१८. नियतीचा खेळ...
आत कुमारचं ऑपरेशन सुरु होत ,पण त्याची काहीएक जाणीव त्याला नव्हती . तो आधीच बेशुध्द होता आणि ऑपरेशन सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याच्या काही अवयवांना सुन्न करेल असे इंजेक्शन दिले होते... जवळ जवळ दीड तास झाला तरी ऑपरेशन सुरूच होते ..... कुमारच्या आई वडिलांना काळजी वाटत होती की आत जाऊन खूप वेळ झाला पण अजून काही कुमारला बाहेर आणलं नाही , तो ठीक तर असेल ना ? ती माउली मनोमन , " परमेश्वरा माझ्या कुमारला वाचव , त्याला जीवन दे , या संकटातून आमची सुटका कर अशी प्रार्थना करत होती . "
तर बाहेर खुर्चीवर बसून खूप वेळ झाला होता म्हणून जरा वेळ उठून थोडं समोर चालत जाऊन आर्यनने इशारा करून सुजितला बोलावलं ... तो उठून आर्यन मागे जायला निघाला तर पाठोपाठ अनिरुध्द आणि ऋतुराज हि उठले . आर्यन काही अंतर चालत जात थांबला . सुजित त्याच्या जवळ आला ... इतक्यात अनिरुध्द आणि ऋतुराज तिथं पोहोचले ... " कुमारला आत नेऊन बराच वेळ झाला पण अजून बाहेर आणलं नाही ! "
आर्यन म्हणाला
त्यावर तिघेही एकमेकांकडे पाहून त्याबद्दल काहीएक माहिती नसल्याने शांत होते ... " ऑपरेशन कितीवेळ चालणार हे सांगितलं असणार नव्हतं का आधी ? " ऋतुराजने मनातील शंका सांगितली
" पण तसं काहीही डॉक्टरांनी सांगितले नाही " सुजित म्हणाला
" कुमारचं ऑपरेशन तेवढं व्यवस्थित पार पडलं की झालं ... मग तो लवकर बरा होईल ..." अनिरुध्द म्हणाला
सर्व शांत झाले . मग जरावेळ असाच निघून गेला , पण बोलणं थांबलं कि मनात विचार यायला सुरुवात होते , नेमकं मन जड झालं की विचारांची गर्दी व्हायला लागते ... असेच विचार करत असता त्यांना कुमारच्या डायरीबद्दल आठवलं सुजित काल रात्री बोलला होता पण अजून काही त्याने ती डायरी दाखवली नाही ... " सुजित , तू काल रात्री डायरी वाचली म्हणून सांगितलं पण आम्हाला अजून तरी ती डायरी कुठं ठेवली ते सांगितलं नाही ... " अनिरुध्द
त्याला दुजोरा देत आर्यन आणि ऋतुराज ने सुजीतकडे एक नजर टाकली तर तो डायरी बॅगमध्ये नाही तर आहे तरी कुठं असा विचार करत , " मी डायरी बॅगमध्येच ठेवली होती "
" पण आता डायरी त्या बॅगमध्ये नाही .. " ऋतुराज म्हणाला
सुजित दुचाकी ची चावी बोटात फिरवत ... " एक मिनिट मला जरा आठवू दे ..."
काही मिनिटांनी त्याला आठवलं कि काल जेव्हा डॉक्टरांना रिपोर्ट द्यायचे होते तेव्हा ती डायरी बॅगमधून खाली पडली होती .. घाई घाईत त्याने ती आकाशाकडे दिली होती .
लगेच फिरवत असलेली चावी हातात घट्ट धरून तो म्हणाला " हा आठवलं , डायरी कुठं आहे ."
तिघे एकसाथ म्हणाले " कुठं ..?? ? "
" ती डायरी आकाश जवळ आहे , मी काल त्याला दिली . " सुजितने काल जे काय झालं ते त्यांना स्पष्ट करून सांगितलं ... एक मिनिट मी आकाशला भेटून आलोच म्हणत तो आकाश कडे गेला ...
" आकाश , जरा एक मिनिट बाजूला ये ." जवळ जाऊन हळूच तो म्हणाला
" काय म्हणतोस ..? "
" अरे काल मी तुला एक डायरी म्हणजे एक बुक दिल होत ... आठवते .."
जरा वेळ आठवून " हो काल दुपारी ना "
" हो ते तू कुठं ठेवलं ? "
" तू सांगितलं होतं ना बॅगमध्ये ठेव म्हणून मी त्यातच ठेवलं "
" पण आता ती डायरी , बुक त्या बॅगमध्ये नाही ."
" मी तर बॅगमध्येच ठेवली डायरी " आकाश म्हणाला
" बरं मग ती बॅग इकडे आण आणि दाखव ती डायरी कुठं आहे ते " सुजित जरा वैतागून बोलला
आकाश मनातच 'वेळ कोणती आणि हा काय त्या डायरीचं घेऊन बसला ' ... आकाश बॅग घेऊन आला पण त्याला त्यात काहीच मिळालं नाही ... " मी तर डायरी बॅगमध्येच ठेवली होती ..." तो म्हणाला
" मग आता कुठे आहे ? " सुजित
मग बॅग हाती घेऊन तो न्याहाळत पाहू लागला ... " हि ती बॅग नाही .."
सुजित एकदम आश्चर्याने त्याच्याकडे पाहून जागेच भान हरपून जरा जोरात .." काय ? "
मग आवाज कमी करून " हि ती बॅग नाही म्हणजे काय ..? तू कोणत्या बॅगमध्ये टाकली होती ... ? "
" काल हि बॅग होती तिथंच आणखी एक बॅग होती .... त्यात टाकली ..."
सुजीतच्या काळजाचा ठोका चुकला , म्हणजे याने ती डायरी तिच्या बॅगमध्ये टाकली ... हे काय झालं ? मी काल कितीतरी वेळ प्रयत्न केला की तिला डायरीबद्दल सांगायला हवं पण मला तिला सांगणं जमलं नाही पण जर तिला हे गुपित माहित व्हायचं असा नियतीचा डाव असेल तर तो काही चुकणार नव्हता .. स्वतःलाच कसतरी समजावत तो तेथून परतला आणि जे काय आकस्मिक घडलं त्याने त्या तिघांना सांगितलं ...
तर पुन्हा नवीन प्रश्न निर्माण झाला की ती म्हणजे कोण ? कुणाजवळ आहे डायरी ? अपेक्षित प्रश्न त्यांनी विचारला ...
आता मात्र यांना सर्व सांगून टाकावं असा मनात विचार करून तो म्हणाला ...
" चला जरा बाहेर बसूया मी तुम्हाला सगळं काही सांगतो ..." ते चौघेही बाहेर जायला निघाले तर दार उघडून कुमारला बाहेर आणत असल्याचं त्यांना दिसून आलं ... ते मागे फिरून ऑपरेशन थिएटर कडे वळले ...
कुमारला लगेच ICU मध्येच ठेवण्यात आलं ... डोक्याला पांढऱ्या पट्टांनी झाकलं होतं , हाताला सलाईन लावलेली अस चित्र त्याला समोरून घेऊन जात असताना त्यांनी पाहिलं ... त्याचे आईवडील तिथं दाराजवळ गेले तर नर्सने त्यांना कुमारला जरा आरामाची आवश्यकता आहे असं म्हणून बाहेरच थांबविल ... मग डॉक्टर तिथं आले आणि त्यांनी कुमारच्या आईवडिलांचे अभिनंदन केले ...
" ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं , तीन चार तास झाले की त्याला जाग येईल , काळजी करू नका तो लवकर पूर्ण पणे बरा होईल "
त्यांचं अस बोलणं ऐकून सर्वांना समाधान वाटलं ... आता कधी एकदा त्याला जाग येते आणि त्याला जाऊन भेटतो अस त्याच्या आईलाच नाही तर सगळ्यांना वाटत होतं ... त्यांनी मनापासून डॉक्टरांचे आभार मानले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले ... सर्वांना खूप आनंद झाला ... चौघांनाही थोड्यावेळ आधी डायरी बद्दल लागून होती ती उत्सुकता लोप पावली .. त्यांना त्यावेळी आधी काय चाललं होतं याचा पूर्णपणे विसर पडला ... पण त्यात त्यांचा काहीएक दोष नाही तर हा आपला स्वभावविशेष आहे की आनंदाच्या क्षणी आपण सारकाही विसरून त्याक्षणी झालेला आनंद उपभोगतो ... क्षणिक सुखाकडे आपली धाव असते ...
सर्व एकाच ठिकाणी जमलेले ... बरं झालं सगळं कसं व्यवस्थित पार पडलं , दैवाने साथ दिली , तो पाठीशी असला की बस , मग कोणतीच भीती नाही . असं त्याचे आईवडील बोलत होते . आता कुमारला भेटता येईल , त्याच्याशी बोलता येईल असे म्हणत गप्पा सुरु होत शांतता नाहीशी झाली ...
continue...