Julale premache naate - 12 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-१२

Featured Books
  • నిరుపమ - 7

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 20

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 6

                         మనసిచ్చి చూడు -06అప్పుడే సడన్గా కరెంట్...

  • నిరుపమ - 6

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 19

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१२

छान प्रवास चालु होता. निशांत गाडी चालवत होता आणि मी बडबड करत होते.. काय आहे ना मी झोपले तर निशांत ही झोपायचा मग आम्ही कोकणात नाही ढगात पोहोचायचो... छान पहाट होत होती.. मी पहिल्यांदाच अशी पहाट अनुभवत होती... आम्ही आता कोकणच्या रस्त्याला लागलो असल्याने दुतर्फा झाडं आणि मधुन रस्ता... पण काळोखामुळे काही दिसत नव्हतं हे वेगळं. मी अंदाज लावत होते सगळ्याचा.
जसे आम्ही पुढे जात होतो.., तो झोपलेला सूर्य उठण्याच्या तय्यारीत दिसत होता. त्याचा तांबडा-पिवळा रंग आकाशात पसरत होता..

माझी आणि निशांतची झोप झाल्याने आम्ही सकाळचा सूर्योदय बघण्यासाठी गाडी बाजुला लावत होतो. गाडी बाजुला लावून दोघे उतरलो. निशांतने रस्त्याच्याकडेला जाऊन बॉटल मधल्या पाण्याने स्वतःचा चेहरा धुतला. मी देखील थोडे फ्रेश झाले. आम्ही बाजूला असलेल्या गाडीला टेकून उभे राहिलो.

समोर तांबुस रंगाचा सूर्य हळूच आपले डोके वर काढू पाहत होता. त्याचा तो तांबूस, लाल आणि पिवळा रंग सगळ्या आकाशभर पसरला होता. काही पक्षी मॉर्निंग वॉकसाठी निघाले असावेत. असेच आकाशात उडत होते. तो क्षण मी आणि निशांत आपल्या नजरेत भरून घेत होतो. आम्ही त्या क्षणात हरवलो असता मागून राज आणि हर्षु ही आले. माझं लक्ष जातात मी त्यांना गुड मॉर्निंग विश केलं....., "गुड मॉर्निंग हर्षु...राज." त्यांनी ही मला आणि निशांतला विश केलं.

"काय मग झाली का झोप..??" मी हसत दोघांना विचारल असता त्यांनी झोपेतच माना डोकावून होकार दिला..
काही वेळ आम्ही तो क्षण एकत्र बघत उभे राहिलो. त्यांनतर तिथुन निघालो... आता राज गाडी चालवत होता. त्याच्या बाजुला निशांत बसलेला.. पुढच्या सीटवर बसून त्यांचं दोघांचं बोलणं चालू होतं. मागे मी आईला फोन करून पोहोचल्याच सांगत होते. तर हर्षु देखील स्वतःच्या आईला कॉल करत होती. राज आजुबाजुच्या भागाची म्हाहिती देत होता. आम्ही बऱ्यापैकी त्याच्या फॉर्महाऊस जवळ पोहोचत होतो.

"गाईज हे सगळं दूरवर पसरलेलं दिसत आहे ना ते आपलच आहे." माझ्या तोंडात तर फक्त वाह...!! याशिवाय दुसरा शब्दच नव्हता. दूरवर समुद्राचा हलका आवाज येत होता. जसं जसे पुढे जात होतो, तो आवाज वाढत गेला. थोडं अंतर पार करून आम्ही एका मोठ्या गेटच्या आत एंटर केलं. मी गाडीतुन बाहेर पडली. समोर एक मोठा बंगला होता. माझ्यासाठी तरी तो सुंदर असा बंगलाच म्हणावा लागेल असा होता...


आम्ही पोहोचताच काही नोकर आले आणि त्यांनी आमच्या ब्यागा गाडीतून काढून घेतल्या आणि ते आत गेले. मी माझ्या जवळची बॅग घेतली आणि गाडीतुन उतरली... खाली उतरताच मी त्या बंगल्यासमोर असलेल्या गार्डनला बघतच राहिले. ते गार्डन खुपच आकर्षित असे होते.


आजू-बाजूला नारळाच्या झाडासारखी शोभेची झाडं लावण्यात आलेली होती. तर गार्डनच्या भोवताली वेग-वेगळ्या प्रकारची आणि रंगाची फुलझाड ही होती. पण गार्डनची शान होता तो मध्यभागी असलेला कारंजा. "सुंदर...!!" नकळत माझ्या तोंडातुन शब्द बाहेर आला. मी सगळं ते बघतच तिथे उभे राहिले. मागून राज येत बोलु लागला...,"काय मग आवडलं का गार्डन..??" मी त्याच्याकडे बघत एक भलीमोठी स्माईल दिली. मग आम्ही आत आलो. तो बंगला बाहेरून जेवढा प्रशस्त होता, तेवढाच आतून ही होता.


समोर मोठा असा दिवाणखाना होता. आजुबाजूलाच्या भिंतीवर जुन्याकाळातील विविध व्येक्तींच्या पेंटिंग लावल्या होत्या. भिंतीवर काही प्राणांची डोके ही लावली होती. शिकार केल्यावर त्या प्राण्यांची डोकं शोभेसाठी लागली असावीत.. मला तर लगेच वाईट वाटलं त्या प्राण्यांच...
सोबत महागातल्या शोभेच्या वस्तूही होत्या.

वर जायला दोन्ही बाजूने गोल अशा प्रकारचे दोन जिने होते. आणि त्या दिवाणखान्याची शोभा वाढवत होता तो काचेचा झुंबर... जो ऐटीत त्या दिवाणखान्याची शोभा अजूनच खुलवत होता.. अगदी टीव्ही मधल्या बंगल्यासारखा असा तो बंगला माझ्यासमोर होता. "प्राजु चल तुला तुझा रूम दाखवते." हर्षु आणि मी तर. राजने निशांतला त्याचा रूम दाखवायचा होता म्हणुन आम्ही एकत्र सगळे वर गेलो..

निशांत आणि माझा रूम डाव्याबाजूला लागून होते.... तर हर्षु आणि राजचे रूम जिना चढुन वर गेल्यावर उजव्या बाजुला होते. सकाळी पोहोचल्याने आम्ही सगळे छान फ्रेश होण्यासाठी स्वतः स्वतःच्या रूममधे गेलो. फ्रेश होऊन खाली नाश्त्यासाठी जायचं होतं म्हणून मी तय्यार होऊन खाली आले. डायनिंगसाठी वेगळा रूम होता. राज आधीच येऊन बसला होता. मी ही त्याला जॉईन झाले.

"राज तुमचा हा बंगला खूपच सुंदर आहे. मला तर खुप आवडला..," मी चेअरवर बघत बोलले. "आवडला ना तुला..!!? राज... "आवडला..! हा काय पश्न झाला का राज खुप सुंदर आहे. अगदी एखाद्या टीव्ही मधल्या बंगल्यासारखा." मी आजूबाजूला बघत बोलले. "तुला म्हाहित आहे का...?! हा बंगला मला माझ्या अठराव्या बर्थडेला डॅडने गिफ्ट केला होता. हे ऐकताच मी बेशुद्ध व्हायची बाकी होते. म्हणजे स्वतःच्या मुलाला बर्थडे गिफ्ट म्हणून बंगला गिफ्ट करण. हे नक्कीच श्रीमंत असतील.


"ए हॅलो..? कुठे हरवलीस..." काही नाही असच मी हसत बोलले. पण मनात मात्र विचार की नक्कीच हे खुप श्रीमंत असतील... "तुला म्हाहित आहे का..! माझं ड्रीम आहे की, मला माझ ड्रीम हाऊस पॅरिसमध्ये घ्यायच आहे आणि हो या बर्थडेला डॅड मला माझं ड्रीम हाऊस गिफ्ट करणार आहेत.
"अरे वाह..!!. खुप छान. कधी आहे तुझा बर्थडे राज..???"
अग नेक्स्ट महिन्यात. तु नक्की यायच हा.. तुला ऍडव्हान्स मधेच इन्व्हाइत केलं आहे मी. मी मान हलवूनच होकार दिला.

"कशा बद्दल आमंत्रण दिल जात आहे. मला ही सांगा म्हणजे मी देखील सोबत येईल..," मागून हर्षु येत बोलली. "अग राज त्याच्या वाढदिवसाच्या आमंत्रणा बद्दल बोलत होता आणि तुला कसलं आमंत्रण मॅडम. तु तर हवीच ना.. मी डोळा मारतच हर्षुकडे पाहिल. "वो तो है। मी हवीच नाही तर भाई चा बर्थडे व्हायचा नाही.. आणि आम्ही हसु लागलो. तितक्यात निशांत आला.

निशांत एंटर होताच माझं आणि हर्षुच त्याच्या वर लक्ष गेलं. " त्याने ब्लॅक शॉर्ट हँडच टिशर्ट घातल होत. त्यात त्याच ते जिम मधलं शरीर कोणालाही भूरळ पाडणार होतं. तो येताच हर्षु ने माझ्याकडे पाहिले आणि फक्त माने समोरून हात फिरवला. जस की, "मार डाला..," असच तिला बोलायच असावं. तो येताच माझ्या आणि हर्षुच्या मधल्या चेअरवर बसला.

नाश्ता घेऊन एक नोकर आला. ब्रेड-बटर, उकडलेली अंडी, ओंब्लेट ही होत. आम्ही सर्व त्यावर तुटून पडलो. खाता खाता माझं लक्ष निशांत वर गेला. त्याचे नुकतेच धुतलेले ओले केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते. त्यात तो अजूनच हँडसम दिसत होता. मी त्याच्याकडे पाहत असतानाच राज मधेच बोलला... "गाईज., आपण आता बाहेर फिरायला जाऊया का.???" "आज नको कारण माझी आणि निशांतची झोप झाली नाहीये.. आपण एक काम करूया.., आज आराम करूया आणि संध्याकाळी बीचवर जाऊ.." माझ्या या कल्पनेवर सर्वांनी माना डोलावल्या.. नाश्ता संपवुन आम्ही बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसलो.


गार्डनमध्ये सुंदर फुलझाडं लावली होती मग काय मी छान फुलांचे फोटो काढत बसले..तोच मला एक कल्पना सुचली आणि मी ते केलं सुद्धा.... "हॅलो.., आजोबा मी बोलतेय प्राजु...! कसे आहेत आणि गोळ्या टाईमवर घेत आहात ना..? आणि आजी आहेत का..?? त्याला विचारल सांगा."
मी फुलांना बघून आजोबांना कॉल केला होता.. आमच्या गप्पा चालू असता हर्षु आली... "कोणाशी बोलतेस ग एवढं..??" मी हाताने इशारा करून नंतर सांगते सांगून बाजूला गेले... थोडा वेळ छान गप्पा मारून आले. तर सगळे आत गेले होते.. जेवण तय्यार झालं होतं. मग मी देखील त्यांना डायनिंग वर जॉईन झाले.

जेवुन आम्ही आराम करायला गेलो. माझा रूमची खिडकी समुद्राच्या समोर असल्याने मी छान खितडकीत बसून समुद्र बघत होते... बघता बघता मला झोप येऊ लागली मग मी बेडवर येऊन स्वतःला झोकुन दिल. जाग आली ती कोणाच्यातरी दार ठोकवण्याने... मी कंटाळतच डोळे उघडले आणि दरवाजा उघडायला गेले.. दरवाजा उघडताच समोर राज दिसला... मी प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितल... "अग जायचं आहे ना समुद्रावर म्हणून उठवायला आलो आहे.. चल लवकर फ्रेश हो आणि खाली ये.." एवढं बोलुन तो गेला देखील. माझ्या उत्तराची वाट न बघता. "हा, आला काय गेला काय..." स्वतःशीच बडबडत मी फ्रेश होण्याकरता गेले..

फ्रेश होऊन शॉर्टस घातले. थ्रीफोर्थ लाईट ब्लु जीन्स आणि त्यावर लाईम कलरचा टिशर्ट. ऊन असेल म्हणून गॉगल ही सोबत घेतला. माझ्या जवळची छोटी स्लिंग बॅग घेऊन मी खाली आले.. मी येताच दोघे ही माझ्याचकडे बघत होते. मी जरा अवघडले कारण अस ते बघत होते जसे की भूतच समोर उभा असावं...

बॉईज असे का बघत आहात मी काय भुत नाहीये... "अग छान दिसते आहेस.., तुला अशा कपड्यांमध्ये पाहिलं नव्हत ना म्हणुन., राजने निशांतकडे बघत वाक्य पूर्ण केलं.. त्यावर निशांतने मान डोलावली.. यावर मला मात्र चांगलंच हसु आल. "मग काय कॉलेजमध्ये घालून येणार का असे कपडे... " पिकनिकला छान वाटत आणि कॅरी करायला बर पडत.. म्हणुन मी आणि हर्षुने ठरवल होत.. मी डोळा मारतच सांगितलं. मी बोलत असता हर्षु ही आली. तिनेही शॉर्टस घातले होते...

मग आम्ही सगळे निघालो. राजच्या बंगल्यापासून बीच दहा मिनिटांवर होता.. मी आणि हर्षु बोलत पुढे चालत होतो. तर आमच्या मागे निशांत आणि राज. संध्याकाळ असल्याने बीचवर काही लोकं होती.. संध्याकाळचे पाच वाजत होते.. समुद्रावर ओहोटी असल्याने पाणी आत गेलं होता...

आम्ही जाऊन एका ठिकाणी थांबलो. छान फोटो घेतले. कधी हर्षु आणि माझे तर कधी निशांत व राजचे... तर कधी निशांत आणि हर्षु तर माझे आणि राजचे...
अस करता करता माझे आणि निशांतचे ही फोटो काढले.. जेव्हा ग्रुप फोटो काढत होतो तेव्हा नकळत निशांतच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि मी मोहरले. त्याने ही चमकुन माझ्याकडे पाहिले कदाचित त्याला ही स्पर्श जाणवला असावा. छान फोटो काढले. चालत चालत आम्ही पूढे गेलो समुद्रावरील थंड हवेमुळे माझ्या केसांचा पिंजरा होत होता हे बघून निशांतला स्वतःच हसु आवरलं गेलं नाही.. तो जोरजोरात हसु लागला. हे बघुन मी चांगलीच चिडली..


"यात हसण्यासारख काय आहे.." जरा चिडूनच मी निशांतला विचारल. "अग मग काय तुझ्या केसांचा अवतार बघ.. एखाद्या चिमणीच्या घरट्यासारखा झाला आहे.." आणि अजून तो हसु लागला. आता सोबत सगळेच हसत होते. त्याच्या त्या "चिमणीच्या घरट्यासारखा" या उपमेला मला ही हसु आवरलं नाही. मी देखील हसत सुटले.. मग त्यानेच स्वतःचा भलामोठा रुमाल मला दिला.. "घ्या मॅडम आणि बांधा केस नाही तर अजून काय काय होईल.... आणि परत हसत राहिला.. मी जरा लटक्या रागाने त्याच्या हातातुन रुमाल अक्षरशः खेचला आणि डोक्यावर बांधला. हे बघून मात्र हर्षुच्या पोटात दुखाव अस झालं.. तिने लगेच स्वतःच नाक मुरडत आणि पुढे जाऊ लागली.. मग मीच जाऊन थांबवलं नाही तर मुलगी वेडी आहे काही करून घ्यायची.


पण ती काही ऐकायला नाही हे बघुन मला ही वाईट वाटलं.. आजूबाजूला नजर जाताच मला एक छान कल्पना सुचली.. मी तिला ओढतच घेऊन गेले... "चल ग.." मला नाही यायच प्राजु.." "म्हटलं ना चल." आणि आम्ही एका स्टोलजवळ पोहोचलो तशी तिची कळी खुलली.. कारण मॅडम पाणी-पुरीच्या दिवाण्या ज्या होत्या. मागून बाईज ही आले.


"काय निशांत खाणार का पाणी-पुरी...?" राजने विचारल पण निशांतने नकार दिला.. "चल ना शर्यत लावूया.." कोण जिंकेलं त्याला प्राजु एक फ्रिएन्ड वाली हग देईल.." हे वाक्य मात्र तो माझ्याकडे बघून बोलला याच मलाच काय निशांतला ही अर्थ कळला नाही... मी तर आधी नाहीच म्हटले मग राजनेच मला मानवल की, फ्रेंड्स मध्ये तर एवढं चालत ना... मग मी कशीबशी तय्यार झाले. पण निशांत काही तय्यार होत नव्हता. "अरे जाऊदे राज नसेल त्याला जमत पाणी-पुरी उगाच कशाला आपण जबरदस्ती करायची." माझ्या या वाक्यावर निशांतने माझ्याकडे पाहिल. तोपर्यंत मी आणि हर्षुने एक एक प्लेट पाणी-पुरी खाल्ली होती.. "मी तय्यार आहे.." काही विचार करून निशांतने मला बघुन आपला होकार दर्शवला.. निशांत तय्यार झाल्यावर राज आणि निशांतमध्ये पाणी-पुरीची शर्यत चालू झाली..

हर्षु निशांत ला सपोर्ट करत होती.. सो मी राजला सपोर्ट करु लागले... हे बघुन निशांतने तर स्वतःचा स्पीडच वाढवला... थोड्यावेळाने राजने स्वतःची हार कबुल केली.. त्यामुळे हर्षु चांगलीच खुश झाली होती. स्वतःच्या तोंडात शेवटची पाणीपुरी टाकत निशांतने काही पैसे त्या स्टोलवाल्याच्या हातात देत समुद्राच्या दिशेने निघून गेला...... हे माझ्यासाठी देखील नवीन होत...


आम्ही त्या पाणी-पुरीवाल्याला विचार असता कळलं की, राजने पन्नास तर निशांतने चक्क एकशे-एक पाणीपुऱ्या संपवल्या होत्या... आम्ही सगळेच अवाक झालो त्या पाणीपुरीवालाच्या उत्तरकडे बघून. त्याने उरलेले पैसे माझ्याहातात देऊ केले. आणि वरून बोलला देखील... " ओ मॅडम.., पहिल्यांदा माझ्या या ठेल्यावर कोणी एवढ्या पाणीपुऱ्या एवढ्या कमी वेळात खाल्या आहेत. सॉलिड आहेत ते साहेब..." हे ऐकून आम्ही सगळेच थक्क झालो.
मग आम्ही देखील सगळे बीचच्या दिशेने निघालो...

निशांत खाली बसून वाळुमध्ये काहीतरी लिहत होता.. आम्ही जाताच त्याने ते मिटवल.. त्यामुळे मला काही दिसलं नाही.. मी त्याच्या बाजूला जाऊन बसायला गेले असता हर्षु लगेच निशांतच्या बाजूला जाऊन बसली... हे त्याच्यासाठी नवीन होत.., तो लगेच बाजूला सरकला. हर्षुच्या बाजूला मी आणि माझ्या बाजूला राज.. आम्ही सगळे बसून समोरचा सूर्यास्त बघत होतो... त्याचा तो गडद लाल, तांबडा, पिवळा रंग समुद्राच्या पाण्यात पडला होता. त्यामुळे कळत नव्हतं खाली पाणी आहे की काच.....


काही वेळाने समुद्राची पातळी वाढत होती आणि समुद्र सूर्याला आपल्या पोटात घेऊ पाहत होता. हळुहळू सूर्य ही त्याच्या आत जावा तसा खाली डुबत होता आणि आजूबाजूला अंधारून आल... त्यामुळे आम्ही सगळे परतीच्या वाटेला लागलो.. येताना परत मी आणि हर्षु गप्पा मारत होतो. बोलता बोलता घरी परतलो. घरी येताच निशांत स्वतःच्या रूमध्ये निघून गेला. आम्ही देखिल फ्रेश होण्याकरता रूममधे गेलो.

मी खाली आले तर निशांत सोडुन ते दोघे बसले होते. मी देखील त्यांना जॉईन झाले. "राज मोबाईल देना तुझा...,मला फोटो बघायचे आहेत." आम्ही सगळ्यांनी राजच्या मोबाईल मध्ये फोटो काढले होते. छान येतात म्हणुन. फोटो बघता बघता मी हसत होते. कारण माझे आणि हर्षुचे विचित्र पद्धतीचे फोटो जे होते. एक एक स्टाईल मधले. बघता बघता माझं लक्ष एका फोटोवर गेलं... तो ग्रुप फोटो होता. त्या ग्रुप फोटोमध्ये हर्षु आणि राज कॅमेरामध्ये तर निशांत आणि मी एकमेकांना बघत होतो. हा तोच फोटो होता, जेव्हा निशांतच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झालेला आणि आम्ही एकमेकांकडे बघत होतो.. खरच खुप गोड असा तो फोटो होता. मी लाहेच सगळे फोटो माझ्या मोबाईलमध्ये घेतले.. स्पेशिएली तो फोटो.


जेवणाची वेळ झाली तस एक नोकराने आम्हाला जेवायला बोलावल. निशांत ही खाली आलेला. आम्ही जेवुन छान गार्डन मध्ये बसलो होतो. मी आईला कॉल केला. तिच्याशी बोलून सहज म्हणून आजोबांना कॉल केला.. कारण मी निशांतला एकदाही कॉल करताना पाहिलं नव्हतं. म्हणून मला काळजी वाटत होती दोघांची. खुप वेळाने आजोबांनी कॉल घेतला.., "हा बाळा बोल..., कशी चालू आहे पिकनिक..??" आजोबा मस्त चालू आहे. तुम्ही गोळ्या घेत आहात ना टाईमवर. आणि आजींना ही सांगा सगळं टाईमवर घ्यायला. माझी बडबड चालूच होती.

"हो ग बाळा.., सगळं छान चालू आहे. तु नको घेऊस जास्त टेंशन मस्त मज्जा कर." "अहो आजोबा मी काळजी नाही घेणार तर कोण घेणार.., तुमचा खडूस नातू काही करत नाही कॉल म्हणून मी करत असते.." माझ्या या वाक्यावर आजोबा चक्क हसले.. "काय झालं आजोबा..,? बरोबर बोलतेय ना...?" कधी कॉल करताना दिसत नाही तो म्हणून मला काळजी वाटते तुमची.."


"बाळा तो रोज सकाळी मला कॉल करून आमची विचारपूस करत असतो. त्याला माझ्या गोळ्यांचा टाईम बरोबर लक्षात असतो. त्यामुळे तु जास्त टेंशन घेऊ नकोस बाळा.. मज्जा करायला गेला आहात तुम्ही आमची काळजी करत बसू नका..." आजोबांच्या बोलण्यावर तर माझा विश्वासच बडत नव्हता. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चालू झाला..

"आजोबा तुम्हाला म्हाहित आहे का..! आज निशांत आणि राज मध्ये शर्यत होती पाणीपुरीची आणि निशांत जिंकला.." माझ्या या वाक्यावर आजोबा काही बोलले नाही... मी हॅलो हॅलोच करत होते की थोड्यावेळाने ते बोलु लागले.. ते ही आश्चर्याने... "काय निशु बाळाने पाणीपुरी खाली...??"
आता मी देखील प्रश्नार्थ भावनेने त्यांना विचारल.... "म्हणजे आजोबा...???"

"अग प्राजु बाळा तुला म्हाहित आहे का... निशांतच्या आई-बाबांच ऍकसिडेंट ते पाणीपुरी खायला गेल्यावरच झालं होतं.. तेव्हा तो खुप लहान असल्याने आम्ही त्याला सांगितलं नाही.. पण जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याला मी घेऊन जायचो पाणीपुरी खायला त्याला ही आवडायची त्याच्या आई सारखी पाणीपुरी.. पण वयाच्या पंधराव्या वर्षी त्याला मी सांगितलं त्या दिवसापासून त्याने पाणीपुरी खायची बंद केली.. आजोबांच्या या वाक्यावर मी मात्र चांगलीच उडाली... "काय.., अहो पण आजोबा त्याने आज चक्क एकशे-एक पाणीपुऱ्या खाल्ला.." काय बोलतेस बाळा.. नक्कीच आमचा नातु बदलतो आहे.. आणि हसु लागले.


मग थोडं बोलून मी कॉल ठेवला. माझ्या डोक्यात फक्त हेच फिरत होत की, आज त्याने कशाला तो निर्णय बदलला असेल.. विचारेन म्हणून मी त्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागले. तोच मध्ये राज भेटला आणि माझ्यासोबत गप्पा मारत बसला. मी कस तरी त्याला कटवून निशांतच्या रूममधे गेले..

मी दार वाजवता त्याने दार उघडलं. काही न बोलता तो आत निघून गेला. "निशांत बोलायच होत जरा बोलु का..???" मी शांतपणे आत जात विचारल. त्याने फक्त मानेने होकार दिला... "मघाशी आजोबांना कॉल केलेला त्यांनी सांगितलं की, तु पाणीपुरी खायची सोडली होतीस आई-बाबांसाठी. मग आज का खालीस...???" त्याने एक सुस्कारा सोडत माझ्याकडे पाहिलं... मी उत्तराची वाट बघतेय बघून त्याने सांगायला सुरुवात केली...

"हा.., मी सोडली होती. हनी-बी मला खुप आवडायची पाणीपुरी.. माझ्या आईला ही खुप आवडायची अस आजोबा नेहमी बोलायचे.. त्यांचं एक म्हणणं होतं की, तु पाणीपुरी खाण्यात तुझ्या आईवर गेला आहेस.. अग मला आईचा चेहरा नेहमी आठवायचा म्हणून तिच्या आठवणीत मी अजून पाणीपुऱ्या खायचो.. पण जेव्हा मी पंधरा वर्षाचा झालो तेव्हा एकदा असच मी खुप लेट पाणीपुरी खायला गेलेलो.. घरी आलो तेव्हा आजोबा खूप चिडले होते. त्यादिवशी त्यांनी मला सांगितलं होतं की.., माझ्या आई-बाबांचा ऍकसिडेंट हा पाणीपुरी खायला गेलेले तेव्हा झाला..
त्या दिवसापासून मी ती खायची सोडली.. कधीच खायचं नाही असं ठरवलं.

एवढं बोलून तो खिडकीत जाऊन उभा राहिला. "मग आज का खाल्लस..??" मी देखील मागे जाऊन उभी राहिली. आता बोलणार आहेस का.., की असाच खितकीतून बघत बसणार आहेस... देवा बघतोस ना रे.. काही लोक किती खडूस असतात प्रश्नांची उत्तर पण देत नाहीत.."
माझं बोलणं ऐकून त्याने वळून माझ्याकडे पाहिलं आणि एक स्माईल दिली.... "तुझ्यासाठी.." ... हे ऐकून मी माझे डोळे मोठे केले.. त्याने माझ्या डोक्यावर एक टपली मारली आणि बेडवर जाऊन बसला.

मी देखील लगेच मागे गेली... बेडवर बसत उत्तराची वाट बघू लागली.. "आता काय..??" सांगतोस ना तु कशाला केलंस ते..?" तु काही उत्तर घेतल्याशिवाय जाणार नाहीस ना..??" मी माझी मान फिरवत मोठा नकार दिला.. "सांग आता गप्पपणे... माझ्यासाठी का..??" कारण राज ची अट होती... जो जिंकेल त्याला तुला हग करायची... भले तो चांगला असुदे पण मला नाही आवडणार की तू अजून कोणाला हग करावीस.." मी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं. कारण तुला बोललो होतो ना तु मला भेटली आहेस.. खुप चांगली मैत्रीण आहे ना माझी अस म्हणायचं आहे मला....तु माझ्या आई सारखी वाटतेस मला म्हणून हे सगळं....


खर तर मला यातलं काहीच पटत नव्हतं जे तो सांगत होता. मला त्याच्या मनात एक आणि सांगतोय वेगळं असच वाटत होतं.. त्याच्या उत्तराची सारवा सारव करून झालेली. मग मी देखील जास्त प्रश्न न विचारता स्वतःच्या रूमध्ये जाऊन बेडवर झोपले.


"माझ्यासाठी... " म्हणे मी "आई" सारखी वाटते.. काही असत निशांतच.. खडूस कुठला.. त्याच्या मनात एक आणि बोलत होता वेगळं हे स्पष्ट जाणवत होतं.. जाऊदे विचारेन परत कधीतरी.. स्वतःशीच हसत मी झोपी गेले....


to be continued.....