रोहीतने मेसेज पाहील्यावर...
उद्या office ला सुट्टी असल्याने रोहीत रात्रभर निवांत झोपला होता. डोक्यात तर काहीच विचार ही नव्हता. सकाळचे दहा वाजले होते. आणि त्याच्या मोबाइल ची रिंग वाजली होती. उश्याजवळ मोबाइल असल्याने झोपेतच त्याने कॉल घेतला. call तर त्याच्या होणा-या बायकोचा होता. रोहीत काही दिवसापुर्वीच त्याच्याच गावातली एक सुंदर मुलगी पाहुन आला होता. त्याच लग्न ही ठरलं होतं. येणा-या काही दिवसात त्याच लग्न होतं. गावातलीच मुलगी पण खुप हुशार होती. व सुंदर ही तितकीच होती. रोहीत चांगल्या जॉब ला आहे म्हणुण तीने ही हो बोललं होतं. दोघ रोज call वर बोलत असायचे. म्हणुण तीचा अता call अला होता. आणि रोहीत ने झोपेतच good morning बोलला.तीकडुन ही सुंदर अवाजात तेच ऐकायला भेटलं. मोबाइल वरुन किस देत ती बोलली उठा अता. आणि तो हो करत या अंगावरुन त्या अंगावर झाला. आणि बोलला, एवढ्या सकाळी तु इथे हवी होती. मस्त किस करत बसलो असतो ना. आणि ती बोलली लग्ना नंतर सर्व काही. त्याआधी काहीच नाही. साधा टच ही नाही. आणि रोहीत मोठ्याने हसला. दोघंही हसत त्याने बाय म्हटलं. आणि फोन ठेवुन दिला. मग उठुन अंघोळ केली आणि coffee तयार करु लागला. तेवढ्यात त्याला त्याच्या office मधल्या friend चा call आला. त्याने तो call सहजतेने घेतला होता. तिकडुन त्याचा friend रोहीतला बोलंला आपली नेहा madam ने आत्महत्या केली आहे. आणि रोहीत ढासळला. त्याच्या लक्षात येईना की असं का केलं असेल तिने म्हणुण. आणि काही वेळात तो तिथे पोहचला. तिच्या प्रेताकडे पाहुन त्याला सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. आणि डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आता सगळेजण तिच्या नवर्याची वाट पाहत होते. त्यालाही रात्रीच कळल्यामुळे तो लवकरच आला होता. तीचा अंत्यविधीचा कार्यक्रम संपवून रोहीत घरी अला होता. विचार तर नेहाचेच डोक्यात होते,
तीला तर बाळाला जन्म देयाचा होता. मग असं का केलं असेल तीने. खुप वेळ विचार करुन करुन त्याने मोबाइल हातात घेतला. आणि त्याला एक टेक्स्ट मेसेज दिसला. तो मेसेज तिचाच होता. काय असं करत या मेसेज मध्ये म्हणून त्याने ते मेसेज ओपन केला. पहिलाच ओळीला तिने लिहिले होते.
प्रिय रोहित, तुझ्या सहवासात घालवलेले क्षण खूप छान होते. तस आयुष्य मला कधी जगायला भेटलं नव्हतं. तू भेटल्या पासून खूप छान वाटलं होतं. माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली होती. जगण्याचा एक कारण मिळाले होते. खरच तू माझ्या आयुष्यात सगळ्यात खुशी दिल्या होत्या. इतकं कसं रे प्रेम झालं होतं तुझ्यावर. तुझ्याशिवाय आयुष्य जगणंच खूप कठीण होतं. पण आता मला एकटीलाच जगणे गरजेचे आहे. कारण तु ही हे सगळं वाचल्यानंतर कदाचित माझ्यासारखंच करशील. ही खूप मोठी गोष्ट आहे जी तुला माहीत होणे गरजेच आहे. मी जर तुला सांगितले नाही तर ही माझी चुकी होईल. आणि मी स्वतःला माफ करू शकणार नाही. हृदयावर हात ठेवून या ओळी वाच तु. " तू सेक्स करून गेल्यानंतर रात्री माझ्या पतीचा मला फोन आला. त्याने सांगितले की तो HIV चा पेशंट आहे. त्याला AIDS झालाय. आणि मला ही. माझ्या बाळा हि झाला असता कदाचित आणि तुला ही. मग मी जिवंत राहुन तरी काय करणार होते. म्हणुण आत्महत्या करत आहे.
हे सगळ वाचत असतांना त्याच्या डोळ्यांतलं पाणी नदी भरुन वाहिल्या सारखं वहात होतं. मी गावात असतो तर कदाचित हे झालंच नसतं. असे किती तरी विचार त्याच्या मनात नाचत होते. सुचेना काय करावं. आणि एकच पर्याय निवडला...
आत्महत्या
आणि शेवटी रोहीत ने ही त्याच जिवन संपवुन टाकलं.
लेखक, दिपक सव्वासे.
📗 THE END 📗