callgirl - 5 in Marathi Love Stories by Satyajeet Kabir books and stories PDF | कॉलगर्ल - भाग 5

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

कॉलगर्ल - भाग 5

दुसऱ्या दिवशी आयरिश हाऊसमध्ये यश पुन्हा जेनीसमोर बसला होता. ती आज कालच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती.
“I am sorry जेनी. मी काल तुला एकटीला सोडून गेलो, actually मी काल थोडा disturb होतो.”
“इट्स ओके, नो प्रोब्लेम.”
“काल तू तुझ्या conditions सांगत होतीस?”
“अं? actually माझी एकच condition होती. तुमच्या काही conditions असतील तर प्लीज?.....”
“नाही, माझी काहीच अट नाहीये.”
“तर मग आपण ही डील फायनल समजूया का?” अनुने विचारलं.
दोघांनीही एकमेकांकडे पाहून माना डोलावल्या.
“cheers for this cute couple.” म्हणत अजयने वाइनचा ग्लास उंचावला. तिघांनीही त्याला response दिला.
“यश, माझी तुम्हाला एक request होती. काल तुम्ही मला जसं सोडून गेलात, तसं त्या गावी जाऊ नका. मुंबईत ठीक आहे, पण तिकडचं मला काहीच माहित नाही.”
यावर ते तिघेही हसायला लागले.
“नाही. मी तुला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही. promise”
“हं....आज promise देतोयस, काल मात्र माझा जीव घेतलास.”
“प्लीज यार आज्या, किती टोमणे मारशील? अनु, पुढचा प्लान काय आहे?”
“हं......तू एक काम कर, उद्या जॉईन हो आणि घर शोधायला सुरुवात कर, फर्निचरचा जुगाड कर, लग्नासाठी सुट्टी घे, आणि परत मुंबईला ये. तो पर्यंत मी इकडे सगळी तयारी करते. आणि हो, तुझं ‘क्रेडिट कार्ड’ माझ्याकडे ठेऊन जा.”
“’क्रेडिट कार्ड’? ते कशासाठी?”
“कशासाठी म्हणजे? जेनीला तुझी बायको म्हणून न्यायचं आहे. गर्लफ्रेंड म्हणून नाही. तिला साडी ज्वेलरी बाकीच्या अँक्सेसरीज नकोत का?”
“अरे हो, माझ्या ते लक्ष्यातचं नाही आलं.”
“आणि आमच्या पार्किंगमध्ये तुझी आय 20 धूळ खात पडलीये, जाताना ती घेऊन जा.”
“पण तिथे माझ्याकडे जिप्सी आहे.”
“कमाल करतोस यार यश, तू जेनीला जिप्सीतून फिरवणार आहेस का? यार तुम्हा मुलांना काही सेन्स नावाची गोष्टच नसते.” अनु अजयकडे पाहत म्हणाली.
“जा ना बाबा यश, ती आय 20 घेऊन, तुझ्यामुळे मला शिव्या ऐकाव्या लागतायेत.” अजय वैतागून म्हणाला.
“ओके ओके, नो प्रॉब्लेम.”
x x x x x
काहीच काम नसल्यानं बबन ऑफिसमध्ये खुर्चीतल्या खुर्चीत डुलक्या घेत होता. दोन दिवसांपासून त्याच्या साहेबांचा पत्ता नव्हता. आजतर तो चांगलाच आळसावला होता. एवढ्यात गाडीचा आवाज आला, आणि त्याची झोप खाडकन उडाली.
“साहेबानु , तुम्ही आलात, माझा डावा डोला सकाळपासूनच लवत होता, म्हंटला तुमी आज आल्यावाचूक राहत नाही.”
“हे घे, तू घे अन बाकीच्यांनाही दे.” यश बबनच्या हातात बॉक्स देत म्हणाला.
“मिठाई? काय खुशखबर साहेबानु?”
“माझं लग्न ठरलंय, पुढच्या सोमवारी मुहूर्त आहे.”
“काय सांगता? रवळनाथाची कृपा झाली, मी त्याला साकडं घातलं होतं. त्यानं लगेच मनावर घेतलं. पहिला पेढा त्यालाच ठेऊन येतो, तुमी संगती येतंय का?”
“नाही, तू जाऊन ये.”
“सायबानु लगीन तर चारच दिवसांवर आलं, एवढ्या कमी वेळंत तयारी कशी हुणार?”
“कोर्ट मँरेज आहे रे, जाऊन फक्त सह्या करायच्या आहेत. आणि बबन आणखी एक काम आहे, मी आता गावातच राहणार आहे, माझ्यासाठी घर शोधशील प्लीज?”
“मणजे? साहेबानु आओ मी घर शोधूनच ठेवलंय, तुमाला सांगतो तुमी लगीन करायचा उशीर होता, बाकी सगळा जुगाड झाला हाय. तुमचं काम संपलं की आपण घर बगायला जाऊ.”
“वा! छानच की! कुठे दूर आहे का?”
“दूर नाय ओ... ते काय ते तीन उंच शहाळ्याची झाडं दिसली का? तिथंच हाय.”
“ठीक आहे, संध्याकाळी आपण जाऊ तिकडे.”
“सायाबानु, मी देवळात जाऊन येतंय हां.”
“लवकर ये रे, आणि ती चायनीज मंडळी कुठे गेली?, आज काही गडबड दिसत नाहीये ते? त्यांनाही पेढा दे बरं.”
“आज ते काय आपली मिठाई खायची नायत, त्याना तेंची मिठाई सकाळची भेटली हाय.”
“म्हणजे?”
“सकाळीच त्यांना काळा कुत्रा घावला. त्यामुळे मंडळी खुशीत हायेत. पार्टीचा बेत हाय आज.”
“शी...!!! काय घाणरडे आहेत यार...”
बबनमुळे यशच्या लग्नाची बातमी सगळ्या साईटवर पसरली. प्रत्येक जण यशचं अभिनंदन करत होता. खोट्या लग्नाचं अभिनंदन स्विकारताना यशला खूपच आँकवर्ड होत होतं.

संध्याकाळी यश बबनसोबत घर बघायला गेला. घर म्हणजे मोठा वाडाच होता. वाड्यासमोर सुंदर बाग होती. त्यात मोगरा, चाफा, केवडा, जाई जुई आणि अनेक फुलझाडे लावली होती. वाडा तसं जुनाटच दिसत होता. या वाड्यात किमान लाईट असली तरी पुरेसं आहे, असा विचार करत यश आत गेला. वाड्याचे दोन भाग होते, एका भागात घरमालक राहायचे,दुसरा भाग बहुतेक किरायदारांसाठी होता. बबनने घरमालकांकडून किल्ली आणली आणि कुलूप उघडलं.
“यार बबन, घर मस्त आहे रे.”
“मग मी मनालो होतो ना, तुमाला पसंद पडणार मनून.”
“बाहेरून तर जुनाट वाडा वाटतो, पण आतमधून फ्लँट आहे रे.”
“साहेबानु सगल्या कोकणचं तसचं हाय, बाहेरून शहाल्यावानी टणक, पण आतून लई गोड पाणी...!!!”
यशने सगळं घर फिरून बघितलं. तीन रूम, बाथरूम, पाण्याची सोय, घर तसं फुल फर्निश्ड होतं. यशला काहीच आणायची गरज नव्हती. गँस, फ्रीज, कुलर, टीव्ही सर्व काही उपलब्ध होतं.
यश समोरच घरमालकाला भेटायला गेला.

“या या. काय पसंत पडलं का आमचं घर?”
“हो. छानच आहे. सावरीसारख्या गावात एवढी उत्तम सुविधा कशी काय? याचच आश्चर्य वाटतंय. कमाल आहे तुमची..!!”
“कमाल माझी नाही. माझ्या मुलाची आहे. त्यानेच हे सगळं बनवून घेतलं. तो शास्त्रज्ञ आहे. सध्या जर्मनीत असतो, काही वर्ष तिथे राहतो आणि परत येतो म्हणाला. मी म्हंटल आमचे हात पाय चालत आहेत तोपर्यंत बाहेर राहिलास तरी चालेल, नंतर मात्र इथेच आला पाहिजेस. त्याने नंतर राहायची सोय आत्ताच करून घेतली.”
एवढ्यात मालकीणबाई चहा घेऊन आल्या.
“यांना घर आवडलंय. रहायला येऊ का म्हणतात? काय सांगू?”
“मला काय विचारताय? तुम्ही मालक तुम्हीच सांगा.”
“तुमच्या मिसेस नाही आल्या?” मालकीणबाईनी यशला विचारलं.
“ती मुंबईला आहे, इथे पुढच्या आठवड्यात येणार आहे.”
“बरं झालं बाई, मला सोबत झाली.”
“घराचा रेंट किती आहे, म्हणजे अँडवान्स द्यायचा की कसं?”
“”अँडवान्स वगैरे काही नाही. अहो, आम्ही कीरायदार पैश्यासाठी ठेवत नाही आहोत. मी रत्नागिरीत केळकर कॉलेजमध्ये प्राचार्य होतो. ही तिथेच प्राध्यापिका, दोघेही रिटायर झालो, आता वेळ जात नाही, या वयात कुणीतरी सोबत लागते, म्हणून कीरायदार हवा. तोही एकटा नको, सहकुटुंब पाहिजे. एकटा माणूस सकाळी जातो तो रात्रीच येतो, बाईमाणूस असलं की बसतं, बोलतं, गप्पागोष्टी होतात. तुम्ही आधी रहायला या. जागा आवडली तर जो योग्य वाटेल तो किराया द्या, नाही दिला तरी चालेल, आत्ता तुम्ही कुठे राहता?”
“मी रोज रत्नागिरीहून अप-डाऊन करतो.”
“मग आजपासून इथेच रहा.”
“पण, माझी पत्नी बरोबर नाही.”
“ती येणार आहे ना ? मग उगाच कशाला खेपा करता? बबन उद्या कोणीतरी सोबत घे अन सगळ्या खोल्या स्वच्छ करून घे.”

त्यादिवशी पासून यशला सावरीमध्ये निवारा मिळाला. फ्लँट अपेक्षेपेक्षा उत्तम होताच, पण त्यापेक्षा उत्तम घरमालक होते. गोगटे काकूंनी यशची बायको येईपर्यंत सकाळचा चहा, नाश्ता, रात्रीच्या जेवणासाठी त्यांच्याकडेच यायला सांगितलं होतं.
लग्नासाठी सुट्टी घेऊन यश मुंबईला आला. इकडे अनु आणि जेनीने बाकीची तयारी करून ठेवली होती. निघायच्या आदल्या दिवशी जेनी अजयच्या फ्लँटवरंच राहायला आली होती. सकाळी यश लवकर उठून तयार झाला होता, पण बहुतेक जेनीच अजून आवरलं नव्हतं. अनु आणि जेनीचं बेडरूममध्ये काहीतरी चाललं होतं.
“आज्या, अनुला विचार झालं का म्हणून? निघायला उशीर होतोय, प्रवास लांबचा आहे. लवकर निघायला हवं.”
एवढ्यात अनु हॉलमध्ये आली. तिच्या पाठोपाठ आलेल्या जेनीकडे यश पाहतच राहिला. जेनी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने केसांची वेणी घातली होती. कानात डूल, नाकात नथ, कपाळावर टिकली, भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या होत्या. तिच्या केसांतील गज-याचा सुगंध हॉलमध्ये दरवळला. यश जेनीकडे पाहतच राहीला. तिच्या दोन्ही हातांवर मेहंदी होती.
“अनु. तू तर जेनीला पार बदलूनच टाकलसं.” अजय म्हणाला.
“मग? नवीन लग्न झालेली मुलगी आहे ती. आणि त्यात यश प्रधानची बायको आहे. यश प्रधानच्या ऑराला शोभली पाहिजे. काय यश शोभेल ना तुला?”
यशला हे खूपच आँकवर्ड झालं होतं. त्याने लाजून मान खाली घातली.
“ओये पप्पू, dont be shy. यार जेनीने लाजायला पाहिजे तर तूच लाजतोयेस.”
“गप रे आज्या. तुमचं झालं असेल तर आपण निघूया का? उशीर होतोय.” यशने जेनीकडे पाहत विचारलं. जेनीने मान डोलावली.

यशची गाडी कोल्हापूर हायवेला लागली.
“जेनी are you feeling nervous?”
“हो.... म्हणजे actually नाही.”
“तू खूप सुंदर दिसतेस.”
“thanks, अनुने यात खूपच मदत केली.”
दोघेही एकमेकांना फार लाजत होते त्यामुळे सावरी येईपर्यंत विशेष काही बोलणं झालं नाही.
सावरीत येईपर्यंत त्यांना संध्याकाळ झाली होती.
गोगटे काकूंनी त्यांचं जोरदार स्वागत केलं होतं. काकूंनी त्या दोघांना दारातच थांबवलं.
“बाई, दिवेलागणीच्या वेळेला सवाष्णबाईच्या रुपात लक्ष्मी येते म्हणतात.” असं म्हणत त्यांनी दोघांवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. पायावर पाणी घातलं.
“यश प्रवास चांगला झाला ना रे? काही त्रास तर नाही ना झाला? ही तुझी बायको का?” काकांनी विचारलं.
एवढ्यात जेनी पुढे झाली. तिने काकांना वाकून नमस्कार केला.
“अखंड सौभाग्यवती भव. नाव काय बाळा तुझं?”
“जान्हवी. सौ. जान्हवी यश प्रधान.”
यश जेनीकडे पाहतच राहिला.
“व्वा! जान्हवी छान नाव आहे. ‘जान्हवी’ म्हणजे काय माहित आहे का?”
“हो काका. जान्हवी म्हणजे गंगा.”
“बरोबर.....यश तुझी बायको हुशार आहे बरंका.”
जेनीने काकूंना नमस्कार केला. काकूंनी तिला कुंकू लावलं. तिची खणा-नारळाने ओटी भरली.
“नक्षत्रासारखी देखणी मुलगी आहे, बाळा माहेर कुठलं तुझं? घरी कोणकोण असतं तुझ्या?”
“माहेर गिरगावचं. मुंबईचं. घरी आई बाबा, आणि एक लहान भाऊ आहे.”
“वडील काय करतात तुझे?” काकांनी विचारलं.
“बाबा रेल्वेत टीसी होते, आता रिटायर झालेत. आई गृहिणी आहे आणि भावाचं शिक्षण चालू आहे.”
“छान हो. बरं झाली बाई, मला सोबतीण मिळाली. यश आज रात्रीचं जेवण आमच्याकडेच करायचं बरकां. आल्या आल्या जान्हवीला कामाला लाऊ नको. पोरगी नवीन आहे, त्यात इतक्या लांब आणलीस, बिचारी भांबावून गेली असेल.”

गोगटे काका आणि यश बाहेर गप्पा मारत बसले होते. काकूंचा आत स्वयंपाक चालू होता. जेनीही त्यांना मदत करत होती.
“चला. गप्पा खूप झाल्या. चला जेवायला बसा. तुमची जेवणं झाली की आम्हा दोघींना बसता येईल.”
काका आणि यश जेवायला बसले. जेनी काकांना वाढणार एवढ्यात काका म्हणाले,
“जान्हवीबाई, तुम्ही आम्हांला सगळं सांगितलंत पण तुमच्या नवऱ्याचं नाव नाही सांगितलं.”
जेनीला काकांचं बोलणं समजलं नाही. तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने काकूंकडे बघितलं.
“अगं तुला ते उखाणा घ्यायला सांगतायेत, अहो का उगाच मुलीची फिरकी घेता? या काळातल्या मुलीना जमणार आहे का?”
“काकू जमेल मला..घेऊ का?”
“अगो बाई, नाव घेणार म्हणतेस, घे गं घे.”


“श्रीहरींच्या मंदिरात भजन गाते मीरा,
शारदेच्या वीणेतून झंकारती ज्ञानाच्या धारा I
विश्रांती घेतात नारायण, अन लक्ष्मी घाले वारा,
‘यशरावांच्या’ रूपाने मला मिळाला सुखाचा किनारा” II

“व्वा! उत्तम! याला म्हणतात हजरजबाबीपणा! यश भाग्यवान आहेस बाबा, तुझी बायको सुंदर आहे नि हुशारही आहे”.

“का हो? जान्हवीला उखाणा घ्यायला सांगितलात. आणि यशला तसेच मोकळे सोडलेत, यश तुही घे रे उखाणा.”
“काय रे यश? तुला येतो का उखाणा घेता? का आपला पेटंट उखाणा, भाजीत भाजी प्रीतीची हाच घेतोस?”
“बघतो. प्रयत्न करतो.”

“कोकण म्हणजे परशुरामाची भूमी, तिला आहे स्वर्गाचं मोल,
जान्हवीच्या साथीने मी, समुद्रातून शोधून काढेल पेट्रोल.”

त्याच्या उखाण्याने सगळेच हसायला लागले.
“अरे वेड्या, उखाण्यात काही अलंकार, वृत्त, मात्रा, कमीत कमी बायकोची स्तुती काहीतरी टाकायचंस. तुझी आपली मुद्द्याशी गाठ असते....!!!”
“अहो काका, माझं कामच ते आहे. त्यामुळे डोक्यात नेहमी तेच असतं.”
x x x x x