Bandini - 9 in Marathi Fiction Stories by प्रीत books and stories PDF | बंदिनी.. - 9

Featured Books
Categories
Share

बंदिनी.. - 9

...... मी कशीबशी त्याला बोलले.. "आलेच"... आणि पळतच वॉशरूम मध्ये गेले...

डोळे पाण्याने डबडबले होते.... बेसिन समोरच्या आरशात स्वतःला बघितलं.... मला माझ्याच डोळ्यांमध्ये अजूनही अनय दिसत होता.. मी स्वतःला बजावलं... अज्जिबात रडायचं नाही.. माझं एक मन स्वतःला समजावत होतं.. दोघेही तुझे close friends ch आहेत ना.. Then be happy for them!🙂... तर दुसरं मन म्हणत होतं... हो आहेत ना... Close friends आहेत.. म्हणूनच दोघांनीही क्षणात परकं केलं.. 😩 एकदाही मला विश्वासात घेऊन सांगावसं वाटलं नाही त्यांना.. 'तन्वी, तुझ्यासाठी तर मी स्वतःच माझं प्रेम कुर्बान करायचा विचार करत होते... पण तू माझ्यापासून सर्वच लपवून ठेवलंस...' , :सोड.. मीरे.. शांत हो..' मी स्वतःचीच समजूत काढत होते.. मी डोळे पुसले.. केस ठीकठाक केले आणि बाहेर आले.. मी माझ्या केबिन कडे जात होते.. तितक्यात main room मधून परेश बाहेर आला... माझ्याकडे बघून म्हणाला..." क्या हुआ? एनी प्रॉब्लेम? "
" काही नाही "... मी एवढंच म्हणाले..

झालेल्या प्रकारानंतरही परेश च माझ्या केबिन मध्ये येणं जाणं चालूच होतं.. हां पण पहिल्या सारखा माझी मस्ती करायचा नाही.. पण रोज येऊन निदान माझी विचारपूस तरी करून जायचा... मी ही तेवढ्यास तेवढंच वागायचे त्याच्यासोबत... आत्ताही मला असं बघून तो माझ्या रडण्याचं कारण विचारत होता.. आम्ही बोलत बोलत माझ्या केबिन मध्ये आलो... अनय अजून तिथेच बसला होता.. परेश ने त्याला बघून गृहीतच धरलं की माझ्या रडण्याला अनयच कारणीभूत आहे.... त्याच्या नजरेतूनच मला ते कळालं.. पण मी काहीच बोलले नाही... अनय उठला आणि काहीही न बोलता निघून गेला... मी त्याच्याकडे बघतच राहिले... 'असा काय हा! मूडी आहे नुसता.. जाऊ दे.. तन्वी सांभाळेल आता त्याचे moods..' मी स्वतःशीच म्हणाले.. परत एकदा काचेतून त्याला जाताना बघितलं आणि जोराचा हुंदका दाटून आला.. मी ड्रेस च्या ओढणीचा बोळा तोंडात कोंबत chair वर बसले ... परेश पटकन माझ्या chair जवळ आला आणि माझ्या समोर गुडघ्यावर बसला.. मी मान खाली घालून मुकाश्रु ढाळत होते... मला असं रडताना बघून परेश कावराबावरा झाला.. "परी.. क्या हुआ.. ऐसे क्यू रो रही है?प्लीज टेल मी.."

"परेश प्लीज तू जा इथून मला एकटीला राहू दे.." - मी रडत रडतच बोलले..

"नाही परी तुला असं सोडून नाही जाणार मी.. मी नाही बघू शकत तुला असं.. सांग मला काय झालंय ते"

"हे बघ परेश मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम आहे पण मी नाही प्रेम करत रे तुझ्यावर😩 मला माफ कर.. मी..... "

" अनय वर प्रेम करतेस.. हो ना?" - परेश

मी मान वर करून त्याच्याकडे बघितलं फक्त....

" मी बघितलंय तुझ्या डोळ्यात ते.. म्हणून तर त्या दिवशी जे झालं त्यानंतर मी तुझ्या जास्त जवळ यायचा प्रयत्न केला नाही.. पण मग तू रडतेयस का.. जा सांग त्याला.. की मी सांगू? "

"नाही... प्लीज... तू हे कोणाजवळही बोलणार नाहियेस.. तुला माझी शप्पथ आहे.." - मी

"पण का? ".. तो संभ्रमात पडला.. कारण त्याच्यामते अनय माझ्यावर प्रेम करत होता...जसं त्याने मला मागे सांगितलं होतं.. पण खरं काय आहे याची त्याला काही कल्पना नव्हती..

"ते नको विचारू प्लीज.. वेळ आली की कदाचित ते तुला कळेल किंवा कदाचित नाहीच कळणार... पण आत्ता या क्षणी तरी मी तुला नाही सांगू शकत" - मी

"ठीक आहे.. जशी तुझी इच्छा...पण डोळे पुस आणि जेवून घे आता.. इट्स lunch time now..मी finance department ला जाऊन येतो.. थोडं काम आहे.. "

मी फक्त हो म्हणाले.. पण आता जेवायची अजिबात इच्छा नव्हती... 😔 कसातरी दिवस घालवला... त्यादिवशी मी अजिबात main room मध्ये गेले नाही.. अनय चा सामना करायची हिम्मत माझ्यात नव्हती...

तन्वी सोबत मी नॉर्मल च वागत बोलत होते..खरं म्हणजे मी वर वर नॉर्मल असल्याचं भासवत असले तरी तिच्याशी बोलणंही मी शक्यतो टाळत होते... घरी जाताना बस मध्ये ही मी तिला टाळण्यासाठी कानात earphone अडकवून बसले.. आणि fm चालू केला... बाहेर धो-धो पाऊस पडत होता.. तसही पाऊस आणि प्रेम यांच अगदी घट्ट नातं आहे.. त्यामुळे पाऊस पडत असला की मला नेहमीच अनय ची आठवण यायची... आत्ताही येतच होती.. मी डोळे बंद केले अन सीट वर मागे मान टेकवून बसले.. एखाद्याला वाटलं असतं की डोळे मिटून किती शांत पडलेय मी.. पण वरुन शांत भासणाऱ्या माझ्या देहात जो ज्वालामुखी उचंबळत होता त्याची तीव्रता मलाच जाणवत होती.. 😖 एव्हाना त्या RJ ला पण कळाली होतं बहुतेक माझी situation.. तो पण एकावर एक sad songs प्ले करून माझ्यातल्या त्या ज्वालामुखी ला आव्हानच देत होता जणू...!! तितक्यात तो RJ स्वतःच्या स्टाइल मध्ये म्हणाला.. 'और अगला गाना dedicate किया है रोशनी ने निहाल के लिये जीनका आज ही ब्रेक अप हुआ है... So sad.. तो चलिये दोस्तों.. सुनते है अगला गाना....'

ते गाणं ऐकून मला तर क्षणभर वाटलं की रोशनी ने त्या निहाल ला नाही तर मलाच ते गाणं dedicate केलंय... 😒😑.. गाणं वाजत होतं...

पिया... प्यार ये.. क्यूँ किया.. क्यूँ किया..
चाहा तुझे.. माँगा तुझे.. छू के तुझे एक बार..
पाया तो साया था तेरा.. अब नही ऐतबार...

मैं तो शायर नही..
फिर भी सोचूँ यूं ही...
तुने दिये है जो आँसू..
है वही शायरी...
पहले प्यार का वादा है.. तुम बिन जीवन आधा है..
आयेगा चल के तू खुद ही... सून के मेरी पुकार...

तशाही स्थितीत मी स्वतःशीच हसले...म्हणाले.. नाही येणार तो परत! त्याला त्याचं प्रेम मिळालंय..!!

To be continued..
🙏
#प्रीत