Rang he nave nave - 1 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | रंग हे नवे नवे - भाग-1

Featured Books
Categories
Share

रंग हे नवे नवे - भाग-1

'मैथिली काय ठरवलं आहेस शेवटी तू?' 'आई, माझं अजूनही काहीच ठरत नाही आहे. जाऊ दे मी घालेल कुठलाही एखादा ड्रेस. मला नाही सुचत आहे काही.' 'अग ए!! ड्रेस काय ड्रेस.. आपल्या घरचं लग्न आहे आणि साधा ड्रेस.. ते काही नाही तू छान साडीच घाल', मैथिलीची काकू म्हणाली. 'मी तर आता हिच्याशी ह्या विषयावर डोकं लावनच सोडलं आहे. तू आणि ती बघून घे. आदितीच लग्न ठरल्यापासून ती confuse आहे काय घालावं.', मैथिलीची आई वैतागून म्हणाली. आदिती म्हणजे मैथिलीची आत्तेबहिण जी फक्त तिच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. 'अादितीला जेव्हा बघायला सुरवात केली तेव्हा किती उत्साही होती तू मैथिली की मी हे घालणार, अस करणार, तस करणार. आता काय झालं तुला?? आणि engagement ला पण किती छान तयार झाली होती. तर मला तर वाटलं माझीच दृष्ट लागेल, किती जणांनी विचारलं हीच लग्न करायचं का?', तिची आई म्हणाली. 'हेच कारण आहे आपण आपलं चांगलं तयार व्हायचं आणि लोक आपल्या कडे marriage material म्हणून बघतात. आणि काय ग काकू तुझं काय जातं साडी घाल म्हणायला, its like offer to invitation!म्ह्णून मी नाही आवरणार कळलं!', इतक्या वेळ शांत असलेली मैथिली बोलली. 'अच्छा तर हे कारण आहे! पण अगं आता लग्नाचं वय झाल्यावर विचारणारच ना', तिची काकू म्हणाली. 'आणि कोणी मागणी घातली तर आम्ही काही लगेच तुझं लग्न लावून नाही देणार', तिची आई तिला म्हणाली. 'अस म्हणायला काय जातं, मला तर लोकांपेक्षा तुमचीच जास्त भीती वाटतीये की द्याल तुम्ही लग्न लावून', मैथिली मनातच म्हणाली. 'हे बघ मैथिली, आम्ही काही इतक्यात तुझं लग्न करणार नाही, तुझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे ह्याची जाणीव आहे आम्हाला, त्यामुळे तू ह्या गोष्टीचं अजिबात टेन्शन नको घेऊ आणि आता पटकन decision घे. लग्नात काय घालायचं, मी तर म्हणते छान साडीच घाल!', तिची आई तिला समजावत म्हणाली. 'तस आई बरोबर म्हणतिये घरच्यांना पण माझी काळजी आहे. ते ऐकणार नाही तस कुणाचं. काय हरकत आहे छान साडी घालून तयार होण्यासाठी आणि मी माझा आनंद दुसऱ्यांसाठी का म्हणून सोडू आणि माझी इच्छाच नाही लग्नाची तर कुणीही काहीही करू शकत नाही आणि घरचे जबरदस्ती तर अजिबातच करणार नाही एवढा तर विश्वास आहे त्यांच्यावर. चला आता मी छान तयार होणार बाकीचे लोक गेले उडत. आता मला नाही फरक पडत', मैथिली मनाशीच म्हणाली. 'जशी आपली आज्ञा मातोश्री!!!', तिच्या आईला हसून म्हणाली आणि त्यांचा साडी, ज्वेलरी सिलेक्ट करण्याचा उद्योग चालू झाला. खूप कमी दिवस होते हातामध्ये. त्यातही आदीतीचं बघायचं, स्वतःच बघायचं ह्या मध्ये तिची खूप ओढाताण होत होती पण लाडक्या बहिणीचं लग्न जे होत! त्यामुळे तिला त्याचा काही त्रास होत नव्हता.
अखेर लग्नाचा दिवस उजाडला. मैथिली सुंदर तयार झाली होती आणि महाराष्ट्रीयन लुक मध्ये तर ती एकदमच उठून दिसत होती. आता नवरीच्या सोबत सतत राहावं लागत असल्यामुळे तीही तितकीच फ्लॅश मध्ये होती. आणि प्रत्येक जण तिला हेच म्हणत होतं आता पुढचा नंबर तुझा! तिचा खर तर अश्या प्रत्येक कंमेंट वर पारा चढत होता. पण लोकांसाठी आपला मूड खराब नाही करायचा हे तिने कुठेतरी ठरवले होते. त्यामुळे ती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आणि मस्त पैकी लग्न एन्जॉय करत होती. लग्नामध्ये त्यांनी दुष्यंत (आदीतीच नवरा)चे बूट चोरले पण त्यांच्या हाती एकच बूट आला.जेव्हा त्यांनी पैशांची डिमांड केली तेव्हा दुष्यंन्त तर पैसे द्यायला रेडी होता पण मध्येच एक मुलगा आला, 'ए दुष्यंन्त, अजिबात द्यायचे नाही ह पैसे.. त्यांच्या कडे एकच बूट आहे, दुसरा माझ्याकडे आहे. काय करणार हे लोक एक बूट घेऊन!', तो थोडा भांडण्याच्या सुरातच बोलाला. 'अरे विहान, जाऊ दे त्यांनी एक चोरला आहे.', दुष्यंन्त त्याला समजावत म्हणाला. 'अरे हो मी तेच सांगतोय एकच चोरला आणि एका बुटाच काय करणार आहेत ते त्यापेक्षा देऊन टाका म्हणावं तसाच.', हा नक्कीच ह्याचा एकतर भाऊ किंवा मित्र असावा असा मैथिलीने अंदाज बांधला. 'हे बघ तू जे कोणी आहेस ते, आम्ही बूट चोरला आहे पैसे द्या आणि बूट घ्या आणि मुळात दुष्यंन्तने ही डील agree केली, so तू मध्ये बोलण्याचा प्रश्नच नाही.', इतक्यावेळ गप्प असलेली मैथिली बोलली. 'हे बघ मी तुला बोललेलो नाही आहे. मी दुष्यंन्तला बोलतोय. तू उगाचच आमच्यात नको पडू', विहान तिला बोलला. 'मला काही हौस नाही आली आहे तुमच्यात पडण्याची तू मध्ये बोलतो आहेस म्हणून मी बोलले कळलं!', मैथिली त्याला बोलली. 'आता तर द्यायचेच नाही पैसे. काहीही होऊ दे', विहान पण रागातच बोलला. 'ए आता तुम्ही भांडू नका हा please!!', दुष्यंन्त त्या दोघांना म्हणाला. 'मी भांडत नाही आहे हा च कोण आहे तो तोच भांडतोय उगाचच', मैथिली त्याला म्हणाली. 'कोण आहे तो काय लावलंय ग किती वेळच विहान आहे माझं नाव विहान......!!!! लक्षात ठेव.' 'गरज नाही त्याची', मैथिली म्हणाली, 'आणि अश्या भांडखोर लोकांना लक्षात ठेवायची अजिबात इच्छा नाही आहे माझी.' तिने रागाने बूट त्याच्या हातात दिला 'घे दान दिला मी. इतका रडू नको', अस म्हणून ती रागाने निघून गेली. 'काय रे विहान का भांडलास तू. ती बिचारी गेली ना!', दुष्यंत त्याला म्हणाला. 'ऐ तू काय तिला बिचारी म्हणतोय. किती उद्धट आहे ती कुठल्या angle ने बिचारी वाटली ती तुला. इथे माझा अपमान करून गेली आणि म्हणे बिचारी. पोरी जीव ओवाळून टाकतात ह्या विहान वर आणि ही चक्क माझा अपमान करून गेली.' 'पुरे झालं हा स्वःता च कौतुक इतक्या पोरी टाकतात न जीव ओळवून तर मग कर ना लवकर लग्न. घरचे असेही मागे लागले आहेत. आता तर तू eligible आहेस.' 'मला जशी हवी तशी मिळत नाही आहे रे म्हणून, मिळाली की करेन ना! लवकर मिळावी. बर घे घाल तुझे बूट आणि थँक्स म्हण तुझे किती पैसे वाचवले काही कल्पना आहे का तुला.', विहान म्हणाला. 'धन्यवाद !!आभारी आहे तुझा..' दुष्यंत त्याला म्हणाला. लग्नाचे सगळे विधी आटपले आणि आदिती जायला निघाली. मैथिली आणि आदिती दोघीही खूप रडल्या. 'बापरे!! झाशीची राणी चक्क रडतीये', विहानने मैथिली कडे पाहून कंमेंट पास केली. ते नेमकं दुष्यंन्तने ऐकलं 'हे बघ अश्या दुसऱ्यांच्या इमोशन्स वर कंमेंट करू नये विहान!!! त्या दोघींची bonding खूप strong आहे', तो विहानला म्हणाला. 'sorry! चुकलं बाबा.', विहान म्हणाला. 'कुठून ह्याच्या समोर बोललो काय माहिती' विहान मनातच म्हणाला आणि एकदाचं वऱ्हाड निघाल.