The Infinite Loop of Love - 9 in Marathi Love Stories by Shubham S Rokade books and stories PDF | The Infinite Loop of Love - 9

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

The Infinite Loop of Love - 9



ते दोघे त्या टाईम पोर्टलकडे निघाले होते . संकेतने ते हे पोर्टल पाहिले होते . पोर्टल चालू करून आत कसे जायचे हे त्याला माहित होते .
" पोर्टल उघडून आपण आत जाऊया , मग कळेलच आपल्याला तो कोण आहे ते....? " संकेत म्हणाला
" ते ठीक आहे , पण तो अगोदरच आला तर.... रवी म्हणाला ...
" टेंशन नको घेऊ , मी अंजलीच्या घरचं रिवॉल्वर आणलंय एमर्जन्सीला...."
काही वेळातच ते त्या जुन्या पुलाजवळ पोहोचले . जुना पूल आडबाजूच्या ठिकाणी होता . फार पूर्वी शहरात येण्याचा तो मुख्य रस्ता होता . पण कालांतराने तो बंद झाला होता . बांधकाम बऱ्यापैकी .
" कुठे आहे रे ते पोर्टल... रवि
" अरे मी पाहिलय, त्याने इथेच कुठेतरी पाय देत पोर्टल उघडलं होतं..... " संकेत इकडेतिकडे जमिनीवरती पाय दाबत म्हणाला . बराच वेळ तो पोर्टल उघडण्याचा प्रयत्न करत होता , पण त्याला न पोर्टल सापडत होतं , न पोर्टल उघडत होतं .
" नसेल रे इथे पोर्टल तू काहीतरी वेगळं पाहिलं असशील.... "
" नाही रे मी पाहिलं होतं....
" सोड रे संकेत , आपण जाऊ या माघारी . प्रीतीच्या जीवाचा प्रश्न आहे ....."
" तेच म्हणतोय मी . प्रितीच्या जीवाचा प्रश्न आहे . तुला काही काळजी आहे का नाही.... पोर्टल शोधणं किती महत्त्वाचं आहे हेही कळत नाही का तुला....? "
" पोर्टल शोधायला हरकत नाही पण ते असायला तरी पाहिजे . मला तर अजूनही तुझ्यावरच कधी कधी शंका येते . जेव्हापासून तुला बोलवले मदतीसाठी , तेव्हापासून तर प्रीतीचा लवकरच मृत्यू होतोय. मला तर वाटतंय तूच मदत करतोयस जो कोणी खुनी आहे त्याला ....
रवीच्या या वाक्याने संकेतच्या तळपायाची आग मस्तकाला गेली . त्याने रवीला जोरात कानाखाली बजावली . आणि त्यांची मारामारी सुरू झाली . ते दोघेही जोराने भांडत होते एकमेकांना मारत होते पडत होते उठत होते पण त्यांच्या भांडणात कोणाचा तरी पाय त्या बटनावरती पडला असावा , कारण त्यांच्य भांडण चालू असतानाच ते पोर्टल उघडले . पोर्टल उघडल्यावर ते दोघे आत गेले . निळसर ज्वाला , गोलाकार. एका बाजूला भूतकाळ तर दुसरीकडे भविष्यकाळ . ते दोघे आत गेले पण तिथेच महेंद्र स्वामीनाथन होता .
" तू मला वाटलंच होतं , तुझा हात आहे या साऱ्या मागे.... " रवी तावातावाने महेंद्राच्या अंगावर धावून गेला . संकेतने आजूबाजूला पाहिले . रवि कुठेच दिसत नव्हता . कोणीतरी महेंद्रच्या अंगावर धावून गेलं होतं . पुढे होत त्याने त्या मनुष्याला महेंद्र पासून सोडून बाजूला केले . पण करताना त्याने तिथे चकाकणाऱ्या काचेत स्वतःचे प्रतिबिंब पाहिलं . तो मोठा झाला होता . त्याचं वय शरीर आवाज सारकाही बदललं होतं .
" तर तुम्ही भूतकाळातले रवी आणि संकेत आहात तर ... महेंद्र स्थिर होत म्हणाला
" आम्ही वेगळा का दिसतोय ...."
संकेत ने विचारले
" म्हणजे " संकेत म्हणाला
" होय , तुम्ही तुमच्या भविष्यात होणाऱ्या शरीरात आहात किंवा तुमचे शरीर भविष्यात असं होणार आहे .....
" अरे संकेत बोलत काय बसलायस , हाच आहे , याला मारलं की टाईम लूप थांबेल...." रवी म्हणाला .
अजून फक्त एकदाच टाईम लूप रिसेट होणार , एकदा का प्रीतीचा ९ वेळा मृत्यू झाले की पुढे लूप रिवाईंड होणार नाही . दहाव्यांदा मृत्यू झाला की तो मृत्यू कायमचा असेल . आणि मी हे करत नाही , सर्वकाही तू स्वतः करतोयस....... महेंद्र रवीला म्हणाला ....
" काहीही काय बोलतोयस , मी का प्रीतीला मारेन... संकेत ऐकून काय घेतोस तु याचं , याला मारल्याशिवाय प्रीतीला वाचवणं शक्य नाही......"
" अरे रवी , तू म्हणजे तू नाही , भविष्यातला तू... भविष्यातल्या रवी प्रीतीला मारायचा प्रयत्न करतोय.....
" भूतकाळ वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ मी तिला कधीच मारू शकत नाही . संकेत तो आपल्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय ...
" मला खोटं बोलून काय मिळणार आहे तुम्हाला खोटं वाटत असल्यास माझ्याकडे पुरावे देखील आहेत ...
असं म्हणत त्याने तेथील एक व्हिडिओ प्ले केला . व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती रवी सारखी दिसत होती . रवी सारखी दिसत होती म्हणण्यापेक्षा तो रवीच होता . पण भविष्यकाळातला .
" ती तेव्हाच मेली असती तर माझ आयुष्य काही वेगळच असतं . मला आता ते बदलायचे आहे . मी भूतकाळात जाऊन इच्छितो . मी तिला त्या वेळेस मारून टाकेन....
" हा एडिटेड व्हिडीओ आहे संकेत....
" होय हा एडिटेड आहे . मीच एडिट केला आहे . यातून फक्त माझा आवाज कापलाय . तुझा आवाज खरा आहे ......
." महेंद्र म्हणजे तू याला मदत केलीस .... संकेत म्हणाला
" होय . I am scientist and I wanted to test my theories and I got the volunteer . Why would I lose such opportunity ....
" तुझ्यामुळे हे सर्व झाले आहे , तू या साऱ्याला कारणीभूत आहे . तू एक मूर्खाला मदत केली जो स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेता दुसऱ्या दोष देतो . त्याला मदत करून तू तुझी हुशारी सिद्ध केली आहेस ...
" माझ्या हुषारीच बोलूच नका , मी जर हुशारी दाखवली नसती तर प्रीती पहिल्यांदाच मृत्यू पावली असती . मी लूप रिवाइंड करण्याची पद्धत अवलंबली नसती तर तुम्हाला काहीच करता आलं नसतं . त्यामुळे मला रागावण्या ऐवजी माझे आभार माना... I gave you chance to save her .....

" तू मूर्ख आहेस का तूच तर पहिल्यांदा तिला मारणासाठी मदत केली...
" Science needs sacrifice . या छोट्याशा एक्सपिरिमेंट मधून मी बरंच काही शिकलो आहे . Time loop , realities , alternative time line , functioning of brain in different realities , memories ...
तो बराच वेळ अशा काही गोष्टी बडबडत होता ...
तुम्हाला काय सांगतो हे सगळं ...? मी केलेल्या छोट्याशा प्रयोगामुळे संपूर्ण मानव जातीला किती मोठा फायदा होणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही...
" पण आमच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार तुला कोणी दिला.....
" तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का ...? भरपूर झाली तुमची प्रश्नोत्तरे . आता तुम्हाला बाहेर काढायलाच पाहिजे.....
तो त्याच्या डेस्ककडे वळला . तेव्हाच रवीने त्याच्यावरती झडप मारली . दोघांनी मिळून त्याला खुर्ची वरती बांधलं .
" आम्हाला सांग हे थांबवायचं कसं ....? रवी म्हणाला
" जोपर्यंत दोघातील एक मरत नाही , किंवा असे म्हटले तरी चालेल जोपर्यंत प्रीतीला रवी मारत नाही तोपर्यंत हे थांबनार नाही . अजून फक्त दोन वेळा लूप रिवाइंड होईल . दहाव्या वेळा तर ती मेली तर ती कायमसाठीच....
महेंद्र विकृतपणे हसत बोलला
" संकेत तुला माहितीये , मी प्रीतीला कधी मारणार नाही . I love her , you know that right .
" तू नाही रे करणार , ते मलाही माहीत आहे .पण भविष्यातल्या तू , त्याला कोण अडवणार . त्यामुळे तर प्रत्येक वेळी त्याला आपला ठिकाणा माहीत होता . तुला जे माहित आहे , ते त्यालाही माहित आहे . तू जे पाहतो ऐकतो , ते त्याच्या आठवणीत जमा होतं . ....
" अरे संकेत हुशार आहे तू , पण तुला हे कळले नाही कि प्रीती तुला का सोडून गेली ...? तिने रवीची निवड का केली , तुला नाकारून ....? हा प्रश्न अजूनही तुला छळतो ना ...? " महेंद्र त्याला खुनशीपणे हसत विचारत होता.
संकेत ने त्याला जोरात बुक्की मारली . त्याच्या तोंडून रक्त आले . तो बोलला
" होय ना रवी . तुला माहित आहे ना सारे... प्रीतीला संकेतचा राग का आला... तू सांगितलं नाहीस का संकेतला खरे कारण .....
" संकेत त्याचं काही ऐकू नकोस , तो आपल्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करतोय ... रवी म्हणाला
" मी , मी प्रयत्न करतोय फूट पाडायचा . तुझं काम आहे ते . माझं नाही. आठव संकेत . प्रीती आणि तुझं कधी भांडण झालं होतं का....? तुमच्या आयुष्यात रवी येईपर्यंत ...
रवी नेही त्याला जोरात बुक्की मारली
" संकेत त्याचा ऐकू नकोस ...
" आणखी एक गोष्ट त्या भांडणाचा तुला कधी संदर्भ लागला का ...? ती काय बोलत होती ...? का रागला गेली होती हे तुला कळलं का ....? नाही ना....! तू तेच ऐकत होतास आणि समजत होतास जे रवी तुला सांगत होता . रवीला विचार ना, त्याने तुझ्याशी मैत्री का केली ...? त्याला प्रीती हवी होती . तुझा वापर करून तुमच्या दोघात फूट पाडून त्याने प्रीतीला मिळवलं.....
" रवी काय बोलतोय हा....!
" तो खोटं बोलतोय संकेत , तू त्याचं ऐकू नकोस ...."
रवी म्हणाला . तो घाबरला होता . संकेत त्याच्या अंगावरती धावून येत होता . तेव्हाच तिकडे भविष्यातल्या रवीने पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या प्रीतीला मारले आणि आणि लूप पुन्हा एकदा रिवाइंड झाला ....