my shantanu - 6 - Last Part in Marathi Motivational Stories by PrevailArtist books and stories PDF | माझा शंतनु भाग ६ - Last Part

Featured Books
Categories
Share

माझा शंतनु भाग ६ - Last Part

नेहाच्या मनात ती न्यूज आठवली जी आपण पहिली होती त्यात आपला शांतनू होता तर तिला खूप वाईट वाटलं.

"तू कशी आहेस...??" ह्या प्रश्नाला तिच्या तोंडून उत्तर बाहेर पडत नव्हतं कारण आज आपण दोन वर्षांनी असे ह्या अवस्थेत भेटू अस स्वप्नात पण वाटलं नव्हतं, तिचे हुंदके तो ऐकत होता ," मी बरी आहे, (

त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत ती बोलत होती.)पण

शांतनू हे असं कसं रे"

तिच्या ह्या प्रश्नाने दोघ थोडावेळ शांत बसले

"अग हे मी फिरायला जात असताना झालं आमची गाडी एका ट्रक खाली आली गाडी मीच चालवत होता"

शांतनू पुढे बोलत होता," आणि त्या accident मध्ये माझे डोळे गेले आणि मी नेत्रहिन झालो आणि माझे दादा-वहिनी मला ह्या अवस्थेत सोडून गेले आणि आता मी एकटाच राहीलोय"

त्याच्या ह्या बोलण्यावर ," तू आता एकटा नाही आहेस मी आहे सोबत तुझ्या", नेहा

त्याला नेहाच्या ह्या बोलण्यावर आधार वाटतो आणि

पुढे बोलतो," मी तुला खूप दुःख दिलय ग, आज आपण दोन वर्षांनी इथे ह्या अवस्थेत आपण भेटू अस वाटलं नव्हतं. मला तुला सांगायचं की, मी तुला अचानक का सोडून गेलो, एकदिवस कॉलेज मध्ये असताना मला घरातून कॉल आलेला मी तडक निघालो आणि कोणाला काही कळवल नाही. त्या दिवशी मला हॉस्पिटॅलमध्ये नेण्यात आलं आणि समोर मी माझ्या आईबाबांना पाहिलं त्यांना पाहिलं नी माझा तोल सुटला ,
तेव्हा कळलं की आई -बाबा मला पाहायला येत होते, आईची खूप इच्छा होती मला पहायची म्हणून ते मला पाहायला निघाले होते आणि अचानक त्यांचा accident झाला.
आई-बाबा माझ्या समोर शेवटचा श्वास घेत होते. मी देवाकडे प्रार्थना करत होतो की माझ्या आई-बाबांना वाचव. पण खूप वेळ झाला होता , त्या दोघांनी माझ्या समोरच श्वास सोडला
त्यांच्या अश्या अचानक जाण्याने मी स्वताला सावरू नाही शकलो, माझ्या आयुष्यात मी खूप काही गमवल्या सारखं वाटतं होत आणि अस वाटत होत की आपलं पण अस झालं तर मी पुन्हा नाही सहन करू शकत, म्हणून मी तुला अचानक सोडून गेलो"

मला माहितीय तुला माझ्या अश्या जाण्याचा राग आला असेल पण मी माझ्या संकाटापुढे काहीच करू शकलो नाही,
शांतनू ने नेहाला घट्ट मिठी मारली "i am sorry नेहा please मला माफ कर"
नेहाचा राग गेला होता (कारण आपले आई-बाबा सोडून जाणे म्हणजे काय दुख असत ते तिने शांतानुच्या डोळ्यात पहिले होते कारण अश्या वेळी आपले डोळे खर बोलतात हे तिला जाणून होते ) ," शांतनू तू मला पुन्हा सोडून जाणार नाही ना तरच मी माफ करेन"
तिच्या प्रश्नावर शांतनु "कधीच नाही सोडून जाणार फक्त तू माझ्या जवळ राहा "

बाहेर मुसळधार पाऊस पडत होता दोघ पण एकमेकांच्या मिठीत होते आणि त्यात नेहाचा राग पूर्ण निवळला होता आपल पाहिलं प्रेम आपला शांतनू पुन्हा आपल्या आयुष्यात पुन्हा आला ह्याच तिला आनंद झाला होता.

---------

आपल्या आयुष्यात सगळ्या व्यक्ती महात्वत्च्या असतात. कोण कस येईल आणि कसे जातील ते आपण नाही सांगू शकत कारण कोणाच्या येण्याला आणि जाण्याला आपण बांधील नसतो, आपण फक्त जगू शकतो ते आपल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणीत, आणि म्हणूनच मी इतक म्हणेन कि आपल्या सोबत जो पर्यंत आपले आई-बाबा आहेत त्यांच्या सोबत तुम्ही युवक जास्ती वेळ घालावा कारण एकदा वेळ निघून गेली कि आपण पुन्हा ती वेळ मागे आणू नाही शकत.

तुम्हाला माझी कथा कशी वाटली ते जरूर कळवा मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे