Admission - 2 in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | एडिक्शन - 2

Featured Books
Categories
Share

एडिक्शन - 2


मी हळूहळू पावले टाकत तिच्याकडे जाऊ लागलो ..ती काहीच अंतरावर होती ...तिला येताना पाहून मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता शेवटी नशिबाने देखील माझ्या प्रयत्नांसमोर हार मानली आणि आम्ही भेटलो ..पण ती येत असताना तिचे पाय लडखडू लागले.. बहुदा आज तिने फार जास्त प्रमाणात नशा केली होती अस तिच्या वागण्यावरून जाणवू लागल..कपड्यांवर चिखलाचे डाग स्पष्ट दिसत होते ..तरीही तिला त्याची काहीच पर्वा नव्हती ..मी पुन्हा समोर चालू लागलो ..त्याचक्षणी तिचा पाय अडखडावा आणि ती लगेच माझ्या मिठीत आली आणि शायर नसलेल्या मला लगेच शायरी सुचली ..

लफजो से कैसे बया करू
तेरे चेहरे की ये सादगी
अब लगता है तुझे पाकर
शायद बन जाये मेरी जिंदगी

मी माझ्या शब्दांना हृदयातच साठवून ठेवलं ..ती नशेत पार बुडाली होती ..त्यामुळे तिला स्वतःच्या वागण्याबद्दल काहीच चिंता नव्हती ..मी तिला बाजूला डेस्कवर बसवलं ..तिने स्वताच माझ्या खिशात हात टाकून एक सिगारेट काढली आणि ओठांना लावली ..मी तिच्याशी बरच काही बोलण्याचा प्रयत्न करित होतो पण ती आपल्याच धुंदीत होती ..माझ्या एकाही शब्दाकडे तीच अजिबातच लक्ष नव्हतं ..तिने ओठांना लावलेली सिगारेटदेखील आता संपली होती . पाहता - पाहता नशा अंगावर झाली आणि ती तिथेच झोपी गेली ..मी तिच्या चेहऱ्यावर हात मारून उठविण्याचा प्रयत्न करीत होतो पण नशेमुळे ती आज काही उठणार नव्हती ..तिला तिच्या घरी सोडता यावं म्हणून तिची तपासणी केली पण मोबाइल सोडून तिच्याकडे काहीच सापडलं नाही ..आता माझ्याकडे फक्त दोनच पर्याय उरले होते एक तर तिला त्याच अवस्थेत तिथेच सोडणं आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या घरी घेऊन जाण ..एखाद्या मुलीला अशा अवस्थेत सोडून जायला मन काही मानेणा त्यामुळे नाईलाजाने तिला घरी घेऊन जाण्याचा निर्णय झाला ..तिला लगेच बाहूत उचललं ..तशी ती स्लिम अँड ट्रिम असल्याने थोडी हलकीच होती ..झोपी गेल्याने तिचा चेहरा अगदी शांत जाणवत होता..थोड्या वेळापूर्वी नशा करून येणाऱ्या त्या मुलीत आणि आता शांत झोपी गेलेल्या त्या मुलीत फारच फरक जाणवू लागला ..मला तर तिचे दोन्हीही रूप फार आवडले होते ..विचार करूनसुद्धा तिला पाहण्याचा मोह आवरेना .वाऱ्याने तिचे केसही वारंवार चेहऱ्यावर येत होते आणि मी त्यांना बाजूला करत तिचा तो मनमोहक चेहरा न्याहाळत होतो ..आज पहिल्यांदाच मी एखाद्या मुलीला एवढं जवळून पाहत होतो तेव्हा त्या भावना काहीतरी वेगळ्याच भाव व्यक्त करीत होत्या आणि अचानक मनातून शब्द बाहेर आले ..

शब्द झाले मुके बोलती पैंजने
उतरले गालिया सोव्हळे चांदणे
पाहताना तुला चंद्रही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी जीव वेळावला
ओळखू लागलो तू मला मी तुला

नाही कळले कधी ....

तिला पाहत- पाहतच मी कारकडे घेऊन गेलो ..घरी पोहोचताच तिला बेडवर झोपवलं ..आताही तिने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता ..बहुदा तिला हा हात कधीच सोडायचा नव्हता अस तिच्या मजबूत पकडवरून जाणवू लागल..मी कसातरी हात सोडवून घेतला आणि हॉलमध्ये जाऊन झोपी गेलो ...
सकाळच्या गुड मॉर्निंग ..गुड मॉर्निंग आवाज करणाऱ्या अलार्ममुळे तिला जाग आली ..जाग येताच आपण कुणातरी दुसऱ्याच्या घरी आहोत याची जाणीव तिला झाली ..ती बेडवरून उठली आणि चौफेर नजर फिरवून घेतली ..बहुदा ती थोडी काँशीअस झाली होती पण घाबरली नव्हती ..अगदी समोरच्याच भिंतीला माझा फोटो लावून होता ..तिने तो पाहिला आणि आपण सुरक्षित ठिकाणी आहोत असं तिला जाणवू लागल .. ती पुन्हा काही विचार करणार तेवढ्यातच मी तिच्यासमोर गेलो ..तिलाही मला पाहून थोडं बर वाटल ..मी तिला फ्रेश व्हायला सांगितलं आणि स्वतः कॉफी बनवायला किचनमध्ये गेलो ..
मी कॉफी घेऊन येईपर्यंत ती फ्रेश झाली होती ..तिची झोप देखील पूर्ण झाली होती पण कालची थोडीफार नशा आताही तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती..तिने कॉफीचा पहिला घोट घेतला आणि आमच्यात बोलण्याला सुरुवात झाली ..

" काय मॅडम आता बर वाटत आहे का ? " , मी काळजीच्या स्वरात तिला विचारल..

" मला काय झालं ??..मी नेहमीसारखीच मस्त ...हो ...पण सॉरी माझ्यामुळे तुला काल रात्री फार त्रास झाला असेल ..काल फार नशेतच तुला भेटले होते ..सिगरेट घेतली आणि बहुतेक तेव्हाच झोपी गेले ..नंतरच आता काहीच आठवत नाही ..जास्त नशा केली की माझं असच होत बघ ..सो सॉरी .." , ती हळुवार आवाजात बोलून गेली ..

मीही शांत राहतच तिला म्हणालो , " होत कधीकधी ..हरकत नाही आणि मी पण सॉरी "

ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली , " आता तू कशाला सॉरी म्हणतो आहेस ? "

" अग तुझ्या लक्षात नाही आलं का ? ..काल रात्री तुझे कपडे फार खराब झाले होते त्यामुळे बदलावे लागले ..( ती कपड्यांकडे पाहणार त्याआधीच )
हो हो ..घाबरू नको मीस्वतः नाही बदलले ..बाजूला ताई राहतात त्यांना सांगितलं सो काळजी नको करू .. " , तिच्याकडे पाहून उत्तरलो ..

ती बिनधास्त होत म्हणाली , " यात काळजी करण्यासारखं काय आहे ? ..तू स्वतःही बदलले असते तर मला फार वाईट वाटलं नसत .."

आता मात्र माझ्या डोक्यात बऱ्याच घंटा वाजू लागल्या होत्या ..मुलगी कितीही मॉडर्न असली तरी एवढी बिनधास्त कशी असू शकते , घरचे तिला काहीच म्हणत नसतीला का असे बरेच प्रश्न मनात निर्माण झाले तरीही विषय बदलत मी म्हणालो , " असो तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार होती ना ? "

" कुठल्या प्रश्नाचं उत्तर ? " , ती म्हणाली ..

आता मला राग अनावर झाला तरीही तो गिळून तिला म्हणालो , " अग मागे भेटलो होतो तेव्हा तू म्हणाली होती की एवढ्या छोट्याश्या सिगारेटसाठी बऱ्याच जणांनी स्पर्श केला ..ते " ..

" ते व्हय ..तुला खरच ऐकायचं आहे " , ती माझ्या नजरेला नजर देत म्हणाली ..

खूप मोठी कहाणी आहे रे तुला सवड असेल तरच सांगते ..

" काळजी नको करु आज रविवार आहे तेव्हा ऑफिसला सुट्टी आहे त्यामुळे तू बिनधास्त सांग " , मी उत्सुकतेने म्हणालो ...
बर ऐक तर मग ..ही कहाणी आहे एक राजकुमारीची ..खऱ्याखुऱ्या राजकुमारीची ..ती राजकुमारी दिसायला अगदी देखणी ..कुणीही तिला पाहिलं की अगदी पहिल्याच क्षणी तिच्या प्रेमात पडावं अस तीच रूप ...नाव शीतल आणि नावाप्रमाणेच अगदी शांत स्वभाव ..कितीतरी मुलांनी तिला मिळविण्याचा प्रयत्न केला होता , स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता तरीही ती कुणाच्याच जाळ्यात अडकली नव्हती ..जन्म झाला तोही गरीब घरात ..लहानपणापासून पैशांची तंगी त्यामुळे मन मारून जगणं तिने पावलोपावली अनुभवलं होत ..त्यामुळे आपल्याही आयुष्यात एक राजकुमार येईल जो आपल्याला एका सुंदर स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाईल अस तिला वाटत होतं ..त्यामुळे ती नजर रोखून आपल्या त्या राजकुमाराची वाट पाहू लागली ..आणि त्या वाट पाहण्याच तिला फळ मिळालं ..
तो दिवस आला ..तिला पाहण्यासाठी तो राजकुमार तिच्या घरी आला होता ..नाव अरुण ..वयात आलेला धडधाकट असा तरुण ..तिच्यासारखाच गोरापान ..शिवाय शासकीय नौकरी होती ..येताच घरभर त्याने आपली नजर फिरवून घेतली ..पण त्याला वाट होती ती फक्त राजकुमारीची आणि ती आली ..तिला त्या साडीच्या वेशात पाहून तो तिथेच फ्लॅट झाला ..त्याने तिला पाहताच आपली पसंती दर्शवली ..तिलाही तो पहिल्याच भेटीत आवडला होता ..ती गरीब असल्याने मुलाने सरळ लग्न करण्याची संमती दर्शवली होती आणि तीही त्याच्या घरी जाण्यास फार आतुर झाली होती ..पाहता - पाहता सर्वांच्या संमत्तीने त्यांचा विवाह सोहळा पार पाडला ..विवाहाचे ते सुरुवातीचे दिवस ती फारच आनंदी होती ..तिला स्वतःच्या घरी जे क्षण जगायला मिळाले नव्हते ते तिला फक्त काही दिवसातच राजकुमाराच्या घरी जगायला मिळाले होते ..तिने विवाहाआधि बरीच स्वप्ने पाहिली होती आणि ती सारी स्वप्न जगण्यासाठी शीतल फार आसुसली होती ..सुरुवातीचे काही दिवस तिला हवं तसच घडत होतं ..अगदी मायानगरी होती ..राजकुमार तिला हवं नको ते पाहायचा , तिची विचारपूस करायचा त्यामुळे ती फार खुश होती शिवाय पहिला - वहिला स्पर्श अनुभवता आल्याने ती फारच खुलली होती ..तिच्यासाठी तर आता ती जादुनगरीच ठरली ...ज्यात दोघे राजा राणी फार आनंदाने राहत होते ..त्यांच्या व्यतिरिक्त घरात फक्त सासूबाई होत्या ..त्याही तिला आईप्रमाणे वागवत असल्याने तिला कुठलीच काळजी नव्हती ..
विवाह होऊन फक्त काहीच दिवस झाले होते आणि तिने पाहिलेली सारी स्वप्न तुटायला सुरुवात झाली ..तिचा तो राजकुमार सकाळी ऑफिसला तर जायचा पण सायंकाळी मात्र नशेत धूर्त होऊन यायचा ..आवडीची भाजी नसली किंवा भाजीत मीठ कमी पडल या ना त्या कारणावरून तो तिच्यावर रागावू लागला ..आता तर त्याने तिच्यावर हात देखील उगारायला सुरुवात केली होती ..चार - चौघात तो तिचा जेवढा छळ करता येईल तेवढा करत असे ..तिची सारी स्वप्न आता भंगली आणि जादूनगरी अचानक एक भयानक जंगल बनत गेलं ज्यात ती अडकत गेली ..सासूबाईला आपल्या मुलाबाबत सर्व काही माहीत होत पण आपला मुलगा लग्न करून सुधारेल या आशेने तिने त्याच लग्न करून दिल..पण या नादात शीतलच जीवन मात्र खराब झाल आणि त्याच्यात काळीचाही फरक पडला नाही ..ती राजकुमारी मग कधीतरी जाऊन तिच्या कुशीत रडायची आणि आपलं मन हलकं करायची ..ती त्याचा मार , बोलणं सर्व काही शांतपणे सहन करत होती आणि हे आपल्या नशिबाचेच भोग आहेत म्हणून जगु लागली ..पण तिच्याही आयुष्यात अस काही लिहिलं होतं ज्याचा तिने कधीच विचार केला नव्हता ..

क्रमशः ....