Bhartiy lokshahi varil kahi chhupe halle in Marathi Philosophy by Rohit Patil books and stories PDF | भारतीय लोकशाही वरील काही छुपे हल्ले

Featured Books
Categories
Share

भारतीय लोकशाही वरील काही छुपे हल्ले

संघर्षाच्या अनेक खडतर वाटेतून ह्या भारत भूमीला स्वतंत्र मिळालं. ह्या स्वातंत्र्यासाठी अनेक आहुतींनी आपलं आयुष्य खर्ची घातलं , कित्येकांनी बलिदान दिलं. आणि मग कुठं एक नवी लोकशाही सत्ता निर्माण झाली, लोकांनी लोकांसाठी राज्य करायचं अशी संकल्पना भारत भूमीत रुजली, जिथं सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, वैचारिक, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना या सारख्या अनेक गोष्टींच स्वतंत्र मिळालं आणि वर्षानुवर्षे गुलामगिरी मध्ये जखडलेल्या, दडपलेल्या बहुजन (अर्थात सवर्ण सोडून इतर सर्व जाती) समाजाला एक नवी वाट निर्माण झाली,एक वेगळं काहीतरी करून दाखवायचं स्वातंत्र्य मिळालं, अनेक वर्षांपासून शिक्षणा पासून वंचित राहिलेल्या अनेक लोकांना शिक्षण घ्यायची संधी उपलब्ध झाली,

काही छुपे हल्ले आज ह्या लोकशाही वर केले जात आहेत,मी त्या आधी हे स्पष्ठ पणे सांगतो भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राजकिय पक्ष म्हणजे एक साप आणि दुसरा नागनाथ त्या बद्दल कोणतीच शंका नाही. तह्यात काँग्रेस ने पुरोगामी विचारांच्या व्यक्तींना संपवले आणि आज त्याच फळ त्यांना भोगायला मिळतंय ह्यात दुमत होऊच शकत नाही.
आज संघ भाजप ही काही हुकूमशाही ची वाट चालत आहे.ते कशी ...? .हे नागरिक या नात्याने समजून घेणं गरजेचं आहे. एक आपण या महान देशाचे नागरिक आहोत ह्या हक्कानं एक राष्ट्राविषयी प्रेम आहे ह्या आदर भावनेने मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ते आपण सर्वांनी समजून घेणे
आवश्यक आहे.

"Where books are burned,
In the end people will be burned"
....Heinrich Hein

पहिल्यांदा ते तुमची ज्ञान पुरवण्याची साधने नष्ट करतील,त्यामध्ये भलत्याच गोष्टी रंगवतील,तुमचे शैक्षणिक साहित्यात हस्तक्षेप करतील, त्यामध्ये स्वतःच गुणगान गातील त्यानंतर तुमचे शिक्षण बंद पाडतील,लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, तर कशाला जनता उठाव करतेय? हे धोरण आवलंबतील.
त्या नंतर दुसरा हल्ला हा माणसांच्या रोजगारावर करतील याचीच पार्श्वभूमी आज भारतात चालू झाली आहे ह्या काही वर्षात जवळपास 900 हुन अधिक उद्योग एकट्या महाराष्ट्र राज्यात बंद झाले. अखंड भारतात करोडो लोकांना ह्या काही वर्षांत रोजगार गमवावे लागलेत. जर कुटुंबाला व स्वतःला काहीही खायलाच मिळालं नाही तर माणूस जिथे पैसे मिळतील तिकडे धावतो, मग ते काम स्वतःच्या विचारांच्या विरुद्ध का असेना.
त्यानंतर तिसरा हल्ला हा बातम्या, वृत्तपत्रांच्यावर असेल,आश्या प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर असेल. वाईट गोष्टी दाबून ठेवतील वा त्या मानव हिताच्याच आहेत सांगून प्रसार करतील,
If you tell a big enough lie and tell
frequently enough, it will be believed.
- Adolf Hitler
(जर तुम्ही एखादी मोठी खोटी गोष्ट सारखी बोलत राहिला तर त्या वर मानस विश्वास ठेवतील)
हेच तंत्र ते वापरताना दिसतील.
त्यानंतर चौथा हल्ला हा सामाजिक सलोख्यावर असेल, जातीय तेढ निर्माण करून युवकांना खोट्या गुंगीत ठेवलं जाईल व या तापलेल्या युवकांच्या मस्तकावर आपल्या राजकारणाची पोळी भाजली जाईल.
"ह्या भारत भूमीत देवांची भीती घालून दानपेटी आणि धर्माची भीती घालून मतपेटी भरली जाते ह्यासारखं दुर्दैवच दुसरं काहीच होऊ शकत नाही."
त्यानंतर पाचवा हल्ला हा न्यायव्यवस्थेवर असेल, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगतात, ह्या देशाची लोकशाही धोक्यात आहे असं भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडलं नाही ते आज काही वर्षांत घडताना दिसून येतंय.
संविधाना वरती हल्ला,विरोधकांची हत्त्या, देशातील बँकांच्या वरती दबाव, सत्तेच्या विरोधात बोललं की कारवाई, सीबीआय सारख्या अधिकाऱ्यावर दबाव ह्यासारख्या प्रचंड गोष्टी आज सत्तेवर असणार भाजप करत आहे.
त्यासाठी वेळीच सावध व्हा काळ हातातून जरी गेलेला असला तरी, अधिकार आजून शाबूत आहेत, कदाचित ते अधिकार सुद्धा उद्या नाहीसे होतील त्या आंदोगरच ही चालली हुकूमशाहीची पाऊल आडवा आणि ह्या देशाचं स्वातंत्र्य चिरायू ठेवा.
-आपला रोहित नामदेव पाटील