावण्याची आपल्याकडे पद्धत नाही.”
“ते मला माहित नाही, तू जर मला यश म्हणशील तरच मी तुला जान्हवी म्हणेल.”
“तुमचा हट्टच असेल तर मग ठीक आहे.”
“बघ, पुन्हा तुमचा म्हणालीस.”
“सॉरी, सवय होईपर्यंत जरा वेळ लागेल. चला तयार व्हा. आपल्याला शॉपिंगला रत्नागिरीला जायचंय.”
त्यादिवशी यश अन जान्हवी रत्नागिरीला गेले. मात्र यशने कटाक्षाने दिवस मावळायच्या आतच गाडी सावरीत आणली. जान्हवी सोबत असताना त्याला अजिबातच रिस्क घ्यायची नव्हती.
x x x x x
जान्हवीला सावरीत येवून आता आठवडा होत आला होता. ती चांगलीच रुळली होती. दोघांचं रुटीन आता ठरून गेलं होतं. जेनी सकाळी यशसाठी चहा नाश्ता करायची. तो साईटवर गेल्यावर स्वयंपाकाची तयारी चालू व्हायची. दुपारी बबन आला की त्याच्याजवळ यशसाठी लंच द्यायचा. थोड्यावेळाने काकूंकडे जावून गप्पा मारायच्या, त्यांना हवी नको ती मदत करायची. नंतर टीव्ही पहायचा, नाही तर मग आराम करायचा. संध्याकाळी यशला चहा देवून पुन्हा रात्रीचा स्वयंपाक. कधी कधी अनुचा फोन यायचा. कधी ती स्वतःच्या घरी फोन करायची. यश स्काईपवर बोलत असताना मात्र त्या रुममध्ये जाणं ती कटाक्षानं टाळायची.त्यानंतर यशसोबत गप्पा वा नंतर झोप... हा रुटीन ठरूनच गेला होता.
यशलाही सावरीत आल्यापासून आराम मिळाला होता. त्याचं कामात concentration वाढले होतं. त्याचा performance दिवसेंदिवस चांगला होत होता. जान्हवीमुळे त्याची जेवणाची सोय झालीच होती, पण ती सोबत असल्याने एक मानसिक आधार मिळाला होता. त्याला आता होम सिक वाटणं बंद झालं होतं.
एकेदिवशी रात्रीची जेवणं झाली. आणि ते दोघेही झोपी गेले. रात्री तहान लागल्यानं यश उठला. पाणी पिऊन परत बेडवर आला. त्यानं जान्ह्वीकडं पाहिलं, ती गाढ झोपेत होती. यश तिच्याकडे पाहतच राहिला. खिडकीतून येणारा चंद्राचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. गाढ झोपेत ती नितांत सुंदर दिसत होती. जान्हवी दिसायला सुंदर होतीच पण नाइटीमुळे तिचे सौंदर्य आणखीच खुलून आले होते. तिचे गुलाबी ओठ, त्यांवर असलेला तीळ, विस्तीर्ण कपाळ, त्या धनुष्याकृती भुवया......यश तिच्याकडे एकटक पाहत होता. श्वासोच्छवासामुळे तिची छाती एकालयीत खाली वर होत होती. तिच्या शरीराचा तो परिचित सुगंध यशला पुन्हा अस्वस्थ करून गेला. त्याला राहवलं नाही. तिचे मुलायम केस वाऱ्याने चेहऱ्यावर आले होते. यश थोडा पुढे सरकला. ते भुरभुरणारे केस त्याने अलगद बाजूला केले. त्या गुलाबी गालांवरून त्याने हलकेच हात फिरवला. तिच्या ओठांवरील तीळ त्याला वेडं करीत असे. त्याला स्पर्श करण्यासाठी यशने तिच्या ओठांवरून हात फिरवला. त्या अनपेक्षित स्पर्शाने जान्हवी दचकून जागी झाली. यश घाबरला. भावनेच्या भरात आपल्या हातून केवढी मोठी चूक झाली हे त्याच्या लक्षात आलं. जान्हवी त्याच्याकडेच पाहत होती. त्याला एकदम अपराधी वाटू लागलं. I am sorry असं पुटपुटतच त्याने पांघरूण ओढलं आणि झोपी गेला.
सकाळी यश उठला तो मनामध्ये guilt घेऊनच....त्याला आपल्या रात्रीच्या कृत्याची लाज वाटत होती. जान्हवी किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होती. यशने झटपट सगळं आवरलं. जान्हवीच्या नजरेला नजर मिळवण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. कसाबसा नाश्ता करून तो चटकन साइटवर आला. त्याला आज खूपच अपराधी वाटत होतं. “जान्हवी मला काय समजत असेल? तिचा मी गैरफायदा घेईल असं तिला वाटत असेल का? shit यार, आपलं स्वतःवर नियंत्रणच नाही. बाहेर हॉलमध्ये झोपत होतो तेच बरं होतं. उगाच तिचं ऐकून बेडवर झोपायला सुरवात केली, ते काही नाही आजपासून पुन्हा हॉलमध्ये झोपायचं. जान्हवी काहीही म्हंटली तरी ऐकायचं नाही. असा विचार करूनच तो घरी आला.”
रात्रीची जेवणं झाली. यशच्या वागण्यातला बदल जान्हवीच्या लक्षात आला होता. तो एवढा अस्वस्थ का आहे, हेही तिला माहित होतं. यश हॉलमध्ये झोपायला निघाला तेव्हा जान्ह्वीनं त्याला अडवलं.
“थांब यश, कुठे निघालास?”
“हॉलमध्ये झोपायला.”
“का?”
“मला बेडवर comfort वाटत नाहीये.”
“इतके दिवस तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग आज अचानक काय झालं?”
यशने तिच्याकडे बघितलं.
“हे बघ जान्हवी, उगाच मला embarrss फील करू नकोस. I am sorry. काल माझं खरंच चुकलं. पण तुझ्याकडे पाहिल्यावर माझं स्वता:वर नियंत्रणच राहिलं नाही. आणि हे सगळं पुन्हा घडू नये म्हणून मी आजपासून हॉलमध्ये झोपणार आहे. हवं तर कालच्या माझ्या वागण्याची ही शिक्षाच आहे असं समज.”
“पण यश तू जे काल वागलास ते नैसर्गिकच होतं. आणि natural behavior साठी कुणी शिक्षा करून घेतं का? प्लीज तू इथेच झोप.”
“नको जान्हवी मी बाहेर हॉलमध्येच ठीक आहे.”
“तसं असेल तर मग मीच हॉलमध्ये झोपते.”
“तू जरा वेडी आहेस का? तुला कसं सांगू? तुझ्या शरीराचा सुगंध रात्ररात्र मला झोपू देत नाही. तू गाढ झोपलेली असतेस मी मात्र इकडे तळमळत असतो. इथं तुझ्याजवळ झोपलो तर माझं माझ्यावरंच नियंत्रण राहणार नाही. आणि तुला पुन्हा दुखवायची माझी इच्छा नाही.”
“तुला असं का वाटतंय की मी तुझ्या वागण्यामुळं दुखावले आहे?”
“म्हणजे?” यशने चमकून जान्ह्वीकडे पाहिलं.
जान्हवी काहीच बोलली नाही.
“काल माझ्यामुळे तू दुखावली नाहीस?”
तिने नकारार्थी मान हालवली.
“तू दुखावली नाहीस? म्हणजे मी जे केलं ते तुला आवडलं का?”
जान्हवी काहीच बोलली नाही.
यशने पुन्हा पुन्हा तिला विचारलं. पण ती काहीच बोलत नव्हती. यश तिच्या जवळ आला. तिच्या दोन्ही खांद्यांना धरून त्यानं तिला हालवलं.
“जान्हवी, मी काय म्हणतोय तुला ऐकू येतंय का?”
“यश तू असा कसायेस रे? प्रत्येक गोष्ट तुला समजावून का सांगावी लागते? काही गोष्टी तू अपोआप समजून का घेत नाहीस?”
“याचा अर्थ मी जर इथं झोपलो आणि माझं स्वता:वर नियंत्रण राहिलं नाही तर तुला काहीच प्रॉब्लेम नाही.”
“यश तुला स्पष्टच बोलते, आपण आता लहान मुलं आहोत का? जर एखादी गोष्ट तुला आवडत असेल तर तू स्वतःवर उगाचच का बंधन घालतोस? आपण त्या योग्यतेचे नाहीयेत असा का विचार करतोस? मी इथे तुझी पत्नी म्हणून आली आहे. पत्नीने करायची सर्व कामं करण्याची माझी तयारी आहे. मी माझ्या escortship बद्दल तुला आधीच सांगितलं आहे. and you are already paying for this.”
यशच्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला. त्यानं तिच्याकडे बघितलं. ती समोर खाली मान घालून उभी होती. त्याला आता राहवलं नाही. त्याने जान्हवीच्या कमरेत हात घातला अन तिला जवळ ओढलं. तिचा चेहरा यशने हातात घेतला, एकक्षण तिच्या डोळ्यात पाहिलं अन अलगद तिच्या ओठांवर ओठ ठेवले. त्या रात्री त्यांच्या बेडरूममध्ये पहाटेपर्यंत कुणीच झोपलं नाही.
क्रमशः
x x x x x