रात्रभर काही जाग आलीच नाही.. आज सकाळीच मला जाग आली घडाळ्यात पाहिलं तर सकाळचे सात वाजले होते... रात्री कमी खाल्याने आता पोटात कावळे ओरडू लागले होते.. चांगलीच भूक लागली होती. एक नजर मोबाईल वर टाकली पण निशांत चा मॅसेज किव्हा कॉल नव्हता. तशीच उठली आणि छान फ्रेश होत मी आज पहिल्यांदाच एवढ्या सकाळी उठुन किचनमध्ये गेले..
स्वतः साठी आधी कॉफी बनवली... हा आता ती निशांतच्या कॉफीसारखी नक्की नव्हती झाली. पण ठीक आहे.. मग आई-बाबांसाठी चहा आणि पोहे करून ठेवले.. वाफळलेली कॉफी घेऊन मी माझ्या रूममधे आले.. सहज म्हणुन निशांतला कॉल केला तर त्याने कॉल काही घेतला नाही.. कदाचित झोपला असेल म्हणून, मी कॉफी पीत खितकीत जाऊन बसले... स्वतःची गप्पा मारत...
कधी कधी माणसाने स्वतःच्या मनाशी गप्पा मारल्या पाहिजेत... त्याने आपल्याला आपल्या चुका कळतात... सोबत आपल वागणं ही कळत. तर कधी न कळलेल्या गोष्टी सहज उमगतात.. जसे की मला आता कळत होतं... म्हणजे आजकाल निशांतच मला मिस करणं.. मी देखील करतेच म्हणा.. त्याच जेलस होणं.. मी जरा राज सोबत असल्यावर किव्हा त्याच नाव जरी घेतलं तरी निशांतच जेलस होतो.. म्हणजे मला गंमत ही वाटते.., पण अस का होत असेल हे त्यालाच म्हाहित.. त्यात आजकाल त्याच कोड्यात बोलणं.. हर्षुची मैत्रीण चालेल.. याचा अर्थ काय होतं.. म्हणजे मी... म्हणजे त्याला... म्हणजे मला... जाऊदे जास्त होतंय.. तोच बाजुला ठेवलेला मोबाईल वाजला..
क्रिनवर निशांतच नाव बघून मी लगेच घेतला... "काय मॅडम आज एवढ्या सकाळी माझी आठवण आली...?? काल एक मॅसेज नाही केलास आणि आज एवढ्या सकाळी आठवण..??" "अरे काल मी लवकरच झोपले होते. जरा डोकं दुखत होत म्हणुन मॅसेज केला नाही.. सो म्हटलं आज कॉल करूया बघू उठला आहेस की अजून झोपा काढणं चालू आहे..." "ओ मॅडम मी रोज सहा वाजता उठतो.., मग जीम करून आवरतो आणि नंतर कॉलेज.. तुझ्या सारखा नाही आळशी..." फोन मधून पण हा खेचत होता काय बोलणार याला..
"गप्प रे.., ते सोड प्रॅक्टिस तुझ्या घरी करुया ना..??"
"हो ग.. माझ्याच घरी करूया.. चल लवकर फ्रेश हो येतो या तुला पीक करायला... आणि त्याने अजून काही न बोलता कॉल कट केला सुद्धा..
पागल आहे हा मुलगा... स्वतःशीच हसत मी कॉलेजसाठी तय्यार झाले.. खाली आले तर आई-बाबा डायनिंग टेबलवर चहा नाश्ता करत होते... "कसा झालाय नाश्ता..??" मी बसत विचारल.. "वाह छान झाला आहे.." बाबांनी लगेच उत्तर देऊ केले.. आई ने ही मान डोलावली.
मी नाश्ता करून निघाले.. खाली येईपर्यंत निशांत गेटपर्यंत येऊन थांबला होता. आमच्या वाचमेन काकांसोबत ही त्याने चांगली ओळख केली होती. मी जाताच आम्ही दोघे कॉलेजसाठी निघालो...
आज प्रॅक्टिस नसल्याने आम्ही एकमेकांच्या क्लासरूममध्ये निघून गेलो. आज हर्षु ही आली होती... "काय मॅडम तब्बेत कशी आहे..??" मी एंटर होताच तिला विचारल. "ठीक आहे ग.. निशांत आलाय का ग आज..?? काय आहे ना त्याला बघूनच मला फ्रेश वाटेल..." मी आम्ही एकत्र आल्याच काही सांगितलं नाही.. नाही तर परत हिला वेगळं काही वाटायच.. "अजून भेट नाही ग झाली माझी.." मी चक्क तिला खोट सांगितलं. आज सगळे जास्तच लेक्चर्स घेत होते कारण आमच्या एक्साम्स ज्या होत्या...
आमच्या एक्साम्स या मधेच ठेवल्याने आम्ही सगळेच बावरलो... ब्रेकमध्ये कॅन्टीनमध्ये जाऊन बसलो.. थोड्या वेळाने निशांत आणि राज ही जॉईन झाले... "प्रांजल आपल्या डान्स कॉम्पेटेशनची डेट चँगे झाली आहे वाचलीस का नोटीस..." निशांत माझ्याकडे बघून बोलला...
"काय...! कधी झाली..??"
"अग आपल्या एक्साम्स आहेत ना म्हणून बदलली झाली आहे डेट अजून लावली नाहीये पण नेक्स्ट मंथमध्ये नाहीये.."
"नेक्स्ट वीक पासून आपल्या एक्साम्स आहेत सो आता कॅन्टीनमध्ये नाही तर लायब्ररीत गर्दी होणार..."हर्षुच्या या वाक्यावर आम्ही सगळेच हसलो...
पुढचे दोन वीक एक्साम्समुळे आमची काही भेट होत नव्हती.. निशांतचे ही एक्साम्स चालू होत्या आणि आमच्याही... फायनली आज सर्वांच्या एक्साम्स संपल्या...
तिघे कॅन्टीनमध्ये माझी वाट बघत बसले होते. हर्षुला काही सांगायचं होत. मला लायब्ररीत काम असल्याने मी लेट पोहोचली... मी जाताच आधी एक प्लेट वडा-सांबर खाल्ला तेव्हा कुठे मला बर वाटल... "हा.., बोल ग हर्षु काय सांगायचं होत तुला...??"
गाईज उद्या जाऊया का पिकनिक ला..???" हर्षु बोलली. कुठे जाऊया..?? मी आनंदाने विचारल.... "आपण ना रत्नागिरीला जाऊया का..?, माझं फॉर्महाऊस आहे... राजने लगेच जागा ही सांगितली.. जस काही हे दोघे बहीण-भाऊ ठरवुनच आले असावेत. पण आताच एक्साम्स संपल्या आहेत आणि लगेच पिकनिक मी सर्वानाकडे बघत विचारल.. चालत ग नंतर परत तुमचा डान्स कॉम्पेटेशन येईल नंतर नाही ग मिळणार., जाऊया ना..." हर्षुने लगेच मानायला सुरुवात केली. ता तीच बोलणं पण बरोबर होत म्हणा. मग मी देखील तय्यार झाले..
सर्वानी निशांतकडे पाहिलं.... "काय.., असे का बघत आहात..?" तु येणार ना..?? हर्षुने विचारल...
निशांत आधी तय्यार नव्हता मग मीच त्याला तय्यार केलं. छान आठवढा भर आम्ही राहायला जायचं ठरवलं.. मग आम्ही जायचा प्लॅन करायला लागलो.... मी आणि हर्षुच काय काय घालायचं... आमच्या दोघींचं हेच चालू होत... "मी माझी गाडी घेऊन येतो." राजने आमच्याकडे बघत बोलला.
"ओके..." आम्ही सर्वानी एकत्र म्हटलं.
"मी आणि निशांत तुला कॉलेजच्या गेट जवळ भेटतो." मी निशांतकडे बघत म्हटलं.. त्यानेही नजरेनेच होकार दिला. सकाळी सहा वाजता भेटायचं ठरवून आम्ही निघालो. मी घरी जाताच आईला पिकनिकच सांगितलं. फक्त निशांतच नाव येताच तिने मला परवानगी दिली. पण राजच्या घरी जाणार त्यामुळे आई देखील आता निवांत होती. मी स्वतःच्या रूममध्ये गेले आणि पॅकिंग करायला घेतली. शेवटच्या पावसाचे दिवस चालु होते. चांगल्या दोन मोठ्या बॅगा भरून मी कपडे घेतले. काय आहे गावी जायचं म्हणजे एवढं तर लागतच ना. लवकर आवरून झोपले कारण सकाळी निशांत मला पाच वाजता घ्यायला येणार होता. लेट झालं तर परत लेक्चर मिळेल म्हणून मी लवकर आवरून झोपले.
कोकणात जायला मिळणार आणि सोबत निशांत असणार म्हणून मी आतुन खुपच आनंदात होते... कदाचित मला ही तो आवडू लागला होता. पण हर्षु खातीर मी स्वतःच्या मनाला आवर घातला...
उद्याची सकाळ आणि पुढचा एक आठवडा मी आणि निशांत एकत्र असणार या विचाराने माझी कळी खुलली... जायचं म्हणून झोप येत नव्हती हे वेगळं.. पण उशीरा एकदाची झोप लागली..
उद्याची सकाळ नवीन आठवणी घेऊन येणार होती... या पिकनिकमध्ये नक्कीच आठवणीत राहील अस काही तरी घडणार होत... काय ते नक्कीच कळेल....
to be continued.....