'तू ह्यातच करियर का नाही करत?', विहानने तिला विचारलं. 'हे मी फक्त आवड म्हणून करते आणि वेळही मिळत नाही हल्ली.' 'मला वाटत की तू एक उत्तम कलाकार आहेस आणि ते तू जपायला हवं. मला पण खूप आवड आहे, पण मला कधी ती आवडही जपता नाही आली, पण आता मी चालू केल आहे पुन्हा आणि मी खरच खूप आनंदी आहे. तू पण ते पुढे चालूच ठेवावं अस मनापासून वाटतंय मला.', विहान तिला म्हणाला. आज पहिल्यांदा मैथिलीला कुणीतरी आपल्या आवडीच्या विषयात करियर कर असा सल्ला देत होतं आणि तिला हे खूप छान वाटलं. 'चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून. नक्की विचार करेन मी ह्या गोष्टीचा.', मैथिली त्याला म्हणाली. 'आपण विचार करतोय तसा नक्कीच नाही आहे हा! किती निर्मळ आहे मनानं. दुसऱ्यांच्या गुणांनाही अगदी मनापासून वाव देतो. एक खरा प्रेक्षक आहे हा. आवडेल ह्याला पुन्हा भेटायला.' 'चला निघायचं? उशीर होतोय.', आदिती मागून आली आणि विहानला म्हणाली. 'हो हो चल. बाय मैथिली! भेटू परत.', विहान म्हणाला. 'हो नक्की.. बाय!' ती म्हणाली. आणि ते निघाले.
'आदिती मला काय वाटत की ह्या मैथिलीला भेटावं पुन्हा एकदा.', विहान अदितीला म्हणाला. 'खरच ह्या पेक्षा तर चांगली गोष्ट असूच शकत नाही' आदिती म्हणाली. 'हे बघ मी फक्त as a friend म्हणून म्हणतोय आणि seriously मी मैथिलीचा life partner म्हणून नाही विचार करत आहे.', विहान म्हणाला. 'ठीक आहे तू तिचा विचार करतो आहे ना हेच खूप आहे, मग ते friend म्हणून का असेना.', दुष्यंत म्हणाला. 'मी आजच बोलते तिला. उद्या भेटा तुम्ही', आदिती म्हणाली. 'पण आदिती एक problem आहे गं', विहान म्हणाला. 'आता काय झालं?' 'पण मैथिली मला भेटेल का? कारण मागच्या वेळेस मी थोडा विचित्रच वागलो तिच्याशी.' विहान म्हणाला. 'बर झालं तूच कबूल केलं की तू विचित्र वागला. मला वाटलंच.. ह्यानेच काही तरी केलं असणार', दुष्यंत म्हणाला. 'तुला मध्ये बोललेच पाहिजे का दुष्यंत? तुझा काय संबंध. मी अदितीला बोलतोय. तिची बहीण आहे ती आणि तू माझा भाऊ आहेस की वैरी खरच मला प्रश्नच पडतो.', विहान म्हणाला. 'आदिती तू काही ह्याच्या बोलण्यामध्ये पडू नको आणि ह्याला भेटायची इच्छा आहे असं म्हणतो तर आहे खर पण त्यालाच माहिती. त्याच्या मनात काय आहे ते. मी चांगला ओळखून आहे विहानला.', दुष्यंत अदितीला म्हणाला. 'तुला माझं आयुष्यात चांगलं व्हाव अस वाटतच नाही का दुष्यंत? मी first time कोणाला तरी स्वतःहून भेटायचं म्हणतोय. तू मदत तर करत नाहीच आहेस पण जे करतय त्याच्यातही तू फाटे फोडतोय. काय प्रॉब्लेम काय आहे भावा तूझा??', विहान म्हणाला. 'बर आता तुम्ही दोघे भांडू नका बर.. काय लहान मुलासारखे भांडताय, तू काही टेन्शन घेऊ नको विहान. उद्या तुला मैथिली भेटणार ही जबाबदारी माझी', आदिती म्हणाली. 'ये हुई ना बात!', विहान तिला टाळी देत म्हणाला. 'शिक दुष्यंत आपल्या बायको कडून काही तरी. नाहीतर तू!' 'चल उतर गाडीतून घर आलं तुझं!', दुष्यंत गाडी थांबवत म्हणाला. 'बाय आदिती उद्याच लक्षात ठेव फक्त!' आणि तो निघून गेला. 'चला आता मैथिलीला तयार कराव लागेल' आदिती म्हणाली आणि तिने मैथिलीला फोन लावला. 'Hii मिथु, झालीस का फ्री?' 'हो बोल ना!' 'अग काही नाही. सहजच केला होता कॉल. छान होत exhibition.', आदिती म्हणाली. 'हो' मैथिली म्हणाली. 'विहानला ही खूप आवडल. त्याला ही खूप आवड आहे ह्या गोष्टींची.', आदिती सांगत होती. 'हो जाणवलं त्याच्या सोबत बोलून', मैथिली म्हणाली. 'hmm माझं काय म्हणणं होतं की तू पुन्हा एकदा भेटते का त्याला, हे बघ मी काही लग्नासाठी अजिबात म्हणत नाही आहे, पण मला काय वाटत की एखाद्या वेळेस पहिल्या भेटीत माणूस नाही कळत तर मग त्या माणसाविषयी चुकीचा अनुग्रह करून घेण्यापेक्षा त्याला पुन्हा भेटून जाणून घेण्याचा तर प्रयत्न तर करूच शकतो ना! बघ म्हणजे तुला पटत असेल तर.. काय आहे ना मिथु, विहान खूप चांगला मुलगा आहे ग! म्हणजे तू सांगितला तसा तर तो नाहीच आहे. खूप बोलका,मनमिळाऊ, हा आता एकुलता एक घरापासून खुप लांब राहतो म्हणून थोडा लाडावलेला आहे पण माणूस म्हणून खूप छान आहे. think about it!', आदिती म्हणाली. 'तू म्हणते आहे ते पटतंय मला आदु, ठीक आहे भेटेन मी.' मैथिली म्हणाली. 'ok then मी तुला उद्या चा time and venue message करते. चल कर आराम. थकली असणार ना आज खूप!', 'हो बाय' मैथिली म्हणाली. मैथिली खूप थकली होती पण तरीही विहानच्या विचारांनी तिला झोपच येत नव्हती. 'कठीण आहे हा समजायला, आदिती म्हणते तस second chance द्यायला हवा. काय करतो काय हा पण नेमका कस कळेल ना.. त्याला विचारुया उद्या. नाही नको मागच्या वेळेस कसा बोलला होता. आदितीला विचारू का? नको तीचं तर काहीतरी वेगळंच चालू होईल. अरे हा facebook वर असणारच न!', तिने लगेच त्याला search करायला घेतलं, पण ह्याच surname नाही माहिती आता कस शोधू? हा!!! idea दुष्यंतच्या friendlist मध्ये नक्की असणार वा काय हुशार आहे मी!!!!', ती स्वतःलाच म्हणाली आणि तिला त्याची profile मिळाली 'अरे बापरे काय सुंदर पैंटिंगस आहेत ह्याचे. awesome!!! music ची पण आवड दिसतीये साहेबांना', त्याच्या पोस्ट पाहून ती म्हणाली. 'आता तर भेटावच लागेल. online आहे हा. चला आता निघुया ह्यातून बाहेर खूप गोळा केली माहिती.' तिला facebook पाहून हे तर नक्कीच कळाल होत की हा जसा दाखवतो तसा अजिबात नाही आहे. मुळात एक चांगला मुलगा आहे. विहानने पण हेच काम केलं होतं घरी जाऊन मैथिलीची माहिती काढायला सुरुवात केली. त्याने ही facebook चा च आधार घेतला मैथिलीची प्रोफाइल पाहून basic ती कशी आहे ही idea आली तिच्या profile वर त्याला बरेच white rose चे pics दिसले आणि त्याने ठरवलं उद्या जाताना white rose च घेऊन जायचा. 'खर तर मला हिचा इतका राग येतो पण आज मी ह्याच मुलीला search करून हिच्या आवडी निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. strange!!',आज पुरत पुरे झालं आता जास्त वेळ नको घालायला ह्यावर अस म्हणून त्याने FB बंद केलं