*****
दिवस कसातरी पुढे ढकलत संपला आणि रात्र पडायला लागली... शेजारच्या गावांमधे यात्रा, जत्रा सुरु होत्या रोज जवळ पासच्या एखाद्या गावची यात्रेसाठी आर्केस्ट्रा, तमाशा, कलापथक असे कार्यक्रम असायचेत...
मी पन मस्त फ्रेश झालो... सर्रर्रर कन बैगेची चेन ओढली आणी अलगद कागदात ठेवलेल ते गुलाबाच फुल हातात घेतल तस अंग मोहरून आल... आज तीला विचारायच , नक्की.. यात्रेच निमीत्त सांगुन घरातुन बाहेर पडलो...बाहेर तीच M80 दिसली... 'मामा' आजुनही स्वताला तरूणच समजत होता... आपन 'अपाचे' बाईक घेऊन तालुक्याला ऊसाच बिल आणायला गेलेला आणी आम्हाला ठेवली ही , खटारा.... ही गाडी घेऊन रस्त्यान जाताना जस सारं गाव जाग व्हायच.... पन नाईलाज... गाडीची चाके आमच्या ठरलेल्या ठिकानाकडे निघाली.. वाटेतच त्या सावकाराच घर होत.. आणि नेमका पत्रिका वाटत भाऊ तीथेच आला होता... मी लपण्याचा प्रयत्न करत जाऊ लागलो, पन या सोबतच्या डॉल्बी सिस्टीमच काय....?
मला पाहताच त्याने हाक मारली .... मला जायच नव्हत पन शेवटी नाईलाज, जाण भाग होत त्यांनी आत यायला सांगितल तसे आम्ही आत सोफ्यावर बसलो... त्यांच्या ऊसाच्या , भाताच्या आणी खताच्या म्हणजेच शेतीच्या गप्पा सुरू होत्या ... तोवर सावकाराच्या एका सुनेन सर्वांसाठी चहा आणला.. हातात गरम चहाच्या कपातला एक एक घोट घेत नेहमीच बोलन सुरू झाल...मी शांतपने चहाचा आस्वाद घेत होतो, पन माझी नजर सावकाराच्या घरभर फिरत होती...
प्रशस्त घर, .... घर कसल आलिशीन वाडाच तो..भल मोठ अंगन, पुढे समोरच गावठी पद्धतिचा 'माच्या'..... त्यावर साठीच्या आसपास वय असणारे सावकार आडकित्याने सुपारी फोडत माझ्या भावाला म्हणाले..
"पोरा...कंच्या गावची न्हवरी म्हणायची...."
वय झालेल पन अजुनही करडा आणि भरदार आवाज. त्यांच बोलन चालु होत. समोरच्या भिंतीवर एका म्हातारीचा फोटो होता, सावकाराची बायको असावी कदाचीत. आणि तीच्या बाजुला आणखी एक फोटो. फोटोला घातलेल्या हारामुळे चेहरा नीट दिसत नव्हता... त्यांच बोलन तसच ठेऊत मोबाइलची रिंग वाजवून मी फोन आल्याच नटक करून बाहेर पडलो... आणि भावाची गाडी घेऊन, तीच M80 घेऊन थेट गौरीला भेटायच्या जागी... गाडी खाली लाऊन मी वर आलो....
काही अंतरावरच ते दैत्याकार वडाच झाड गौरी आणि माझ्या भेटीची साक्ष देत होत होत, त्याच्या पारंब्या जमीनीपर्यन्त पोहोचलेल्या. त्या झाडावर नजर पडताच वाटायच की एखादा शक्तिशाली दैत्य डोळे बंद करून देवाची तपश्चर्या करत बसलाय... आणि वहाणा-या मंद वा-या सोबत डोलत देवाशी संवाद साधतोय...
शेजारच्या मोठ्या दगडावर बसुन आजुबाजूला नजर फिरवून गौरीचा वेध घेऊ लागलो...
ती अजुन आली नव्हती , मी तसाच मोबाइल वर गेम चालु केली.. तोच एक थंड वा-याची लहर अंगाला स्पर्श करुन गेली... झाडावर पानांचा सळसळ वाढलेली जाणवत होती. मोबाइल खिशात ठेवत पुन्हा तसाच आजुबाजूला पहू लागलो..
काल सारखच शुभ्र चांदण पडल होत... गाव खुप दूर, खाली डोंगराच्या पायथ्याशी राहिलेल. शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात गावाचे चित्र अतिशय सुंदर दिसत होत, सावकाराचा प्रशस्त वाडा सोडला तर बाकी छोटी छोटी घर, कुठेतरी एखाद्या घरातुन बल्ब चा पिवळसर प्रकाश घराच्या अंगणात पसरलेला होता आणि त्यात हूंदडणारी काही छोटी मुल, एखादी माऊली घराच्या मगे रचलेल्या छोट्याश्या चुलीवर भाकरी थापत होती. त्या चुलीत फूंकर मारताच धुराची पांढरट रेषा वर वर आकाशात जात सामावुन जायची..... दिर्घ श्वास घेत मी नीट बसण्याची जागा करून घेतली आणी आजुबाजूला पाहु लागलो..
अचानक माझ्या पासुन काही अंतरावरच्या त्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली काही हलचाल होत असल्याच जाणवल तस थोड निरखून पाहू लागलो. पण नीट काही दिसत नव्हत. थोड पुढ जात मी पाहील कोणीतरी तीथ असल्याच जाणवल, कदाचित गौरी माझी मस्करी करत असेल म्हणून सौम्य आवाजात हाक दिली..
" गौरी ............ ए गौरी ........."
तशी त्या दैत्याकार वटवृक्षामागुन एक माणवी आकृति किलकील्या नजरेने माझ्याकडे पहात असल्याच जाणवल... पन ती आकृति पुरुषाची होती... असेल कोणीतरी म्हणून मी मागे येत पुन्हा त्या दगडावर बसून मोबाइल सुरू केला... तीची वाट पहात तसच त्या दगडावर अंग टाकल ...
क्रमशः