मी प्रतिकार करायच्या आत पाठीमागून येणारा बारीक आवाज कानावर पडला...
" शुssssssssssss....इथच थांब... एकही पाउल पुढ टाकु नग..आन काय बी बोलू नग..."
आवाज ओळखला तस मी गर्रर्रर्रर कन मागे फिरलो...
" ग........ग.....गौरी......तु..."
तीला पहाताक्षणी तीला गच्च मीठी मारली, माझ्या डोळ्यातुन घळाळा आनंदाश्रु वाहु लागले... ती ठीक होती..
दुस-याक्षणी मनात विचार आला, मग ती जखमी आहे ती कोण...? तसच समोर पाहिल. ती जख्मी अवस्थेत पडलेली मुलगी गाडीचा स्टर्टर लागावा तशा आवाजासारखी हसत उठुन उभी राहीली. र्खी खी खी खी करत तीीच हसण ऐकून जसं डोकच बधीर होऊ लागल.. क्षणाक्षणााााला तीचा विद्रुप होऊ लागला तसा मी हादरलो...
गौरीन माझा हात मागे ओढला आणि आम्ही दोघे गावाच्या दिशेने धावत सुटलो. पडत होतो, धडपडत होतो पन एकमेकांचे घट्ट पकडलेले हात आम्हाला सावरत होते... तसच कोणीतरी वेगात आमच्या मागे धावत असल्याच जाणवल... मी मागे पहाणार तोच गौरी ओरडली......
"माग बगू नग....."
दोघेही जीवाच्या आकांताने धावत सुटलो... पन कोणीतरी आमच्या मागे वेगाने येत होत ... त्याच्या ओरडण्याचा आवाज मेंदु बधीर करत होता... पन मागे न पहाता आम्ही धावतच राहीलो... काट्याकुट्यातुन , त्या दाट जंगलातुन, मागे न पहाता काही क्षणात मागुन येणारा तो आवाज येईनासा झाला..
माझी गाडी रस्त्यावर दीसली तसा सुटकेचा नि:श्वास टाकला... ती ही दमली होती आणि मी तर धापा टाकत होतो...
जोरजोरात श्वास घेत ती म्हणाली ...
" सारी......( sorry).. मला जरा यायला यळच झाला...एक बी पाऊल पुढ टाकल आसतस तर त्या पिशाच्च्यान तुजा जिव घेतला आसता..."
मी गुडघ्यावर हात ठेऊन धापा टाकत तीच्याकडे पाहीले, घडल्या प्रकाराची थोडी भीती होतीच पन एकमेकांकडे पाहुन आता आम्हाला हासु ही येत होत...
शुभ्र टपोर चांदण . तेच टीम टीमनारे काजवे.. कुठूनतरी रातराणीच्या फुलांचा योणार सुगंध मनावरील ताण कमी करत होता आणि अशातच चंद्राच मोहक रुपही फिक वाटाव अशी ही माझी गौरी...
घडलेल्या प्रसंगातून थोड normal होत तीच्या जवळ आलो... ती तशीच उभी होती... माझ्या थरथरणा-या हातात तीचा हात घेतला तशी काळजाची धडधड वाढली होती... एक हात शर्टच्या आत घातला आणी ते गुलाबाच फुल बाहेर काढु लागलो... एक दोन काटे पोटात , छातीत रूतलेच शेवटी... ती आश्चर्यान पहात म्हणाली...
"काय हे"
आणी तो सुंदर गुलाबही फिक्का पडेल आशा माझ्या निरागस गौरी समोर करत धडधडत्या काळजान, काळजात आजवर लपवुन ठेवलेल ते गुपित, अहं.. गोड गुपित तीला सांगितल,
" गौरी......मला तु खुप आवडतेस..खुप जीव आहे ग तुझ्यावर.."
तीच ही अंग थरथरत होत... नाजुकस गालात हसत तीन मान झुकवली आणी आपल्या दोन्ही हातानी तो गुलाब स्विकारला..
तीचा हात आपल्या दोन्ही हातानी घट्ट पकडत म्हणालो..
"गौरी.........माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे ग... मला आयुष्यभर अशीच साथ देशील......माझ्याशी लग्न करशील....."
तीने शांतपने आपले डोळे मिटले तसा तिच्या पाणावलेल्या डोळ्यातुन एक थेंब माझ्या मनगटावर पडला... तीच्या चेह-यावर एक समाधान दिसत होत...
माझ्याकडे पहात ती म्हणाली..
" आजवर म्या या दिसाची बगत व्हती..
मला ठाव हुत तु परतून यणार... माजा देव माज्यासोबत एवढा निर्दयी न्हाय वागनार...."
बोलता बोलता तीला अश्रु अनावर झाले तशी ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडतच म्हणाली..
"माजा बी लय जीव हाय तुज्यावर... .."
तीच बोलण थांबवत मी म्हणालो...
" मला तुझ्याशीच लग्न करायच आहे....मग जीव गेला तरी चालेल... मी उद्याच माझ्या आईला सांगतो आणि तुझ्या आईसोबत बोलणी करायला सांगतो..."
माझ बोलण ऐकताच ती घाबरली आणि घरी न येण्याची विनवणी करू लागली.. माजी आन हाय वगैरे वगैरे..पन तीच काही ऐकण्याची मला गरज वाटली नाही. तीला गाडीवर बसवले आणि मुद्दाम सावकाराच्या घराजवळुन आलो. आर्केस्ट्रा बघून येणारी लोक, स्त्रीया मुल रस्त्याने चालत येत होती... तिला गाडीवरुन तीच्या घराजवळ सोडली आणि दोन मिनट गाडी थांबवून बोलत उभ राहीलो कारण सावकाराच्या मुलाचे दोघे मित्र काही अंतरावर बोलत उभे होते...
घरी आलो एव्हाना रात्रिचे बारा वाजलेले... थोड जेवण करून अंथरुणावर पडलो. आज खूप खुश होतो... उद्या आईला सांगायच की मला गौरीशी लग्न करायच आहे, पन मामाला काही समजू द्यायच नाही. गौरी बरोबरच्या नव्या आयुष्याची स्वप्न पहातच झोपी गेलो...
सकाळी आईला फोन करून गौरी बद्दल सांगितले. पालकांच्या चौकशी की चौकस स्वभावाप्रमाणे कोण आहे ती, वडिल काय करतात, कोणती जात, कोणत कुळ वगैरे प्रश्नाचा भडिमार सुरू झाला..
त्या नंतर सर्व मित्राना फोन केला आणि जर घरचे लग्नाला नाही म्हणनार ठाऊकच होत त्यामुळे पुढची फिल्डिन्ग लावायला सांगितले, सगळे खुश होते... शेवटी मित्रच ते, सुखाता आणि दु:खात साथ देणारे..
*****