संकेत त्याच्या घरीच होता . तो रवीला मेसेज करणारच होता . पण मागच्या दोन वेळेस काय झालं हे त्यालाही आठवलं . पहिल्या वेळेस जेव्हा रवीने त्याला बोलून घेतलं व सांगितलं त्यावेळेस त्यावेळेस ही प्रीतीचा मृत्यू झाला . दुसऱ्या वेळेस त्याने प्रितीला वाचवायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या वेळेसही प्रीतीचा मृत्यू झाला आणि त्याच वेळी जो कोणी प्रीतीला मारायला आला होता त्याने रवीचा गैरसमज करून दिला की त्याला संकेत ने मदत केली होती . पण रवीला माहीत नव्हतं की संकेतला सर्वकाही आठवले आहे . म्हणून संकेतने पुन्हा एकदा रवीला मेसेज केला .
' Come tonight , project work '
रवीचा काही रिप्लाय आला नाही . संकेतला काय करावे कळेना . बिन बोलवता जावे तर रवीचा संशय अधिकच दाट होईल व तोच प्रीतीचा मारेकऱ्याला मदत करतो आहे असे वाटून तो संकेतलाच मारायचा प्रयत्न करेल . पण संकेतला माहित होतं त्याने कोणत्या मारेकर्यांना मदत केली नव्हती . जो कोणी मारेकरी होता तो भलताच हुशार होता त्याने दोन मित्रांमध्ये संशयाचे बीज पेरलं होतं जेणेकरून ते एकमेकांची मदत घेऊ शकणार नाहीत आणि त्याचं प्रीतीला मारण्याचं काम अधिकच सोपं होणार होतं .
संकेतला शांतपणे बसून प्रीतीचा मृत्यू पाहणे सहन होत नव्हतं . त्याने गपचूप त्या दोघांचा पाठलाग करण्याचे ठरवले . जो कोणी मारेकरी होता त्याला पकडण्याचे त्याने मनाशी निश्चित केले . त्याला तर रघुवीर सांगितलेल्या सर्व गोष्टी आठवल्या होत्या पहिल्या दोन वेळेस प्रीती तिच्या घरी गेली होती त्यावेळी तिचा मृत्यू झाला होता तिसऱ्यावेळेस रवी तिच्या सोबत असूनही तिचा मृत्यू झाला होता . पहिल्या तीन वेळेस मृत्यू कसा झाला हे त्याला माहीत नव्हतं . पण शेवटच्या दोन्ही वेळेस पण बंदूकच वापरली होती . पहिल्या तीन वेळेस त्याने समोर न येता गपचूप खून केला होता . पण शेवटच्या दोन्ही वेळेस तो उघडपणे समोर आला होता कारण त्याला गुपचुपपणे काम करता येणे शक्य होते . कारण शेवटच्या दोन्ही वेळेस ते दोघेही प्रीती बरोबर उपस्थित होते त्यामुळे त्याला गुपचूपपणे काही करता येणे शक्य नव्हते . मात्र आता रवी एकटाच होता आणि तो काय करेल काही सांगता येत नव्हतं . त्यामुळे संकेतने त्यांचा पाठलाग करण्याचे ठरवले .
संकेत ने गाडी घेतली व रवीच्या बिल्डिंग समोर घेऊन उभारला . त्याने कपडे वेगळे घातले होते तोंडाला रुमाल ही बांधला होता . साधारणपणे कोणालाही दिसणार नाही अशा जागी तो लपला होता . तो बिल्डिंगच्या गेट वरती येणाऱ्या-जाणाऱ्या कडे लक्ष देत होता . तो आल्यापासून कन्ही संशयित व्यक्ती आत आली होतं किंवा गेली नव्हती . तो बराच वेळ तिथे उभा होता . नेहमीच्या वेळी पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला . तो आत जात असताना कोणीतरी त्याला बेशुद्ध केलं . त्याच्याकडून पिझ्झा घेत तो माणूस आत जाऊ लागला.त्याच्या मागोमाग संकेतही जाऊ लागला . मधेच थांबत त्याने पिझ्झ्यामध्ये काहीतरी मिसळले . तो रवीच्या दाराची बेल वाजवणार तेवढ्यात संकेत ने त्याला मागून पकडले . त्याने दार वाजवत रवीला हाक मारली .
" रवी पटकन बाहेर ये मी त्याला पकडले आहे .....
दार उघडत रवी बाहेर आला . संकेत संकेत तू काय करतोयस इथे ....
" रवी हाच आहे प्रीतीचा खुनी ....
" तुला कसं माहित म्हणजे तुला आठवतंय का काय सगळं....
" होय रवी मला मागच्या दोन्ही वेळेस घडलेल्या घटना आठवत आहेत.....
" ही तुझीच चाल आहे , तुला पहिल्यापासून सारं काही आठवत होतं , तूच आहे खूनी .....
" मी का करू प्रीतीचा खुन मी तिच्यावरती प्रेम केलं होतं आणि अजूनही करतो .... हा माणूस खरा पिझ्झा डिलिव्हरी बॉय नाही . त्यांने खऱ्या डिलिव्हरी बॉयला बेशुद्ध केलं . त्याच्याकडून पिझ्झा घेऊन तो तुम्हाला द्यायला येत होता . त्याने त्याच्यामध्ये काहीतरी मिसळलही होतं . मी त्याला पकडलं नसतं पुन्हा एकदा तिचा जीव गेला असता ....
त्याने पकडलेल्या माणसाला मारत बोलू लागला ...
" बोल बोल काय मिसळलं पिझ्झ्यात .....
" काही नाही काही नाही साहेब मला एका माणसाने भरपूर पैसे दिले होते हे काम करण्यासाठी . तो म्हणाला की जर मी पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेशुद्ध केलं आणि त्यामध्ये काहीतरी मिसळल्याचं नाटक केलं तर अजूनही तेवढेच पैसे देईल......
तेव्हाच आतल्या खोलीत गोळी झाडल्याचा आवाज आला . त्या पाठोपाठ एक किंकाळी हवेत विरून गेली . पुन्हा एकदा त्या माणसांने प्रीतीचा खून केला होता .....
पुन्हा एकदा तो टाईम लुप रिसेट झाला होता . संकेतच्या हातात पुन्हा एकदा मोबाईल होता . तो रवीला मेसेज करणार होता पण या वेळेस त्याने मेसेज करण्याचे टाळले . सहावी वेळ होती . महेंद्र स्वामीनाथनला संपर्क साधण्याचे त्याने ठरवले . त्यांनी बरीच धडपड करून महेंद्र स्वामीनाथचा प्रायवेट नंबर मिळवला .
" Hello... Mahendra speaking..
" तू मला ओळखत नसशील . पण मला एक फार महत्त्वाचं बोलायचं आहे ....
" Who is this....?
" Do you remember priti , who punched you in seventh standard....? , I am her friend sanket ....
" Ohh priti.... अरे प्रीती प्रीतीला मी कसा विसरेन...?
" म्हणजे तू विसरला नाही तर तुझ्या लक्षात आहे सारं काही ...
" मग अरे सारं काही लक्षात आहे तिथून तर माझं सारं आयुष्य बदललं....
" म्हणजे तू अजूनही राग धरून आहे मनात..
" राग कशाचा राग... राग नाही अरे प्रीतीला मला थँक्यू म्हणायचंय...
महिंद्र स्वामीनाथन हा त्या टाईम ट्रॅव्हलरला मदत करत नाही किंवा त्याच्या मनात प्रीती बद्दल राग नाही हे ऐकून संकेत उत्साहाच्या भरात बोलून गेला
" म्हणजे तू पुढे जाऊन टाईम मशीन बनवून भूतकाळात येऊन प्रीतीला मारणार नाही तर ....
" काय काय बोलतोस काय तू.....
भलतेच बोलून गेल्याची सारवा सरव करतो म्हणाला
" काही नाही काही नाही असंच म्हणालो चेष्टेने....
" पण माझ्याशी तू टाइम ट्रॅव्हलची चेष्टा का करशील....? तुला माहीत नसेल पण टाईम ट्रॅव्हल हा माझा सगळ्यात आवडीचा विषय आहे...
" मी तुला काही सांगितलं तर तू मला वेड्यात तर काढणार नाही ना.....
" बोल बोल काय म्हणतोस तू.....
संकेत ने त्याला झालेले सर्व किस्से सांगितले...
" This is fascinating , not only time travel is possible but also some one is already doing it ....! पण प्रीतीला मारण्यासाठी एवढ कष्ट कुणी घेतला असावं....
" आम्हालाही तेच कळत नाही प्रीतीला मारण्यासाठी कोणी टाईम मशीन बनवली असावी..? किंवा ज्याने कोणी टाईम मशीन बनवली त्याच्याकडून जो कोणी मारू इच्छित आहे त्याने चोरली असावी... पण तो आहे कोण हेच कळत नाही ....
" सोपं आहे . साधारणपणे पुढच्या वीस ते तीस तीस वर्षात कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट आणि कुठले कुठले शास्त्रज्ञ टाईम मशीन बनवू शकतात हे आपल्याला शोधून काढावे लागेल ....
" ठरलं तर मग तू यादी तयार कर तोपर्यंत मी प्रीतीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेन....
आणि संकेत रवीच्या खोलीकडे निघाला...