Rang he nave nave - 10 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | रंग हे नवे नवे - भाग-10

Featured Books
Categories
Share

रंग हे नवे नवे - भाग-10

आणि त्याने मैथिली कडे बघितलं. इतक्या वेळ नाही नाही म्हणणारी मैथिली आता विचारात पडली.अरे यार आता नाही गेलं तर ह्याला राग येणार आणि विहान चा राग काढणं म्हणजे खूप कठीण काम, 'चला 10 दिवस तर राहिले कशाला परत रुसवे फुगवे'ती मनातच म्हणाली. 'बर चल!' ती म्हणाली. 'म्हणजे मी रागवल्यावरच तू हो म्हणायचं अस ठरलेलंच आहे का?' 'दोनदा झालं कारण अस तो म्हणाला'.'नाही रे तुला म्हंटल ना की तू रागवल्यावर खूप cute दिसतो ते बघायचं असत मला बस'!मैथिली खट्याळ पणे म्हणाली.'ओहो मैथिली, तू पण शिकली माझ्या सोबत राहून flirting जमलं ना','म्हणजे रागात का होईना मी तुला आवडतो'!बरोबर ना? तो म्हणाला. 'ऐ अस काही ही नाहीआहे', ती म्हणाली. 'म्हणजे नाही आवडत'विहान म्हणाला. 'अरे अस कुठे बोलले मी नाही आवडत!' तुझं आपलं काहीतरीच मैथिली म्हणाली. 'हे बघ मैथिली हा विहान असाच आहे हा आवडतोच सगळ्यांना त्यात तुझा काही दोष नाही मुळात सुंदर गोष्टी आवडतातच सगळ्यांना तसा मी ही आवडतो' विहान बोलत होता. 'चला आता तुझं चालू झाल मला काय वाटत आपण तुझं कौतुक च ऐकायचं तर खाली च ऐकू ना उगाच वर चढून कशाला ऐकायचं मैथिली म्हणाली'.' ऐ तुला ना कारणच पाहिजे आहे वर न यायला!''चल आता मी एक शब्द ही नाही बोलणार'. इतका माझ्या बोलण्याचा त्रास होतो तर!विहान म्हणाला. 'wow चला म्हणजे थोड्यावेळ माझ्या कांनांना आराम मिळेल'. मैथिली त्याच्या कडे पाहून म्हणाली. त्याने फक्त तिच्या कडे पाहून चिडण्याचे एक्सप्रेशन दिले ठरल्याप्रमाणे तो काहीही बोलला नाही. दोघेही जण वर चढायला लागले.मैथिली चढतांना खूप घाबरत होती. तिने नकळत विहान चा हात पकडला आणि ह्या वेळेला तोच तिचा खूप मोठा आधार होता.मैथिली एकटीच बडबड करत होती. त्याला बरंच काही सांगत होती पण तो अजूनही काही बोलत नव्हता 'ऐ विहान तुला बोलतीये ना मी', मग काही तरी रिस्पॉन्स दे ती थोडं चिडूनच म्हणाली. 'नको तुझ्या कानांना आराम करू दे' तो थोडा रागातच म्हणाला. 'अच्छा म्हणजे तुला राग आला तर मी बोलल्याचा मी तर विसरूनही गेले होते',तुला कधी कशाचा राग येईल काही सांगता येत नाही विहान!मैथिली म्हणाली.'वा म्हणजे हे बर आहे तुझं माझा अपमान करायचा आणि वर मलाच म्हणायचं कशाचाही राग येतो'.बाय द वे मी बोलतोच का आहे तुला तो अस म्हणून शांत झाला. मैथिली ला त्याचा चेहरा बघून खर तर हसायला येत होतं,पण तरीही ती कंट्रोल करत म्हणाली. 'ऐ विहान अस काय करतो', बर चुकलं बाबा माझं नाही बोलणार परत तुला काही!'आता तरी बोल', 'करमत नाही रे तू बोलला नाही तर आता खर तर तुझ्या आवाजाची इतकी सवय झाली आहे ना की तू नाही बोलला की काही तरी चुकल्याचुकल्या सारख वाटत' ,मौथिली म्हणाली. 'हो का मग मी गेल्यावर कस होणार तुझं?'तो थोडा गंभीर होऊन म्हणाला. 'विहान सोड ना तो विषय तू का नेहमी नेहमी जाण्याबद्दल च का बोलत असतो?'' मला नाही आवडत please यार नको हा विषय'. मैथिली म्हणाली. किती दिवस टाळणार अस तु, ही गोष्ट तितकीच खरी आहे की तू माझ्या शिवाय राहू शकत नाही. विहान तिला म्हणाला anyway चल !'कारण तू काही accept करणार नाही' तो म्हणाला. मैथिली कडे आता बोलायला काहीही नव्हतं खर तर विहान खरच बोलतोय हे कुठेतरी तिलाही माहिती होत.आणि दोघे पुढे चालायला लागले, चालताचालता मधेच मैथिलीचा पाय घसरला आणि ती पडणार इतक्यात विहान ने तिला पकडलं आधीच घाबरट असणाऱ्या मैथिली अजूनच घाबरली आणि तिने घट्ट डोळे मिटून घेतले.हवेमुळे तिच्या चेहऱ्यावर आलेले केस विहान मागे करत म्हणाला 'ऐ मैथिली काही झालं नाही तुला उघड डोळे,'तिने डोळे उघडले पण ती मात्र जाम घाबरलेली होती.' विहान पडले असते ना मी', बापरे!!'किती भयानक झालं असत इथून खाली गेले असते तर बघ किती उंचावर आहे'! 'अग हो हो शांत हो पडली नाही ना'! आणि अशी बरी पडली असती!तो म्हणाला 'thank godविहान!', तुझा हात पकडलेला होता नाहीतर आज .........! विहान ने तिच्या ओठांवर हात ठेवला 'ऐ वेडी आहेस का?''अस काहीही बोलू नको''आणि माझा एकदा हात पकडला ना की मी सोडत नाही कुठल्याही परिस्थितीत!' तो म्हणाला. मैथिलीला त्याच्या बोलण्याचा रोख कळत होता ती त्याच्या पासून दूर होत म्हणाली चल जायचं ना? 'हो चल',तो म्हणाला. आणि ते दोघेही वर पोहचले. 'बघ मैथिली view',विहान म्हणाला. 'wow यार awesome खरच' वरून किती भारी दिसतंय!मैथिली म्हणाली. 'ते च म्हणत होतो मी, पण तू ऐकायलाच तयार नव्हती'. 'मैथिली हा निसर्ग त्याचे रंग,ह्या छटा किती छान निर्मिती आहे ना!' 'ह्या रंगांमध्ये एकदम रंगून जावं वाटत' विहान बोलत होता आणि मैथिली त्याच्या कडेच पाहत होती. 'काय झालं?'असं काय बघतआहेस!विहान म्हणाला. 'विहान तू खरच मला कधी कधी इंद्रधनू सारखा वाटतो सप्तरंगी!' खरच तुला समजून घ्यायला वेळ द्यावा लागतो!मैथिली म्हणाली. 'बस मैथिली इतक महान नको बनवू मला'. काही सप्तरंगी नाही मी. विहान म्हणाला. तुझ्यातला सच्चा कलाकार अजूनही जिवंत आहे, हे तू नाही तुझ्यातला चित्रकार बोलत होता ऐक माझं परत सुरू कर अर्धवट सोडलेल्या पैंटिंगस मैथिली म्हणाली. 'हम्म तू म्हणते आहेस तर विचार नक्की करेन', तो म्हणाला. मैथिली त्याच्या कडे बघून फक्त हसली त्यानंतर दोघांनी खूप सारे फोटोस, सेल्फी काढल्या. मैथिली च्या नकळत विहान नि तिचे candid काढले. मैथिली मात्र वेगवेगळ्या views ची photography करण्यात व्यस्त होती. तितक्यात तीच लक्ष विहान कडे गेलं , तो एकटाच फोन मध्ये बघून हसत होता खर तर तो मैथिली चे च फोटोज बघत होता. 'ओय काय चाललंय काय तुझं?'कोण आहे फोन मध्ये? 'किती वेळ च बघतीये मी तुला एकटाच हसतोय'. काही नाही ग त्याने फोन पटकन बंद करून खिशात टाकला, 'बोल ना काय म्हणतेय' तो म्हणाला. कोण होती? मैथिली म्हणाली. 'ओह लगेच कोण होती, फीलिंग जेलस मिस मैथिली', 'असतात माझ्या मैत्रिणी आता करतात त्या मला मिस, मग बोलावं लागत तो म्हणाला. 'बर बर नको सांगू मला तरी काय करायचं' आणि आणि 'मी का जेलस फील करू?' 'ते तुलाच माहिती'. 'अग काही नाही तुझ्या पासून काय लपवायच', 'हे बघ मी भारतात आल्यावर माझ्या आईने विडाच उचलला होता की ह्या वेळेस माझं लग्न जमवूनच पाठवणार' मग काय, सुरवात तुझ्या पासून केली पण आपलं बिनसलं! 'मग काय सपाटाच चालू झाला आता आवडली त्यातली एक तिचाच फोटो बघत होतो'. 'तसा माझ्या कडून होकारच आहे आता तिच्या कडून बाकी आहे बस मग झालं'. आणि घरच्यांना तर आधीच आवडली होती.तो म्हणाला. 'खरच विहान seriously' !! खर बोलतोय तू!मैथिली थोडं चिडूनच म्हणाली. 'अग हो खोटं का बोलेन मी''आणि ह्या विषयी तर अजिबात नाही'.आता मात्र मैथिली ला रडूच यायचे बाकी होते. 'मग कशाला आला माझ्या सोबत?'जायचं ना तिच्याच सोबत ! 10 दिवस घालायचे असते तिच्या सोबत उगाच माझा वेळ कशाला वाया घालतोय.मैथिली थोडी चिडूनच म्हणाली.'असतेच ती माझ्या सोबत नेहमीच' आणि आता आयुष्य तिच्या बरोबरच काढायचं आहे मग म्हंटल मैथिली बरोबर काढावे 10 दिवस! '10 नाही' 1 च ,'आता पुढचे 9 दिवस तिला च घेऊन जा बाय मी चालली'. मैथिली जायला निघाली. ऐ..ऐ.. मैथिली थांब, 'तुला माझं चांगलं बघवल जात नाही का ग ?'' म्हणजे मला एखादी मुलगी आवडली मी आता लग्न करणार',तर तू मला अभिनंदन करायचं सोडून रागाने काय निघून जातेय? 'तुला आवडलं नाही का?' विहान म्हणाला. 'अस काही नाही congratulations!' तिने जुजबी उत्तर दिले. 'निघू मी', 'आणि मी नाही येणार उद्या!' मैथिली आतून खूप दुखावल्या गेली होती. आणि ती जायला निघाली.