सकाळच्या कोवळ्या किरणांनी माझी झोपमोड केली... खरतर उठायची बिलकुल इच्छा नसताना मी किलकिले डोळे करून घडाळ्यात पाहिलं आणि ताडकन उठले... कारण सकाळचे दहा वाजता होते. पळत फ्रेश व्हायला गेले. तय्यार होऊन खाली आले तर आई- बाबा डायनिंग टेबलवर गप्पा मारत नाश्ता करत होते.. "अग आई..., मला उठवलं का नाहीस..?? दहा वाजून गेलेत उशीर होईल मला जायला..." मी ओरडतच खुर्चीवर बसले. माझ्या अशा बोलण्याकडे दोघेही आश्चर्याने माझ्याकडे बघत होते... आणि अचानक हसायला लागले.. मी जरा चिडूनच विचारलं, "काय झालं..??".... "मग काय हसु नको तर काय करू.. संडे आहे आज म्हणुन तुला उठवलं नाही.." आईच्या या वाक्यावर मी मोबाईलमध्ये पाहिलं.. आज खरचं रविवार होता. मी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला आणि नाश्ता करत बसले.
नाश्ता करून स्वतःच्या रूममधे गेले आणि साधे कपडे घातले. थोडा अभ्यास करू म्हणून बुक काढून बसले खर.., पण राहून राहून डोक्यात प्रश्न येत होते. टेबलवर पसारा तसाच ठेवून बेडवर पडले मोबाईलवर टाईमपास करत.. तोच बघता बघता गॅलरीमध्ये फोटो बघत बसले... तो ग्रुप मधला फोटो ज्यात मी आणि निशांत एकमेकांकडे बघत होतो... तो फोटो बघुन नकळत माझ्या चेहऱ्यावर छान हसु उमटलं. त्यांनतर बीच वरील माझे आणि निशांतच्या सेल्फी.. आणि तो एक फोटो समोर आला ज्यात मी कॅमेरामध्ये आणि तो माझ्याकडे बघत होता... "छान वाटत नाही कोणी आपल्याकडे अस बघत तेव्हा."...
"खडूस.., कसा वागतोस रे माझ्याशी.. आपल्यातली मैत्री ही कमी झाली का रे..?? जे तु स्वतःहून मॅसेज ही करून विचारू नये.., मी ठीक आहे का..?? का मी बोलत नाहीत तुझ्याशी..." त्या फोटोशी बोलता बोलता माझा कंठ दाटुन आला.... आणि दुःखाचे ढग वाहू लागले. हे सर्व चालु असता कोणी तरी माझ्या रूमचं दरवाजा वाजवला.. मी लगेच गालावरील अश्रु पुसून दरवाजा उघडला.. आणि बघतच राहिले..... समोर निशांत होता.
"हॅलो.., हनी बी." तो एक मोठी स्माईल देत बोलला. "आता दरवाजा मधेच उभा राहू का की, आता ही येऊ..??" मी काही न बोलता आत आले. मागून निशांत ही आत आला. "काय मॅडम कशा आहात...?" निशांत बेडवर बसत बोलला.. "ठीक आहे.." मी चेहऱ्यावर कशी तरी स्माईल देत बोलले. "मस्त झाली नाही पिकनिक..?"... यावर मी मानेनेच होकार दिला.. "ती हर्षु देखील चांगली मुलगी आहे.. म्हणजे वाटली होती तेवढी ही बोरिंग नाहीये." त्याच्या या वाक्यावर मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं.. "वाह...!! हर्षल वरून हर्षु.., चांगली प्रगती आहे." मी स्वतःच्या मनात पटपुटले. "अग उभी का आहेस बस बस.. तुझचं घर आहे." आणि निशांत हसु लागला. पण त्याच्या या जोकवर मला काही हसु आले नाही.
"काही काम होत का तुझं निशांत..??" मी सरळ त्याला प्रश्न केला. "अच्छा म्हणजे आता काम असेल तरच यायच का मी इथे...?? अस असेल तर निघतो बाबा मी.." "तस नाही आज संडे आहे तर मला वाटलं हर्षुला भेटायला गेला असशील.." मी अस बोलताच तो उठला आणि माझ्याजवळ आला.. "मी का जाईल तिला भेटायला.??" "तुमचं बोलणं राहील असेल ना..! म्हणून विचारल." मी निर्विकार चेहऱ्याने पाहत आपलं वाक्य पूर्ण केलं आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. संडे असल्याने समोरच्या गार्डनमध्ये छोटी मुलं खेळत होती. एखाद्या फुलपाखरांसारखी बागडत होती. हे बघुन मला छान वाटलं.
मागुन निशांत ही आला. "काय झालं आहे...?" त्याने समोर बघत विचारल. "काही नाही." मी पण समोर बघून उत्तर दिल.. "तु पिकनिक वरून आल्यापासून नीट बोलत नाही आहे. खरतर तु बोलणंच टाकलं आहेस माझ्याशी." त्याने माझ्याकडे बघून वाक्य पूर्ण केलं आणि माझ्या उत्तराची वाट बघत माझ्याकडे बघत बसला. खुप वेळ असाच बघत होता म्हणुन मीच बोलली..., "असा काय बघतो आहेस..?" "मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय." तो माझ्या डोळ्यात बघून बोलला. "मी सांगितलं ना, काही नाही.. असाच जरा थकले आहे सो...," आणि मी जाऊ लागले. तोच त्याने माझा हात पकडला आणि मला थांबवलं. "हनी-बी.. सांगणार नाहीस तर कळणार कस मला की, तुला काय झालंय.." मी माझा हात त्याच्या हातातुन सोडवून बेडवर जाऊन बसले.
तो ही आला आणि माझ्या समोर बसला. "मी पर्वापासून बघतोय तु नीट बोलत नाही आहेस माझ्याशी. माझं काही चुकलं का..??" त्याने विचारल. "नाही रे तुझं काही नाही चुकलं.. बस कधी कधी आयुष्यात अस होत. पण तू छान निवड केली आहेस तुझ्यासाठी." मी एक स्माईल देऊन बोलले. "एक मिनिटं काय बोललीस तु...!! मी कोणाची निवड केली." त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं.
"हेच की तू हर्षुला आपल्या डान्सनंतर प्रपोज करणार आहेस." मी चेहऱ्यावर कशी बशी स्माईल आणुन बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्या या वाक्यावर मात्र तो खो-खो हसत सुटला. "काय..! मला काय भटका कुत्रा चावला आहे का की, जो मी त्या हर्षलला पूर्ण आयुष्य झेलु." आणि परत हसायला लागला....."म्हणजे..? तु तिला प्रपोज नाही करणार आहेस.??" मी आता पूर्णपणे गोंधळून विचारल.
"मी कधी अस म्हटलं की, मला ती हर्षल आवडते." "तुच तर गावी बोललास ना तिच्याकडे बघुन आणि नंतर तुझ तिच्यासोबतच गप्पा मारन. आणि हो ते काय होत हॉटेलमधून बाहेर पडताना तिने तुझा हात ही धरला होता." मी हे सगळं एकदाच सांगून टाकल. "बापरे..! तु तर माझ्यावर नजर ठेवुनचं होतीस की, काय..?" त्याने लगेच आपले डोळे मोठे करत विचारलं. यावर मी माझी बत्तीसी दाखवत हसले.
निशांतने तर स्वतःच्या डोक्यावर हातच मारला. "काय बोलु यावर मी..? थोडा बोललो काय तुला तर भलतच वाटलं. नशीब अजून काही दिवस आपण राहिलो नाहीत नाही तर लग्नचं लावुन दिल असतस माझं." आणि हसु लागला. "सॉरी..." मी ओशासळतच त्याची माफी मागितली. माझ्या डोक्यावर टपली मारून तो बोलायला लागला..., "मी जिला प्रपोज करणार आहे ती हर्षल नाहीये. हर्षल माझी फक्त एक मैत्रीण आहे. मला कोणी दुसरीच आवडते आहे. आता कोण हे नको विचारुस.. ते तुलाही कळेलच डान्सच्या दिवशी." तो हसुन बोलला. त्याच्या बोलण्याने मात्र मी चांगलेच सुखावले. आणि नकळत माझ्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल ही आली.
"पण तु जेलस तर नाही ना झालीस.. म्हणजे तु एवढी नजर वैगेरे ठेवलीस म्हणून विचारलं..." त्याने एक डोळा मारत विचारल....."मी का जेलस होऊ...?? अस काही नाहीये." मी लगेच त्याला सांगून टाकल. त्याने ही हसुन सोडून दिलं.
"खर तर आज मी इकडे तुला बाहेर घेऊन जायला आलो होतो. पण वाटत आता मला हर्षलाच न्यावं लागेल." मला चिडवण्यासाठी निशांत बोलत होता. मी लगेच त्याच्या पाठीत धपाटा घातला. "चल जा बाहेर मी लगेच तय्यार होऊन येते." मी स्माईल देत त्याला बाहेर पाठवलं. तो ही स्वतःच्या पाठीला हात लावत बाहेर गेला. जस काय खूपच लागलं असावं. " किती ती नाटकं...,नौटंकी कुठचा." स्वतःशीच हसत मी तय्यार व्हायला गेले.
छान असा रेड टॉप आणि ब्लॅक जीन्स घालायची ठरवली. कानात सिल्वर मोठे असे हुक्स, हाय पोनीटेल. न्यूड कलरची लिपस्टिक आणि आयलाईनर. आवडत परफ्यूम मारून मी बाहेर जायला तय्यार झाले. एक स्लिंग बॅग घेतली आणि बाहेर आले. बाहेर निशांत बाबांसोबत गप्पा मारत बसला होता. मी जाताच त्याची नजर माझ्यावर गेली आणि तो बघतच राहिला....
समोर बाबा काय बोलत होते ते ही त्याला कळत नसेल एवढा तो मला बघण्यात गुंग झाला होता. मी समोर आली तशी बाबांनी त्याच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजवली.... "अरे निशांत.... काय लक्ष कुठेय..??" "काही नाही बाबा..., बोला ना.. काय बोलत होता तुम्ही..?" "काही नाही चला जावा तुम्ही दोघे बाहेर..." बाबा ही आता हसत होते.., कारण त्याच लक्ष अजून ही त्यांच्या बोलण्याकडे नव्हतं.
मी जाऊन गप्प शूज घातले.., तो ही पट्कन आला आणि आम्ही बाहेर पडलो.. पाठुन बाबांचा हसण्याचा आवाज मात्र चांगलाच वाढला होता सोबत आईचा ही. हे ऐकून मी ही हसु लागली.. आम्ही लिफ्टमधुन खाली येताना मी सहज म्हणून त्याला विचारलं... "एवढं काय बघत होतास..? जास्त झालं का..?" आणि मी लिपस्टिक पुसनारच होते की, त्याने माझा हात पकडला.. "मॅडम लिपस्टिक नका पुसू..., तो हक्क तुमचा नाही.." या वाक्यावर मी जरा लाजतच त्याला प्रश्न केला... "म्हणजे...?" "अरे, म्हणजे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला दे अस बोलायच होत." स्वतःची जीभ चावत निशांत बोलला. मी ही जरा लाजले. खाली येऊन निशांतने स्वतःची बाईक काढली आणि आम्ही फिरायला निघालो.
"कुठे जायचे आहे.??" मी विचारलं असता त्याने काही ही उत्तर दिलं नाही. कदाचित त्याच आधीच ठरलं असेल., म्हणून मी देखील गप्पपणे बसून होते. थोड्यावेळाने आम्ही एका कॅफेमध्ये पोहोचलो. छान होता तो कॅफे. "कॅफे-सनशाईन" आम्ही पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजत होते. तो कॅफे दूर होता.. पण गर्दी मात्र चांगलीच होती. आम्ही आत जाताच त्याने वेटरला सांगितलं. कदाचित निशांतने आधीच टेबल बुक केलं असावं. आम्हीवर जायला निघालो...
वर जाताच मी ती जागा न्याहाळत बसले. समोर ओपन गॅलरी असावी तशी होती. काही कपल एकमेकांशी बोलत बसले होते. छान वार सुटलं होतं. आणि समोर होता तो अस्ताला जाणार सूर्य.. म्हणूनच की काय त्या कॅफेच नाव असेल.., "कॅफे सनशाईन". आम्ही जाऊन एका टेबलवर बसलो.... "मग मॅडम काय काय खाणार..??" निशांतने मेनुकार्ड माझ्याकडे सरकवत विचारल. मी ते ओपन केलं आणि शोधु लागले. पण मला काहीच कळत नव्हतं.., शेवटी कंटाळुन मी निशांतकडे पाहिलं..तो माझ्याचकडे बघत होता..
"काय झालं..? असा का बघत बाहेस..?" मी माझी एक भुवई वर करत विचारलं. "काही नाही.., आज एक मुलगी जरा जास्तच गोड दिसते आहे ना म्हणून बघतोय तिला." त्यानेही लगेच एक स्माईल देत बघणं सुरूच ठेवल. मी मेनुकार्ड माझ्या चेहऱ्यावर धरत जरा लाजलेच.. "गप्प हा निशांत.. काही असत तुझं.."
"मला काही सुचत नाहीये तूच मागव काही तरी चांगल." मी कंटाळुन मेनुकार्ड निशांतकडे दिल...... "ओके मॅडम, मीच मागवतो." अस बोलून त्याने एका वेटरला ऑर्डर दिली.... "तुला म्हाहित आहे या कॅफेमध्ये खुप गर्दी असते.. ऍडव्हान्स बुकिंग करावी लागते तेव्हा जाऊन कुठे तुला इथे जागा मिळेल." मी आश्चर्याने पाहिलं..."का..? येवढ काय खास आहे इथे.., नॉर्मल कॅफेसारखा तर कॅफे आहे हा."
"हो नॉर्मल कॅफेसारखाच आहे." पण संध्याकाळचा सूर्यास्त सुंदर असतो. आणि रात्री चंद्र आणि चांदण्यांच्या खाली मस्त डिनर ही आपण करू शकतो. अजून एक म्हणजे इथे जे फ्रेंड्स म्हणुन येतात ना ते पुढे जाऊन जीवनसाथी ही होऊ शकतात जर त्यांच्या मनात असेल तर अस म्हटलं जातं.
जेव्हा कधी पौर्णिमा किव्हा चंद्र ग्रहण असते ना तेव्हा तर इथे येऊन आपण ते बघू ही शकतो. मोठा चंद्र असतो म्हणे.. माझा फ्रिएन्ड बोलला. म्हणून तुला घेऊन आलो. तुला आवडत ना निसर्ग. म्हटलं काही तरी वेगळं करू. मग आवडलं की नाही मॅडम तुम्हाला.." त्याने डोळा मारत विचारलं. मी देखील लगेच स्वतःची मान डोलवत स्माईल दिली. तेवढ्यात वेटर आमची ऑर्डर घेऊन आला.
"हनी-बी इथली कोल्ड कॉफी खुप छान असते. म्हणून आपल्या दोघांसाठी मी ती मागवली आहे." त्याने माझ्यासमोर असलेल्या कपकडे बोट करून दाखवलं. "तुला बरी एवढी म्हाहिती..?? खर सांग कोणत्या मुलीसोबत आला होतास..? त्याच मुलीसोबत ना..? जिला प्रपोज करणार आहेस..." मी चिडवतच विचारल.
"नाही ग, मी पहिल्यांदाच आलो आहे. जिच्यासोबत आयुष्य घालवायचा आहे ती समोर तर बसली आहे.." त्याच्या या वाक्यावर मी लगेच माझं डोळे मोठे केले...
"काय बोललास तु..?? कळलं नाही..??" "अग म्हणजे त्या मुलीसोबत येईन नंतर तिला प्रपोज केलं की., अस बोलायच होत मला" त्याने स्वतःच वाक्य बदललं होत. आम्ही ती कोल्ड कॉफी पिट बसलो. निशांत बोलला तशीच छान होती कॉल्डकॉफी. समोर सूर्याची तांबुस-लाल किरण आभाळात चौफेर पसरली होती. आकाशातून पक्षांचे थवे परतीच्या प्रवासाला निघाले होते..त्यांची ही घरी कोणी तरी वाट बघत असावेत..
त्या सुंदर क्षणाला आम्ही मन भरून बघत होतो. थोड्यावेळाने सूर्य ही निघून गेला आणि सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं. पण त्यावर मात करत होते ते त्या गच्चीत लावलेले लाईट्स. समोर साथ देत होता तो चंद्र. त्या चंद्राला बघुन आठवण येते ती त्या दिवसाची... चंद्र आणि निशांत.
तोच निशांतच्या घसा ठीक करण्याच्या आवाजाने मी भानावर आले. "अजून काही मागवू का..??" मी मानेनेच नकार दिला. "चला मग निघुया का..?"
त्याने बिल मागवला असता एका वेटर ने बिल आणून दिलं सोबत एक प्लेट ही, त्यात फॉरच्युन कुकीज होत्या.. "अहो तुम्ही चुकीच्या टेबलवर ऑर्डर दिलीत." निशांतने लगेच त्या वेटरला हाक मारून सांगितलं.
" नाही सर.., आमच्या कॅफेचा रूल आहे की, जेव्हा आम्ही काही नवीन पदार्थ बनवतो. तो आम्ही त्या दिवशीच्या आमच्या सर्व कस्टमरला टेस्ट करण्यासाठी देतो. आज आम्ही नवीन पदार्थ सुरू केला आहे. या फॉरच्युन कुकीज आहेत. त्याच्या आतमध्ये एक नोट असते तुमच्या भविष्यात काय होईल याची. जस्ट फॉर फन..." एवढं बोलून तो वेटर हसत निघून गेला.
निशांतने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि एकदा समोरच्या प्लेटमध्ये. त्यात दोन कूकीज होत्या. त्यातली एक त्याने घेतली आणि एक मला दिली. त्याने ओपन केलेल्या कूकीज मध्ये नोट होती की, "टेक केअर ऑफ युअर लव्ह वन." आणि माझ्या कूकीज मध्ये नोट होती की, "यु मेट युअर सोल्मेट इन फ्यु डेज" आम्ही एकमेकांना त्या दाखवल्या आणि मस्तीसाठी असेल म्हणुन जास्त लक्ष न देता बिल करून निघालो.
बाईक वरून जाताना रात्रीचे आठ वाजले होते.., वातावरण चांगलंच थंड झालं असल्याने मला मात्र चांगलीच थंडी वाजत होती. अचानक निशांतने बाईक बाजूला घेतली... "काय झालं निशांत, बाईक का बाजूला घेतलीस.???" मी खाली उतरत विचारल. "हनी-बी थंडी लागतेय ना तुला.??? एक काम कर हा घे माझा रुमाल तुझ्या कानांवर बांध म्हणजे जरा कमी थंडी वाजेल." एवढं बोलून त्याने माझ्या हातात त्याचा रुमाल दिला.
पण मी बांधत नाहीये बघून त्याने सरळ तो माझ्या डोक्यावरून घेऊन हनुवतीच्या खाली जराशी घट्ट अशी गाठ बांधली. माझं झालेलं बुजगावणे बघून नकळत त्याच्या तोंडातुन..,"क्युट" हा शब्द बाहेर आला. त्याच्या नकळत आलेल्या शब्दाने माझ्या चेहरा मात्र गुलाबी झालेला. तो लपवतच मी त्याला निघायला सांगितलं.. "चला चला उशीर होईल..., उद्या कॉलेज आहे.." हे ऐकताच त्यानेही लगेच बाईक स्टार्ट केली. त्या शांत वातावरणात माझ्या कानात फक्त त्याच ते "क्युट" काय ते ऐकू येत होतं. आणि होती ती चेहऱ्यावर हॅपी स्माईल.
काही वेळाने आम्ही माझ्या बिल्डिंगच्या खाली पाहोचलो. मी लगेच निशांतचा रुमाल काढुन त्याला दिला. " हा घे तुझा रुमाल... थँक्स आजच्या दिवसा बद्दल. मस्त गेला माझा दिवस.." मी मनापासून त्याचे आभार मानत होते. एवढ्या छान ठिकाणी तो आज मला घेऊन जो गेला होता.... "येतोस वर..??" "आता नाही ग.., चल निघतो.." "बर, घरी पोहोचल्यावर मॅसेज कर मला." मी त्याला सूचना देत होती. त्याने ही लगेच.., "येस टीचर बोलत" निघु लागला. निशांतची बाईक जाईपर्यंत मी त्यालाच बघत होते. गाणं गुणगुणत मी लिफ्टने घरी पोहोचले. "कशी झाली डेट..." बाबा मस्करीत बोलते झाले... "बाबा काही ही हा तुमचं..., आम्ही काही डेट वर नव्हतो गेलो असच गेलो होतो फिरायला."
"कॅफे सनशाईनला गेलेलात ना..??" त्यांच्या या वाक्यावर मी लगेच अवाक होऊन त्यांच्याकडे पाहिलं.. "बाबा तुम्हाला कस म्हाहित की, आम्ही कुठे गेलो होतो ते.???" "परी बाळा मीच तर त्याला सांगितलं होतं ते लोकेशन.." बाबा हसत बोलत होते. "बाळा एक सांगु का..??
तुला तर म्हाहितीच आहे की माझं आणि तुझ्या आईच लव्ह मॅरिज आहे ते..,तुझा ही कोणी बॉयफ्रेंड असेल तर मला किव्हा तुझ्या आई ला तु सांगू शकतेस. तेवढे तर आम्ही तुझ्यासोबत फ्री आहोतच.." "बाबा माझा कोणी बॉयफ्रेंड नाहीये.." मी बाबांच्या बाजूला बसत त्यांना सांगितलं.
"बाळा आता नाहीये..,पण पुढे झाला तर घरी आमच्या दोघांमध्ये एकाला नक्की सांग. काय आहे ना बाळा आजकालच जग खुप वेगळं आहे. प्रेम आधी सारखं राहील नाहीये. काही जण फक्त शारीरिक संबंधासाठी नात बनवायला बघतात.. म्हणून तुला सांगतो."
"माझं तुझ्या आईवर खुप प्रेम होतं. तुला म्हाहित आहे का तुझे आजोबा तय्यार नव्हते आधी.., पण जेव्हा मी त्यांना प्रूव्ह करून दाखवलं ना तेव्हा कुठे त्यांनी आमच्या लग्नाला संमती दिली. आणि हो जेव्हा मी मला तुझ्या आईसाठी फिलिंग होत्या ना तेव्हा मी तिला घेऊन त्याच कॅफेमध्ये गेलो होतो. आणि आता बघ आम्ही एकत्र आहोत... बाबांनी शेवटचं वाक्य आईकडे बघुन पूर्ण केलं.
मला ही छान वाटलं हे ऐकून. "बाबा मला पुढे जाऊन कधी कोणताही मुलगा आवडला तर आधी मी तुम्हाला सांगेल.." येवढ बोलून मी बाबांना मिठी मारली. मागून आई येऊन तिनेही आम्हाला दोघांच्या मिठीला अजून घट्ट केल.
मग मी माझ्या रूममधे गेले. फ्रेश होत मोबाईल बघितला तर राजचे पाच मिस कॉल दाखवत होते... मी लगेच त्याला कॉल बँक केला.. "हॅलो.., राज कॉल केला होतास का.??" अरे जरा कामात होते म्हणून बघितलाच नाही मी. सॉरी हा." मी पट्कन माझं वाक्य पूर्ण केलं. थोड्यावेळाने तिकडून आवाज आला..., "हॅलो.. इट्स ओके प्रांजल." आणि खोकण्याचा आवाज आला.... "राज तु ठीक आहेस ना.?? तुझी तब्बेत ठिक वाटत नाहीये.?? काय झालंय तुला.??" मी जरा टेंशनमधेच विचारल. "अग जास्त काही नाही.., थोडा ताप आणि खोकला आहे. होईल ठीक उद्यापर्यंत. डॉक्टर येऊन गेलेत. सहज म्हणून कॉल केला होता पण वाटत तु जास्तच महत्त्वाच्या कामात होतीस. डोन्ट वरी मी ठीक आहे आता." त्याने सगळं कस तरी बोलणं संपवलं. त्याच्या आवाजावरून तरी त्याची तब्बेत जरा जास्तच खराब वाटत होती.
"राज तु पक्का ठीक आहेस ना.??" "हो., मी ठीक आहे आता." थोडं बोलून मी कॉल ठेवला. फ्रेश होऊन आई-बाबांसोबत जेवुन घेतलं आणि रूममधे आले. मोबाईल बघितला तर निशांतचे पोहोचल्याचे मॅसेज होते. त्यालाही रिप्लाय देऊन मी बेडवर आडवी झाली. आजची संध्याकाळ खूपच सुंदर आणि आनंदी गेली होती..... "बघतेच त्या निशांतच्या बच्चाला.., काय बोलला मला माझ्या एका मित्राने सांगितली जागा.. बाबांनी सांगितलं अस सांगायचं ना...!.....
"पण खरच ते असेल का..??" म्हणजे निशांतच्या मनात, मी तर नाही ना.." आजच्या त्याच्या बोलण्या आणि वागण्यावरून तरी वाटत होतं. तस आपल्यालाही आता तो आवडू लागला आहे. कुठे तरी मनात खोलवर त्याच्या साठीच्या भावना निर्माण होत आहेत. स्वतःशीच हसत मी निशांतला गुड नाईटचा मॅसेज पाठवला आणि मी देखील झोपी गेले. कारण उद्यापासून कॉलेज, डान्स प्रॅक्टिस सगळं काही रुटीन चालू होणार होत.
सकाळच्या स्वच्छ वातावरणाने माझी सकाळ एकदम फ्रेश झाली. फ्रेश होऊन बाहेर आले तर आई किचनमध्ये तर बाबा डायनिंगवर बसुन नाश्ता करत होते. मी देखील नाश्ता करून कॉलेजसाठी निघाले. आज ऑडीमध्ये गेले तर आत लख्ख काळोख.. "अरेच्चा..! आज कोणी आलाच नाही वाटत प्रॅक्टिससाठी.., स्वतःशि पुटपुटत मी क्लाससाठी निघाले. जाताना निशांतला कॉल केला तर हा काही घेत नव्हता. सो गप्प क्लासमध्ये जाऊन बसले. स्वतःचा अभ्यास करत बसले. मी बसले असता हर्षु आली आणि स्वतःच येऊन माझ्या बाजूला बसले... मी बघून जास्तकाही बोलली नाही हे बघुन तीच बोलु लागली.
"हेय प्राजु, कशी आहेस.??" मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. "मी ठीक.., आणि तु.??" मी कस तरी उत्तर देऊन स्वतःच डोकं पुस्तकात घातल. मग तीच बोलु लागली..., "प्राजु मला जरा बोलयच होत तुझ्याशी..??".... मी प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. तिने एक स्माईल देत बोलणं चालू केलं...,"प्राजु सॉरी..." "कशा बद्दल"... मी तिच्याकडे बघत विचारलं... "ते मी पिकनिकच्या शेवटच्या दिवसांमध्ये जरा जास्तच राग राग केला ना.." ती मान खाली घालून बोलत होती. "अग इट्स ओके मी समजु शकते तुला.." मी देखील जास्त न वाढवता तिला समजून घेतलं.
"पण प्राजु यार तुला म्हाहित आहे ना, माझं किती प्रेम आहे ते निशांतवर, म्हणून नकळत माझ्याकडून हे सगळं झालं. आणि मला म्हाहित आहे तुझे आजोबा आणि त्याचे आजोबा हे फ्रिएन्ड आहेत हे तुलाही नव्हतं ना म्हाहित. मीच जास्त केलं.., माफ कर मला प्राजु.." तिचा चेहरा आता रडवेला झालेला बघुन मीच तिला मिठी मारली... "अग वेडाबाई.., बस बस होत असे ठीक आहे." मी तिला थोपटत बोलले. तिनेही मला घट्ट मिठी मारली. हे सगळं चालू असताना सर आले आणि आम्ही लगेच उभे राहिलो. दोघांचे ही डोळे पाणावले होते. एकमेकांना बघून हसुन खाली बसलो. नंतर लेक्चर्स संपवुन कॅन्टीनमध्ये आलो.
"अरे हर्षु.., आज राज नाही आला..?" मी विचारल. "अरे यार तुला सांगायलाच विसरेल.., अग प्राजु राजची तब्बेत ठीक नाहीये. त्याने मला तुला कॉल करायला सांगितला होता. सॉरी मी विसरले." ती ओशाळातच बोलली. "तु पण ना...," मी लगेच स्वतःचा मोबाईल काढला आणि राजला कॉल केला.
"हॅलो राज.., प्राजु बोलतेय.." "हा बोल ना.." त्याचा आवाजात अशक्तपणा जाणवत होता. "तुझी तब्बेत खूपच खराब वाटतेय.., तु डॉक्टरकडे जाऊन आलास का?? " मी घाई घाईत सगळे प्रश्न विचारून टाकले. "अग हो मला बोलू तर दे.." काल डॉक्टर आले होते. आता ठीक आहे तब्बेत." त्याने ही शहाण्या मुलासारख एकएका प्रश्नाच उत्तर देऊ केलं.... "ठीक आहे एक काम करते मी येते तुला भेटायला सोबत निशांतला ही घेऊन येते ओके.., चल आता भेटुन बोलूया." अस बोलून मी त्याच काही न ऐकता कॉल ठेवुन दिला.
"हर्षु तु भेटलीस का राज ला..??".. कॉलवर बोलून झाल्यावर मी हर्षुला प्रश्न केला.. "हो कल रात्री भेटले होते भाईला. मम्मी आणि मी गेलो होतो. काका नाही आहे ना तो गेलाय बाहेर आऊट ऑफ इंडिया. सो त्याच्यासोबत कोणी नव्हतं त्यामुळे आम्ही गेलेलो. पण आज सकाळीच त्याने आम्हाला पाठवुन दिल." तिने समोर ठेवलेला शेवटचा घास खात बोलणं संपवलं.... "तु येणार आहेस का आज..? मी जातेय भेटायला राजला.." मी थोडा विचार करून तिला विचारलं. "अग मला आता नाही जमणार कारण मम्मीने बोलावल आहे घरी.. तु जाऊन भेटुन ये ना भाईला बर वाटेल. आणि तसही रात्री जाईलच मी भेटायला.." तिने हसुन उत्तर दिलं.
आम्ही बसलो असता तिला कॉल आला आणि ती निघुन गेली. मी एकटीच बसले होते तेव्हा मागून निशांत आला.. माझ्या डोक्यावर टपली मारत समोरच्या चेअरवर बसला. "अरे किती दुष्ट आहेस..., मी डोक्यावर हात चोळत बोलले..... "तो तर मी आहेच"..... त्यानेही स्माईल देत माझ्या समोरच्या डिश मधला वडा-सांबरचा शेवटचा घास स्वतःच्या तोंडात कोंबत बोलला.
"निशांत ऐक ना.., राजची तब्बेत ठीक नाही आहे आपण जाऊया का त्याला भेटायला. " मी त्याला विचारल. काही विचार करून त्याने ही होकार देऊन टाकला... "चल मग निघुया का..? माझे लेक्चर्स संपले आहेत." मी स्वतःची बॅग घेत विचारती झाली. आम्ही निघालो.... बाहेर येईपर्यंत त्याला एक कॉल आला आणि तो दहा मिनिटं सांगुन निघून गेला. मी त्याची वाट बघत तिथेच टाईमपास करत बसले होते. काही वेळाने त्याचा कॉल आला..
"हॅलो.., अग मला प्रिन्सिपल सरांनी थांबवून घेतलं आहे सो मला जमेल अस वाटत नाही. तु जाऊन येतेस का हवतर तुला पीक करायला येतो मी नंतर.. सॉरी हनी-बी." एवढं बोलून त्याने कॉल कट केला. कारण त्याने सरांच्या समोर कॉल लावला होता. मी जरा सॅड मुड मधेच जायला निघाले.
ऑटो केली आणि राजच्या बिल्डिंग खाली पोहोचले... "हा बोला मॅडम कोणाकडे जायचं आहे. तुम्हाला??" तिथे बसलेल्या एका वाचमेन काकांनी मला अडवत विचारल. "काका.., मला राज सरनाईक यांना भेटायला जायचं आहे." मी त्या काकांना राजच नाव सांगताच त्यांनी लँडलाईन वरून कॉल केला.. आणि मला वर जायला सांगितलं. "मॅडम जावा तुम्ही वर.." मी त्यांना एक स्माईल देऊन वर जायला निघाले.
वर जाताच डोअर बेल वाजवली.. एका नोकराने दार उघडलं. "या मॅम.." त्यांनी माझं हसुन स्वागत केलं. "राज कुठे आहे..??" सर त्यांच्या रूममधे आहेत." मी तुम्ही आल्याच सांगतो तुम्ही बसा." "नाही नको.., म्हणजे मीच जाते त्याच्या रूममधे.., ओके."
मी निघाली राजच्या रूमचा दरवाजा थोडा उघडाच होता. "येऊ का आत...?" मी दरवाजा वर नॉक करत विचारल.. "अरे प्रांजल ये ना..? कधी आलीस...? चला म्हणजे मी आता एकदम ठणठणीत होणार." राज हसत माझ्याकडे बघत बोलला.. "मी छान.., तुझी तब्बेत कशी आहे. आणि हो आताच आले म्हटलं पेशंट ला भेटुन येऊया. खर तर निशांत ही येणार होता. पण त्याला सरांनी थांबवून घेतलं." मी एक स्माईल देत बोलले. निशांत न आल्याने त्याचा चेहरा मात्र चांगलाच खुलल्या सारखा वाटला.
"काही खाल्ल्यस का??..." "नाही ग मला इच्छाच नाही होत काही खायची" राज जरा तोंड वाकड करतच बोलला. सोबत तस करून दाखवल्याने मला मात्र चांगलाच हसु आल.., मला हसताना बघून तो ही हसु लागला.. "चला काही तरी खाऊन द्या.. आणि मेडिसिन कधी घेणार. कारण उपाशी मेडिसिनचा त्रास होईल कळलं का.." मी जरा ओरडतच बोलले. एका नोकराला सांगून मऊशी खिचडी करायला सांगितली. आम्ही गप्पा मारत असताना नोकर ती गरमा गरम घेऊन आला. "चला आता गप्पपणे खाऊन घ्या" मी डिश राजच्या समोर धरत बोलले. पण तो काही खायला बघत नाही हे बघुन मीच एक चमचा घास त्याला भरवला. मी भरवला बघुन त्याला छान वाटलं आणि त्याने राहिलेली खिचडी खाऊन घेतली.
"छान होती खिचडी.." मला बघून राजने थम दाखवला. " अरे मी नाही केलेली.., त्यांना थँक्स बोल.." मी पण लगेच त्याला रिप्लाय दिला. "राज तुझी तब्बेत ठीक नाहीये आणि घरी कोणीच कस नाहीये.??? म्हणजे तुझ्या घरचे..??" मी त्याच्या बाजूला बसत विचारल. माझ्या या प्रश्नाने मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद एका मिनिटात निघून गेला. "काय झालं राज..., सॉरी मला तुला हर्ट करायचं नव्हतं." मी स्वतःच्या डोक्यावर हात मारत बोलले. कारण आता हसणारा मुलगा लगेच दुःखी झाला होता माझ्या बोलण्याने.
"प्रांजल...." त्याने माझ्याकडे पाहिलं. "हा बोल ना....राज." एक मोठा श्वास घेत तो बोलु लागला... "प्रांजल तुला म्हाहित आहे का..., माझी या जगात फक्त एकच वेक्ती आहे जवळची... माझा डॅड. हा तसे हर्षल आणि तिची फॅमिली आहे. पण माझा हक्काचा असा माझा डॅड आहे. तुला म्हाहित आहे का... जेव्हा मी मम्मीच्या पोटात होतो ना तेव्हा डॅड मम्मीची खूप काळजी घ्यायचा. तिला काय हवं नको ते स्वतः जातीने बघायचा.. मी झालो आणि मम्मी आजारी पडू लागली आणि आम्हाला एकट सोडुन ती हे जग सोडुन गेली. त्यादिवशी डॅड खुप रडला होता मला मिठी मारून. तेव्हा मी दहा वर्षाचा होतो." .... हे सगळं बोलत असताना त्याच्या पापण्यांच्या कडा मात्र ओल्या झालेल्या. त्या उडत तो ऊभे बोलु लागला.
"त्या दिवसापासून त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलं. खूप जणांनी त्याला दुसर लग्न करायचा सल्ला दिला.., पण त्याने ठरवल होत की एकट राहायचं.. त्याचा ना माझ्यावर खूप जीव आहे. डॅडच मम्मी वर जीवापाड प्रेम होतं. तो तिच्यासाठी काही ही करायला तय्यार असायचा. तुला एक गंमत सांगतो.., म्हणजे काय झालेलं की, मम्मीला एका शॉपमध्ये एक साडी आवडली होती, पण ती साडी ती घेण्याआधीच विकली गेली. मम्मीला तीच साडी हवी होती म्हणून डॅडने तशी सेम साडी बनवून घेतली तेही एका दिवसात... आणि सोबत ते दुकान ही विकत घेतल. खुप प्रेम होतं तिच्यावर.. मी त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून डॅड मला कसलाच त्रास होऊ देत नाही. आता ही त्याची इकडे येण्याची धडपड चालूच आहे. पण मीच त्याला ओरडलो की, आता मी मोठा झालो आहे. स्वतःची काळजी घेऊ शकतो. तरीही दिवसातून दहा कॉल्स असतात त्याचे." एवढं बोलून त्याने स्वतःचे डोळे पुसले. नकळत माझ्याही डोळ्यात पाणी आलं होतं. मी देखील माझे डोळे पुसले.. "अरे डियर तु का रडते आहेस.., बापरे एवढी बोरिंग होती का माझी स्टोरी..??" त्याने हसत विचारलं.
"काही असत हा राज तुझं.. बोरिंग नाही.. वाईट वाटलं की, एवढे प्रेम करणाऱ्या तुझ्या बाबांसोबत तुझी मम्मी नाहीये."
"काय करणार देवाच्या मनात असत तेच होत. चल तुला माझ्या लहानपणीचे फोटो दाखवतो." तो बेडवरून उठला आणि स्वतःचा लॅपटॉप घेऊन आला.
"ते सगळं नंतर, हे घे मेडिसिन.." मी गोळ्या आणि पाण्याचा ग्लास पुढे केला. त्यानेही एखाद्या शहाण्या मुलासारख्या गोळ्या घेतल्या आणि मला लॅपटॉपवर फोटो दाखवत बसला. आम्ही त्याच्या लहानपणीचे फोटो, आई-बाबांसोबतचे फोटो, हर्षु आणि त्याच्या लहानपणीचे फोटो...बघत होतो. त्याच्या लहानपणीचे छान छान फोटो होते. बघता बघता त्याला एक कॉल आला आणि तो गॅलरीत निघुन गेला.
मी बघता बघता एक फोल्डर ओपन केला. त्यात आमच्या पिकनिकचे फोटो होते. सुरुवातीला आम्ही गेलेलो तिथले छान निसर्गाचे फोटो होते, त्यानंतर मात्र सगळे माझेच होते. खुप छान होते ते फोटो. पण एका फोटोमध्ये निशांत आणि मी होता. मागे उगवता सूर्य त्याच्या समोर निशांत आणि बरोबर निशांतच्या समोर मी.. छान होता तो फोटो. काही फोटो निशांत आणि हर्षुचे ही होते ते पाहुन मात्र मी पुढे पुढे केले कारण मन काही हर्षु आणि निशांत एकत्र पाहु शकत नव्हत.
थोड्या वेळाने राज ही आला. आम्ही सोबत फोटो बघत होतो. चहा गप्पा मारत मग आम्ही कॉफी देखिल घेतली. "चल राज आता निघते मी.." राजकडे बघत मी बोलले. "लवकर जाते आहेस. थांब मी तुला सोडायला येतो." तो ही तय्यार होण्याकरता उठू लागला..... "अरे काही काय.., तु नको येऊस निशांत येणार आहे मला पीक करायला." मी हसुन बोलले. पण माझ्या या वाक्याने त्याच्या चेहरा जरा सॅड वाटला. मी निशांतला कॉल केला.
"हॅलो.., कुठे पोहोचलास.??". "अग हे बघ बिल्डिंगखालीच पोहोचलो आहे येतो." एवढं बोलून त्याने कॉल कट केला. तो आला आहे हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. मी आणि राज निशांतची वाट बघत बसलो होतो. तोच बेल वाजण्याचा आवाज आला आणि दरवाजा उघडला गेला.... निशांत राजच्या रूममधे यायला निघाला होता. राज बेडवर झोपुन होता. "अग प्रांजल एक ना.. माझ्या डोळ्यात काही तरी गेलं आहे बघतेस का.??" त्याच्या डोळ्यात काही गेलय म्हणून मी तो झोपला असतानाच वाकुन त्याच्या डोळ्यात बघायला गेले. मी फुक मारत असताना मागुन निशांत आला.
त्याला मात्र काही वेगळाच वाटलं आमच्या त्या पोजीशनमुळे... म्हणुन त्याने दरवाजा जोरात वाजवला. मी लगेच वळून पाहिलं तर त्याचा रागात लाल झालेला चेहरा माझ्या समोर होता. मी हसुन पाहिलं पण त्याने मात्र माझ्याकडे बघुन मला इग्नोर केलं. याच मला मात्र वाईट वाटलं होतं. तो आत येत राजला भेटला. "हेय.., ब्रो कस वाटत आहे.??" त्याने राजला भेटुन विचारपुस केली. "अरे आता छान वाटत आहे. प्रांजल आल्यापासून.." राजने माझ्याकडे बघत स्वताच वाक्य पूर्ण केलं.
यावर मात्र निशांत चांगलाच रागावला होता.., पण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत तो हसुन समोरच्या चेअरवर बसला. एका नोकराने त्याला पाणी आणि जुस आणुन दिला. ते घेऊन आम्ही जाण्यासाठी निघालो. निशांत आल्यापासून माझ्याशी बोलत ही नव्हता की, माझ्याकडे बघत होता. हे बघून राजच्या चेहऱ्यावर मात्र वेगळेच भाव दिसत होते. आम्ही राजची भेट घेऊन निघालो. निशांत काही बोलत नाही म्हणून मीच बोलु लागले...
"निशांत कधी निघालास तु... मला बोलला नाहीस निघालास ते...?" "ओह म्हणजे तुला सांगून यायला हवं होतं का मी.??" त्याने ही जरा रागातच माझ्याकडे पाहिलं..... "म्हणजे तस नाही निशांत." "मग कस प्रांजल." आज त्याने मला माझ्या नावाने हाक मारली. आज निशांत जरा वेगळाच वागत होता. मला सोडुन काहीही न बोलता तो निघून गेला. साधं माझ्याकडे पाहिलं ही नाही त्याने. "आता याच का बिनसलं..?" स्वतःशीच बोलत मी वर आले. घरी येऊन फ्रेश होत. अभ्यास करत बसले. नंतर जेवुन राजची विचारपूस करून निशांतला मॅसेज केला. पण त्याचा काहीच रिप्लाय आला नाही. कॉल केला तर तो ही त्याने घेतला नाही.
कदाचित कामात असेल म्हणून मी देखील जास्त वाट न बघता झोपी गेले....
to be continued.......
स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.