varas - 11 in Marathi Horror Stories by Abhijeet Paithanpagare books and stories PDF | वारस - भाग 11

Featured Books
Categories
Share

वारस - भाग 11

11

आणि तो करार म्हणजे तेहत्तीस माणसांचा भोग,जेणेकरून त्यांना हे असलं का होईना शरीर मिळेल आणि मग त्याद्वारे ते मुक्त होईल... सर्वप्रथम माझी ही ऑफर ते स्वीकारत नव्हते.पण शापाच्या वेदनानी त्यांना झुकवल... ठरलं तर मग मी त्यांना तेहत्तीस भोग चढवणार होतो आणि ते मला ते गुपित सांगणार होते.आणि माझं नशीब पण बघ ना ज्या रात्री मी इथं आलो त्याच रात्री मला सरपंच वाड्या बाहेर दिसले... मग काय त्यांच्यापासूनच मी सुरुवात केली,,तो मूर्ख माणूस बोकडाचा नैवेद्य घेऊन आरती म्हणत होता,मग काय हीच वेळ साधून त्याला मी डोक्यात वार करून बेशुद्ध केलं आणि त्याचाच नैवेद्य माझ्या बा ला चढवला... त्याच्याच तासभर नंतर गण्या आणि जब्या पण घावले.त्या दोघानाही मारायचं होत..पण नंतर म्हंटलं एका मूर्ख माणसाला सोडलं तर तो भुता खोतांची अफवा पसरवून मला अजून सोयीस्कर करेल,,आणि तसंच झालं.

पण उरलेले माणसं मारण म्हणजे कठीण काम होत...पण त्याचा उपाय सुद्धा माझ्या वडिलांनी सांगितला.तुला हि जी विहीर दिसते ना ती काही साधीसुधी विहीर नाही बरं का!!या वाड्या प्रमाणेच ती पण शापित आणि तीच पाणी पण तितकंच लालची, थोडतरी पाणी कुणावर शिंपडल ना कि ती व्यक्ती रात्री आपोआप भान सोडून चालत चालत वाड्याकडे येते....मग काय मी सपाटाच लावला,,घरातले सर्व झोपले कि मी रात्री फिरायचो आणि शिकार करायचो... आणि सगळं काम आटोपून पहाटे पुन्हा झोपायला यायचो,म्हणूनच मग मला उठायला उशीर व्हायचा अन तुला वाटायचं की मी आळशी आहे!!!!

हे सगळं काम करत असताना माहितीचे फक्त दोन स्रोत माझ्याकडे होते,एक म्हणजे माझा बा ज्यावर किती विश्वास ठेवावा हाच मोठं प्रश्न होता आणि दुसरं म्हणजे ते पुस्तक जे मी लहान पनी चोरल ,पण दुर्दैवाने त्या पुस्तकाचं अर्धाच भाग मला घावला होता,,त्याचा दुसरा भाग जो तू वाचला तो माझ्या बा न त्या ग्रँथालयात तू सांगितल्या प्रमाणे लपून ठेवला होता,,त्याबद्दल माहिती मुख्यध्यापकाला पण नव्हती... पण तो दुसरा भाग चोरून लै महत्वाचं होत,मी माझ्या बा ला त्याबद्दल लै विचारलं,पण तो कपटी माणूस काही सांगायला तयार नव्हता,,शेवटी त्याला माणसं पुरवणं बंद करण्याची धमकी दिली तर त्याला संगावच लागलं...

त्याने सांगितल्यानुसार ते पुस्तक ग्रँथालयात कुठेतरी भिंतीत होत.आणि त्या भिंतीची पण वेगळीच चावी होती आणि ती चावी असते फक्त मुख्यध्यापका कड,,मग काय मी चुपचाप जाऊन त्याच्या कार्यालयातून चावी चोरणार होतोच त्या थेरड्या हेडमास्तर ने पकडलं,,आणि त्याच नशीब चांगलं कि माझ्याकडे तेव्हा ते पाणी नव्हतं...पण त्यांना जीवन्त सोडणं म्हणजे माझ्या जीवाला धोका,म्हणून मग मी त्याचाच जीव घेतला.

हे करत असताना मला अजून मदत झाली ती श्रीधर कडून,त्याने या सगळ्यांच्या सम्बन्ध लावला पाटलांशी... हा श्रीधर जरा जास्तच चलाख होता म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी मग मी त्याला घेऊन वाड्यावर आलो,,पण साला नशीबवान कि त्यावर शिंपडलेलं पाणी त्या ओढ्याच्या पाण्याने धुवून निघाला आणि बिचारे महेश,तुक्या,आणि सूर्या चा जीव गेला,

जरा दुःख झाल पण सम्पत्ती मिळवणं अस सोपं थोडीच असतंय,हळूहळू करत मागच्या अमावस्येला मी तेहत्तीस भोग सम्पवले आणि माझ्या बा ने मला ते गुपित सांगितलं.ते म्हणजे अशा स्त्री च रक्त जी शेवन्ताची वारस आहे आणि जीचा तुमच्यावर अमाप जीव असेल...खरंतर माझ्या आईशी लग्न माझ्या वडिलांनी एका योजनेवर आधारित केलं होतं कारण ती होती शेवन्ताची वारस.पण माझ्या आईचा कधी माझ्या वडिलांवर जीव जडलाच नव्हता.आणि तिथंच ते हरले.

मला आता हेच करायचं होत की शेवन्ताची वारस सापडायची होती अन तिला माझ्या प्रेमात पडायचं होत
पण मला ती वनशावळ कशी चालते हेच माहित नव्हतं...ती घराण्यात चालत असावी असं प्रथम वाटलं,,पण त्यानुसार माझे काका तर जराही लालची नाही.
तू माझ्या मामाची मुलगी,म्हणजे माझ्या आईच्या माहेरची.मला नेहमी मनाच्या कोपऱ्यात वाटायचं की तूच ती असावी .आणि नशीब बघ ती तूच निघाली आणि त्यात आपण प्रेमी युगुल.तर आता आपल्याला जास्त काही करायचं नाहीये,,तुझं थोडस रक्त त्या खजिन्यावर टाकले कि ते शापमुक्त होईल,,ती पूर्ण सम्पत्ती आपली आणि।मग आपण सुखात नवरा बायको म्हणून राहू शकू.

"विजू का केलंस अस?मला कधी वाटलही नव्हतं कि तुझ्या अंगात एक हैवान राहतो...तुला खरंच वाटत कि अस काही केलं तर मी तुझ्यासोबत राहील?यापेक्षा तर तू मला मारलं तरी चालेल"

"ए,,उगाच नखरे नको करुस,,मुकाट्याने चल"

"आणि त्याने तिचा हात पकडून ओढत ओढत,वाड्यात आणलं.तळघराकडे जाण्याचा एक रस्ता होता तिथे तिला घेऊन तो निघाला.बऱ्याच पायऱ्या नंतर तळघर दिसलं.तळघरात घुसताच डोळे दिपून जातील एव्हढं सोन तिथे पडलेलं होत...त्याने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने कविताच्या हातावर एक चिर पाडली... ती रडत होती...त्याला थांबवत होती...नको जाऊस काहीही झालं तरी तो एक शापित खजाना आहे...पण त्याने तो रक्ताळलेला हात त्या सोन्यावर टाकला,,ते रक्त त्या सोन्यावर सांडलं.....

विजय ने एक दीर्घ श्वास घेतला,
"हा हा हा हा...अखेर जे माझ्या बा ला नाही जमलं ते मी करून दाखवलं".
आणि त्याने कविता ला ढकललं आणि सोन हातात घेऊन त्याला न्याहाळू लागला.
तेव्हढ्यात मागून कविता बोलू लागली,

"म्हणजे श्रीधर बरोबर होता तर,, त्याला तर तुझ्यावर आधीच शंका आली होती.तुझा येण्याचा टाईम,सरांच्या बॉडीवर असणारा तोच चिखल जो त्याने तुझ्या सदर्यावर बघितला होता.मला त्याने बऱ्याचदा सांगायचं प्रयत्न केला पण मी खरोखर तुझ्यावर प्रेम करते रे म्हणून नेहमी स्वतःशी खोटं बोलत राहिले.
पण मला विश्वास तर तेव्हा बसला जेव्हा मी पुस्तकाचा दुसरा भाग वाचला,, खरंतर हा भाग तिथे लपवालाय हे कदाचित सरांना सुद्धा माहित नसावं,पण नशीब ते कोड मला उलगडलं,,... विजू तू खरंच चुकलास जे तुला वनशावळी नीट माहित नव्हती..... माणसांची वनशावळी चालते घरान्यानुसार जस तुझे खापर पणजोबा म्हणजेच मकरंद,,त्यानंतर पणजोबा,आजोबा,तुझे बाबा आणि आता तू....पण....पण स्त्रियांची वनशावळी चालते अपत्य नुसार.... शेवन्ता,मग तिची मुलगी,मग तिची मुलगी,मग आत्या म्हणजेच तुझी आई आणि त्यांनतर त्यांची मुलगी म्हणजेच चिमणी... ना कि मी.... हरलास तू विजू,,दैव चांगलं होत जे तुला हे माहित नव्हतं नाहीत स्वतःच्या बहिनीला सुद्धा तू तुझ्या स्वार्थाची शिकार केलं असत...ज्या क्षणी मला तुझ्याबद्दल कळालं तेव्हा स्वतःला समजावण्याचा खुप प्रयत्न केला,, मला विश्वास तर बसलाच नव्हता..असा व्यक्ती ज्याच्यावर मी जीव ओवाळला तो हैवान निघेल हे वाटलं नव्हतं... दोन दिवस विचार केला,जेव्हढे काही लोक बेपत्ता झाले त्यांची माहित घेतल्यानंतर मात्र मला सगळेच पुरावे तुझ्या विरोधात मिळाले,,वाटलं तुला एकदा समझुमी सांगावं,,पण जो व्यक्ती स्वतःच्या मित्रांचे जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही तो मला ऐकणारच नव्हता.. म्हणून आम्ही हा सगळा डाव खेळला तुझ्याशी...पण या डावात श्रीधर मात्र गेला...

"काय बकवास करते आहे"

"बकवास नाही खरं बोलतेय,,एकदा तुझ्या हाताकडे तर बघ"

आणि त्याचा हात हळूहळू जीर्ण होत चालला होता...मातीप्रमाणे त्याच शरीर कोसळत होत...असंख्य वेदना होत होत्या....तो ओरडत होता...अगदी आसमंत त्याच्या किंकाळ्यांनी भरून गेला होता...तो ओरडत होता...वाचवा,वाचवा,बाबा,कविता मला मारायचं नाहीये....पण आज सलग तिसरी पिढी हरली होती....आणि विजय!!!!!! तो तर नेहमीच लालसे चा होत असतो
............