.... पटकन डायल्नंड बर डिलीट केला आणि आईचा मोबाईल चार्जिंग ला लावून आम्ही दोघी बाहेर पळालो..!!
शिवानी चा लग्न सोहळा खूप छान पार पडला.. खूप छान दिसत होते नवरा नवरी ?.. मला तर राहून राहून अनयचीच आठवण येत होती.. गुरुवारी लग्न सोहळा संपन्न झाला आणि शुक्रवारी संध्याकाळी आम्ही घरी आलो... पण शनिवार, रविवार सुट्टी असल्याने आणखी दोन दिवस मला अनय ला बघता येणार नव्हते.. त्यात Monday ला तो कोणत्या शिफ्ट ला असेल ते देखील माहित नव्हतं.. ?
Saturday, Sunday जरा सुस्ती मध्येच गेले... लग्नाचा हँगओव्हर होता दोन दिवस... ?
फायनली Monday उजाडला.. खरं तर Sunday पर्यंत च्या एकूण सहा सुट्ट्यांनंतर ऑफिस ला जायची इच्छा नव्हती... पण अनय ची ओढ होतीच... त्यामुळे कसबसं आवरलं आणि निघाले ऑफिस ला...
- - - - - - - - - - XOX - - - - - - - - - -
इथे जॉईन झाल्यानंतर पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या सुट्टीनंतर ऑफिस ला येत होते.... ऑफिस मध्ये पाऊल ठेवल्यावर असं वाटलं की खूप काही बदललंय इथे... पण खरं तर सर्व जसंच्या तसं होतं.. तीच केबिन.. तोच पीसी .. तोच स्टाफ ... पण तरीही काहीतरी वेगळं वाटत होतं... Maybe एवढ्या दिवसांनी मी ऑफिस ला आले म्हणून असेल... ?
एवढ्या दिवसांच्या पेंडींग कामाचा आढावा घेतला... Priority नुसार सर्व कामाची लिस्ट बनवली.. Mails चेक केले... तितक्यात तन्वी नाश्त्यासाठी बोलवायला आली... आम्ही दोघीही कॅन्टीन मध्ये गेलो..
अनय ऑफिस मध्ये आलाय की नाइट शिफ्टला असणार आहे हे सुद्धा मी बघितलं नाही.. तन्वी ने तेवढा वेळच दिला नाही.. त्यामुळे पटापट नाश्ता करून निघालो.. वर आल्यावर तन्वी माझ्या केबिन मध्ये शिरली पाणी पिण्यासाठी.. आणि मी main room मध्ये..!! तन्वी ने आवाज दिला "अगं कुठे?".. मी म्हणाले "तू जा मी आलेच!"
घाईघाईतच आत शिरले.. हृदयाची धडधड वाढली होती.. ?... सरांच्या टेबल जवळून हळूच पुढे सटकले.. नाहीतर सरांनी बघितलं असतं तर बोलत बसले असते.. सध्या मला disturbance नको होता.. माझ्या नेत्रांना आणि हृदयाला फक्त अनयचीच ओढ लागली होती... थोडं पुढे गेले आणि पावले अडखळली.. समोरच्या PC वर अनय बसला होता...!.. त्याच लक्ष नव्हतं माझ्याकडे.. मी डोळे भरून बघून घेतलं त्याला.... 'सच में यार.. कलेजे में ठंडक पड गयी.. ?'.. आज तो खरच खूप छान दिसत होता.. तसा तो रोजच दिसायचा... पण maybe आज पहिल्यांदाच तो ऑफिस मध्ये checks चा शर्ट घालून आला होता.. रेड कलर अन् त्यावर ब्लॅक कलर चे मोठे checks असलेला शर्ट त्याच्यावर खरच उठून दिसत होता.. ? त्याने मला असं बघायच्या आधीच मी तिथून निघून आले.. आणि माझ्या केबिन मध्ये गेले.. तन्वी माझीच वाट बघत होती.. मी आत गेल्यावर तिने विचारलं.. "काय गं कुठे गेली होतीस एवढ्या घाईत? "
"अगं ते सरांजवळ एक महत्त्वाचं काम होतं.. कॅन्टीन मधून येता येता आठवलं म्हणून गेले पटकन..." - मी तन्वी ला थाप मारली.. तीही खोलात शिरली नाही..
मी म्हणाले, "अनय खूप छान दिसतोय ना आज..!"
"हो.. शर्ट बघितला का त्याचा.. मी दिलाय.. "-तन्वी
मी गोंधळून तिच्याकडे बघितलं...
" काsssय... तू?... कधी? आणि बर्थडे च्या वेळी मी तुला हे सुचवलं तर तुला आवडलं नव्हतं.. ?".. मी जरा नाराजीनेच बोलले..
" अगं.. त्याने मला t-shirt दिलाय एक ... त्याचे काका कुठल्यातरी कंपनी मध्ये कामाला आहेत तिथून त्यांना मिळाला होता.. तो म्हणाला तुला होईल का बघ... मी नव्हतेच घेत पण त्याने फोर्स केला म्हणून घेतला..मग त्याचं गिफ्ट असच कसं घ्यायचं.. मला चांगलं नव्हतं वाटत.. म्हणून मी पण त्याच्यासाठी शर्ट घेतला... "
मी तर सुन्नच झाले तन्वी च बोलणं ऐकून... काय बोलावं तेच सुचेना... तीच पुढे म्हणाली...
" या Saturday ला आम्ही भेटलो होतो.. म्हणजे मी माझ्या कामासाठी तिथे गेले होते.. आणि तो पण तिकडे आला होता.. अचानक भेट झाली आमची.. मग आम्ही दोघे मॉल मध्ये गेलो... थोडा वेळ बसून गप्पा मारल्या.. आणि निघालो"
तन्वी एकावर एक धक्के देत होती... जे पचवायला मला कठीण जात होतं.....?म्हणे अचानक भेटलो... अनय आमच्या कॉलनी पासून बस ने अर्धा पाऊण तास लागेल एवढ्या लांबच्या शहरात राहत होता... हां आता गाड्या घोड्यांच्या जमान्यात हे अंतर तसं काही लांब नव्हतं.. पण अचानक भेट होण्याएवढं जवळही नव्हतं... ही भेट ठरवून घडलेली होती...गोष्टी इथपर्यंत येऊन पोचल्या होत्या.. तन्वी मला मूर्ख बनवत होती... मी आजवर तिच्या चुकांवर पांघरूण घालत आले.. तिला माझ्या बहिणीप्रमाणे समजत होते... पण आज मला कळालं ऋतू ला ती का आवडत नव्हती ते... ?
इतक्यात तिचा फोन वाजला आणि ती बाहेर निघून गेली...
माझं मन आक्रंदत होतं... अनय, तीचं सोड... तिचा खरा स्वभाव तिने दाखवला... पण तू?.. तू असं का वागलास माझ्यासोबत?? एवढे दिवस जे तू माझ्या केबिन मध्ये येऊन मला दाखवायचा प्रयत्न करत होतास ते काय होतं... सर्वच खोटं होतं का? आणि माझ्या भावना... त्या खोट्या नाहियेत ना पण... सुट्टीवरून आल्यावरच मी ठरवलेलं.. की माझ्या मनातलं तुला सांगायचं... पण तू चान्स च नाही दिलास अनय.. आता मी तुझ्याजवळ काहीही बोलणार नाही...? आता सर्वच संपलय.. तसही मी फक्त हा आठवडाच इथे आहे.. माझा कंपनी सोबतचा बॉन्ड संपतोय... मी Monday पासून नाही दिसणार तुला.. तुझं प्रेम मात्र जिवंत असेल माझ्यात... कायम...! मी तुला कधीच विसरू शकणार नाही.. Afterall.. यू आर माय फर्स्ट लव्ह!! ❤️ आय विल मिस यू अनय... विल मिस यू...!!! ?
मी माझ्या pc मध्ये save केलेलं song प्ले केलं...
जे आता फक्त माझ्यासाठीच बनवलं गेलय असं वाटत होतं...
????
कैसे बताये क्यूँ तुझको चाहे
यारा बता न पाएं
बातें दिलों की.. देखो जो बाकी
आँखें तुझे समझाए
तू जाने ना.. तू जाने ना..
मी ठरवलेलं की नाही रडायचं.. अनय ला त्याचं प्रेम मिळालंय.. मग मला तर त्याच्यासाठी खुश व्हायला पाहिजे... तितक्यात समोरच्या काचेतून मी अनय ला येताना बघितलं... 'Ohhh गॉड! नाही... आता कसं सावरू मी स्वतःला?? '..... मी बाहेर जाण्यासाठी पटकन उठून उभी राहिले आणि मागे वळले..तेवढ्यात तो दरवाजा उघडून आत शिरला..आता आम्ही दोघे समोरासमोर होतो... माझी भिरभिर नजर त्याच्या नजरेला भिडली होती... तोही माझ्या डोळ्यांमध्ये बघत होता.... गाणं चालूच होतं....
????
निगाहों में देखो मेरी जो है बस गया
वो है मिलता तुमसे हुबहू..
जाने तेरी आँखें थी या बातें थी वजह
हुए तुम जो दिल की आरजू...
तुम पास हो के भी
तुम आस हो के भी
एहसास हो के भी.. अपने नहीं..!
ऐसे हैं हमको गिले.. तुमसे न जाने क्यूँ
मीलों के है फासले... तुमसे न जाने क्यूँ..
तू जाने ना... तू जाने ना...
मला अश्रू अनावर होत होते.. तोही आत्तापर्यंत एक शब्दही बोलला नव्हता... मी कशीबशी त्याला बोलले.. "आलेच.."
आणि पळतच वॉशरूम मध्ये गेले....
To be continued..
#preet