Passenger in Marathi Horror Stories by Dipak Ringe ।बोलका स्पर्श। books and stories PDF | Passenger

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

Passenger

रिक्षा....रिक्षा एका मुलीच्या आवाजाने त्या इसमाने त्याची रिक्षा तिच्या समोर येऊन उभी केली।

हुश्शह बरं झालं काका तुम्ही भेटलात, एवढ्या रिक्षा खाली गेल्या पण एकानेही थांबवली नाही। किती माज आलाय ह्या रिक्षा वाल्याना। तुम्ही मात्र देवासारखे धावत आलात।

तसं नाही बेटा. किती वाजलेत ते बघ.
ओहह मी तर घड्यालच बघितलं नाही. शिट घरी आत्ता ओरडा बसणार बहुतेक। साडे अकरा वाजून गेलेत।
काका खरच माफ करा हा. पण कामच इतकं होतं त्यात वेळेचे भानच राहील नाही बघा.

मी म्हणून थांबवली रिक्षा. दुसर कोण इथे गाडी थांबवणारही नाही आणि ह्या रस्त्याने गाडी चालवणारही नाही, आत्ता ह्या वेळेला.

मला पण खूप वेळ झाला म्हणून वेळ न दौडता घरी पटपट जात होतो . तेवढ्यात तू दिसलीस म्हणून मी गाडी थांबवली। आणि असं एवढ्या रात्री एकट्या मुलीने थांबायचं नसतं। कुणी कधी वेळ साधून घेईल सांगता येणार नाही।

हो काका पण आज जरा उशिराच झाला पण तुम्ही का एवढ्या घाईत निघालात? आणि बाकी सगळे का नाही थांबवत रिक्षा ह्या ठिकाणी.

मला नाही माहीत पण सगळे बोलतात हा रस्ता ठीक नाही आहे . रात्रीचं बारा वाजून गेले की इकडे मुंगीसुद्धा भेटणार नाही किंवा कुणा पाखरांचा आवाज सुद्धा येणार नाही। सगळेजण इकडे घाबरतात। आत्ता खर कारण मलासुद्धा माहीती नाही पण दुसरे बोलत आहेत म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असणारच ना। कशाला धोका पत्करायचा।

मला सांग तुला कुठे उतरायचं आहे। मला पण लवकर घरी जायचं आहे माझी बायका पोरं वाट बघत असतील। कधी नव्हे तो आज मला उशीर झाला जायला।

काका मला इथेच पुढे उतरायचं आहे जवळच. त्या पुढच्या पुलाच्या मागे. पाच मिनिटांच अंतर आहे.

बघ आलं तुझं ठिकाण।

हे घ्या काका पैसे आणि धन्यवाद. तुम्ही नसता तर मी तिथेच असते अजून।

राहूदे राहूदे पैसे नको देऊ, तू ही मला माझ्या मुलीसारखी आहेस एकटी दिसलीस म्हणून तुला गाडीत घेतलं नाहीतर पायपीट करत एवढ्या काळोखात एकटीला यावं लागलं असत। चल सांभाळून जा. मला पण उशीर झालाय।

धन्यवाद काका। तुम्ही सुद्धा सांभाळून जा. बाय✋

त्या इसमाने एकवार घड्यालात पाहिले. बापरे साडे बारा वाजलेत. आज तर खूप उशीर झालंय त्यात आज आमावस्या सुद्धा. दुष्काळात तेरावा महिना. घरून दहा बारा मिस कॉल. तो इसम थोडा घाबरलाच, छातीमध्ये धड धड सुरू झालेली।
संपूर्ण शरीर घामाघुम झालेलं. गाडी चालवताना सारख आजूबाजूला पाहत गाडी चालवत होता।

सामसूम रस्त्यावर आमवसेच्या काळोख्यात हा एकटाच गाडी चालवत होता, त्याच घर अजून दूरवर होतं। त्याने गाडीचा वेग वाढळवला ।

गाडी नदीच्या पुलाच्या पुढे आली, गाडी वेगात होती तो आजूबाजूला पाहत, शांततेला धुडसावत मागे टाकत सरळ एकमार्गी गाडी चालवत होता आणि अचानक त्याच्या मनात एकदम धस्स झाले।

समोर बघत आजूबाजूला लक्ष देत गाडी चालवताना त्याला रिक्षाच्या उजेडात समोरच एक बाई तिच्या लहान बाळाला काखेत घेऊन रस्त्याच्या कडेला उभी होती। तिला बघताच ह्याच्या मनामध्ये धस्स झाले।

गाडी अजून मागेच होती हा विचार करू लागला थांबवू का नको? थांबू का नको? अगोदरच घाबरलेला आणि सोबतही कोण नव्हतं, घरी बायका पोर वाट बघत होतीत, थोड्या विचाराने त्याने गाडी थांबवण्याचा विचार केला , एकटाच असल्याने सोबत होईल ह्या विचाऱ्याने त्याने रिक्षा त्या बाईच्या समोर उभी केली।

एवढ्या रात्री इथे काय करताय? कुठे जायचे आहे तुम्हाला?
त्या इसमाने त्या बाईची विचारपूस सुरू केली।

मला माझ्या घरी जायचं आहे, इकडच्या गावात आलेलो मी माझ्या बाळाला घेऊन. पण यायला उशीर झाला, आणि आत्ता एकही गाडी मिळत नव्हती म्हणून इथेच बाजूला कोण येत आहे का नाही म्हणून वाट बघत होते.

इथून जवळच आहे माझं घर पण सोबत छोटं बाळ आहे म्हणून एकटीला चालत नाही जाता आलं।

तुम्ही सोडता का मला? इथून जवळच आहे.

ठीक आहे. ठीक आहे. या बसा पटकन . येतानाच विचार करायचा ना. बाळ होत तुमच्या सोबत त्याचातरी विचार करायचा.

त्या इसमाने गाडी सुरू केली. गाडीचा वेग वाढवला, गाडी थोडी पुढे गेल्यानंतर अचानक कसला तरी जळलेला दर्प त्याला येऊ लागला . खूप विचित्र वास होता तो।

खूप घाण वास येत आहे ना? त्याने त्या बाईला सांगितले.

कुठला वास? मला नाही येत.

काय?

एकवेळ त्याने रिक्षाच्या समोरच्या दर्पणातून त्या बाईकडे बघितले।

बाळाला खांद्यावर घेतलेलं , साडी ठीक करत समोर बघत असतानाच त्याने त्याची नजर वळवली।
बाळ खूप सुंदर आहे तुमचं. तुमच्यावरच गेलंय। कायतरी बोलायचं म्हणून बोलून गेला।

हो पण खूप मस्तीखोर आहे. आज कसं काय शांत आहे काय माहित?

घड्याळात पाहिलं बापरे पाहुणे एक वाजला होता त्याच्या डोक्याला दरदरून घाम फुटलेला। त्या बाईने त्याला पाहिले आणि क्रूर स्मित केलं.

इथे ह्या वडाच्या झाडाखाली थांबा. मी इथेच उतरणार आहे.
बाई इथे कुठे मधेच उतरणार? इथे तर कुठे वस्ती ही दिसत नाही आहे? नाही मला इथून माझं घर जवळ पडतं.

त्या इसमाचे डोकं चक्रावले? इथे कुठं जवळ वस्ती आहे? असू दे ना मला नाही माहिती काय. मी माझं काम केलं तस पण एक वाजायला आलाय. माझंही घर आत्ता जवळच आहे।
ही म्हणते तर सोडू इथंच.

ठीक आहे उतरा इथे।

धन्यवाद साहेब. तुमच्या मुले मी माझ्या मुक्कामावर आले. रिक्षातून उतरत त्या बाईने त्याचे आभार मानले. पाकिटातून पैसे काढत त्या इसमाला देण्यासाठी हात पुढे केला.

एकवेळ तो इसम चरकलाच. अगोदरच घाबरलेला, त्यात अजून असं. त्याने पैसे घायला पुढे केलेला हात मागे केला.

माफ करा हा त्या बाईने आपला जळालेला हात मागे घेत दुसऱ्या हाताने त्या इसमाला पैसे दिले.

त्या इसमाचा हात थरथर कापत होता एकवेळ तिच्याकडे बघितलं आणि त्याने ते पैसे घेतले एकवेळ तिने स्मित केलं.
पैसे किशात टाकता टाकता खाली पडले .

ती बाई उचळणारच तेवढ्यात तो इसम म्हणाला थांबा मी घेतो.
त्यासाठी तो खाली पैसे घेण्यासाठी वाकला.
पैसे त्या बाईच्या पाया समोर पडलेले पैसे उचलण्यासाठी हात समोर करताच त्या इसमाची बोबडीच वळली, त्याचा हात थरथरत कापू लागला , घामाने अंग भिजून गेले, त्यांचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले, त्याचे अवसान निघून गेलं.
पैसे उचलताना त्याचे लक्ष तिच्या पायकडे गेलं तीच पाय उलट्या दिशेला होत.पाय संपूर्ण जळाला होता त्यातून सूक्ष्म असे किडे वळवळत होते.

त्यासाठी त्याने लगेचच त्या बाईकडे बघितले, बघतो तर तिचे संपूर्ण शरीर जळाले होते तिचा उग्र वास यायला लागला, त्याच्याने त्याला उलटी सारख झालं. ती विवस्त्र होती. संपूर्ण शरीरावर सूक्ष्म किड्यांनी जळत्या अंगावर वावर केला होता.

त्याचे लक्ष तिच्या बाळाकडे गेलं ते बघून त्याचा श्वास फुलायला लागला, त्याला धडती भरायला लागली. त्या मुलाचे मुंडकेच गायब होतं. तरीसुद्धा त्याचे हातपाय वळवळत होते.त्यात त्या बाईने कर्कश जोराची हसण्याची किंकाळी फोडली.
हिहीहीहीईहीहीहं..... ? एवढं सगळं बघून त्याची पाचावर धारण बसली .

त्यातच कशिबशी त्याने रिक्षा चालू केली आणि पूर्ण जीवात जीव असे पर्यंत चालवू लागला . गाडीचा वेग वाढलेला, पाठून त्या हडळीचा हसण्याचा आवाज येतच होताच . त्याच शरीर थरथर कापत होत. ह्रदय धडधड करत होत श्वास फुलत होतं त्यातच तो त्यांच्या घरासमोर आला रिक्षातून तावातावातून निघाला. धडपडत पडत झडत घरापाशी आला.

घराची बेल वाजवली दरवाजा जोर जोरात धाड धाड वाजवला तरी सुद्धा आतून काही प्रतिसाद नाही आला कदाचित आतले सगळे गाड निद्रेत होते.

आई कोणीतरी दार ठोठावत आहे. त्या छोट्या बाळाने आईला हलवत हलवत उठवले. "ते" आले वाटतं.त्या बाईने तिचा निष्कर्ष लावला.

बाहेर तो इसम जोर जोरात दरवाजा ठोठावत होता. दारावर हाताने धापा मारत होता त्याला श्वास घेता जमत नव्हतं. खूप भेदरलेला. त्याची पॅन्ट कपडे सगळे ओले झाले होते. पाय लटलटत होते अंगात त्राण उरला नव्हता .तरी सुद्धा तो दारावर जोर जोरात धापा टाकत होता.

आतून "आले " आवाज आला आणि दरवाजा उघडला गेला.

तसाच तो इसम त्या बाईवर पडला आणि दोघेही खाली पडले

ती बाई एकदम जोरात किंकाळली तिला एकवेळ समजलच नाही काय झालं ते. तिने दिव्याच्या प्रकाशात त्या इस्माकडे बघितले तर तिचाच नवरा होता. पण तो खाली जमिनीवर कोसळला होता त्याला ती उठवण्याचा प्रयत्न करत होती मात्र तो काही उठत नव्हता। त्याच संपूर्ण शरीर थंड पडले संपूर्ण थंड.


©दिपकरिंगे