काळ्या अंधाऱ्या रात्री कोणीतरी भयाण वाटेने धापा टाकत पळत होतं . आपल्या मागे कोणी लागलय आणि त्याच्यापासून बचावासाठी जीव मुठीत घेऊन दिसेल त्या वाटेने धावत पळत होता. काटेरी झाडाझुडपातून दिसेल त्या वाटेने. शरीरातून रक्तस्त्राव सुरु झालेला,डोळे रक्तासारखे लाल माखलेले ,श्वास फुलत होता, पाऊलवाटेवर सांडलेले रक्ताच्या वासावर ती शक्ती आजून चकलात होती. कोण होती माहित नाही? तो पळू लागला, पळता पळता मागे बघू लागला, किंचित त्याला कोणती तरी सावली दिसली, मागे एका जागेवरून दुसर्या जागेवर अशी उघडझाप दिसत होती. चंद्राच्या लक्ख प्रकाशामध्ये तो एकटाच कुठल्यातरी भयाण वाटेवरून पळत होता.कुठेतरी दूर पण थोडं जवळपास कसलातरी उजेड दिसला. आणि त्याला कुठेतरी जगण्याची उमेद दिसली. तो त्या उजेडाच्या दिशेने पळू लागला. मागे पहिले ती सावली अजूनही त्याच्या दिशेने धावत होती. तो त्या पडक्या घरामध्ये घसकन घुसला आणि दरवाजा कडीबंद केला. त्यातच एक उसासा सोडला. खूप दमलेला अंगामध्ये त्राण उरला नव्हता. कोण होता तो? आणि का पळत होता? आणि त्याच्या मागे कोण लागलेले? आणि हे घर कुठले? त्याने संपूर्ण घरामध्ये नजर फिरवली त्याला कुठेतरी ओळखीच वाटू लागल. समोर एक कपाट होत, लाकडी होत, खूप धूळ होती त्यावर, पाच फुटाचा दर्पण ही होता त्यावर. तो त्यासमोर जाऊन ठेपला, हाताने धूळ बाजूला करत दर्पणामध्ये स्वतःला पाहू लागला. जरावेळ थबकलाच तो.
तो रव्या होता. चेहरा रक्ताने माखलेला, डोळे लाल झालेले, आणि हे घरही त्याचेच होते, मग मग बाकी सगळे कुठे गेलेत? आणि बाकीचे घरे कुठे गेलीत? विचाराविचारामध्ये कुठून तरी दर्प सुटला. पाठीमागून अचानक कर्र कर्र कर्र आवाज करत दरवाजा थोडासा उघडला गेला. रव्या घाबरला, ती शक्ती घरापर्यंत पोहोचली, तो लगेच दरवाजा बंद करण्यासाठी पुढे धावला त्यातच अचानक त्याच्या समोर काळी भयाण सावली उभी राहिली. एकवेळासाठी रव्याला स्वर्गाचे दर्शन झाल्यासारख वाटल.त्याचा श्वास अडखला. बाहेर अचानक पावसाचा मारा सुरु झालेला, विजा कडकडू लागल्या, ढगांचा कडकडाट सुरु झाला. सागळ घर घुमू लागलं. समोरची काळी सावली हसू लागली, किळसवाणी हसणे, आणि त्यात त्याच्या तोंडातून सुटलेला दर्प नाकातील केस जाळत होता. फाटलेले मांस रक्तालेले डोळे पांढरे बिबुल आणि त्या शक्तीने रव्यावर झेप घातली.
वाचवा... वाचवा.... रव्या झोपेतून सकाळी ओरडत उठला .खूप भयाण स्वप्न होत. त्यामुळे शरीरही घामाने लक्ख झालेले. त्याच्या आवाजावरून आई त्याच्याकडे धावत आली. काय झाले स्वप्न बघितलेस का ?एवढा का घाबरलास ? आणि रात्री अंगणात बेशुद्ध कसा पडलास ?एकाच श्वासामध्ये एवढेसारे प्रश्न! तिने रव्याच्या डोक्यावर काळजीने हात फिरवला. तीही खूप घाबरलेली शेवटी आईच ती!
आईचा हात खांद्यावरून ढकलून दिला. आणि तावातावात तिच्यावर ओरडला आणि आधाशासारख घुगर्या आवाजात रव्या म्हणाला, मला जर वापस त्राण दिलास तर तुझ्या मुलाचा जीव गमावून बशील, एवढी अंगावर येवून कशाला वायफळ बडबड करतेस, डोळे वटारून त्याने सर्वांगी नजर फिरवली त्याच्या डोळ्यातील खुन्नस स्पष्ट दिसत होती आणि अचानक खाटीवरून रव्या हवेमध्ये वर खाली होऊ लागला. त्याचे दोन्ही हात पसरलेले डोळे लाल रक्तासारखे माखलेले. चेहरा काळपट होत होता, आणि अमानुष हसू घरामध्ये घुमू लागलं.अमानुष हसू पाहून रव्याच्या आई आवाक्यात आली. अचानक घडलेले प्रसंग तिला खोटच वाटत होत. तिला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आपल्या मुलाला वर खाली हवेमध्ये तरंगताना तिचा जीव टांगणीला लागला. आणि रव्या एकदाच खाटेवर निपचिप पडला. आणि आईने हंबरडा फोडला.
आतापर्यंत त्या अमानुष वाईट शक्तीेचा रव्याच्या शरीरावर प्रभाव सुरु झालेला. त्याचात चांगलाच बदल होऊ लागला. त्याला तशी वर्तवणूक करायची नव्हती पण त्या वाईट शक्तीचा प्रभाव त्यावर होता, मध्ये मध्ये रव्या नेहमीचा वाटायचा आणि आई वाचव आई वाचव आशी निष्फळ मागणी करायचा. वापस ती वाईट शक्ती त्याच्या शरीरावर जखमा द्यायची. जरी त्याला त्या वेदना जाणवत नव्हत्या, पण त्या वेदना त्याच्या आई मध्ये स्पष्ट दिसत होत्या. एकवेळ आईला झालेला जखमा ती सहन करेल पण तिच्या मुलाला झालेल्या जखमा ती सहन नाही करू शकत.
त्या दिवशी नक्की कुठे कुठे गेलेलात? आणि मला सगळ खर पाहिजे. रव्याच्या बाबांनी त्याच्या मित्रांची शाळा घेतली.
क... क... काका आम्ही अंगणातच खेळत होतो.
हा काका बाहेर ऊन होत म्हणून आम्ही घरीच होतो.
हरी जरा घाबरला होता. आणि त्याला काही लपवायचे नव्हते. आणि इथे त्याच्या मित्राच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. आपल्या चुकीमुळे त्याची ही अवस्था झाली आहे.
काका त्या दिवशी आम्ही त्याच आंब्याच्या झाडावर गेलेलो जिथे तुम्ही जायला नव्हते सांगितले, नदीच्या पलीकडे,नदीवर पोहायला म्हणून गेलो पण आंबे दिसले म्हणून आम्ही तिकडे गेलेलो. सगळ्यांनी झालेला प्रकार पुस्तक वाचतो त्या प्रमाणे त्यांच्या समोर आधोरेखीत केला.
रव्याच्या बाबांच्या राग अनावर झालेला पण परिस्थिती पाहता त्यांनी त्यांना एक मोकळीक दिली. आणि तिथे परत न फिरकण्याचा सल्ला दिला सक्त मनाई केली.
एकदा पायावर कुऱ्हाड पडली कि त्या कुऱ्हाडीला जो हात लावलं तो महामूर्खाच ठरेल. म्हणतात न जित्याची खोड जाता जात नाय पण इथे उलट होतं होत. ह्यांना चांगलाच उमगून आलेल. पण माणसाच्या आयुष्यात जोपर्यंत काही अघटीत घडत नाही तोपर्यंत त्याला शहाणपण येत नाही.आणि हे सत्य जरी कडू असलं पण हेच खर आहे. रव्याच्या मित्रांची खोड चांगलीच उमगली होती.जसा शाळेमधील परीक्षेत एखादा विद्यार्थी नक्कल करताना पकडला जातो आणि त्याला त्याची शिक्षा सुनावली जाते, आणि जर त्याने पुढच्या वेळेस नक्कल करायचं ठरवल तर त्याला त्याची शिक्षा डोळ्यासमोर दिसते आणि तो त्याच्या पासून तो वंचित राहतो तसच काहीतरी ह्यांच्या बाबतीत झालेलं.
क्रमशः