Julale premache naate - 20 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-२०

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२०

आजींच्या आवाजाने मला हलकी जाग आली... "प्राजु बाळा.. उठा आता." आजी हातात चहाचा कप घेऊन उभ्या होत्या...... "आजी तुम्ही कशाला आणला चहा. मी आले असते खाली." मी लगेच बेडवर उठुन बसत बोलु लागले. पण तापामुळे काही केल्या जमत नव्हतं..... "हो ग तु आली असतीस..., पण तुझी तब्बेत ठीक नाहीये ना म्हणून घेऊन आले. चल आता फ्रेश होऊन ये आणि घे गप्प." आजी कप घेऊन तिथेच बसल्या. मी लगेच फ्रेश होऊन गरम चहा घेतला.


त्या चहामध्ये मस्त कुटून घातलेल्या आल्याचा सुगंध आणि सोबत गवती चहाचा सुगंध ही दळवळत होता.. "वाह आजी अगदी मला आवडतो तसाच बनवला आहे तुम्ही चहा." मी चहा चा एक सीप घेत बोलले... "अग प्राजु बाळा चहा मी नाही निशांतने केला आहे. अगदी तुला आवडतो तसा. आज लवकर उठला आणि किचनमध्ये चहा बनवायला आला." आजी हसुन सगळं सांगत होत्या.

मी किचनमध्ये निशांतला बघुन आधी अवाकच झाले.... "वाट चुकलास का निशु बाळा..??" "अग आजी ते मी... म्हणजे.. मी ते चहा करायला आलो आहे." चक्क माझ्या हातातल सगळं समान काढून घेऊन बनवला. गवती चहा आपल्याच गार्डनमधली तोडून घेऊन आला. आणि बघ किती छान बनवला नाही चहा..!" आजींनी एक स्माईल देत आपलं बोलण संपवलं.

"तुला म्हाहित आहे का प्राजु बाळा..., तु काल रात्री चक्कर येऊन पडलीस तेव्हा त्यानेच तुला बेडवर ठेवलं. आम्हाला बोलावून घेतलं. बाहेर पाऊस होता तरी चालला होता डॉक्टरला घेऊन यायला. आजोबा नको बोलले म्हणुन पूर्ण रात्र तुझ्या उशाशी बसून त्याने मिठाची घडी घातली. जेवला पण नाही काल. खुप छान काळजी घेतली हो तुझी." आजींच्या या बोलण्यावर मी मात्र चांगलेच आश्चर्यचकीत झाले. हा माझ्यासाठीचा सुखद धक्काच होता. आम्ही बोलत असताना मागून निशांत आला सोबत डॉक्टर ही होतेच.


डॉक्टरांनी तपासलं मला.. "ताप नाहीये आता त्यांना.. पण काही मेडिसिन लिहून देतो ती द्या. काही इन्फेक्शन असेल तर कमी होईल आणि सोबत सर्दीही.." एवढं बोलुन निशांत डॉक्टरांना घेऊन गेला. आजी अजून ही माझ्या सोबत बसूनच होत्या..... "बघितल प्राजु.., काल नाही जमल तर कसा घेऊन आला बघ डॉक्टरांना.. माझा नातु खरच खूप काळजी घेणारा आहे. बस आता त्याला त्याची काळजी घेणारी आणि आयुष्यभर साथ देणारी भेटली की, आम्ही डोळे मिटायला मोकळे." हे बोलताना मात्र त्यांच्या डोळ्यांच्या कडा चांगल्याच भिजल्या होत्या.


"आजी काही ही असत हा.. तुम्हाला अजून खुप जगायचं आहे कळलं ना.." मी आजींना एक घट्ट मिठी मारून बोलले. यावर त्यांनी माझ्या डोक्यावर आपला मायेचा हात फिरवला. छान वाटलं मला ही... आम्ही सेंटी होत असतानाच निशांत आला.. येताना त्याच्या हातात एक ट्रे होता ज्यात पोहे आणि दुध होत. सोबत गोळ्याही.. हे बघून मात्र मी स्वतःच तोंड वाकड करून दाखवलं..... "किती ही तोंड वाकडी केली तरीही तुला हे खायचं हनी-बी सोबत मेडिसिन ही घ्यायच्या आहेत... चला पोहे खाऊन घे." माझ्या समोर पोह्यांची डिश धरत त्याने स्वतःचे वाक्य पूर्ण केले.. निशांत आला म्हणुन आजी खाली निघुन गेल्या.


मी खात असताना तो माझ्या समोरच बसून होता. जस काही माझ्यावर लक्ष ठेवुन. पोहे खाऊन मी दुध घेतलं आणि काही वेळाने मेडिसिन.. "हबी-बी... आता तू आराम कर. आई-बाबांना मी सांगितलं आहे. ते संध्याकाळी येतील भेटायला आणि तुला सोबत घेऊन देखील जातील. कळलं का.." छान हसुन त्याने समजावलं. मी मानेनेच होकार दिला.. थोडा वेळ मोबाईल मध्ये टाईमपास करून मी कधी झोपले हे देखील मला कळलं नाही. कदाचित औषधांचा परिणाम असावा.


जाग आली तेव्हा समोर निशांत बसला होता. मला एकटक बघत...... "काय झालं.??? असा का बघत आहेस.???" मी जरा घाबरतच उठले आणि बेडला टेकून बसले.... "उठलीस तु..., अग काही नाही सहजचं... शांत झोपलेलीस छान वाटत होतीस. बाबा बोलतात ना तशी.. एखाद्या गोड परी सारखी." निशांत एक मोठी स्माईल देत बोलला..... "हा हा हा कुछ भी हा... झोपेत मी भूत दिसत असणार.. आणि म्हणे परी दिसत होती. काही पण हा निशांत. आणि तसही मुलांना छान मेकअप केलेल्या मुलीच जास्त आवडतात." मी त्याच्याकडे बघत बोलले... "पण मला तीच आवडेल जी सकाळच्या अवतारात असेल...तिचे ते विस्कटलेले केस..., चेहऱ्यावर कोणताही नसलेला मेकअप..., जस देवाने तिला बनवल आहे ना असदी खरी... एकदम खर रूप असलेली मुलगी मला आवडेल जशी की तू..." त्याने स्वतःची जीभ चावत स्वतःच वाक्य पूर्ण केलं...


त्याच्या बोलण्याने मी मात्र चांगलीच गोरिमोरी झाली... "चला मॅडम कपडे बदलून घे.. हे घे तुझ्यासाठी घेऊन आलो आहे.. हा एकदम छान नाही पण जस जमल तस आहे. मला नाही कळत एवढं पण घेऊन आलो आहे घालून घे.." एवढं बोलून त्याने एक बॅग माझ्या समोर ठेवली.. आता तर मी चांगलीच शोक मध्ये होते.. लाईफमध्ये पहिल्यांदा माझ्या बाबांशिवाय कोणी तरी माझ्यासाठी कपडे आणले होते... हे बघुन नकळत माझे डोळे पाणावले.. मी ते निशांत न दाखवता त्याला रुम बाहेर जायला लावल.

त्या बॅगेत हात घालुन कपडे काढले. त्यात एक लाईट पिंक आणि रेड कलरचा असे दोन टॉप आणि खाली घालायला ब्लॅक अँड ब्राऊन कलरचे ट्रक पंट्स होत्या... "अरे वाह नाईस चॉईस मिस्टर खडूस.." मी ते कपडे मिठीत घेऊन चेंज करायला गेले. बाथ घेऊन छान फ्रेश वाटलं... बाहेर येऊन गार्डनमध्ये जाऊन बसले.. "गुड मॉर्निंग आजोबा.." मी छान हसुन आजोबांना विश केलं.. "गुड मॉर्निंग बेटा.. कशी आहे आता तब्बेत.???" त्यांची स्वतःच्या हातातलं काम बाजुला ठेवत विचारल.. "एकदम मस्त" मी हाताने छान अस करून दाखवलं. आजोबांनी ही मला बघून थम दाखवत ते स्वतःच काम करू लागले.


थोड्यावेळाने आजी आणि निशांत ही गार्डनमध्ये आले. आज पावसाने उसंत घेतली होती.. काल पडून पडून नक्कीच थकला असेल. म्हणून की काय आज गायब होता. गप्पा मारून आम्ही जेवायला आत गेले. आज छान अशी दालखीचडी होती. पोटभर खाऊन मी रूममधे परतले.. स्वतःचा मोबाईल बघितला तर त्यात राजचे तीन तर हर्षुचे पाच मिस कॉल होते. ते बघून लगेच मी हर्षुला कॉल केला.. तिचा कॉल लागत होता पण ती घेत नव्हती. कदाचित लेक्चर्स मध्ये असेल करेल नंतर म्हणून मी मोबाईल बेडवर ठेवुन गॅलरीत जाऊन उभी राहिली...


कालचा दिवस डोळ्यांसमोर येऊन गेला... "किती काळजी घेती ना निशांत आपली... रात्रीभर आपल्या जवळ बसुन होता. छान थोपटलं ही आपल्याला.. माझ्यासाठी कपडे घेऊन आला.. डॉक्टरांना घेऊन आला. किती केलं त्याने आपल्यासाठी... "ती" किती लकी असेल जे निशांतसारख्या मुलाची साथ "तिला" आयुष्यभर लाभणार आहे... पण "ती" निशांतची साथ आयुष्यभर देईल ना..??" या सगळ्या विचारात असताना निशांत कधी माझ्या मागे येऊन उभा राहिला हे देखील मला कळलं नाही....


"मॅडम कोणत्या येवढया गहन विचारात आहात.???" त्याच्या या वाक्याने मी भानावर आले.. "ते मी..., म्हणजे..., मी तुझा.. म्हणजे माझा..." अचानक निशांत समोर आल्याने माझी पाचावर धारणा बसली.. "काय ग काय झालं..?? ठीक आहेस ना.??" त्याने काळजीने विचारलं... "मला पाणी हवं आहे.." मी तोंडात येईल ते बोलले... "हो थांब घेऊन येतो" अस बोलून तो बेडजवळ गेला आणि पाण्याचा ग्लास घेऊन आला.


त्याने आणलेल्या ग्लासातल सगळं पाणी मी गटागटा पिऊन टाकलं... "अग हो..., आरामात पी नाही तर ठसका लागायचा.." मी त्याकडे बघत एक स्माईल दिली आणि बेडजवल येऊन बसले.. तो ही माझ्यामागे येई बसला... "चला आता गोळ्या घ्या.." टेबलावर ठेवलेल्या मेडिसिन घेत त्याने माझ्याकडे दिल्या.. "अरे पण पाणी संपल आहे." मी ग्लास उलटा करून दाखवत बोलले.... "थांब मी घेऊन येतो" अस बोलून तो रूममधून निघून गेला. मी स्वतःच्या डोक्यावर हात मारत स्वतः वर चिडलेच.... "काय मूर्खां सारखे वागले.." स्वतःशीच पुटपुटत असताना निशांत आला..


"हे घे पाणी आणि घे मेडिसिन." पाण्याचा ग्लास पूढे करत निशांत बोलता झाला. मी काही न बोलता एखाद्या लहान मुलासारखा गप्पपणे मेडिसिन खाल्या.. मेडिसिन खाल्ल्यानंतरचा माझा चेहरा बघून निशांत चांगलाच हसत होता... "काय झालं हसायला.??" मी जरा लटक्या रागाने बोलले. "हसु नको तर काय.., मेडिसिन घेऊन कस तोंड झालंय बघ तुझं.." आणि पुन्हा हसु लागला.. मी माझा नाक मुरडत समोर पाहिलं.

हे बघून त्याने स्वतःच्या जीन्सच्या पॉकेटमधून एक सिल्क काढली आणि माझ्या समोर धरली... "खाणार का..???" सिल्क बघून तर मी चांगलेच उडाले... "वाह माझी आवडती रोस्तेडे आमंडची सिल्क.." मी लगेच त्याच्या हातातुन ती खेचुन घेऊन खाऊ लागले... माझा चॉकलेट ने भरलेला चेहरा बघून त्याला मात्र चांगलंच हसु येत होतं.. तो सारखा बघत आहे हे बघून मी त्याला ही दोन तुकडे देऊ केले.. "हे घे.. सारखं नको बघुस यापेक्षा जास्त नाही मिळणार.." मी स्वतःचं चॉकलेट लपवत बोलले. यावर हसुन त्याने मान डोलावली आणि मी दिलेले चॉकलेटचे दोन तुकडे स्वतःच्या तोंडात टाकले..


माझं चॉकलेट खाऊन झाल्यावर त्या चॉकलेट ने भरलेले माझे हात ही त्यानेच पुसले..., "काय ग हनी-बी.., तु तर एकदम लहान मुलांसारखी चॉकलेट खातेस" माझे हात पुसता पुसता निशांत बोलून गेला.. यावर मी फक्त माझे बस्तीस दात दाखवत एक मोठी स्माईल दिली.... "जा आता चूळ भर सगळे दात बघ कसे झालेत.." आणि निशांत हसु लागला.. मी ओशाळातच उठले आणि जाऊन फ्रेश होऊन आले.. छान गप्पा मारत असताना अचानक माझं डोकं दुखायला लागलं... "निशांत... आss माझं डोकं...," मी माझ्या डोक्याला हात लावून बसले....


"काय ग काय होतंय हनी-बी तुला..???" निशांत ही पॅनिक झाला.. "अरे माझं अचानक डोकं दुखायला लागलं आहे.." कस तरी मी बोलले...हे ऐकून तो तडक रूमधून निघून गेला.. परत आला तेव्हा त्याच्या हातामध्ये बामाची बॉटल होती.. "हनी-बी झोप बघु तु..., मी डोक्याला बाम लावून मसाज करून देतो बर वाटेल.. आणि यानेही बर नाही वाटलं तर आपण लगेच डॉक्टरकडे जाऊया." निशांत बामाची बॉटल ओपन करत बोलला. "नको निशांत एवढं काही नाही.. आणि दे मला मी लावते. उगाच तुला कशाला त्रास." त्याने जरा रागातच माझ्याकडे पाहिलं आणि मला ओरडलाच..


"आता तू गप्प ऐकणार आहेस का माझं... मी झोप बोललो ना तुला.. चल झोप मला माझं काम करुदे." एवढं बोलून त्याने माझ्या डोक्याला बाम लावला देखील.. छान मसाज करून देत होता तो माझ्या डोक्याचा.. त्यामुळे लगेच डोकेदुखी कुठच्या कुठे पळुन गेली.. आणि बघता बघता मी देखील झोपी गेले.. मी झोपले बघून निशांतने माझ्या अंगावर चादर घातली आणि पडदा बंद करुन तो निघून गेला...

आवाजाने मला जाग आली.. बाजीच्या मोबाईल मध्ये बघितल्यावर कळलं की, संध्याकाळचे सहा वाजले होते.. बाहेर पावसाने ही चांगलाच अंधार केला होता. म्हणून रूममधे ही अंधार झालेला.. मी बाजुचा लॅम्प लावत उठले. त्यानंतर उठुन लाईट लावली.. फ्रेश होऊन खाली आले तर खाली आई-बाबा आले होते आणि त्यांच्याच गप्पा चालू होत्या. आईला बघून मी तर जाऊन तिला जोरात मिठीच मारली... "प्राजु..., कस वाटतंय बाळा." आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. "आता बघ एकदम मस्त. माझी इकडे काळजीच एवढी घेतली की, मी आता परत काही आजारी पडणार नाही." मी हे निशांतकडे बघून बोलले असता.. त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली.


बाबांना भेटुन मी त्यांच्या सोबत गप्पा मारायला बसले... "काय ग प्राजु.., आता बर नव्हतं ना तुला लगेच गप्पा मारायला मोकळी झालीस काय.." आजोबा माझी मस्करी करत बोलले. "मग काय आजोबा.., मी गप्प राहिले तर तुम्हीच बोर व्हाल म्हणून बोलावं लागत." मी माझे डोळे बंद करून एखादं मोठं काम केल्या सारखे भाव चेहऱ्यावर आणुन बोलत होते.. हे बघुन सगळेच खदखदून हसले.. मला ही छान वाटलं की, आपल्यामुळे सगळे छान हसत आहेत..


"निशांत बाळा खरचं आभार तुझे... तु प्राजु बाळाची एवढी छान काळजी घेतलीस." बाबा निशांतला बोलले. "काय बाबा प्रांजल माझी कोणीच नाही का..? की मी तिची काळजी नाही घेऊ शकत." त्याच्या या वाक्यावर सगळेच प्रश्नार्थक चेहऱ्याने निशांतकडे बघत होते त्यात मी देखील होती.. " "म्हणजे मला बोलायचं आहे की, प्रांजल माझी बेस्ट फ्रिएन्ड आहे ना म्हणुन मी काळजी तर घेणारच ना तिची." स्वतःची जीभ चावत निशांत बोलला. यावर सगळ्यांनी स्माईल दिली.
थोडे गप्पा मारून आम्ही जेवायला गेलो... जेवण उरकुन आम्ही निघण्याच्या तय्यारीला लागलो.. मी रूममधे जाऊन निशांतने दिलेले कपडे सोबत घेतले.


आम्ही निघताना निशांत रूममधे आला... "निघालीस...? म्हणजे नीट जा आणि हो मॅसेज कर घरी जाऊन. कळलं का मॅडम." छान हसुन तो बोलत होता. मी जाणार याच दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मी सगळं आवरून निघणारच होते की, मी एक घट्ट मिठी निशांतला मारली.. "थँक्स निशांत... तु सोबत असल्यास की छान वाटत मला.." येवढ बोलून मी खाली निघून गेले. निशांत काही वेळ तसाच उभा होता. थोड्यावेळाने तो देखील खाली आला..

खाली जाताच मी आजी-आजोबांना भेटले.. "मग आजी-आजोबा येते." एवढं बोलून मी त्यांच्या पाया पडले.. आजींनी तर मला मिठीतच घेतलं.. मागून निशांत ही आला. आम्ही निघत असताना मी मागे फिरून आजोबांकडे पाहिलं.... "आजोबा.., संडे फिक्स ना.???" हे ऐकून त्यांनाही बर वाटल कदाचित ते याचिच वाट बघत असावेत.. त्यांनीही आपल्या दोन्ही हाताचे अंगठे वर करून दाखवले सोबत एक मोठी स्माईल होतीच. इकडे अजून कोणाचा तरी चेहरा खुलला होता.. तो निशांत होता. मी परत येणार म्हणुन त्याला ही आनंद झालेला..

सर्वांची भेट घेऊन आम्ही गाडीमध्ये बसलो. बाय करून आमची गाडी निघाली... मी आणि निशांत एकमेकांना दिसेनासे होईपर्यंत बाय करत होतो... आम्ही निघायच्या वेळी त्या पावसाने सुरुवात केली... बाहेरच थंड वातावरण अंगावर शहारे उभे करत होत... प्रवास करत आम्ही आमच्या बिल्डिंग जवळ पोहोचलो... मी आणि आई वर घरी आलो तर बाबा मागुन परतले..

मी घरात पाय ठेवताच निशांतला मॅरेज केला.. त्याचाही रिप्लाय आला. थोडं फ्रेश होऊन आम्ही सगळे झोपायच्या तय्यारीला लागलो.., कारण आम्ही जेवूनच आलो होतो.. स्वतःच्या रूममधे जाऊन मी हर्षुला कॉल केला.. "हॅलो हर्षु.., प्राजु बोलतेय.. अग कॉल केलेलास का.??" "हो ग.. तु आज कॉलेजमध्ये आली नाहीस म्हणून कॉल केला होता. काय झालं.., म्हणजे तु ठीक आहेस ना." "अग जरा ताप आलेला म्हणून आले नाही." उद्या भेटु एवढं बोलुन मी कॉल ठेवला. राजला ही मॅसेज करून विचारल असता त्याने ही तेच विचारल.., की आज कॉजेलमध्ये का आली नाहीस..?" त्यालाही ही तब्बेतीच कारण सांगितलं..

निशांतच्या मॅसेजने मेडिसिनची आठवण करून दिली... मेडिसिन घेऊन थोडा वेळ निशांतसोबत बोलुन मी झोपायला सज्ज झाले..

काही तरी विचार करून मी डोळे बंद करत झोपायचा प्रयत्न केला. मेडिसिनमुळे लगेच झोप लागली देखील.

to be continued........


(कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.