Julale premache naate - 13 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-१३

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१३

सकाळच्या सूर्याच्या किरणांनी माझी सकाळ एकदम फ्रेश झाली. आज मला लवकरच जाग आली होती.. घडाळ्यात पहिल तर सकाळचे सात वाजले होते.. स्वतःशीच हसत मी उठले... जाऊन खितकीत बसले.., तो समोरचा समुद्र आणि त्याच्यासोबत वर येऊ पाहणारा सूर्य जणु मला गुड मॉर्निंग विश करण्यासाठीच एकत्र उठल्या सारखे वाटत होते.. त्यांना बघून मला ही त्यांना विश करावस वाटलं. थोडावेळ बसुन मग मी फ्रेश होण्यासाठी गेले.. फ्रेश होऊन खाली आले तर कोणीही उठल नव्हतं... चक्क नोकर ही घरी दिसत नव्हते. मग मीच सर्वांसाठी कडक चहा आणि गोड शिरा करायचा ठरवला.


गॅसवर चहाचे पातेले ठेवले आणि सगळं सामान शोधु लागले.. कस तरी चहाचे सामना तर सांपडले. पण रवा, तुप, ड्रायफ्रुट काही सापडत नव्हते. त्यामुळे चहा तरी करून घेऊ ठरवुन मी चहा करायला घेतला. त्याआधी मला काही तरी आठवल आणि मी गार्डनमध्ये धावत गेले. परत आली ती गवती चहा घेऊन. मस्त आलं आणि गवती चहा घालून सर्वांसाठी कडक चहा केला. तोच एक नोकर माझ्या मागून येत बोलु लागला...


"अहो मॅडम तुम्ही का उठलात.. म्हणजे मला बोलायच होत की, तुम्ही कशाला करत आहात चहा वैगेरे मला सांगा मी करतो. तुम्ही राहु द्या.." राज साहेबांना कळलं तर ते आम्हाला नोकरी वरून काढुन टाकतील... "ओ काका तुम्ही नका टेंशन घेऊ.. या चहा घ्या." मी एक चहाचा कप पुढे करत म्हटलं... "नको मॅडम. मला चहा नको. तुम्ही जावा., काय हवं ते मला सांगा मी देईल तुम्हाला बनवून.." ते आता खूपच घाबरत बोलत होते. "अहो तुम्ही एवढं का घाबरत आहात मी म्हटलं ना घ्या चहा." मी जरा रागातच कप त्यांच्या पुढे केला.. शेवटी घाबरून त्यांनी घेतला. "आणि हो मला हवं असलेलं सामान काढुन द्या." मी एक स्माईल देत सांगितलं. त्यांनी चहा पटापट पिउन टाकला..


"काय ओ., आवडला नाही वाटत तुम्हाला चहा..??"
"नाही ओ मॅडम खुप छान झाला होता.. "अस उठल्यावर बायको नंतर कोणी तरी पहिल्यांदा चहा दिला आहे. धन्यवाद मॅडम." "अहो काका तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही मला मॅडम नका बोलु.. नावाने हाक मारली तरी चालेल... त्यांनी एकदा माझ्याकडे पाहिल आणि विचार करू लागले... "काय झालं..???"
"ते तुम्हाला नावाने नाही हाक मारू शकत.., हा, पण एका नावाने नक्कीच हाक मारू शकेन." मी चमकुन पाहिलं..


"प्रांजल ताई बोलु का.??" मी पण लगेच होकार दिला. आणि अजून एक चहा खुप मस्त झाला होता. त्यातल्या गवती चहा आणि आल्याची चव चहामध्ये छान उतरली आहे. तुम्हाला छान ओळख आहे मसाल्यांची.. "हो., म्हणजे काय मला गवती चहा आणि आलं, घातलेला चहा प्रचंड आवडतो. चला काका.., आता मला काही वस्तू काढून घ्या. मला सगळ्यांसाठी गोडाचा शिरा करायचा आहे. "पण प्रांजल ताई..., मी करतो ना तुम्ही तुमच्या रूममधे आराम करा.."


"आता काय मी किचनमध्ये येऊन काही करू पण शकत नाही का.., मला वाटत आता,, मला राजला जाऊन सांगावं लागेल की, मला किचन सुध्दा वापरायला देत नाहीत." माझ्या या वाक्यावर त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.. हे बघुन मीच खळखळून हसली.. "अहो काका गंमत केली.. तुम्ही कुठे जाऊ नका मला सगळं काढून घ्या आणि मदत ही करा.."


हे बोलल्यावर मात्र त्यांनी ही लगेच मान डोलावली...
आधी मला तुप, ड्रायफ्रूट, रवा, दूध, वेलची पावडर., अस सगळं साहित्य काढून घ्या. मी रवा भाजून घेते. तुम्ही ड्रायफ्रूट छान बारीक चिरून घ्या. आम्ही गप्पा मारत गोडाचा शिरा करत होतो.. तुपामध्ये रवा टाकताच खमंग असा सुगंध दळवळला.. मग मी त्यात एक एक करून साहित्य टाकलं... दूध, वेलची पावडर, ड्रायफ्रूट आणि शेवटी साखर. तूप सुटेपर्यंत शिजवला आणि शेवटी वरून परत ड्रायफ्रूट घातले.


मी शिरा करेपर्यंत एक एक जण खाली येत होतं.. "दामू काका नाश्ता घेऊन या खुप भूक लागली आहे.." राज डायनिंगवर बसतच ओरडला.. मी किचनमधून बाहेर आले तर तिघे ही डायनिंग टेबलवर येऊन नाश्त्याची वाट बघत होते. मग दामू काका नाश्ता घेऊन आले. म्हणजे तेच घेऊन आले मी येऊन डायनिंगवर सर्वांना जॉईन झाले.


चहा कपामध्ये ओतताना सर्वांना सुंदर असा सुगंध येत होता.. "काय टाकलं आहे यात जो एवढा छान सुगंध येत आहे आणि नाश्त्याला गोड शिरा आहे वाटत." राज शिऱ्याच्या डीशीचा सुगंध घेत बोलला... "राज साहेब आज चहा आणि नाश्ता प्रांजल ताईंनी केला आहे." ते काका कसे तरी बोलले. त्यांच्या या वाक्यावर राजने एक कटाक्ष त्यांच्यावर टाकला.. हे बघून मीच पुढे आले आणि त्याला समजावलं..


"अरे., राज आज मी लवकर उठले. तुम्ही झोपा काढत होतात म्हणुन म्हटलं सर्वांसाठी चहा- नाश्ता करूया. आणि हो काका बोलत होते नको नको मीच त्यांचं ऐकल नाही आणि केला.. चला आता टेबलावर काही बोलणं नको. छान नाश्ता करा आणि तो चहा प्या आधी नाही तर थंड होईल. मी बोलण्याने राज गप्प झाला. सर्वजण चहा आणि नाश्ता करू लागले..


"वाह..!!.... काय छान चहा झाला आहे.. पण टाकलं काय आहेस यात प्राजु..??" हर्षु एक सीप घेत बोलली. "अग आपल्या बागेरील गवती चहा टाकली आहे. मला आवडते म्हटलं बघू तुम्हाला ही आवडते का.??" मी एक डोळा मारत म्हटलं. "काय कमाल झाली आहे चहा." निशांतने माझ्याकडे बघत म्हटलं.. पण त्याने "कमाल" या शब्दावर चांगलाच भर दिला होता. कारण त्याने जेव्हा कॉफी केलेली तेव्हा मी हाच शब्द वापरला होता... हे ऐकून मीच जरा लाजले. चहा नंतर गोड शिरा ही सर्वांनी चाटून पुसून खाल्ला.. "काही बोल पण आज तु एवढा छान नाश्ता केला आहेस की, असत वाटत अजून खात राहावं.." राज माझ्याकडे बघत बोलला. मी एक छान स्माईल दिली.

"चला मग आता मला गिफ्ट द्या. मी एवढा छान नाश्ता केला आहे तर..." माझ्या अशा बोलण्यावर सर्वजण चकित होऊन माझ्याकडे बघत होते... "म्हणजे मला अस बोलायच होत की.., आपण सगळे आज गणपतीपुळेला जाऊया का..??" माझी खूप इच्छा आहे आणि हो आज मंगळवार ही आहे.
राजने घडाळ्यात पाहिलं..., आठ वाजता होते. "अग आता गेलो तर बारा शिवाय आपल्याला दर्शन नाही.." सगळे रेडी असतील तर मला काही प्रॉब्लेम नाहीये." मी सगळ्यांकडे पाहिलं.. हर्षु यायला तय्यार नव्हती.. खर तर तिला निशांतसोबत टाईम स्पेन्ड करायचा होता.. पण निशांत तय्यार झाल्याने तिला ही यावं लागलं. आम्ही सगळे परत आप आपल्याला रूममधे तय्यार होण्यासाठी गेलो.


मंदिरात जायचं म्हणून मी छान असा अनारकली ड्रेस घालायचा ठरवला. लांबलचक असा तो लाईट पिंक आणि डार्क ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनचा अनारकली होता. सोबत गोल्डन नक्षीकाम केलेली डार्क ग्रीन कलरची त्याची ओढणी त्यावरील बिट्सच्या कामामुळे ती अजूनच सुंदर वाटत होती.


त्यामुळे मी त्यावर मोत्यांचे लांब कानातले घातले. हलका मेकअप करून केस मोकळे सोडले. तय्यार होऊन खाली आले. आज राजने डार्क ब्लू कलरचा शर्ट आणि खाली क्रीम कलरची पॅन्ट घातली होती. तर निशांतने व्हाईट कलरच्या शर्टावर सुंदर डिझाईन असलेला शर्ट आणि खाली ब्लॅक पॅन्ट घातली होती. दोघंही एकदम हिरो सारखे तय्यार होऊन बसले होते.

मी खाली आले..., माझ्याकडे दोघांच लक्ष जाताच ते दोघे ही मला बघत उभे राहिले. मी पायऱ्या उतरून खाली आले... "बसा बसा." मी हसतच आपल्या दोन्ही हातांनी त्यांना बसण्याचा इशारा केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ते दोघेही नकळत उभे राहिले होते.

"सुंदर दिसते आहेस प्रांजल." राजने मला छान कॉम्प्लेमेन्ट दिली. "थँक्स राज." मी निशांतकडे पाहिलं, मला वाटलं तो देखील काही बोलेल, पण शेवटी खडूस... तो काय बोलणार. आम्ही आता हर्षुची वाट बघत होतो. ती देखील अनारकली ड्रेस घालून आली. माझ्यासारखाच काहीसा तिने मेकअप केलेला. राजने आम्हाला बघुन तर चक्क जुळ्या बहिणी वाटत आहात.. अस संबोधल ही. यावर आम्ही ही लगेच एकमेकांना मिठी मारत माना डोलावल्या....

आम्ही सगळे गाडीत बसून दर्शनाला निघालो. एक दीड तासाने आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो. आम्ही तिघे उतरून राज ती वाट बघत थांबलो.., कारण राज गाडी लावायला गेला होता. तो येताच आम्ही दर्शनासाठी लागणाऱ्या वस्तू तिथल्या स्टॉलवरून घेतल्या आणि निघालो. आत जाताच भली मोठी रांग आम्हाला दिसली तसे आमचे खुललेले चेहरे खाली पडले. आम्ही सगळे त्या रांगेत उभे राहिलो असता, राज मंदिराच्या ऑफिसमध्ये निघुन गेला. आज चांगलचं ऊन पडल्याने आमची डोकी उन्हात भाजून निघत होती. आम्ही लगेच आमच्या ओढण्या डोक्यावर घेतल्या. त्यांचा चांगल्याच वापर त्या उन्हात होत होता... तोच राज आणि त्याच्या सोबत भडजी काका असे ते दोघे आम्ही उभे असलेल्या जागी आले. ते आजोबा वजा भडजी काका राज सोबत काही तरी बोलत आमच्या दिशेने येत होते.

"राज साहेब तुम्ही येणार आहात हे कळवल असत तर तुम्हाला लगेच दर्शनासाठी आत मी स्वतः घ्यायला आलो असतो. काही हरकत नाही... तुम्ही आणि तुमच्या मित्रांना आता दर्शन मिळेल." आमच्याकडे येत त्यांनी आम्हाला आता नेलं. गर्दीतून काही माणसं चूळबुळ करत होती. आम्ही आत जाताच आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळाल. आम्ही पटकन आत जाऊन पूजा करून बाहेर आलो. जास्त वेळ न लावता.

बाहेर येताच मी लेगच राजला प्रश्न केला.... "राज एक गोष्ट सांग... तु आत जाऊन अस काय सांगितलंस की, आपल्याला लगेच दर्शन मिळालं..??" मी उत्सुकतेने राजकडे बघत होते. "खास अस काही नाही ग..., मी फक्त एक विनंती केली की, मी सरणाईकांचा मुलगा आहे. मी आणि माझे काही फ्रेंड्स दर्शनासाठी आलो आहोत. तर आम्हाला जरा लवकर दर्शन मिळेल का..? बस त्यांनी लगेच दर्शन दिल." येवढ बोलुन त्याने माझ्याकडे बघून एक डोळा मारला आणि पुढे निघुन गेला... "फक्त आडनाव सांगून दर्शन... भलतच आहे बुवा यांचं तर....!"

आजूबाजूला निसर्ग डोळ्यात भरत आम्ही तिथल्याच एका हॉटेलवर थांबलो. साधं डाळ-भाताचा बेत जेवुन सगळे आराम करायला गेलो. यावेळी आम्ही दोन रूम घेतल्या होत्या. त्यातल्या एका रूममध्ये मी आणि हर्षु, तर दुसऱ्यात निशांत आणि राज असे होतो. सगळे दुपारी एक झोप काढुन फ्रेश झालो. मग मीच सर्वाना समुद्रावर जायचा हट्ट केला. आधी नाही नाही करत सगळे तय्यार झाले.. त्यांचं म्हणणं होतं की, आपल्या बंगल्या समोर आहे ना तिकडे जाऊया.. पण मला याच समुद्रावर जायचं होतं. आणि शेवटी मी सर्वाना घेऊन गेलेच...

एक दोन फोटो आठवणीसाठी आणि आईला दाखवण्यासाठी काढले.. निशांत माझे आणि हर्षुचे फोटो काढत होता. त्यांनतर आम्ही समुद्रावर उभं राहून समोरचं सौंदर्य मनात साठवत होतो...
संध्याकाळी गेल्याने सूर्याची लाल, तांबुस किरणे चौफेर पसरली होती. सकाळी कामावर गेलेले पक्षी, आप-आपल्या घरी परतत होते. सूर्यदेव ही सर्वांचा निरोप घेत समुद्राच्या पोटात लपायला जावा तसाच खाली-खाली जात होता... समुद्रावरील ते दृष्य मनात घर करून गेलं. त्या सुर्यासारख आम्ही ही आता आमच्या प्रवासाला लागलो. आणि परत
बंगल्यावर जायला निघालो.

यावेळी निशांत गाडी चालवत होता. मी मागे बसून होती तर, हर्षुने आधीच पुढची जागा मिळवली होती. राज काहीही ऑपशन नसल्या सारखा माझ्या बाजुला येऊन बसला. खर तर मनातुन तो खूप खुश होता, पण चेहऱ्यावरचे भाव मात्र नोर्मल होते. प्रवास करत आम्ही आमच्या बंगल्यात परतलो. प्रवासात थकल्याने सगळेच आप आपल्या रूममध्ये निघून गेले.


मी देखील माझ्या रूममध्ये आले. गरम पाण्याने छान बाथ घेत बेडवर आडवी झाले. थकाव्यामुळे कधी झोप लागली ते देखील कळलं नाही... जाग आली ते हर्षुच्या आवाजाने. ती दरवाजा वाजवत होती... मला जेवायला बोलण्यासाठी आलेली. मी चाचपडत मोबाईलच्या घड्याळात पाहिलं, रात्रीचे आठ वाजले होते. पटकन उठून आधी दरवाजा उघडला.

"अग.., कधीची हाक मारत होते. झोपली होतीस वाटत...?? चला मॅडम जेवायला." मी मानेने होकर देत तिला पूढे व्हायला सांगितलं. फ्रेश होत मी खाली जेवायला गेले. आज छान असा पुरणपोळीचा बेत होता. जेवण करून आम्ही चौघे ही टेरेजवर गप्पा मारायला गेलो.

"या निरभ्र आकाशात छान चांदण पडलं आहे नाही..!!. असंख्य चांदण्या जणू काही आज आम्हाला दर्शन देऊ पाहत आहेत असाच वाटत आहे बघून.., म्हणून की काय तो चांदोबा एका बाजुला रुसल्यासारखा गाल फुगवून बसलाय. मुंबईत कुठे हे अस काही बघायला मिळत नाही..!!!. मनाला आनंद देणार." माझ्या तोंडातुन नकळत असे शब्द बाहेर पडले त्या दृष्याला बघुन. माझं अस बोलणं ऐकून सगळ्यांनी एकदम टाळ्याचं वाजवल्या... "हे काय आता नवीन..." मी बघत विचारल.. "अग एवढं छान वर्णन केलंस तु.." निशांत लगेच बोलला... मी एक स्माईल दिली आणि आम्ही परत गप्पा मारू लागलो...


तोच राजने विषय काढला... "गाईज उद्या भटकंतीसाठी जायचं का..??" भटकंतीच नाव येताच मी लगेच तय्यार झाले.. माझ्यामागे निशांत.. आणि मनात नसतानाही हर्षु..
"चला मग उद्या लवकर उठायचं आहे.., तर आता जाऊन झोपुया नाही तर उठणार नाही कोणी...," माझ्या बोलण्यावर सगळ्यांनी लगेच लहानमुलांसारखा होकार दिला आणि एक लाईन करून निघाले ही.. मग मी पण त्यांच्या मागे जाऊन त्यांना जॉईन झाले.. एक क्षण आम्ही लहान झालो होतो.


खाली येत सर्वांना गुड नाईट करून मी माझ्या रूममधे आले. उद्या जायचं म्हणून मोबाईलमध्ये पाच चा अलार्म लावला आणि झोपी गेले... उद्या निसर्ग दर्शन होणार म्हणून मी चांगलीच खुश होते.... आणि लगेच निद्रेच्या स्वाधीन झाले.

to be continued........