आज खूप दिवसांनी मला तो अचानक आठवला कारण असच कि बाहेर खूप पाऊस पडत होता," त्याला पण ह्या पावसात गरम चहा नि भजी खायची इच्छा होत असे ,आणि आज मी पण तेच करत होती,"खुप आठवण येतेय रे तुझी फक्त एकदा भेट " मनात असे विचार सुरु असताना अचानक नेहाचा मोबाईल वाजला पहाते तर हॉस्पिटलमधून कॉल येत होता, आता ह्यावेळी पण emergeny असेल तर जावं लागेल म्हणुन तिने कॉल उचलला तर खरच एक complicated केस होती.मग नेहाने आवरायला घेतलं बाबांचा निरोप घेऊन तिने आपल्या कामाला सुरुवात केली.
ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले तिला खूप चांगले आशीर्वाद पण मिळाले. नेहा तिच्या केबिनमध्ये मघासचाच विचार करत बसली होती. तिला घरी जायचं होत पण पाऊस जणू तिला थांबवण्यासाठी पडत होता. शांत डोळे मिटून तिला त्याची आठवण झाली
मेडिकल च्या पहिल च वर्ष होत खूप exicted होती,कारण जाताना बाबाच्या डोळ्यात पाणी आलेलं तीन पाहिलं होत,आपल्या पिल्लूला दुर जाताना त्यांना त्रास होत होता कारण आई गेल्यानंतर आम्ही एकमेकांसाठी जगत होतो.पहिल्या दिवसापासून कॉलेज मध्ये जे काहि होईल ते सगळं नेहा आपल्ल्या बाबांना सांगायची तिच्या बोलण्यातून तिला आत आपल्या कामात,स्टडी मध्ये रस वाटत आहे असं तिच्या बाबांना दिसत होत. कॉलेज मधले दिवस जात होते.एकदिवस प्रॅक्टिकल शीट्स सबमिट करायची लास्ट डे आला ,त्यादिवशी नेहा खूप गडबडीत प्रॅक्टिकल लॅब मध्ये गेली ,प्रॅक्टिकल शीट्स तीने टेबलं वर ठेवली आणि शामिकापाशी येऊन उभी राहिली आणि प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली,प्रॅक्टिकल झाल्यावर शीट्स सबमीट करायचं वेळ आली तेव्हा समोर कोपऱ्यात काहीतरी दोन मूल गडबड करत होती ते पाहिलं न लगेच जवळ गेली आणि पाहते तर काय तिची प्रॅक्टिकल शीट्स वर असिड सांडलेले नेहाचा पारा प्रचंड चढला होता कि कसलं दुर्बुद्धी झाली आणि इथे प्रॅक्टिकल शीट्स गडबडीत ठेऊन गेले.नेहाला खूप राग आलेला नि त्याबरोबर संताप पण ती खूप रडवेली झालेली काय करा सुचत नव्हतं.त्यातला एक मुलगा अचानक बाहेर गेला तीला न सॉरी बोलता , त्यात अजून चिडली नि शमिका जवळ जाऊन उभी राहिली,प्रॅक्टिकल शीट्स सबमिट करायची वेळ आली नेहा रडवेल्या अवस्थेत केबिन मध्ये गेली तेव्हा मॅम नि नेहाला सांगितलं ," झालेला प्रकार मला कळला आहे टेन्शन नको घेऊ तुला तुझ्या प्रॅक्टिकल च्या वर्क वर मार्क्स मिळतील फक्त ह्या चुका अशा पुन्हा करू नको.",
नेहा विचारात पडली एवढ्या कडक मॅम नि असं अचानक का समजून घेतलं ,ह्या विचारात असताना तिला कळलं कि आपल्या पोटात कावळे ओरडत्यात मग ती कॅन्टीन ला गेली ऑर्डर दिली कारण शमिकाला यायला थोडा वेळ लागणार होता नेहाचं होईपर्यंत शमिका तिथं येऊन पोचली शामिकाने मघासचा विषय काढला तेव्हा
नेहा बोलिली कि ," यार ऐक तरी माझं "
नेहा,"काय ऐकायचं आता ..?"
शमिका ," अग मॅम नि तुला सुट दिली ती त्या मुलामुळे तो जर नसला असता तर तुला panishment झाली असती "
नेहा "अग म्हणजे काय त्याने का केलं. .?"
शमिका ," तो अचानक तुझ्या समोरून निघून गेला ना तेव्हा तो मॅमच्या कॅबिन मध्ये गेलेला नि झालेलं सगळं प्रकार त्यानं सांगितलं नि तो लगेच तिथून निघून गेला कारण त्याच्या हातावर पण ऍसिड सांडल होत आता बघ ह्यात चुकी कोणाची तिथे चुकून तू शीट्स ठेऊन आलीस. चुकून त्याच्याकडून पण झालं पण तो तुझ्यासाठी लगेच मॅम कडे गेला कारण तुला ओरडा नको म्हणून आणि त्यात तू अशी निघून आलीस .." हे एका दमात शामिकांने नेहाला सांगितलं