Bandini - 5 in Marathi Fiction Stories by प्रीत books and stories PDF | बंदिनी.. - 5

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

बंदिनी.. - 5

मी ठरवलं.. आजपासून अनय पासून जरा लांबच राहायचं....

पुढे..

असं मी ठरवलं खरं.. पण त्याच्यापासून दूर राहणं खूप कठीण होतं माझ्यासाठी... एक क्षणही राहू शकत नव्हते मी त्याच्याशिवाय... तो जरा जरी दिसला नाही तरी सैरभैर व्हायचे मी.. पण माझी ही अवस्था मी तन्वी ला कधीच कळू दिली नाही.. एकदा बोलता बोलता मी तिला विचारलं होतं की 'तू अनय ला like करते का?'.. ती थोडीशी लाजली अन्‌ म्हणाली.. 'हो.. म्हणजे... असंच... as a friend.. ?'.. ती जरी स्पष्ट बोलली नाही तरी मला कळत होतं तिच्या मनात काय आहे ते..

त्यादिवशी मी, माझे दोन कलीगस्, आणि आमचे डायरेक्टर आणि मॅनेजर आम्ही आमच्या क्लायंट सोबत असलेल्या मीटिंग बद्दल आणि लोकेशन्स बद्दल डिस्कस करत होतो... साधारण तासाभराने आमची मीटिंग संपली.. मी केबिन मधून बाहेर आले.. सहज तन्वी च्या टेबल कडे बघितलं तर ती जागेवर नव्हती.. अनय ला चोरून बघणं हा तर माझा नित्यक्रमच होता.. ? पण बघितलं तर तो ही जागेवर नव्हता.. आज मला main room मध्येच डायरेक्टर सरांच्या PC वर बसून काम करायचं होतं..सरांची लगेच CEO सोबत मीटिंग होती त्यामुळे ते तिकडे जाणार होते.. तहान लागली होती म्हणून मी माझ्या केबिन कडे जायला वळले.. मी माझी पर्स आणि बॉटल माझ्या केबिन मध्येच ठेवायचे.. म्हणून मी पाणी पिण्यासाठी निघून गेले.. मी जेव्हा पण माझ्या केबिन मध्ये नसायचे तेव्हा बाहेर पडताना लाइट्स ऑफ़ करूनच बाहेर पडायचे.. आत्ताही लाईट्स ऑफ़ च होते.. मी दरवाजा ढकलून आत शिरले.. बघते तर अनय आणि तन्वी तिथे बसून मस्त गप्पा मारत बसले होते.. मला बघून तन्वी गप्प झाली... अनय ने ही फक्त एकदा मान वर करून माझ्याकडे बघितलं.. काळजात चssर्रर्र झालं.. असं वाटलं एक क्षण ही इथे थांबू नये.. पण असं तडकाफडकी निघून जाणं ही योग्य वाटलं नसतं.. मी माझी वॉटर बॉटल घेतली आणि एक शब्द ही न बोलता सरळ बाहेर पडले आणि माझ्या जागेवर येऊन बसले.. आता तहान काय, माझी भूक सुद्धा निघून गेली होती.. ?
माझ्या मागोमाग थोड्या वेळाने अनय सुद्धा main room मध्ये आला.. तो आला हे डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला दिसलं पण मी मुद्दामच त्याच्याकडे बघायचं टाळलं.. त्याच्या मागोमाग तन्वी ही आत आली.. मी कसबसं स्वतः ला सावरलं आणि कामामध्ये concentrate केलं...

- - - - - - - - - XOX - - - - - - - - -


विचार करता करता.. फ्लॅशबॅक मध्ये हरवताना कधी डोळा लागला कळालंच नाही...
"मीरा ss.. अगं ऊठ.. भूक लागलीय.. काहीतरी खायला दे"
विक्रांत च्या आवाजाने मला जाग आली.. खिडकीतून बाहेर बघितलं तर सूर्यराव परतीच्या प्रवासाला निघाल्याची चिन्हं दिसत होती... आळस देत मी समोर बसलेल्या विक्रांत कडे बघितलं.. तो माझ्याकडे आशाळभूत नजरेने बघत होता.. मला त्याच हसू आलं...तो म्हणाला..
" हसतेस काय, खरंच खूप भूक लागलीय.. दे ना लवकर काहीतरी.."
तितक्यात तो 'चाय' वाला परत आला.. विक्रांत ने त्याच्यासाठी चहा आणि माझ्यासाठी एक कॉफी घेतली.. बॅग मधून एक बिस्कीट पुडा आणि मेथीचे ठेपले काढून मी त्याच्यासमोर ठेवले.. आणि मी फ्रेश व्हायला गेले.. बेसिन समोर गेले आणि आरशात बघितलं.. तर त्यात मला अनय चा हसरा चेहरा दिसला... गालांवरून दोन अश्रू ओघळलेच...! संध्याकाळची वेळच ती शेवटी.. कातरवेळ!! मनाच्या तळाशी लपवून ठेवलेल्या जुन्या वेदना उकरून काढणारी..!

माझे अश्रू कोणाला दिसू नये म्हणून मी तोंडावर पटापट पाण्याचे हबके मारले.. चेहरा पुसला... आणि सीट वर येऊन बसले.. कॉफी प्यायल्यावर थोडी तरतरी आली.. थोड्या वेळासाठी का होईना मनावरची मरगळ दूर झाली.. Vacation चे दिवस नसल्याने की काय आज ट्रेन मध्ये फारशी गर्दी नव्हती...आणि समोर बसलेले मावशी अन्‌ त्यांचे मिस्टर बहुदा पाय मोकळे करण्यासाठी फेरी मारायला गेले होते... त्याचाच फायदा घेत विक्रांत ने माझे गाल ओढले..

"Oouch!! विक्रांत काय हा चावटपणा!" मी लटक्या रागाने बोलले..

"चावटपणा काय गं.. स्वतःच्या बायकोचेच गाल ओढले ना.. आणि तुला माहितीये ना मीरा मला तुझे गाल ओढायला किती आवडतं ते.. ??"

"अरे हो.. पण काही काळ वेळ? पुरे हं आता सोड बघू माझे गाल.." माझे गाल आता खरच दुखायला लागले होते.. पण विक्रांत काही गाल सोडायचं नाव घेत नव्हता..

तितक्यात समोरचे मावशी अन्‌ काका आले.. तसे विक्रांत ने पटकन माझे गाल सोडले आणि कानात earphone ? अडकवून तो लाजून वरच्या बर्थ वर निघून गेला ?...मला खूप हसू आले... ??मावशींनी बसल्या बसल्या परत त्यांच डोकं पुस्तकात खुपसलं.. आणि काकांनी शिळ्या झालेल्या न्यूजपेपर मध्ये ?...
मी हसतच होते ... बिचारा विक्रांत!! ??

हसता हसता परत डोळ्यांत अश्रू जमा झाले...एक सुस्कारा टाकून मी मागे सीट ला पाठ टेकली आणि परत भूतकाळात शिरले..

त्यादिवशी मी माझ्या केबिन मध्ये माझ्या chair वर बसले होते.. तितक्यात कुणीतरी मागून येऊन माझे गाल ओढले.. मी मागे वळून बघितलं तर 'अनय'!.. मनात आलं.. आज हा वाट तर नाही ना चुकला... मी त्याच्याकडे बघितलं तसं तो हसला... म्हणाला..

"तुझे गाल खूप मस्त आहेत.. एकदम लहान मुलांसारखे सॉफ्ट सॉफ्ट.. मला खूप आवडतात.. मला सारखं googly woogly whoosh करावसं वाटतं.. ?.."

मी त्याच्याकडे बघतच राहिले.. त्याने माझ्या मनगटापासून कोपरापर्यंतच्या हातावर त्याचा हात हळुवारपणे फिरवला..जणू मोरपीसच!.. म्हणाला..

"तुझी स्किन किती सॉफ्ट आहे.. एकदम लहान बाळासारखी.. "

मी तर जणू स्वप्नातच होते... मी काहीच बोलले नाही.. खरं तर काय बोलावं तेच मला सुचलं नाही.. तसा तो माझ्या पासून लांब झाला.. जवळच्या chair वर जाऊन बसला.. आणि त्याने मला विचारलं..

"तू कोणाला like करतेस का?"

तो एकदम असं काही विचारेल असं वाटलं नव्हतं मला.. पण मी लगेच भानावर आले.. आणि 'हो ' अशी मान हलवली.. आणि त्याच्याकडे तिरप्या नजरेने बघितलं..

त्याने माझ्याकडे न बघताच विचारलं "कोण आहे तो? "

मनात बोलले की ' बघ तूच.. तुला माझ्या डोळ्यांमध्ये कोण दिसतय.. माझ्या हृदयात माझ्या अंतरात फक्त तूच आहेस अनय... तुझ्याशिवाय इतर कोणाचा मी विचार ही नाही करू शकत रे... माझ्या मनाची तळमळ तुला दिसत नाहिये का.. की मुद्दाम छळतोयस मला.. तो तूच आहेस अनय.. तूच आहेस'.. माझे शब्द ओठांवरच राहिले..

त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला.. "असं नको ना बघू माझ्याकडे.. मग मला वाटतं की तो मीच आहे".. ?

मी चमकलेच.. कसला आहे हा!! खरच मनकवडा आहे का हा!! कसं कळतं ह्याला माझ्या मनात काय आहे ते...?

मनात आलं बोलावं स्पष्ट की ' हो तूच आहेस तो'... पण.. पण..
मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले.. पहिला प्रश्न म्हणजे प्रेमाच्या पुढचं पाऊल म्हणजे लग्न..! आणि आंतरजातीय विवाह माझ्या घरच्यांनी कधीच मान्य नसता केला.. त्यात माझ्या घरच्यांनी तर आत्ता पासूनच स्थळं शोधायला सुरुवात केली होती.. अनय ची स्वप्ने मोठी होती.. तो इतक्यात बंधनात अडकण्यासाठी तयार झाला नसता... खरं तर मीच त्याला तसं करू नसतं दिलं.. कारण मला माहीत होतं त्याची स्वप्ने काय आहेत त्याच्यासाठी...
दुसरं म्हणजे तन्वी त्याला like करत होती.. दिसायलाही छान होती.. तिच्या घरचं वातावरण माझ्यापेक्षा जरा फ्री होतं.. आढेवेढे घेऊन का होईना तिच्या घरच्यांनी त्यांचं हे रिलेशन मान्य ही केलं असतं.. ती सुद्धा तिला हवं ते भांडून मागून घेऊ शकत होती तिच्या घरच्यांकडून...
माझं तसं नव्हतं..? मी आई वडीलांच्या against जाऊन काही करू शकत नव्हते.. Rather मला तसं करायचंही नव्हतं.. ?
या सर्व गोष्टींचा विचार करून मी कितीतरी रात्री जागवल्या होत्या....

आणि अनय... तो माझा जीव की प्राण होता...!! ❤️

तितक्यात अनय चा आवाज कानावर पडला.. "काय झालं? कसला विचार करतेयस?"

मी मानेनेच 'काही नाही' म्हटलं...

तेवढ्यात परेश तिथे आला...

अनय कडे बघून म्हणाला, "क्या चल रहा है ईधर..? तू कही परी को प्रपोज तो नही कर रहा था ना?? ?"
अनय ने त्याला फक्त एक look दिला... तो परेश सोबत जास्त बोलायचा नाही...तो माझ्या मागे मागे करायचा नेहमी म्हणूनच असेल कदाचित.. आत्ताही त्याने परेश ला उत्तर देणं टाळलं..

परेशने त्याचा मोर्चा आता माझ्याकडे वळवला,
"परी सुन..इतने दिन मैने तुझे कुछ नही बोला.. मुझे लगा एक दिन तू खुद मेरे बारे में सोचेगी.. लेकिन अब वक्त आ गया है की मैं तुझे बोलू.... अगर तू किसी लडके के बारे में सोचने का सोच रही है.. तो सब से पहले line में मैं खडा हुँ.. भुलना मत.." तो अनय कडे खुन्नस ने बघत बोलला..

अनय ने एकदा माझ्याकडे बघितलं.. मी खाली मान घालून गप्प बसले.. काही क्षण शांतता पसरली केबिन मध्ये..
त्याच्या श्वासोच्छ्वासाचा वेग आता वाढला होता... त्याने हाताची मूठ घट्ट आवळली... आणि तो ताडकन उठून बाहेर निघून गेला..तो जाईपर्यंत मी त्याच्याचकडे बघत होते... त्याला परेश चा राग आला होता हे नक्की होतं..पण हे ऑफिस होतं ह्याचं त्याला ही भान होतं आणि मलाही.. आम्हाला दोघांनाही इथे सीन create करायचा नव्हता...

तो बाहेर गेल्यावर परेश माझ्या जवळ आला..
"परी तू मुझे like करती है ना?"

"परेश please.. Stop now! मी फक्त एक चांगला फ्रेंड म्हणून बघते तुझ्याकडे.. यापलिकडे माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाहिये??" - मी

"means यू डोन्ट लव मी?.. परी मी माझ्या आईला पण सांगितलय तुझ्याबद्दल.. तिला काही प्रॉब्लेम नाहिये".. - परेश

"तू वेडा आहेस का परेश... काहीही काय तुझं" - मी

"खरच परी.. मी आईला तुझा फोटो पण दाखवला...तिला सांगितलं शादी करूँगा तो इसी से करूँगा.." ?-परेश

"काsssय... माझा फोटो... तुझ्याकडे कसा आला? ?"-मी

" परी गुस्सा मत होना.. उस दिन तुम्हारे ऑफिस आने से पहले vnc से तेरा PC कनेक्ट करके उस में से तेरी फोटो ले ली"- परेश

हे ऐकल्यावर माझा पारा चढला...

" तुझी हिम्मत कशी झाली माझ्या PC ची vnc घ्यायची.. ऑफिस मधल्या एम्प्लॉईज च्या PC चे vnc घेण्याची authority असेल तुला.. पण माझ्या PC मधून माझे pics मला न सांगता घेण्याची authority कोणी दिली तुला ??... आणि मी कधीतरी तुला बोलले होते का की मी तुला त्या अर्थाने like करतेय.. किंवा माझ्या वागण्यातून कधी तुला तसं वाटलं का??? "

" नही परी.. But please.. मैं तुम्हे बहोत खुश रखूँगा.." - परेश

"परेश.. असं जबरदस्ती प्रेम नाही करता येत... प्लीज leave now.. Leave me alone ?"-मी

परेश ने पहिल्यांदा मला एवढं चिडलेलं पाहिलं होतं... तो निमुटपणे बाहेर निघून गेला.... आणि मी एवढ्या वेळ अडवून धरलेल्या माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली... ?


To be continued..
?

#प्रीत ?