callgirl - 6 in Marathi Love Stories by Satyajeet Kabir books and stories PDF | कॉलगर्ल - भाग 6

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

कॉलगर्ल - भाग 6

सकाळी यश उठला तेव्हा त्याचं अंग दुखत होतं. रात्रभर सोफ्यावर झोपल्याचा परिणाम होता. पण आता याची सवय करून घ्यायला हवी होती. रत्नागिरीहून अप डाऊन करण्यापेक्षा हे better होतं. त्याने बेडरुममध्ये डोकावून पाहिलं. बहुदा जेनी बाथरूम मध्ये होती. त्याने दोघांसाठी चहा टाकला.
“गुड मॉर्निंग! कशी झाली झोप?”
“खूप छान झाली. ‘आपलं’ घरही मस्त आहे. मला खूप आवडलं.”
‘आपलं?’ यशला तिच्या बोलण्याचं हसू आलं. पण बायकांचं असंच असतं. ‘एकदा ठरवलं ना, की त्या कोणतीही गोष्ट आपलीशी करू शकतात.’
“बस ना. चहा घे.” यश तिच्या समोर कप ठेवत म्हणाला.
“बरेच दिवस सुट्टी घेतल्याने माझ्यासमोर कामाचा डोंगर पडला आहे. त्यामुळे मला साईटवर लवकर जावं लागेल. मी माझ्या हेल्परला बबनला पाठवून देतो, त्याला गावाची माहिती आहे. तुला काही हवं असेल तर त्याला सांगून मागवून घे.”
थोड्या वेळाने आवरून यश साईटवर जायला निघाला.
“जेनी हे घे. ठेव तुझ्याकडे.”
जेनीनं ते पाकीट घेतलं. त्यात पैसे होते.
“असू दे. लागतील. गावात काही बरी हॉटेल आहेत. जे काही लागेल ते बबनकडून मागवून घे. मी आज कुक शोधून फायनल करतो. प्लीज आजचा दिवस adjust कर.” असं म्हणून यश साईटवर निघून गेला.
त्याने गेल्या गेल्या बबनला जेनीच्या मदतीसाठी पाठवलं. आठवडाभर सुट्टीने कामाचा डोंगर झाला होता. अनेक टेस्ट घ्यायच्या होत्या. samples आणायला समुद्रात जायचं होतं. रिपोर्ट्स मेल करायचे होते. यश त्या सगळ्यात गढून गेला.
दुपारच्या सुमारास यशचं काम बरचसं उरकलं होतं. इतक्यात बबन ऑफिस मध्ये आला.
“बबन, तू इकडे काय करतोय? मी तुला घरी पाठवलं होतं ना?”
“सायबानु, बाईसाहेबांनीच मला जायला सांगितलं. त्यांनी तुमच्यासाठी जेवण पाठवलं हाय.” असं म्हणत त्यानं यशच्या हाती टिफिन दिला.
टिफिन बघितल्यावर यशला जेवणाची आठवण झाली. कामाच्या राड्यात तो जेवायचचं विसरला होता.
यशने टिफिन उघडला. त्यात फिशकरी आणि राइस होता. यश ने एक घास घेतला.
“झक्कास! फिशकरी तर कडचीतोड आहे. बबन टिफिन कुठल्या हॉटेलातून आणला?”
“सायाबानु, हॉटेलातून नाय काय. बाईसाहेबांनी कालवण स्वतः तयार केलं हाय. आमी सकाळी मासळी बाजारात गेलो होतो. कालवण लई बेस झालंय. मला बी जेवून जा मनल्या. त्यांच्या हाताला चव हाय.”
यशला आश्चर्य वाटलं. आणि थोडं वाईटही वाटलं. आपण जेनीच्या जेवणाचा विचारही केला नाही. तिने मात्र स्वतः जेवण बनवून पाठवलं.

यशने राहिलेलं काम लवकर आटोपलं. अन लगेच घरी आला. जेनी टीव्ही पाहत बसली होती. यश आल्याचं पाहताच ती उठली.
“कसा होता आजचा दिवस? खूप काम होतं का?” ती त्याला पाणी देत म्हणाली.
“हो काम बरंच होतं. पण उरकलं शेवटी. तुला एकटीला दिवसभर बोअर झालं असेल.”
“नाही, दुपारी थोडावेळ काकूंकडे गेले होते. नंतर टीव्ही पाहत बसले, तुम्ही जेवण केलं का? मी बबनदादांसोबत लंच पाठवला होता.”
“फिशकरी काय अमेझिंग झाली होती! बऱ्याच दिवसांनी अशी फिशकरी खाल्ली. पण तू उगाच त्रास घेतलास. कुकिंग वगैरे करण्याची काही गरज नव्हती. आज मी एक कुक शोधला आहे. तो उद्यापासून येईल.”
“मला वाटतं कुक लावण्याची काही गरज नाही. मला कुकिंग करायला आवडतं. त्यामुळे मीच करत जाईल”
“नाही जेनी, मी तुला इथं वाईफ म्हणून आणलंय, मेड म्हणून नाही. तू उगाचच त्रास घेऊ नकोस.”
“मलाही तसचं वाटतं, तुम्ही मला इथं पत्नी म्हणून आणलंय. त्यामुळे पत्नी म्हणून मीही काही कामं केली पाहिजेत ना! काकू मला विचारत होत्या स्वयंपाक येतो का म्हणून? मी निवांत बसून राहिले तर वाइफचा role play व्यवस्थित होणार नाही. आणि तसंही इथे दिवसभर मला काहीच काम नाहीये. स्वयंपाकात माझा छान वेळ जाईल. cooking is my hobby. आणि बबनदादा सांगत होते, तुम्ही दुपारचं जेवण वेळेवर घेत नाही. बऱ्याच वेळा स्किपदेखील करता. हे खरंय का?”
“नाही तसं नाही, पण इथं हॉटेल्स बरोबर नाहीत, आणि कामाचा लोड असला की मग जेवायचं लक्षात राहत नाही.”
“मग मी रोज टिफिन पाठवला तर चालेल का? म्हणजे माझाही वेळ जाईल आणि तुम्हालाही व्यवस्थित लंच मिळेल.”
“एवढा स्वादिष्ट लंच मिळणार असेल तर कोण नाही म्हणेल? पण हा तुझा पर्सनल डिसिजन आहे हं. नाहीतर मला अनुचे बोलणे ऐकावे लागेल.”
यावर जेनी खळखळून हसली.
“don’t worry. मी काही तुमची complaint करणार नाही. तुम्ही बबनदादांना पाठवत जा. मी रोज टिफिन पाठवत जाईल. आणि इथं काका-काकूंनाही वाटेल की नवीन जोडप्याचा संसार सुरु झाला. त्यांनाही संशय येणार नाही.”
“हो खरंय.. माझ्या तर हे लक्षातच नव्हतं. मला वाटलं तू इथे रहायला आलीस की झालं. पण त्यासोबत या गोष्टींचा मी विचारच केला नव्हता. तुम्ही मुली किती सखोल विचार करता. thanks for टेस्टी lunch. कुकिंग मध्ये मीही तुला मदत करेन. सांग मी काय करत जाऊ?”
“काही विशेष नाही. पण आपल्या गावातलं मार्केट लहान आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी इथं मिळत नाहीत. आपण सुट्टीच्या दिवशी रत्नागिरीला जाऊया का?”
“सुट्टीच्या दिवशी कशाला? मी उद्याच सुट्टी घेतो आपण उद्याच जाऊया.”

त्यांची रात्रीची जेवणं झाली. आणि गप्पा सुरु झाल्या.
“काल तू काकांकडे situation छान हँडल केलीस. पण स्वतःच नाव जान्हवी का सांगितलस?”
“मग? तुमचं नाव यश प्रधान आणि माझं नाव जेनी यश प्रधान. हे ऐकायला किती विचित्र वाटलं असतं.”
“अरे हो! हे माझ्या लक्षातच आला नाही. आणि तो घेतलेला उखाणा awesome होता. तो इतक्या फास्ट कसा काय मँनेज केलास?”
“actually मी कॉलेजात एका नाटकात काम केलं होतं. त्यात हा उखाणा माझा डायलॉग होता. मलाही तो आवडतो. म्हणून माझ्या पाठ राहिला. तुम्ही मात्र कमालच केलीत...कोकण, समुद्र, पेट्रोल आणि मी सर्वांना किती उत्तम एकत्र बांधलत. I adore your presence of mind.”
“thank you, thank you. जास्त काही नाही मी फक्त यमक जोडण्यावर भर दिला. तू नाटकात काम केलंस याचा अर्थ तू स्टेज अँक्टर आहेस. मग तुला हा role play सहज जमून जाईल.”
“हो. मला पण तसचं वाटतं.”
यशला जरा बरं वाटलं. अनुचा प्लान सक्सेस होणार असं दिसत होतं.
“चला, मला झोप येतीये. मी झोपायला जातो.” असं म्हणत यश हॉलकडे निघाला.
“थांबा. तुम्ही आज इथे झोपा. मी हॉलमध्ये झोपते.”
“नको. काही गरज नाही. मी झोपतो बाहेर.”
“पण तुम्ही घराचे owner आहात,तुम्ही असं बाहेर झोपता, हे मला आवडत नाही.”
“आपण स्वतः बेडवर झोपून, एका मुलीला बाहेर झोपायला लावणं हे मलाही आवडणार नाही.”
आता मोठा प्रश्न उभा राहिला. ते दोघेही विचारात पडले. थोडा विचार करून यश म्हणाला,
“हा बेड पुरेसा मोठा आहे. आपण असं करूया, मी या साईडला झोपतो, तू त्या साईडला झोप. आपण दोघांच्या मध्ये उश्या ठेवूयात, त्यामुळे बॉर्डर तयार होईल. तुला काय वाटतं?”
“मला चालेल.”
त्यादिवशी प्रथमच यश कुणासोबत तरी बेड शेअर करत होता. सवय नसल्यानं त्याला विचित्र वाटत होतं.
त्यानं जेनीकडे पाहिलं, जेनी गाढ झोपली होती. यशला काही झोप येत नव्हती. जेनीच्या शरीरातून एक विशिष्ट मादक गंध यशकडे येत होता, आणि यशच्या भावना त्यामुळे वारंवार जागृत होत होत्या. त्यादिवशी यशच्या एक गोष्ट लक्ष्यात आली, ‘स्त्रीच्या शरीराला एक विशिष्ट सुवास असतो आणि तो पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करत असतो.’

क्रमशः