Love After Breakup - 11 in Marathi Fiction Stories by Vishal Patil Vishu books and stories PDF | ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 11

Featured Books
Categories
Share

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 11

क्रमशः

प्रीती तिचे एका हातातील बॅग खाली ठेवण्यासाठी आपले दुसऱ्या हातानी मोकळे सोडलेले केस सावरत खाली वाकते आणि सकाळच्या त्या सोनेरी किरणात प्रीतीचे गळ्यात असणाऱ्या त्या मंगळसूत्राची सोनेरी किरणे थेट आर्यनच्या नजरेला जाऊन भिडतात. त्या प्रखर किरणांचा स्पर्श होताच आर्यनचे डोळे नकळत पाणावतात आणि त्याची दोन्ही मने एकमेकांचे सांत्वन करण्यात मग्न होऊन जातात.. हा त्याचे मनाला बसलेला एक धक्का कमीच असतो तोच एक छोटी मुलगी त्या गाडीतून आपल्या बोबड्या आवाजात आई.. आई.. म्हणत हळू हळू चालत चालत येते आणि प्रीतीचा पायाला पकडते.. इतके दिवस प्रीतीचे मिलनाची वाट पाहणारे ते डोळे.. पण आता त्या डोळ्यांना ती आपल्या नजरे समोर असून देखील ते समोरचे दृश्य पहावत नव्हते आणि आर्यन क्षणाचाही विलंब न करता धावत धावत आपल्या रूम नं ५०१ मध्ये जातो आणि त्या रूमचा दरवजा आतून बंद करून घेतो.

प्रीती आपल्या मुलीला प्रतिक्षाला आणि आई बाबांना घेऊन रूम नं ५०२ मध्ये जाते. प्रीतीला तिची मनपसंद रूम मिळालेने यावेळी प्रीती खूप खुश असते. रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन झालेवर प्रीती त्या हॉटेलचे व्यवस्थपकाना भेटायला जाते. पण आर्यन नी अगोदरच त्या व्यवस्थापकांना आपली माहिती न देण्याची विनंती केलेमुळे ते हॉटेलचे व्यवस्थापक प्रीतीला आर्यन विषयी काहीच माहिती नाही देत.. त्या रूमचे बुकिंग विषयी माहिती न मिळालेने थोडीशी हताश झालेली प्रीती मग तशीच निराश मानाने चालत चालत हॉटेल जवळच असणाऱ्या त्या हिरव्यागर्द झाडीतल्या त्या बाकड्या जवळ पोहोचते. तिथे पोहोचलेवर तिचे हताश झालेलं मन थोडसं खुश होते.. कारण यावेळी त्या बाकड्यावर कोणीच बसलेले नसते. मागच्या पिकनिकचे वेळी मनात राहून गेलेली तिची इच्छा यावेळी पूर्ण होते. यावेळी सगळंच प्रीतीचे मनासारखं होत असते पण मनात एक खंत अजून बाकीच असते ती म्हणजे आर्यन चे भेटीची..

आर्यन सकाळपासूनच खूप अस्वस्थ होता. आपल्या रूमचा दरवाजा बंद करून एकटाच आपल्या भाव विश्वात हरवला होता.. काय करावे त्याला काहीच कळत नव्हते. आर्यन ज्या नजरेत गोड गुलाबी स्वप्न घेऊन महाबळेश्वरला आला होता त्या त्याच्या नजरेत आश्रुंचा जणू महापूरच लोटला होता. आता सार संपले, जिच्यासाठी इतकी वर्ष वाट पाहिली तीच आता आपली नाही राहिली, आता आपल्या जगण्यात काहीच अर्थ नाही राहिला.. जगून तरी काय करू ?? आणि कोणासाठी ?? प्रीती तू असे का केलेस??.. नाही मी तुझ्या शिवाय नाही जगू शकत आता.. या साऱ्या मनातील विचारांच्या वादळातच त्याचा जीव अडकलेला असतो.. त्या दुःखातून स्वतःला सावरण्यासाठी मग तो आपली डायरी आणि पेन घेऊन काही तर लिहायला घेतो.. पण त्या डायरीतील शब्दातही तेच विचार उमटतात.. आपलं प्रेम आता आपलं नाही राहिलं.. हा विचारच त्याला सहनच नाही होत.. मग आपली जीवनातील अखेरची कविता पोस्ट करून आर्यन आपले जीवनच संपवायचा निर्णय घेतो..

स्वप्न माझे तुटले

प्रेमही दुरावले..

मनातील आठवणीतले

क्षण सारे विरून गेले..

नाव तुझे हृदयातले

थोडेसे धूसर झाले..

उमंग सारे जीवनातले

क्षणात विरझून गेले..

आज जणू जगण्यातले

मर्मच संपून गेले..

- शब्दप्रेमी..

इकडे त्या हिरव्यागर्द झाडांच्या सावलीत त्या बाकड्यावर बसून प्रीती आपल्या त्या पहिल्या प्रेमातील पहिल्या वहिल्या चुंबनाचे गोड गुलाबी आठवणींत हरवून गेलेली असते. त्या आठवणींच्या वेलींवर ती मनमुराद झुलत असते आणि अचानक तिला आठवते आपण बराच वेळ झाला इथे बसलो आहोत तिकडे आई-बाबा आपलेला शोधात असतील. किती वाजले हे पाहण्यासाठी प्रीती आपला मोबाईल पहाते तर तिला त्या "शब्दप्रेमी" समुहावर एक नवीन कविता पोस्ट झालेची नोटिफिकेशन दिसते. ती पटकन ती कविता वाचते आणि ती कविता वाचून तिला जाणवते की पहिल्यांदाच या कवीने आज काहीशी निराशजनक, नकारार्थी कविता लिहिली आहे.. प्रीतीला त्या कवितेतून त्याच दुःख कळते आणि मग प्रीती त्या दुःखी झालेल्या शद्बप्रेमीला थोडा धीर देण्यासाठी त्या कवितेला ती लगेच रिप्लाय करते.. आणि रिप्लाय करून हॉटेलवर आपल्या रूमवर जायला निघते..

स्वप्न तुटले असेल पण

प्रेम अजूनही तिथेच आहे..

आठवणी साऱ्या विरल्या पण

सुगंध अजूनही दरवळतो आहे..

नाव थोडेसे धूसर झाले पण

हृदयातील सार अजून तेच आहे..

उमंग विरझून गेले पण

कर्तव्य अजूनही बाकी आहे..

जगण्यातले मर्म संपले पण

नव स्वप्नांची आस अजून बाकी आहे..

नव स्वप्नांची आस अजून बाकी आहे..

- शब्दसखी..

आपले जीवन संपवण्यासाठी आर्यन आपली आयुष्यातील शेवटची कविता पोस्ट करून हातातील मोबाईल खाली ठेवतो तोच आर्यनला त्याच्या समुहावरील शब्दसखीचा हा रिप्लाय येतो. ती शब्दसखीने लिहिलेली कविता वाचून त्याच मन थोडे भानावर येत आणि त्याला आपल्या चुकीची थोडीफार जाणीवही होते. तो त्या कवितेला लाईक करून त्या शब्दसखीचे आभारही मानतो.

प्रीतीला तिची आवडती रूम नं ५०२ मिळालेने तिला त्या रूम मधून कोठेही बाहेर जावसच वाटत नाही.. मग ती मुद्दाम तब्येत खराब झालेच बहाना करून एकटीच त्या हॉटेलवरील रूमवर राहते व आई बाबांना प्रतिक्षाला घेऊन बाहेर फिरायला पाठवते. त्या तिचे कवितेला शब्दप्रेमीने केलेला रिप्लाय पाहून ती पुन्हा त्याला रिप्लाय करते आणि मग त्यांचे एकमेकांशी पर्सनल चॅटिंगवर चालू होते. चॅटिंगवर बोलत बोलत ते दोघे मग आर्यनच्या "my words" या व्हाट्सअप ग्रुपवर एकमेकांना जोडले जातात. दोघेही एकमेकांना अनोळखी असूनही देखील त्यांना आपण एकमेकांचे खूप परिचयाचे, खूप जवळचे असले सारखे वाटू लागते. पण त्या दोघांनाही या गोष्टीची जाणीव नसते की, ते दोघे खरचं एकमेकांचे परिचयाचेच असतात आणि एकमेकांचे इतके जवळ असतात की त्यांच्या मध्ये अंतर होते ते फक्त एका भिंतीचेच..

प्रीतीचे आई बाबा आणि तिची मुलगी प्रतिक्षा बाहेरून फिरून येतात तरी प्रीतीचे आपल्या मोबाईलवर त्या "my words" समूहावर कवितेतील जुगलबंदी मधून शब्दप्रेमीशी चॅटिंग चालूच होते. "काय ग प्रीती कशी आहे बरे वाटते ना आता की, डॉक्टरकडे जाऊन येऊया का?" प्रीतीची आई आल्या आल्या प्रीतीला प्रश्न करते. यावर प्रीती "नको ग आई.. आता ठीक आहे मी.. तसे काही वाटले तर सांगेन मी तुला.." असे आपल्या आईला सांगते आणि पुन्हा तिची मोबाईल वरील व्हाट्सअप ग्रुपवर कवितांची जुगलबंदी चालू होते. नंतर काही वेळानी ते सगळे मिळून रात्रीचे जेवणासाठी हॉटेलचे डायनिंग एरियात जातात. रूममधून बाहेर पडताना नकळत प्रीतीची नजर त्या शेजारचे रूम नं ५०१ चे दरवजावर पडते. पाहते तर त्या रूमचा दरवजा किंचितसा उघडा होता. पण जशी प्रीतीची नजर त्या रूम नं ५०१ चे दरवजावर जाते तोच "खट्ट" असा आवाज होतो आणि तो दरवजा आतून बंद केला जातो.

बाहेरून प्रीतीचा कानावर पडणारा आवाज ऐकून आर्यनला तिला पाहण्याचा मोह आवरत नाही आणि तो तिला आपल्या रूम नं ५०१ चे दाराचे फटीतून हळूच चोरून पहात असतो. पण जशी तिची नजर त्याचे रूमचे दरवजावर पडते तो आपल्या रूमचा दरवजा पटकन आतून बंद करून घेतो. मनात खूप इच्छा असूनही त्याची त्या परिस्थितीमध्ये प्रीती समोर जाण्याची हिंमतच होत नसते. तो आपले रात्रीचे जेवण मग आपल्या रूमवरच मागवून घेतो कारण त्याला प्रीतीचे नजरे समोर जायचंच नसते. आपल्या रूम नं ५०१ मध्ये जेवण करून झालेवर काही वेळानी आर्यन बाहेर कोणी नसलेच पाहून तो आपल्या रूम समोरील असणाऱ्या बाल्कनीत उभा राहतो आणि वरून त्यांची नजर पुन्हा खाली हॉटेलचे पार्किंगमध्ये शतपावली करत असलेल्या प्रीतीवर पडते. आर्यनचे डोळ्यासमोर तिला पाहून पुन्हा पूर्वीचा सारा इतिहास उभा राहतो.. आणि त्याचे मनात विचार येतो..

क्रमश: भाग - १२

- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापुर