9
उभा घटने नन्तर तर गावाला जणू ग्रहण लागलं होतं ,गावातले प्रतिष्ठित व्यक्ती जसे सरपंच,मुख्यध्यापक यांचा मृत्यू झाला होता,पाटील गावातून गायब झाले होते,गावातून बाहेर पडायला मार्ग नव्हता...दर दोन दिवसातून एक व्यक्ती गायब होत होता,गावातून बाहेर पडण्याचा मार्गही नव्हता,श्रीधर तर पूर्णतः नैराश्यात गेला होता.विजू ने पुन्हा तिकडं वळून न बघण्याचा निर्णय घेतला .
गावातला प्रत्येक व्यक्ती पुढचा नंबर आपला नसावा अशी प्रार्थना करत दिवस काढत होता.
असाच एक महिना निघून गेला.मागच्याच आठवड्यात आलेल्या अमावस्येच्या तर 3 लोक एकाच दिवशी गायब झाले.गावात घाबराटीच वातावरण होत.अशाच वेळेत एके दिवशी सकाळी सकाळी कविता पळत पळत विजू च्या घरी आली,होणाऱ्या सासू सासर्यांना नमस्कार करून तिने नेहमीप्रमाणे गाढ झोपलेल्या विजू खडखडून उठवलं.
"कविता तू...पुन्हा इतक्या सकाळी... आता काय झालं?"
"विजू उठ,,मला एक नामी युक्ती सापडली आहे,त्या वाड्या विषयी "
"त्या वाड्याचं नाव नको ग काढू,,आजही तो दिवस आठवला तर काळजात धडकी भरते"
"एकदा ऐकून तर घे"
"ठीक आहे सांग"
"तुला आठवत जेव्हा सरांचा मृत्यू झाला होता.त्यावेळी त्यांच्या हातात आपल्याला ग्रंथालयाची चावी होती.त्या चविवर 4 असा नंबर होता म्हणजेच ती ग्रंथालयाची चावी होती.मला तेव्हाच वाटलं होतं की सरांना काहीतरी मार्ग सापडला आहे ते.म्हणून मग मी त्यानंतर पूर्ण ग्रंथालय चाळून काढलं... पण दुर्दैवाने तेव्हा काही सापडलं नाही.काल असच त्या चावीला न्यहाळात असताना मला त्यावर अजून काहीतरी दिसलं.त्यावर लहान अक्षरात 4 हा अंक पुन्हा रेखाटला होता.मग मी ग्रंथालयाची जी चावी माझ्याकडं होती ती बघितली,त्यावर मात्र तसलं अंक नव्हता... मी त्याचवेळी ताडकन उठून मग ग्रंथालयात गेले.तिथं संपूर्ण जागा नीट न्याहाळली आणि मला अस लक्षात आलं की एका कपाटावर 4 हा अंक होता,,मात्र इतर कपाटांवर काहीच नव्हतं.मी सहजच ते कपाट उघडलं.सर्व पुस्तक बाहेर काढली,,आणि आश्चर्य,त्या कपाटाच्या मागच्या बाजूला पण एक न कळणारी उघडण होती.मी ती पत्र्याची उघडन हळूच उघडली आणि आतमधे एक पोकळ जागा लागली.त्याच जागेत काही कागदांचा गठ्ठा होता.तो बऱ्यापैकी जुनाट वाटत होता.मी हळूहळू करून वाचायला सुरुवात केली.आपल्याला सरांनी जी कथा सांगितली होती ना त्याच्या पुढचा तो भाग होता."
"त्या कथेला पुढचा भाग पण होता"
"हो,,त्यात जी शेवन्ता नावाची मुलगी होती ना तिची माहिती होती...आणि त्यात एक फार महत्वाची माहिती होती.त्यानुसार जर का त्या वाड्याला त्या दृष्ट शक्तींपासून स्वतंत्र करायचं असल्यास ते काम फक्त शेवंतांची वारसच करू शकते."
"आणि ते कसं?"
"त्यानुसार तो सम्पूर्ण वाडा त्या वारसाचा प्रामाणिक आहे,त्या वाड्यातील कोणतीही शक्ती त्या वारसाच काहीही बिघडवू शकत नाही.आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या शेवंतांची वारस आपल्याच गावात आहे"
"तिची वारस.... तिची वारस आपल्या गावात आहे!!!",उतावळा होत विजू विचारू लागला.
"हो,त्या पुस्तका अनुसार ती वारस दुसरी कुणी नसून मीच आहे"
"काय!!!!,,तू शेवन्ताची वारस,कसकाय?"
"त्या कागदामध्ये वनशावळ दिली होती,मी ती नीटपणे वाचली आणि मग नीट उलगडल्यानंतर कळालं कि सध्या तरी मी एकटीच वारस आहे"
"त्यात तुझं नाव लिहिलेलं होत?"
"नाही रे...माझं नाव कस असणार त्यात? त्यामध्ये अशा विक्षिप्त प्रवृत्तींची वनशावळ कशी चालते हे सांगितलं होत,,त्याच उत्तर शोधन तस अवघड होत,पण मग मी आणि श्रीधर ने बुद्धीचा कस लावला आणि माहित करूनच घेतलं."
"श्रीधर ला सुद्धा हे माहित आहे!!त्याला का सांगितलं?तुला माहित आहे ना कि आधीच तो किती नैराश्यात आहे ते... आता तो त्या वाड्यावर येण्याची रडपड करणार."
"त्याने पण स्वतःचे वडील,मित्र गमावले आहेत,त्याला पण हे कळण्याचा अधिकार आहेच ना?आणि त्याची बुद्धी पण तीक्ष्ण आहे,आपल्याला त्याचा फायदाच होणार बघ."
"ठीक आहे... आता आपणा तिघांनाच सम्पूर्ण गाव निकामी होण्याआधी त्या वाड्याचा निकाल काढावच लागणार...पण मला एक शंका आहे,,तू शेवन्ताची वारस आहे हे मानलं पण मग त्या शक्तीला हरवनार कस?"
"त्याचा उपाय पण त्या कागडांमध्ये होता"
"खरंच!!दाखव ना ते कागद"
"नाही ते आम्ही कालच नष्ट केलेत,अजून कोणाच्या हाती एव्हढी महत्वाची माहिती लागावं अशी माझी इच्छा नाहीये,,पण चिंता नको करू मी आणि श्रीधर ने मिळून ते सगळं डोक्यात फिट केलंय"
"मग सांग काय आहे ते!!"
विजू ने विचारताच कविता ने हळूहळू करून सगळी माहिती विजू ला सांगितली,पूर्ण पद्धत ज्याप्रकारे त्या दृष्ट शक्तीचा नाश करता येईल ,जवळ जवळ एक तासभर दोघांच सम्भाषण सुरु होत ,आणि सगळ्यात शेवटी एक पदार्थ सांगितला ज्याची सगळ्यात जास्त गरज होती तो म्हणजे मृगरस
"मृगरस??म्हणजे हरणांचं रस?"
"नाही रे,तो एक पदार्थ आहे ,त्याची पण सामग्री आहे,मी ते आजच तयार करून घेईल."
"बापरे इतक्या तयारीत आली आहेस तू?मग तर कधी जायचं तिकडे हे हि सांग"
"नाही ते तू ठरव"
"मी ठरवू!!!... ठीक आहे जेव्हा तुझा हा मृगरस पूर्णपणे तयार होईल त्यानंतर लगेच निघू"
"तो तर आजच तयार होईल,,मग उद्याच जायचं?"
"चांगल्या गोष्टीसाठी उशीर कशाला,तेवढेच दोन तीन माणसं कमी मरतील,जाऊया उद्याच,पण श्रीधर तयार होईल का उद्यासाठी?"
"तो तर आजही तयार आहे".
"ठीक आहे ठरलं तर मग,,उद्याच त्या वाड्यावर जाऊ,,विठ्ठलाच्या मनात असेल तर आपला विजय नक्कीच होईल"
क्रमश: