7
दोन तीन दिवस असेच गेले... विजू च तर्क वितर्क लावणं चालू होत.त्यात त्याला त्याच्या मित्रांची पण साथ मिळतच होती....असेच सगळे जण संध्याकाळी कट्ट्यावर बसले असताना अचानक दुरून त्याना सूर्य पळत येताना दिसला...धापा टाकत टाकत तो विजू जवळ आला,
"अरे सूर्या, काय झालं,एव्हढा का घाईत आहेस"
"आर विज्या,एक खराब बातमी हाय बघ."
"काय झालं?"
"आर आपल्या शाळेचे हेडमास्तर वारले,,मंदिरा पासल्या विहिरीत त्यांचं शरीर तरंगत आहे,चला पटकन बघाया"
"ते ऐकताच सगळेच जण ताडकन उठून उभे राहिले,सगळ्यांनाच धक्का बसला होता... सगळेच जण पळत पळत विहिरीपाशी गेले... काही पोरांनी मिळून ते शरीर बाहेर काढलं... धड एकदम पाणी भरल्याने फुगलं होत.कुणाला विश्वासच बसत नव्हता कि अस काही झालंय म्हणून... सरांची मूठ पक्की बंद होती.श्रीधर ने ती उघडण्याचा प्रयत्न केला,,मूठ उघडताच त्या मुठीत चावी होती आतमधे,,निरखून बघितलं तर कळत होत की ती ग्रंथालयाची चावी होती... शरीरावर अनेक ठिकाणी काही निशाण होते.. अस वाटत होत की जणू मरण्याआधी त्यांना कुणीतरी फरपटत आणलं होतं.जागोजागी कपडे फाटलेले होते.डाव्या खांद्याला लाल रंगाचा चिखल सुद्धा लागलं होतं
"विजू,,कुणीतरी दुरून फरपटत आणलंय, खून आहे हा"
"हो श्रीधर,मलापण तेच वाटत आहे."
आणि अचानक एक म्हतारी रडत रडत तिथं आली.बहुतेक त्यांची पत्नी होती ती... बिचारीचा वृद्धाप काळातला एकुलता एक आधार नाहीसा झाला होता.सरांना कुणी मुलबाळ सुद्धा नव्हतं.शाळेतली मुलंच स्वतःची समझुन त्यांनी आयुष्य काढलं होत.त्यांचा तो मृतदेह बघून कविता पण स्वतःला आवरू शकली नाही,,नकळत रडणं फुटलं तिला.विजू ने जाऊन तिला आधार देण्याचा प्रयत्न केला....
इकडे रडत असलेली सरांची बायको एकाएकी पाटलांच्या नावाने शिव्या द्यायला लागल्या,पाटलांच्या नावाने नको नको ते बोलू लागल्या अस वाटत होत की जणू सरांच्या खुनाचा आरोपच ती पाटलांवर लावत होती... सगळेच जण अचानक चकित झालं..
"आई स्वतःला सावरा,,",महेश ने कसतरी सांत्वन केले.
"काय सावरू पोरा,,माझं कपाळाच कुंकू गेलंय,, त्या पाटलांन खून केलाय"
"आजी काय बोलताय"
"खरं बोलतेय मी",पदराने डोळे पुसत आजी बोलू लागली,"काल संध्याकाळी घरी अलथा त्यो पाटील,दोघ जाऊन एका खोलीत बोलत बसले.अर्धा तासाने बाहेर आला तर ओरडून ओरडून काहीबाही बोलून निघून गेला,,अन आज हे अस झालं",आणि एव्हढं बोलून पुन्हा रडायला लागली.
ते ऐकताच श्रीधर ताडकन उठला,जमा झालेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली.सगळे जण त्या शरीराला सोडून बडबडू लागले,तिथलच बदलत वातावरण बघून महेश एकाएकी ओरडला,
"शांत व्हा सगळे,काय कुरबुर लावलीय?यायला इथं आपल्या सर च थडग पडलंय आणि तुम्ही वेगळीच कुरबुर करताय.बघताय काय उचला ते धड,मसनात घेऊन जावं लागलं ना?"
महेश च्या त्या करकरीत आवाजाने सगळे भानावर आले.सगळ्यांनी मिळून शरीर स्मशानात नेलं,योग्य ते सगळे विधी केले आणि शरीर अंतिम संस्कारासाठी लाकडावर ठेवलं.
विजू,श्रीधर,महेश,सूर्या, तुका,कविता सगळेच जण तिथे घेर मांडून उभे होते,,सरांना सगळेच ओळखत असल्याने गावातले बऱ्यापैकी लोक सुद्धा तिथे जमले होते... पाटलांच नाव समोर आल्याने श्रीधर गूढ विचारात गुंतला होता.त्याचा तो चेहरा बघून विजू त्याच्या जवळ गेला,
।"श्रीधर कसल्या विचारात गुंतलाय?अरे त्यांनी दुःखाच्या आवेशात बोलून दिल,याचा अर्थ असा नाही होत ना की पाटलांनी त्यांचा खून केलाय ते."
"नाही विजू,,ते माझे बाबा आहेत म्हणून मी त्यांना निरपराधी बघावं अस नाही ना!! आणि विशेष म्हणजे आज पहाटे पासून ते गायब झाले आहेत.अजून पण त्यांचा पत्ता नाही.बाळू काकांनी गावभर सापडलं पण अण्णा काही सापडले नाहीत."
"काय बोलतोस?"
"हेच काय तुला आठवत सरांनी त्या लोकांची नाव सांगितली होती ज्यांना या खजिन्याबद्दल माहिती आहे,,त्यात होते तुझे बाबा जे 15 वर्षांपूर्वी वारले,तात्याराव जे पण गेलेत,सरपंच ज्यांच्या सोबत अण्णांच्या कुरबुरी होत्या,आणि आता सर.यात उरले फकत तेच... कस शक्य आहे बाकीचे दगावले आणि फक्त एकच व्यक्ती जीवन्त आहे ते.... एव्हढंच काय तुला आठवत सभा संपल्यानंतर ते काय म्हणाले होते?"
"काय म्हंटले होते?"
"हेच कि परवानगी शिवाय कुणीही त्या वाड्याकडे फिरकायच पण नाही.... आता मला सगळं उलगडतंय,, बाबा बऱ्याचदा पहाटे बाहेर गावाला जातोय अस सांगून एकटेच का जायचे?त्यांच्या शाळेत सारख्या चकरा का असायच्या... "
"म्हणजे तुला म्हणायचं आहे की पाटील??"
"हो विजू,तेच म्हणायचं आहे,,तू बरोबर होतास,,भूत प्रेत नाही तर माणसातील भूत होती या गावात... खजिन्यासाठी त्यांनी निर्दोष माणसांना मारलं... ते जरी माझे बाबा असले तरी त्यांच्याधी हे गाव महत्वाचं आहे."
"मग आता काय करायचं?"
"मला वाटत दोन दिवस गावात शांतता येऊ द्यावी,आणि नंतर मग पुन्हा शोध सुरु करावा.तसपन अस्मानी पाऊस झाल्याने दुसऱ्या गावी जाण्याचे जवळ जवळ सगळेच मार्ग बंद झाले आहेत,,म्हणून आता अण्णा त्या खजिण्या शिवाय इतरत्र कुठे असणार नाही ..
"पण श्रीधर पुन्हा एकदा विचार कर,स्वतःच्या बाबांना दोषी ठरवत आहेस तू"
."त्यामुळेच तर दोन दिवसांची मुभा घेत आहे.एकदा साऱ्या सोंगट्या नीट चाळावे लागतील मगच कळेल कि नेमकं कोण आहे ते"
क्रमश:
.......