फिरून नवी जन्मेन मी...
तशी लहान असल्यापासुनच आमची मैत्री... मी येताच ओंजळ भरून करवंदे घेऊन यायची. दिवस भर आम्ही दोघे डोंगरावरून जांभळे, करवंदे खात हूंदडत फिरायचो. आंब्याच्या कच्च्या कै-या दगड मारून पाडायच्या आणि त्या खाण्यासाठी सोबत थोडी तीखट आणि मीठ ही खिशात असायच... पण कसे इतके जवळ आलो समजलच नाही. स्वता काट्यांमधुन वाट काढत माझ्यासाठी करवंदे जमवायची, स्वतासाठी नाही पण मला काटा लागला तर मनापासुन हळ हळायची. पण आता मीही तीला जपत होतो. तीला सोडून जावस वाटत नव्हत, रात्र कधी संपेल आणि कधी पुन्हा सकाळी या डोंगर द-यांमधुन हातात हात घालून फिरेन अस व्हायच.. ती सोबत असताना कसलीच तमा नसायची... पण ही बालपनाची मैत्री कधी आणि कशी कुणास ठाऊक मैत्री प्रेमात बदलून गेली...
पन पाच वर्षापुर्वीची ती शेवटची भेट.. ..त्यावेळी मी सतरा वर्षाचा होतो आणि ती कदाचित माझ्या पेक्षा दोन वर्षानी लहान... ती आपल्या वर्गातील गमती सांगणात दंग झालेली ,मी मात्र तीच हसण बोलण मनात साठवत होतो . तीच बोलण मधेच थांबवत मी म्हणालो
" गौरी सुट्टी संपल्यात ग, उद्या मला घरी जाव लागणार..."
हसता हसता एकदम तीच्या डोळ्यात पाणी तरळले... मघापासुनची तीची अखंड बडबड एकदम शांत झाली... आपल्या हातात घेतलेला माझा हात अलगद सोडवत दोन पावले पुढे जात म्हणाली...
" संजु... त्ये बघ डोंगरामाथ्यावर ढग कस उतरल्याती..किती सुरेख दिसतया ना ..."
एक दिर्घ श्वास घेत ती म्हणाली..
" या धरणीमातेला भेटून ते पन असेच निघून जातेत....परतून येण्यासाठी ."
मी तीच बोलन मधेच थांबवत म्हणालो...
"गौरी... आज कदचीत आजची आपली शेवटची भेट असेल... आता वर्षभर नाही भेटता येणार.. .."
खुप उदास वटत होत पन थोडास धाडस करत मी तीला म्हणालो....
" तुला काहीतरी विचारायच होत...
तीचा हात हाती घेतला तशी ती थोडी लाजली. आणि पापण्या खाली झुकवत नाजुक पणे म्हणाली...
"..मलही तुला कायतरी सांगायच व्हत...."
थोड धाडस करत मी तीच्याकडे पहात दिर्घ श्वास घेतला... ते शब्द ओठांवर आलेही नव्हते पन एक गोड शिरशीरी सर्वांगातुन उमटली...
"गौरी.." मी पुढ बोलणार तोच मोटरसाइकिलचा आवाज येऊ लागला.. मी मान तीरकी करत पाहील तसा सावकाराचा मुलगा आणि त्याचा मित्र मोटरसायकल साईड स्टैंडवर लावत आमच्याकडे पहातच पुुढ आला... अंगान तसा भरगच्च होता... रागीट चेहरा, पांढरा कुर्ता आणी साधी दगडी रंगाची पैंट , वीस बावीस वर्षाचा असेल,
माझ्या हातात गौरीचा हात बघुन चिडला आणि मला थोड रागातच म्हणाला...
" ये पाव्हण्या..... काय नाटक चालु हायती रे..जीत्ता जाणार की पार्सल न ...?"
मी काही बोलणार तोच गौरी त्याच्या वर चिडली...
" ये... काय करायच तुले... गप गुमान चालायच हीतन..."
त्यान चिडून गौरीकड पाहिल आणी आपल्या उजव्या हाताच्या आंगठ्यान खुरटी दाढी कुरवाळत वासनेन भरलेल्या नजरेन तीला न्याहाळत म्हणाला...
"तुले तर मीच....."
पुढे काही बोलायच्या आत मी त्याच्या मुस्काटात हानली आणि तीथेच त्या सावकाराच्या मुलासोबत झटापट लागली...'
*****
धापकन पलंगावरून खाली पडलो तशी जाग आली.. सकाळची कोवळी किरणं बाजुच्या खिडकीतुन अंगावर पडत होती झालेली....पाच वर्षापुर्वी घडलेले सर्व जसेच्या तसे आठवत होते...
लग्नाचे घर असल्याने जो तो आपापल्या कामात. गौरी ला भेटता येणार नव्हत कारण पाच वर्षापुर्वी सावकाराच्या मुलाशी झालेल्या भांडणामुळे मामाने मला इकडे न येण्याची ताकीद केलेली... नुसती ताकीद नाही तर चांगलाच धोपटून काढलेल.. म्हणजे आता तीला नेहमी प्रमाने भेटण्याचा प्रश्नच येत नव्हता....
*****
क्रमशः