Julale premache naate - 19 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-१९

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१९

"अरे यार.... तुला काही झालं तर नाही ना प्राजु..??" अभिने टेंशनमध्ये विचार..... "अरे गाईज ऐका तर पुढे काय झालं." मी स्वतःच्या डोक्यावर हात मारत बोलले. तिघीही आता माझ्या बोलण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकत होत्या. मी एक मोठा श्वास घेत बोलु लागले.

त्या काळोखात वरून कोसळणारा पाऊस आणि मनातील भावनांचा पाऊस दोघेही धुमाकूळ घालत होते. तशीच रस्त्यावरून जाताना स्वतःच्या विचारात असताना मागुन येणाऱ्या ट्रकने मी भानवर आले खर. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो ट्रक आणि माझ्यात खूप कमी अंतर राहील होत. मी तर माझे डोळेच बंद करून घेतले. तो ट्रक भरदाव वेगाने आला मी माझे डोळेच बंद करून घेतले. मनात देवाच्या नावाने प्रार्थना चालुच होती.........


किती तरी वेळ मी तशीच उभी होती. गच्च डोळे बंद करून आणि डोळे उघडले तेव्हा मी निशांतच्या मिठीत. त्याच्या हृदयाचे ठोके ऐकु येत होते... त्यानेही घट्ट मिठी मारली होती. कोणीच काही बोलत नव्हतं. काही वेळाने निशांतच बोलला.


"हनी-बी.., तु ठीक आहेस ना.??? हॅलो इकडे बघ माझ्याकडे. " त्याने अलगद माझा चेहरा स्वतःच्या हाताने वर केला. मी अजूनही थरथरत होते. "अग मी आलोय ना आता शांत हो.., रडणं बंद कर. चल आपल्या घरी जाऊया." पण माझं काही त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. आता जर निशांत आला नसता तर माझं काय झालं असत याचा विचार येताच मला अजूनच रडु कोसळलं. ते बघून त्याने परत मिठीत घेतलं.


"हनी-बी..., मी आहे ना. तुला कधीच काही होऊ देणार नाही मी." त्याने माझ्या डोक्यावर आपला हात फिरवला.... "चल आता आपल्या घरी जाऊया. खुप भिजली आहेस पावसात परत आजारी पडशील." त्याने हसुन बघितल.... "मी नाही येणार" एवढं बोलून मी पुढे जायला निघाले. हे बघून निशांत माझ्या मागे आला आणि माझा हात धरला.

"हनी-बी...,मला म्हाहित आहे तुझा माझ्यावर राग आहे तो. पण आता एकतर खुप पाऊस आहे. त्यात आताच तुझं ऍकसिडेंट होता होता राहील. इतर वेळी ठीक आहे पण आज मी नाही ऐकणार तुझं कळलं." तो जरा ओरडतच बोलला. पण मी काही ऐकत नाही हे बघुन तर त्याने हद्दच केली. "अशी नाही ऐकत ना तु थांब आता उचलूनच घेऊन जातो. आणि हो मला नाही हा फरक पडत कोण काय बोलेल ते. तुलाच पडेल सो गप्पपणे चल." त्याने शांतपणे सांगितलं.


आधी मला वाटलं तो असच बोलतोय. म्हणुन मी दोन पावलं पुढे चालु लागली. तोच त्याने माझा हात खेचला आणि मला समोर उभा करत उचलायला पुढे आला.. "निशांत..... काय करतो आहेस." मी घाबरून जरा दूर झाले. "तुला कळत नाही म्हटलं आता करून दाखवू. आता येते आहेस की, घेऊन जाऊ उचलून." त्याचा आवाज जरा रागावलेला वाटला. मी गप्पपणे त्याच्या मागे चालु लागले.

वरून कोसळणारा पाऊस आता अजुनच वाढला होता. आम्ही दोघेही भिजत होतो. त्याने एक ऑटो थांबवली आणि आम्ही त्याच्या घरी जायला निघालो. माझं घर लांब पडलं असत त्यात पाऊस वाढल्याने सगळीकडे थोडफार पाणी भरलं होत. त्या काकांनी आमची अवस्था बघून आम्हाला मसाज घरी म्हणजे निशांतच्या घरी सोडलं. आता जाताच आजी मला त्यांच्या रूममधे घेऊन गेल्या. पुसायला टॉवेल दिल. निशांत ही स्वतःच्या रूमध्ये गेला. माझं सगळे कपडे भिजले आल्याने मी कुडकुडत टॉवेलने स्वतःला झोकून घेतलं.


थोड्यावेळाने निशांत ही आला. त्याने काही सुके त्याचे कपडे आणले होते. "हे घे.., मला म्हाहित आहे हे तुला आवडणार नाहीत पण सध्या दुसरा चॉईस तुझ्याकडे तरी नाहीये. एक तर आजीची साडी नेस नाही तर हे माझं टिशर्ट आणि शॉर्टस घाल." स्वतःच्या हातातले कपडे बेडवर ठेवुन निशांत गेला. काही वेळ मी ते कपडे बघत बसले. दुसरा ऑपशन नसल्याने मी निशांतने आणून दिलेले कपडे घातले. टॉवेलने स्वतःचे केस वर बांधुन मी खाली आले. निशांतच टिशर्ट मला छान वाटत होतं. डार्क रेड कलरच आणि खाली ब्लॅक शॉर्टस. आणि वर टॉवेलने बांधलेले केस. माझं तर बुजगावन झालं होतं.


"प्राजु बाळा कधी गेलीस तु...?? आम्हाला सांगून जावस नाही वाटलं तुला..?" आजोबा जरा रागावून बोलले. "आजोबा मीच विसरलो सांगायला. तिने मला सांगितलं होतं तुम्हाला सांगायला." निशांतने माझ्याकडे बघत वाक्य पूर्ण केलं. मी माझा मोबाईल शोधु लागले तस आजोबांनी समगितल की, त्यांनी घरी कळवल आहे आज मी इथेच राहणार अस. आम्ही जेवायला बसलो पण मला काहीच खायची इच्छानावती म्हणून मी स्वतःच्या रूमध्ये जाऊन बाल्कनीत जाऊन पाऊस बघत बसले.


त्या पावसाला बघताना परत तो क्षण माझ्या नजरे समोरून सर्रकन येऊन गेला. थोडं घाबरतच मी मागे फिरले. माझ्या मागे निशांत उभा होता. मी काही न बोलता बेडजवळ जायला निघाले आणि....मला चक्कर आली आणि मी जमिनीवर कोसळनारच होते की, निशांतने मला स्वतःच्या कवेत घेतलं. माझी शुद्ध हरपली होती. हे बघुन त्याने मलाउचललं आणि मला बेडवर झोपवलं. त्याचा माझ्या बॉडीला स्पर्श होताच जाणवलं की, मला ताप आला आहे.

मी किलकिले डोळे करून आजूबाजूला पाहिलं. बाजुला निशांत बसला होता बेडला टेकुन. मला जाग आलीये हे कळताच तो उठला आणि मला उठवुन बसायला मदत केली. "हनी-बी कस वाटतं आहे.?" त्याने प्रेमाने मला विचारलं. पम माझ्या तोंडुन काहीच शब्द बाहेर पडत नव्हते. मी बोलायचा प्रयत्न करत होते पण काही जमत नव्हतं. "शुsss... काही नको बोलुस शांत बसुन रहा. किती टेंशन दिलास म्हाहित आहे का तुला. अग रात्री ९ वाजता तु बेशुद्ध पडलीस ती आता रात्रीच्या ३ वाजता तुला जाग आलीये." बोलताना त्याचा कंठ दाटून आल्यासारखा वाटला. मी बोलायचा प्रयत्न करते होते. पण बोलता काही येत नव्हतं. माझ्या तोंडुन आवाजच येत नव्हता.


मी इशारा करत त्याला जवळ बोलावल.... तो जवळ आला "मला भूक लागली आहे.." आणि मी त्याच्या कानात बोलले... "लागणारच ना काही खाल नाहीस नुसता राग करायचा सगळ्या गोष्टींचा... आता गप्प बसून रहा मी येतो" अस बोलून तो निघुन गेला. त्याला जाताना बसून नकळत माझ्या चेहऱ्यावर एक छोटीसी स्माईल आली.

काही वेळाने तो एक मोठा ट्रे घेऊन माझ्या समोर उभा होता. तो ट्रे त्याने माझ्या समोर ठेवला. त्या ट्रेमध्ये वरण-भात, लिंबाच लोणचं. काही फळं, दूध अस सगळ काही तो घेऊन आलेला. त्याने मला बेडला टेकून बसायला सांगितलं. तो माझ्यासमोर बसला आणि मला स्वतःच्या हाताने त्याने वरण-भात भरवला. शेवटी गरम पाणी प्यायला देऊन बळे-बळेच दुध प्यायला सांगितलं. त्याच्या जवळची एक मेडिसिन देऊन त्याने मला पुन्हा झोपायला लावले. सगळे पार्ट ठेवून तो माझ्या बाजूला बसला.


"काय गरज होती एकटी जायची.??? आणि तुझ्याकडे तर नेहमी छत्री असते ना मग भिजत का जात होतीस.???? आणि अजून एक कां खराब झालेत का तुझे तर डॉक्टरकडे जाऊन ये. मागच्या ट्रकचा आवाज ही तुला ऐकु आला नाही का.???" हे सगळं त्याने एकाच दमात बोलून टाकलं. आणि माझ्या उत्तराची वाट बघत बसला. "आता बोलणार आहेस कि, अशीच बघत बसणार आहेस.???" मी स्वतःच्या अंगावर चादर वर घेत बोलु लागले.

"तुझ्या बोलण्याचं वाईट वाटलं होतं निशांत मला.. तु असा कसा विचार करू शकतोस की मी किस करेन आणि तेहि त्या राजला. हे बघ आम्ही फक्त मित्र आहोत. बाकी मला राज कधी आवडला नाही. मी त्याला माझा खुप चांगला मित्र समजते आणि तु नको ते समजुन मला अस बोललास त्याचं वाईट वाटलं. मी हर्ट झाले निशांत. उद्या मी तुला आणि हर्षल ला अस बोलले तर तु घेशील समजून नाही ना... तुला ही वाईट वाटेल." एवढं बोलून मी पुन्हा रडु लागले. मला रडताना बघून त्याला ही स्वतःची चूक कळली.


"हनी-बी मला माफ कर मी प्रत्येक वेळी तुला दुखवतो. मीच जातो दूर तुला सारख हर्ट होत राहणार मी असेल तर." "दूरच जायचं होतं तर आज वाचवलं का मला...?? द्यायचं होतास मरू." .. माझ्या या वाक्यावर त्याने माझ्या तोंडावर स्वतःचे हात ठेवले... "हनी-बी..., काही ही काय बोलतेस.. तुला कधीच काही होऊ देणार नाही मी समजलं तुला.... तुझ्यापासून दूर राहण्याचा विकजार हु माझ्या मनात येऊ शकत नाही आणि तु बोलतेस की,..." आणि नकळत निशांत रडु लागला. "निशांत.... शांत हो. अरे मी मस्करीत बोलले." मी तुपाचे अश्रू पुसत बोलले.

"हनी-बी तु मला कधीच सोडुन जाणार नाहीस ना.??? मला प्रॉमिस कर. प्लीज." तो रडत बोलत होता हे बघून आता मला ही अश्रु अनावर झाले. मी रडतच त्याचा हात हातात घेत प्रॉमिस केलं. "कधीच सोडुन जाणार नाही." आम्ही दोघे ही एकमेकांचे अश्रु पुसत होतो. "पण तू हिरो सारखी एन्ट्री केलीस हा... फुल स्टाईलमध्ये." मी वातावरण हलकं होण्यासाठी एक जोक मारला आणि चक्क निशांत हसला. ते बघून मला ही बर वाटल. "पण तू पुढे कधीच गैरसमज करून घेणार नाहीस... काय असत ना निशांत जवळच्या व्येक्ती वर विश्वास ठेवावा. ते नातंच काय कामच ज्यात विश्वास नाही. आणि कोणाला अस हर्ट होईल असं बोलु नकोस.. काय म्हाहित कोणाची भेट, किव्हा बोलणं शेवटचं ठरेल."


"समजा आज जर मी गेले असते ढगात तर तुझ्या "तिला" भेटता ही आल नसत मला." मी हसत बोलले...... "मी तुला कधीच काही होऊ देणार नाही. तुझ्यासोबत नेहमीच मी सावली सारखा असेल नेहमीच.. आणि आता राहिला "तिला" भेटायचा प्रश्न तर तो ही लवकरच पूर्ण होईल." त्यानेही हसुन त्याच उत्तर दिलं. "चल आता झोप गप्प ताप आहे मॅडम तुला."


"पण मला झोप येत नाहीये" मी स्वतःचे दात दाखवत बोलले. छान स्माईल देत निशांत मला थोपटू लागला. खरच आज मी किती लकी ठरले. खडूस असा निशांत आज माझी किती काळजी घेत होता. कधी तरी मला झोप लागली.

बाहेर अजून ही पाऊस कोसळत होताच....

to be continued.......

(कथेचा हा पार्ट कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.f