चौथी वेळ होती ही . तीन वेळा प्रीतीचा मृत्यू रवीने पाहिला होता . कसं सांगावं त्याला कळत नव्हतं . या वेळेला त्याने मनाशी निर्धार केला . ज्यावेळी त्याला जाग आली , तो पुन्हा एकदा प्रीती समोर होता ....
व ती त्याला त्याला I love you म्हणत होती ....
त्याने तिला तिथेच थांबवलं .
" I love you priti and I want to marry with you .... त्यावेळी त्याच्या मोबाइलची नोटिफिकेशन रिंग वाजली . त्याच्या मित्राचा मेसेज होता . त्याने त्याला लगेच माघारी फोन केला व बोलावून घेतले .
" कोणाला बोलवतोयस ... " प्रीती
" प्रीती मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे . आपल्यापुढे एक फार मोठी अडचण आहे . ती कशी सोडवायची हे मला कळत नाही .
" काय बोलतोयस काय...? एवढा कशाला घाबरतोयस.....? नक्की अडचण तरी काय आहे सांगशील का मला....? आधी मला सांगण्याच्या अगोदर कोणाला फोन करून बोलावून घेतलय....? "
तो अस्वस्थ होत होता. झालेल्या सर्व घटना ह्या दोघांनाही कशा सांगायच्या हा विचार त्याच्या मनात चालू होता . पुढे घडणाऱ्या घटनांमुळे त्याला घाम फुटला होता . अस्वस्थपणे तो इकडे तिकडे फेर्या मारत होता
" काय चाललय रवी तुझं ...? प्रती
" प्रीती तुला कसं सांगु हे कळत नाही , आणि तुला खरं वाटणार नाही . त्याच त्या घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत . आणि पुन्हा पुन्हा तुझा मृत्यू होत आहे...।
" काहीही काय बोलतोयस वेड्यासारखा....
काहीही नाही बोलत Time loop असतो ना त्या Time loop मध्ये आपण अडकलोय .
" काहीही काय बोलतोय हा काय hollywood चित्रपट आहे का. ...
" प्रीती मी खोटं कशाला बोलेन . तीन वेळा , तीन वेळा या सर्व घटना घडल्या आहेत . या वेळेला फक्त मी जरा वेगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत ....
" म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच त्या गोष्टी घडत आहेत . मग मला का काही आठवत नाही . फक्त तुझ्याच कसं लक्षात आहे सारकाही....?
" ते मलाही माहीत नाही पण मागच्या तिन्ही वेळेस , ज्यावेळी तुझा मृत्यू झाला त्या वेळी सर्व काही घटना पुन्हा सुरू झाल्या ....
" रवी काहीही बोलू नकोस बास झाली चेष्टा ....
" प्रीती मी खोटं का बोलू आणि तेही तुझ्या मृत्यूच्या बाबतीत .... तुला माहित आहे ना माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते....
" बरं , मला व्यवस्थितपणे सांग काय झालं ते...?
तोपर्यंत नेहमीप्रमाणे घडणाऱ्या न घटना घडतच होत्या . बाजूच्या खोलीत क्या हुआ तेरा वादा हे गाणं वाजून गेलो होतं . स्टडी रूम मधील खिडकीच दार जोरात आपटला होतं आणि आता दारावरती थाप पडली होती आणि पिझ्झा बॉय डिलीव्हरीसाठी आला होता . रवीने पिझ्झा घेतला व दार लावणार तेवढ्यातच संकेत त्या ठिकाणी आला . संकेतला आत घेत रवीने दार लावले . संकेतला पाहताच प्रीतीचा पारा वर चढला . ती रागाने पाय आपटत आतल्या खोलीत गेली . संकेत ओशाळून बाजूला होत बसला . रवी प्रतीची मनधरणी करायला तिच्या मागोमाग गेला . संकेतला बाहेरून त्यांचे संवाद तुटकपणे ऐकू येत होते....
" तो काय करतोय येथे , तू त्याला कशाला बोलावलं ....?
" तो माझा मित्र आहे आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे . तो आपल्याला मदत करू शकतो .
" पण तुला माहित आहे त्याने काय केलं होतं .... त्याला बघितलं की मला सारं काही आठवतं .... अजूनही मी त्या गोष्टी पूर्णपणे विसरू शकले नाही ....
" जुन्या गोष्टी आहेत त्या . आणि त्यामुळेच मी त्याला बोलावाले . काहीही केलं तरी त्याचं तुझ्यावरती प्रेम होतं , कधीकाळी . अजूनही तो माझा जवळचा मित्र आहे . माझं ऐक जुन्या गोष्टी विसरून जा आणि खरच मोठ्या अडचणीची वेळ आहे ....
अजूनही बऱ्याच वेळ ते दोघे काहीबाही बोलत होते . संकेत बाहेर बसून नाही ऐकण्याचा प्रयत्न करत होता . पुन्हा एकदा तो भूतकाळात जाऊन आला . भूतकाळात झालेल्या त्या जखमा अजूनही ताज्या होत्या . तिच्या बोलण्याने त्या जखमांवर मीठ चोळलं गेलं . नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने ते हळूच टिपले . त्याने काही झालं नाही असं दर्शवत शांतपणे बसून . काही वेळानंतर ते दोघेही बाहेर आले . प्रीती त्याच्याकडे बघण्याचे टाळत होती . ज्यावेळी तिची नजर त्याच्यावरती पडली त्या नजरेतला तिरस्कार बघून त्याच्या काळजाचं पाणी झालं . तोही तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळू लागला .
" ही चौथी वेळ आहे ...... रवी बोलू लागला . तो दोघांनाही सर्व काही समजावून सांगत होता .
" पहिल्या वेळेला ज्यावळ हे सर्व काही झालं , त्या वेळेसही प्रीतीचा मृत्यू झाला होता पण जोपर्यंत मी तिचं शव पाहिलं नाही तोपर्यंत हा घटनाक्रम पुन्हा सुरू झालं नाही . दुसऱ्या वेळेलाही तिचा मृत्यू झाला पण जोपर्यंत मी तिचं शव पाहिलं नाही तोपर्यंत हा घटनाक्रम पुन्हा सुरू झाला नाही . दोन्ही वेळेस मी तिच्याबरोबर नव्हतो मात्र तिसऱ्या वेळेस मी पूर्णवेळ तिच्याबरोबर होतो . आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळी तिचा मृत्यू झाला त्यावेळी मी तिच्याबरोबर होतो आणि त्यावेळी लगेच हा घटनाक्रम पुन्हा सुरू झाला ....
आणि रवीने घडलेल्या घटना संकेतला सांगितल्या त्यावर ती संकेत म्हणाला
" म्हणजे हा Time loop आहे आणि ज्या ज्या वेळेस तिचा मृत्यू होतो त्या वेळेस reset होतो ... Edge of tomorrow या चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे टॉम क्रूझच्या मृत्यूनंतर time loop reset होतो त्याप्रमाणे प्रीतीचा मृत्यूनंतर हा time loop रिसेट होत असावा ....
पण तू हे खरंच सांगतोय ना उगाच आमची चेष्टा करायचो म्हणून सांगतोय. ... " संकेत रवीला म्हणाला
" प्रीती शपथ नि तुझ्या शपथ ... तुमच्या दोघांची शपथ घेऊन सांगतो... मी खोटं का बोलेन....
" पण माझाच मृत्यू का होतोय ...? आणि माझ्याच मृत्यूनंतर टाईम लुप रिसेट का होतोय आणि बाकीचं कोणाला काही आठवत नाही , फक्त तुलाच का आठवत आहे....? " इतका वेळ शांत असलेली प्रीती म्हणाली .
" एक मिनिट , पहिल्या दोन वेळेस प्रीतीचा मृत्यू अगोदर झाला होता पण जोपर्यंत तू तिचं शव पाहिलं नाही तोपर्यंत टाईम लूप रीसेट झाला नाही , बरोबर...
संकेत विचार करत म्हणाला....
" बरोबर .... रवी म्हणाला
" म्हणजे जोपर्यंत तुला जाणवत नाही तिचा मृत्यू झाला तोपर्यंत हा time loop चालू राहील ... पण ज्यावेळी तुला जाणवेल त्यावेळी तो पुन्हा एकदा याठिकाणी चालू होईल ....
" पण मला एक कळत नाही प्रितीचाच का मृत्यु होतोय....? आणि प्रीतीच्या मृत्युनंतरच हा time loop का reset होतोय ....
" टाइम ट्रॅव्हल करण्याच्या बऱ्याच संकल्पना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत आणि त्याचे होणारे परिणाम आणि तयार होणारे paradox यांची ही बरीच वर्णने आहेत . आईन्स्टाईनच्या मतानुसार टाईम हे आपले फोर्थ डायमेन्शन आहे . आपण जसं लांबी रुंदी आणि उंची हे म्हणतो त्याप्रमाणे टाईम हे चौथे डायमेन्शन आहे जे फक्त एकाच दिशेने प्रवास करते ते म्हणजे भविष्याच्या .... पण टाइम ट्रॅव्हल जर शक्य असेल तर कोणीतरी भविष्याततून भूतकाळात किंवा भूतकाळातून भविष्यात जाऊ शकते . पण टाइम ट्रॅव्हल करणे हे वैश्विक शक्तीशी खेळण्यासारखे आहे .... संपूर्ण विश्व हे स्पेस आणि टाईम याभोवती केंद्रित आहे . स्पेस टाइम चा अभ्यास म्हणजे या विश्वाचा अभ्यास आहे ज्यावेळी आपण स्पेस टाईम मध्ये निपुन्य मिळवू त्यावेळी आपण विश्वातील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करू शकतो....
" संकेत मला माहित आहे तुला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि म्हणूनच मी तुला बोलवल पण सरळ सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सांग काय चाललं आहे ते...? रवी त्याच्या शास्त्रीय बोलण्याला वैतागून म्हणाला ...
" सांगतो सांगतो... अशी कल्पना कर की तुला टाइम ट्रॅव्हल करणे शक्य आहे , आणि तो भूतकाळात गेला . तुझ्या वडिलांचा जन्म होण्याअगोदर तू तुझ्या आजोबाला मारून टाकलं तर काय होईल....
रवी म्हणाला " मग माझे वडील जन्मणार नाहीत आणि वडील जर जन्मले नाहीत , तर मीही जमणार नाही आणि मी जर जन्मलो नाही तर मी भूतकाळात कसा जाईन ....
" तेच म्हणतोय मी . हाच grandfather paradox आहे आणि याची वेगवेगळी उत्तरे दिली जातात त्यातले एक उत्तर आपल्या सिच्युएशनला लागू पडतय .. ते उत्तर म्हणजे सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल ( self consistency principle ) . साध्या सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे ज्यावेळी तु भूतकाळात गेला आणि तू तुझ्या आजोबाला मारलं त्याअगोदरच तुझ्या वडिलांचा जन्म झाला असेल , किंवा तू आजोबा म्हणून दुसऱ्यालाच मारलं असेल किंवा अशी काहीतरी घटना घडेल की जेणेकरून तू तुझ्या खऱ्या अजोबाला मारूच शकणार नाही....
" म्हणजे नक्की काय म्हणाचय तुला... " रवी म्हणाला
" मला हेच म्हणायचं आहे की सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल मुळेच हा टाइम लूप वारंवार रिसेट होत आहे . तिच्या मृत्यूला कोणीतरी भविष्यातील व्यक्ती कारणीभूत असावी . नैसर्गिक रित्या प्रीतीच्या मृत्यूची अजून वेळ आली नसावी . त्यामुळे हा टाइम लूप प्रीतीच्या मृत्यूनंतर रिसेट होतोय जेणेकरून आपण त्या मारेकऱ्याला शोधू शकू व त्याला थांबवू शकू....
" मी काही टर्मिनेटर मधील सारा कॉर्नर नाही जिचा मुलगा जॉन कॉर्नर आहे व तो टर्मिनेटर विरुद्ध युद्ध लढत आहे . मला कोण येणार आहे भविष्याततून मारायला.... तुम्ही दोघेही वेढपसारखे बोलत आहात ....
त्याचवेळी दारातून एक गोळी सुसाट वेगात आलु व प्रीतीच्या मस्तकातुन बाहेर निघाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला . रवीला काही कळण्याअगोदर तो टाईम लूप पुन्हा एकदा सुरू झाला होता . त्याच्यासमोर प्रीती होती व ती I love you म्हणत होती ...